वांग जाण्यासाठी घरगुती उपाय – Top 5 Best Home Remedies

वांग जाण्यासाठी घरगुती उपाय / वांग आयुर्वेदिक उपचार / वांग येण्याची कारणे / vang dag upay in marathi >>>स्वच्छ , नितळ, सतेज आणि गोरापान असा चेहरा हा आज केवळ तरुण मुला-मुलींनाच नव्हे तर प्रत्येक मध्यम वयस्क महिलाना देखील हवा-हवासा वाटतो. प्रत्येकाला स्वतःच्या चेहर्‍यावर कुठल्याही प्रकारचे वांग चे डाग, फोडचे डाग असू नये असेच वाटत असते. आपल्या चेहर्‍यावर येणारे कोणत्याही प्रकारचे डाग आपले सौंदर्य कमी करण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे आपला चेहरा हा सतेज आणि डाग विरहित राहून आपण सुंदर दिसावे असेच सर्वांना वाटत असते.

काही वेळा आपल्या चेहर्‍यावर फोड आले आणि नंतर त्याचे डाग राहिले तर आपण त्यावर बर्‍याच वेळा घरगुती उपाय करून ते कमी करू शकतो तसेच आपण चेहर्‍याला वांग आल्यास अनेक प्रकारच्या क्रीम लावत असतो किंवा काही वेळा त्यावर गोळ्या देखील घेतो पण त्याचा परिणाम केवळ 2 ते 3 दिवसच राहतो आणि त्या नंतर तेच वांग चे डाग किंवा फोड चे डाग मोठ्या प्रमाणात संपूर्ण चेहर्‍यावर पसरतात आणि वाढतच जातात.

या लेखात आम्ही तुम्हाला, वांग जाण्यासाठी साधे सोपे आणि अगदी 100% परिणामकारी असे उपाय सांगणार आहोत, त्याचबरोबर वांग आयुर्वेदिक उपचार साठी,आयुर्वेदिक घरगुती औषध कसे तयार करावे हे सांगणार आहोत, त्यासाठी तुम्ही आमचा हा “वांग जाण्यासाठी घरगुती उपाय/ वांग आयुर्वेदिक उपचार /वांग येण्याची कारणे ” लेख पूर्ण वाचवा. हे घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार केल्याने तुम्हाला या वांग च्या डागांपासून नक्कीच सुटका मिळेन आणि तुमचा चेहरा सतेज कांतीने उजळून दिसेल.

तर आता वांग वरील उपाय आणि उपचार बघण्याआधी वांग म्हणजे नेमके काय आणि ते वांग येण्याची कारणे काय आहे आहेत ते आपण सुरूवातीला पाहूया, तर वांग म्हणजे साध्या शब्दात सांगावयाचे झाल्यास, चेहर्‍यावर, जास्त करून गालावर छोटे-छोटे डोट्स, अगदी जवळ जवळ येऊन तयार झालेला एक काळसर पॅच , यालाच इंग्लिश मध्ये हायपर पिग्मिनटेशन म्हणतात. यात आपल्या गालाच्या वरची त्वचा हो थोड्या प्रमाणात जास्त गडद रंगाची दिसते आणि त्याचा पॅच म्हणजेच वांग चा डाग आपल्या चेहर्‍याच्या इतर रंगाशी साधर्म साधत नाही. आता आपण पाहूया की, वांग येण्याची कारणे काय आहेत, वांग चे डाग का येतात.

वांग येण्याची कारणे

वांग जाण्यासाठी घरगुती उपाय / वांग आयुर्वेदिक उपचार / वांग येण्याची कारणे / vang dag upay in marathi
चेहर्‍यावर वांग येण्याची कारणे

वांग किंवा हायपरपिग्मिनटेशन अशावेळी होते जेव्हा आपल्या त्वचे मध्ये जास्त प्रमाणात मेलालिन चे उत्पादन केले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे मेलालीन काय आहे, तर मेलालिन हे आपल्या त्वचेतील उपलब्ध असणारे एक पिग्ममेंट आहे, जे आपल्या त्वचेला रंग देण्यास मदत करते, परंतु काही वेळेस आवशकतेपेक्षा जास्त प्रमाणात मेलालिन चे उत्पादन झाले तर त्याचे मोठे डाग तयार होतात, तेच वांग चे डाग असतात. त्याचे काही प्रकार आहेत, ते म्हणजे वयानुसार पडणारे वांग चे डाग, मेलाज्मा म्हणजे किशोर वयात येणारे वांग टाइप डाग आणि स्कीन प्रॉब्लेम झाल्यानंतर होणारे वांग चे डाग आणि हे येण्याची कारणे म्हणजे-

कडक उन्हात जास्त प्रमाणात जाणे

सहसा त्वचा रोग तज्ञानुसार वांग येण्याची कारणे ही, वांग चे प्रकार आणि आणि वांगची लक्षणे यानुसार ओळखली जातात, परंतु आता आम्ही जी कारणे सांगत आहोत ती, सर्व सामान्य वांग येण्याची कारणे आहेत, आणि त्यात सर प्रथम असणारे कारण म्हणजे, भर दुपारी उन्हात जाणे, ऊन जास्त प्रमाणात किंवा जास्त कडक असणारे ऊन आपल्या चेहर्‍यावर किंवा गालावर पडले तर त्याचे वांग चे पॅच तयार होण्यास सुरुवात होते, त्यामुळे कडक उन्हात जाणे, हे वांग येण्याचे सर्वसामान्य कारण समजले जाते.

सतत त्वचेचा आजार होणे

वांग येण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे, सतत त्वचा आजार , त्वचेवर जळजळ होणे, किंवा जखम होणे यामुळे देखील त्या भागावरची त्वचा ही गडद रंगाची होते आणि त्याचाच वांग चा डाग तयार होतो. त्याचबरोबर जर सोरायसिस झाला असेल तर त्यामुळे देखील तुमच्या चेहर्‍यावर किंवा शरीरावर इतरत्र कुठेही हे वांग चे डाग येऊ शकतात. सतत त्वचेचा आजार होणे हे देखील वांग येण्याचे एक कारण आहे.

मेलाज्मा वांग डाग येण्याचे कारण

मेलाज्मा म्हणजे किशोर वयात होणारे त्वचे वरचे डाग किंवा फोड होय. म्हणजेच किशोरावस्थेमुळे तुमच्या चेहर्‍याच्या त्वचेवर डाग किंवा तपकिरी रंगाचे चट्टे पडू शकतात, ते म्हणजेच वांग चे डाग होय. अशा प्रकारे मेलाज्मा हे वांग येण्याची कारणे यामध्ये येते.

औषधांची रिएक्शन – वांग येण्याची कारणे

काही जास्त केमिकल युक्त औषधांचे सेवन केल्यानंतर देखील वांग चे डाग येऊ शकतात. जसे की मलेरिया किंवा कावीळ यासाठी आपण कोणते विशिष्ट खास औषध घेतेले, जे जास्त अॅंटी गुणांनी युक्त असेल तर आपल्या चेहर्‍यावर भुरकट रंगाचे वांग चे डाग हे पडू शकतात.

ही सर्व कारणे वांग येण्याची सर्वसामान्य अशी कारणे आहेत, त्यामुळे कडक ऊन, त्वचा जास्त खाजवणे आणि हाय अॅंटी- बाइओटीक घेणे टाळा. वांग चे डाग असल्यास आपल्या सर्व चेहर्‍याचे संपूर्ण सौंदर्य हे कमी होते आणि हे डाग आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात. कोणतीही त्वचेची समस्या ही इतर समस्येपेक्षा जास्त वेळ लावते दुरुस्त होण्यास, म्हणून यावर ताबडतोब औषधोपचार व उपाय करावेत.

वांग जाण्यासाठी घरगुती उपाय/ वांग वर आयुर्वेदिक उपचार /वांग वरील घरगुती उपाय

वांगची समस्या असेल तर त्यासाठी खालील घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार करावेत. त्याने आपल्या चेहर्‍यावरील वांग चे डाग लवकर जातील. त्यामुळे या लेखात आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही अवश्य करून बघा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

कडूलिंबाची पावडरचा फेसवॉश- वांग वरील उपाय

कडूलिंबाचा पाला घ्या त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि उन्हात वाळत घाला. उन्हामध्ये जवळपास दोन ते तीन तास वळत घाला . त्यानंतर हा पाला पुर्णपणे सुकल्यास त्यावर तीन ते चार चमचे मुलतानी माती टाका, हे एकत्र बारीक करा मिक्सर मधून आता आपल्याला बारीक पावडर तयार मिळेल.

वांग जाण्यासाठी घरगुती उपाय / वांग आयुर्वेदिक उपचार / वांग येण्याची कारणे / vang dag upay in marathi
कडूलिंबाची पावडर

अशी तयार पावडर बाजारात देखील तयार पॅक मध्ये उपलब्ध मिळेन. परंतु आपण आम्ही सांगितल्या प्रमाणे घरी देखील तयार करून वापरू शकता.

आता ही तयार पावडर जवळपास एक चमचा हातावर घ्यावी आणि त्यावर थोडे पाणी टाकावे॰ आणि आता या मिक्सर केलेल्या पावडरचा फेसवॉश म्हणून वापर करावा. असे दोन वेळा चेहरा धुतल्याणे आपल्या चेहर्‍यावरील वांग चे दाग हळू हळू करत पुर्णपणे नाहिशे होतील आणि आपला चेहरा हा पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी आणि वांगडाग विरहित व सुंदर दिसेल.

फळे खाणे – वांग जाण्यासाठी घरगुती उपाय

वांग जाण्यासाठी घरगुती उपाय / वांग आयुर्वेदिक उपचार / वांग येण्याची कारणे / vang dag upay in marathi
फळे खाणे

फळांची साल देखील वांग जाण्यासाठी अगदी 100% गुणकारी आहे. फळांच्या सालीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखे बरेच घटक असतात, पोषकतत्वे असतात जे आपल्या त्वचेचे रक्षण करण्यास मदत करतात. फळे तर आपण खावीच परंतु त्याचबरोबर या खालेल्या फळांची साल हे फेकून न देता ती तशीच रात्रभर एक ग्लास पाण्यामद्ये भिजत ठेवावी आणि दुसर्‍या दिवशी त्या पाण्याने आपला चेहरा धुवावा, त्याने आपल्या चेहर्‍यावरून वांग चे डाग हे पुर्णपणे निघून जाण्यास मदत होईल.

बटाटा – वांग जाण्यासाठी आयुर्वेदिक उपचार

बटाटा हा चेहर्‍यावरील वांग जाण्यासाठी खूप फायदेशीर असतो. बटाटा हा चेहर्‍यावरील वांग आणि त्याचबरोबर डार्क- स्पॉट व व्हरींकल आणि पिम्प्ल्स यासारख्या चेहर्‍याच्या बर्‍याच समस्या दूर होतील.

वांग जाण्यासाठी घरगुती उपाय / वांग आयुर्वेदिक उपचार / वांग येण्याची कारणे / vang dag upay in marathi
बटाट्याचा रस

बटाटाच्या वापराने तुमचा चेहरा हा नेहमी निरोगी आणि सतेज राहील. एक बटाटा घ्यावा आणि तो बारीक खिसणीने खिसून घ्यावा. आणि आता ही पेस्ट वांग आलेल्या डागांवर किंवा संपूर्ण चेहर्‍यावर लावावी. असे दिवसातून कमीतकमी दोन वेळा तरी करावे. एकसारखे हा उपाय सात ते आठ दिवस केल्याने तुमच्या चेहर्‍यावरचे वांग क्ष्चे दाग नक्कीच पुर्णपणे नाहिशे होतील यात काही शंका नाही.

खोबरेल तेल – वांग वरील उपाय

वांग जाण्यासाठी घरगुती उपाय / वांग आयुर्वेदिक उपचार / वांग येण्याची कारणे / vang dag upay in marathi
विटामीन सी कॅप्सुल

खोबरेल तेल हे देखील इतर उपाय प्रमाणेच वांग चे दाग जाण्यासाठी अतिशय फायदेशिर ठरू शकते. एक ते दोन चमचे खोबरेल तेल घ्यावे आणि त्यामध्ये विटामीन ‘c’ ही कॅप्सुल टाकावी आणि या मिश्रणाने वांग चे डाग असलेल्या जागी मालीश करावी, याने वांग चे डाग हे कायमस्वरूपी नाहिशे होतात आणि आपली त्वचा तजेलदार आणि नितळ व डाग विरहित होते.

मुलतानी माती – वांग आयुर्वेदिक उपचार

वांग जाण्यासाठी घरगुती उपाय / वांग आयुर्वेदिक उपचार / वांग येण्याची कारणे / vang dag upay in marathi - मुलतानी माती
मुलतानी माती

मुलतानी माती देखील वांग चे डाग घालवण्यासाठी महत्वाची ठरते. दोन चमचे मुलतानी माती मध्ये अर्धा किंवा एक चमचा लिंबाचा रस टाकावा आणि हा लेप वांग चे डाग असलेल्या जागी लावावा आणि सुकल्यानंतर ओल्या कॉटन ने पुसून टाकावे याने वांग चे डाग पुर्णपणे कमी होतात.

सारांश – वांग जाण्यासाठी घरगुती उपाय / वांग आयुर्वेदिक उपचार / वांग येण्याची कारणे / vang dag upay in marathi

आपल्या जर चेहर्‍यावर जर असे वांग चे डाग आले असतील आणि ते घालवण्यासाठी किंवा जाण्यासाठी तुम्ही परेशान असाल आणि तुम्हाला उपाय आणि आयुर्वेदिक उपचार कोणते आहेत ते जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही या लेखात सांगितलेले हे उपाय आणि उपचार करावेत याने तुम्हाला अनुकूल परिणाम जाणवेल. हे घरगुती उपाय आणि उपचार केल्याने वांग चे डाग जाण्यास नक्कीच मदत होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , वांग जाण्यासाठी घरगुती उपाय/ vang dag upay in marathi हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top