लिंबाचे फायदे / लिंबू उपयोग मराठी / लिंबूचे फायदे / limbu upyog >>लिंबु हे आपल्या उत्तम आरोग्यासाठी खुपच फायदेशीर ठरणारे आहे. आपण पाहतो की, खास करून उन्हाळयाच्या दिवसांमध्ये तर लिंबाचा खुप मोठया प्रमाणात वापर केला जातो कारण या बहुपयोगी लिंबाचे फायदे हे बरेच आहेत तसेच लिंबाचा वापर केल्याने आपल्याला उष्णतेचा त्रास देखील बर्याच अंशी कमी प्रमाणात होतो. अनेकजण तर सकाळी सकाळी अनाशेपोटी लिंबुपाणी पिऊनच आपल्या दिवसाची सुरूवात करतात,कारण उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला हवी असेल तेवढी ऊर्जा पुरवण्याचे सामर्थ्य हे केवळ लिंबू यामध्ये आहे, आणि म्हणूनच बरेच लोक अनाशेपोटी लिंबू पाणी घेत असतात. लिंबाचे पुरातन काळापासून असणारे महत्व आणि लिंबाचे फायदे लक्षात घेता, आपण आपल्या आहारामध्ये वेगवेगळया पध्दतीने लिंबाचा समावेश करतो.
आहारात लिंबाचा समावेश केल्याने, लिंबामध्ये असलेल्या आंबट चवीमुळे जेवणातील स्वाद हा तर वाढतोच वाढतो परंतु त्याचबरोबर लिंबामध्ये अनेक औषधी गूणधर्माचा समावेश असतो आणि त्याचा आपल्याला बर्याच प्रमाणात फायदा देखील होतो. लिंबाच्या फायद्यातील सर्वात महत्वाचा आणि सर्वपरिचित असा फायदा म्हणजे शरीरातील डिटॉक्सीनेशन करण्यासाठी बहुतांश लोक लिंबू पाण्याचा वापर करतात. याने आपले शरीर चांगलेच डीटॉक्स होते.
लिंबाचे असणारे फायदे लक्षात घेता, डॉक्टरसुध्दा लिंबू पाणी पिण्याचा सल्ला हमखास देत असतात. लिंबाच्या बहुविध फायद्यामुळेच तर खुप जण लिंबाचे लोणचे घालत असतात तर काही जण लिंबाचा वापर हा आपल्या आहारामध्ये करतात. खिचडीवर पिळुन खायला लिंबू वापरतात. भाजी, वरण कोंशिंबीर यामध्ये लिंबू पिळून खाल्ले तर जेवणाची चव ही अधिकच वाढते आणि त्याचा शरीराला फायदा देखील होतो. तर इतर अनेक पाककृतीमध्ये लिंबाचा सहभाग हा असतोच असतो.
लिंबू हे तर सर्व परिचित म्हणजे सर्वांनाच माहीत असणारे असे आहेच आणि ते घरात देखील उपलब्ध असते , परंतु या लिंबाचा स्वयंपाक घरातील वापरा सोबत इतर कोणता फायदा आहे ते आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही हा लेख घेऊन येत आहोत. चला तर मग अशा या इवल्याश्या लिंबाच्या फायद्यांविषयी जाणून घेऊन माहिती “लिंबाचे फायदे / लिंबू उपयोग मराठी/ लिंबूचे फायदे / limbu upyog” या लेखात अधिक माहिती काय आहे ते –
Table of Contents
लिंबाचे फायदे / लिंबूचे फायदे / लिंबू उपयोग मराठी / limbu upyog
आपल्या दैनंदिन वापरात असणारे छोटेसे लिंबू आकाराने लहान मात्र गुणधर्माने अतिशय महान असे आहे. या लिंबाचे फायदे आणि उपयोग बरेच आहेत. आपल्या घरात असणारे हे लिंबू किती फायदेशीर आहे आणि लिंबाचे उपयोग काय ते पाहूया खालीलप्रमाणे :
अपचन झाल्यास लिंबू फायदेशीर
अपचनाच्या समस्या या जवळपास सगळयानाच उदभवतात. कधी काही अतिरीक्त खाण्यात आले की लागलीच अपचनाची समस्या उदभवते. पण रोज कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळुन पिल्याने हा अपचनााचा त्रास होत नाही. लिंबू पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आणि नुसते लिंबु पाणी पिल्यास त्रास होत असेल. तर तुम्ही त्यामध्ये मिठ टाकु शकता. यामुळे मग चवीनुसार मीठ टाकले तर लिंबुपाण्याची चव देखील वाढेल आणि पचन पक्रिया सुध्दा सुरळीत राहण्यास मदत होईल. अपचन या समस्येवर लिंबू अतिशय फायदेशीर ठरते.
कोमट पाणी आणि लिंबू आरोग्यासाठी फायदेशीर
लिंबामध्ये मोठया प्रमाणात सायट्रीक अॅसिडचा समावेश असतो आणि हा घटक आपल्या आरोग्यासाठी खुपच उपयोगी आणि लाभदायी आहे. कोमट पाण्यामध्ये लिंबु पिळुन पिल्यामुळे आपल्याला आरोग्यदायी फायदा होऊ शकतो. लिंबु पाणी पिल्यामुळे सर्दी, खोकला यासांरख्या आजारांपासुन आपली सुटका होण्यास मदत होते. पण याची तुमच्या शरीराला रोजची सवय असली पाहिजे. तुम्ही जर रोज नियमित लिंबु पाणी पित असाल तरच याचा फायदा होईल. नाहीतर सर्दी खोकल्या झाल्यावर लगेचच लिंबु खाल्ले तर अधिकच सर्दी, खोकला वाढेल म्हणुन याचा वापर रोज नियमित केल्यास मग कोणता त्रास होणार नाही.
मूतखडा चा त्रास कमी करण्यास मदत :- लिंबाचे फायदे
तुम्हाला जर मुतखडयाचा त्रास असेल तर डॉक्टरांना विचारून तुम्ही नियमित सकाळी दोन लिंबाचा रस कोमट पाण्यामध्ये मिक्स करून पिल्याने मुतखडयाचा त्रास उदभवणार नाही आणि खडा आपोआप पडून जाईल. कारण लिंबामध्ये योग्य ती पोषकतत्त्वे असतात जे की शरीरामध्ये मुतखडयाची समस्या वाढवण्यास रोखतात. मुतखडयाची समस्या त्रास थांबवण्यासाठी लिंबु खाणे हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे. कारण लिंबामध्ये असलेले औषधी गुणधर्म शरीरात मुतखडयांच्या पेशीचा प्रादुर्भाव वाढण्यापासुन वाचवतात. त्यामुळे मूतखडयाचा त्रास असेल तर हा खुप चांगला फायदा आहे लिबांचा.
डिहायड्रेशन चा त्रास कमी करते :- लिंबू उपयोग मराठी
आपण पाहतोय की आपले वेळी अवेळी झोप आणि, जेवणाच्या वेळा बदलल्या जातात. झोप पुरेशी मिळत नाही. कामाची दगदग तसेच बदलते लाईफ स्टाईल, या सर्व कारणांमुळे शरीरातील अतिरीक्त चरबी, विषारी पदार्थ, अनावश्यक घटक हे सर्व आपल्या शरीरातुन बाहेर फेकले जाण्यास काही प्रमाणात अडथळा निर्माण होत असतो. यामुळे असे झाल्याने अनेक आजार आपल्या शरीराला जखडतात. त्यामुळे त्या समस्यांना आपल्यापासुन दुर ठेवण्यासाठी लिंबु आणि लिंबु पाण्याची नियमित सेवन केल्यास फायदा होतो आणि आपला डिहायड्रेशन चा त्रास कमी होण्यास मदत होते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवते :- लिंबूचे फायदे
कधी कधी तोंड कोरडे पडते. वारंवार लघवी लागते तसेच सारखे पाणी घ्यावेसे वाटते. हे सर्व होण्याचे कारण म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास हे त्रास उदभवतात. मग या समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणजे लिंबु ॰डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही सकाळी उठल्या उठल्या नियमित लिंबु पाणी पिले तरी हया समस्या उदभवत नाहीत, तसेच मोड आलेल्या कडधान्यांवर, सलादवर, लिंबु पिळुन खाल्ल्याने तोंड कोरडे पडल्याच्या समस्या ह्या देखील उदभवत नाहीत.
रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यास मदत
लिंबाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील कार्य व्यवस्थित रित्या लिंबामुळे चालतात. लिंबामध्ये व्हिॅटमिन सी असल्याकारणाने रोगप्रतिकारकशक्ती बळकट होते. तसेच मलेरीया आणि कॉलरा यांसारखे रोग झाल्यास उपचाराच्या वेळी लिंबाचा वापर औषधी म्हणुन उपयोग केला जातो. विशेषतज्ञांच्या मते लिंबु हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि उपयुक्त असा आहे.
शरीराला ऊर्जा मिळते
लिंबामध्ये अॅंटीबॅक्टेरीयाचे गुणधर्म असतात. म्हणुन तुम्ही जिम किंवा वर्कआउट करत असाल तर तुमचा ट्रेनर वर्कआउट झाल्यावर लिंबुपाणी पिण्याचा सल्ला देतात. लिंबु पाणी पिल्यामुळे उर्जा मिळते आणि शरीरातील मीठ पुन्हा भरले जाते. अशा प्रकारे शरीराला ऊर्जा पुरविण्याचा महत्वाचा फायदा हा लिंबाचा आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लिंबू अतिशय फायदेशीर आहे.
भात मोकळा आणि दानेदार करण्यासाठी (limbu upyog)
बर्याच वेळेला असे होते की, आपण भात कुकर मध्ये लावतो, तर कधी पाणी जास्त झाले तर किंवा कुकरची शिट्टी जास्त झाली तर आपला भात अगदी गच्च आणि चिकट बनतो. अशावेळी भात शिजवत असताना किंवा शिजवून झाल्यानंतर जर चिकट झाला असेल, तर त्यामध्ये आपण थोडे लिंबु पिळल्यास भाताचे शित हे अगदी वेगवेगळे होतात आणि भात मोकळा व दानेदार बनतो.
त्वचेसाठी फायदेशीर
आपल्या त्वचेच्या गोरेपणा साठी, नितळ कांती साठी लिंबू आणि लिंबू रस अगदी वरदान आहेत. लिंबू रसामुळे त्वचा ही खुप सुंदर आणि तजेलदार बनते. चेह-यावरील चटटे, छिद्र कमी करण्यास लिंबु हे खुप फायदेशीर आहे. त्यामुळे जर आपल्याला त्वचेची कोणती समस्या असेल किंवा गोरेपणा वाढवायचा असेल तर आपण लिंबाचा वापर करावा याचा अतिशय चांगला परिणाम आपल्याला जाणवेल.
भाजीचा खारटपणा कमी करण्यासाठी
आपण पाहतो की, एखाद वेळी गडबडीत चुकून आपल्याकडून भाजी , वरण किंवा एखाद्या खाद्य पदार्थ मध्ये मीठ जास्त पडले तर आपली संपूर्ण मेहनत वाया जाते आणि भाजी किंवा वरण हे खारटपणा मुळे खाण्या योग्य राहत नाही. तर अशा वेळी भाजीमध्ये किंवा वरणामध्ये मीठ हे जास्त झाले किंवा भाजी, वरण खारट झाले असेल तर त्यामध्ये लिंबु पिळुन खाल्ल्यास त्यातला खारटपणा हा बर्याच प्रमाणात कमी होतो.
कर्करोग वाढण्यापासून रक्षण
लिंबाच्या नियमित सेवनामुळे कर्करोगाच्या वाढीस प्रतिबंध घालण्यास मदत होते. लिंबामध्ये असलेले घटक कर्करोग वाढण्यापासुन बचाव करतात. त्यामुळे ज्या व्यक्तिला कर्करोग झाला आहे त्यांना आपण जर जास्तीत जास्त प्रमाणात लिंबू दिले तर त्याचा चांगलाच परिणाम होईल आणि त्यांचा आजार पसरणार देखील नाही.
अॅसिडीटी आणि जळजळ कमी करण्यासाठी
अॅसिडीटी आणि जळजळ यावर अनादी काळापासून वापरण्यात येणारा सर्वात रामबाण आणि प्रभावी उपाय म्हणजे लिंबू आणि लिंबू पाणी . लिंबाची चव ही आंबट असते आणि पोटातील तयार झालेले अतिरिक्त आम्ल शमविण्याची शक्ति ही लिंबूत असते, त्यामुळे अॅसिडीटी झाली किंवा पोटात जळजळ होत असेल तर लिंबु आणि पाणी पिल्याने हा त्रास कमी होतो.
डोक्यातील कोंडा घालवण्यास मदत
जर आपल्या डोक्यात कोंडा झाला असेन आणि त्याने आपण त्रस्त असाल तर लिंबू चे साल किंवा लिंबू रस डोक्यावरील केसांना लावले तर डोक्यातील कोंडा हा निघुन जातो. तसेच त्वचेवरील डाग सुध्दा लिंबु तोंडावर चोळल्याने निघुन जातात. त्यामुळे लिंबु हे प्रत्येकच गोष्टीमध्ये अतिशय फायदेशीर आहे. बर्याच मुलींसाठी डोक्यातील कोंडा कमी करण्यास फायदा होतो
सारांश – लिंबाचे फायदे /लिंबूचे फायदे/लिंबू उपयोग मराठी / limbu upyog
अशा प्रकारे आपण आपल्या घरात असणार्या लिबू चे उपयोग आणि लिंबाचे फायदे कसे करून घ्यावे ते या “लिंबाचे फायदे /लिंबू उपयोग मराठी / limbu upyog” या लेखातील माहिती द्वारे करून घेऊ शकता. लिंबाचे उपयोग आणि लिंबाचे फायदे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमचा हा लेख अतिशय फायदेशीर ठरेल आणि यातील माहिती उपयोगी देखील येईल.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले ,लिंबाचे फायदे घरगुती माहिती / लिंबूचे फायदे /( limbu upyog ) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)