कुरूप साठी घरगुती उपाय – Kurup On Foot Best 12 home Remedies

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment >>> कुरूप हा तसा फार भयानक किंवा त्रासदायक आजार नसला तरी एका सिमित रेषेपलीकडे हे दुखणे किंवा आजार गेला तर त्याचा त्रास हा होतोच आणि मग ते नियंत्रणात ठेवण्यास कमी करण्यास जास्त कालावधी लागतो, त्यामुळे कुरूप झाल्याची लक्षणे वाटल्यास लागलीच त्यावर उपाय आणि उपचार करावेत. म्हणजे ते वाढणार नाही आणि त्याचा त्रास देखील जास्त होणार नाही.

कुरूप म्हणजे आपल्या शरीरा बाहेरील कुठलीही कृत्रिम वस्तु ही शरीराला रुतून बसलेली वस्तु ती बाहेर न निघता थोड्याच अंशी का होईन त्वचेच्या आत राहून त्वचा बाहेर काही जखम होणे म्हणजे कुरूप किंवा खुरूप हे होय. ही वस्तु म्हणजे काटा, कूस, काच, लोखंडी यांपैकी कोणतीही वस्तु असू शकते. आपल्या शरीरात थोडा काटा झरू असला तरी देखील आपले शरीर तो कधीच स्विकारू शकत नाही. कुरूप ला इंग्लिश मध्ये कॉर्न असे म्हणतात आणि हे कुरूप किंवा कॉर्न आपल्या शरीराच्या त्वचेवर अगदी किडया प्रमाणे वाढत जात असते. तसेच आपल्या शरीराच्या त्वचेला अगदी घट्ट चिटकुन राहते.

सुरूवातीला या कुरूप चा आपल्याला त्रास होत नाही, ते दुखत नाही परंतु काही दिवसानंतर कुरूप वाढल्यास त्याची जखम चिघळल्यास मात्र त्याचा अतिशय त्रास होतो आणि त्यावर भार पडल्यास ते भयानक त्रासदायक वाटते. काही वेळेला आपल्या शरीराला झालेले हे कुरूप दिसण्यास देखील विद्रूप दिसते आणि आपल्याला अगदी त्रासदायक देखील ठरत असते. अशा वेळी या कुरूप ला काढून टाकण्यासाठी कमी करण्यासाठी बरीच लोक याला सुई किंवा पिन च्या सहाय्याने तर कधी कधीऊ नखाने काढण्याचा किंवा कुरतडण्याचा प्रयत्न करत असतात परंतु; असे केल्याने ही कुरुम कमी होण्याएवजी जास्तच वाढते किंवा अजून खोल जाते.

कुरूप हे त्वचेच्या तिसर्‍या लेयर च्या खाली गेले तर त्याचा आपल्याला जास्त त्रास होण्याची शक्यता देखील निर्माण होते, त्यामुळे असे सुई, पिन किंवा नखाने कुरूप काढण्याचा किंवा उकरण्याचा प्रयत्न हा अजिबात करू नये. काही वेळेस हे असे करणे आपल्याला अतिशय महागात पडू शकते. आपल्याला या त्रासापासून सुटका मिळवून देण्यासाठीच आम्ही या लेखासह येत आहोत यातील माहिती आणि घरगुती उपाय आणि उपचार हे तुम्हाला नक्कीच बर्‍याच प्रमाणात उपयोगी येतील आणि त्याचा फायदा तुम्हाला होऊन तुमचा त्रास देखील कमी होईल.

आपला हा त्रास कमी होण्यासाठीच आम्ही ‘कुरूप कमी करण्यासाठी घरगुती उपाय’ हा लेख सादर करीत आहोत. या लेखात असे काही सोपे आणि बिन त्रासदायी असे उपाय सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला 100% फायदा हा होणारच आणि लवकरात लवकर झालेले कुरूप हे देखील कमी होणार.सुरूवातीला आपण जाणून घेऊया की कुरूप होण्याची कारणे काय आहेत?

कुरूप होण्याचे कारण

साधारणपणे कुरूप हे आपल्या पायात किंवा हातात काटा टोचला आणि पुर्णपणे बाहेर नाही निघला तर होते. आपल्या त्वचेला पाच लेयर असतात त्यातील तिसर्‍या लेयर पर्यंत कुठलीही इतर वस्तु शरीरात, त्वचेमध्ये राहिले तर त्याचे कुरूप होते.

कुरूप साठी घरगुती उपाय / कुरूप उपचार /कुरूप कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आपल्याला जर काटा रुतून, कशाचा मार लागून किंवा काही कारणास्तव कशाची ईजा होऊन कुरूप झाले असेन तर आपण या लेखास पूर्ण वाचावे आणि त्यातील उपाय करावेत. हे उपाय केल्याने तुमचं हा त्रास नक्कीच लवकरता लवकर बारा होईल आणि तुम्हाला आराम मिळेन. तर हे कुरूप कमी करण्याचे घरगुती उपाय आणि उपचार खालील प्रमाणे आहेत.

लिंबाचा रस – कुरूप साठी घरगुती उपाय

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment
लिंबू रस

कुरूप झाल्यास त्यावर हमखास उपयोगी येणारा आणि फायदेशीर ठरणारा उपाय म्हणजे, लिंबाचा रस हा आहे. आपल्या शरीरावर जर काटा लागला असेल तर तो आत मध्ये जवळपास चार ते पाच दिवसांनंतर नाही निघाला तर त्याचेच कुरूप हे बनत असते. त्यामुळे जर आपल्याला काटा त्वचेमध्ये रूतला आणि लवकर नाही निघाला तर त्याला दुर्लक्षित न करता त्यावर लिंबाचा रस टाकावा. असे केल्याने त्याचा त्रास देखील होणार आणि त्याचे कुरूप देखील होणार नाही .

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment
लिंबाच्या पानाची पेस्ट

लिंबाचा रस टाकल्याने त्या जागी कोणतेही इन्फेकशन देखील होणार नाही कारण लिंबू हे एक अॅंटीबक्टेरियल गुणधर्माने परिपूर्ण असे समजले जाते. त्यामुळे कुरूप झाले असेल तर त्यावर देखील लिंबाचा रस टाकावा आणि काटा रूतला असेल तर त्यावर देखील लिंबू रस टाकावा त्याने कुरूप होणार आणि आणि आधीच झाले असेल तर त्याचा त्रास न होता ते कुरूप कमी होण्यास मदत होईल.

रुईचे पाण – कुरूप वर घरगुती उपाय

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment
रुई कुरूप साठी फायदेशीर उपाय

रुईच झाड हे देखील औषधी गुणधर्माने परिपूर्ण समजले जाते. त्यामुळे कुरूप आलेल्या जागी जर रुई चे पाण लावले तर झालेले कुरूप हे नक्कीच बारे होण्यास मदत होते. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेमके हे रुई चे पाण कुरूप कमी करण्यासाठी वापरायचे कसे, तर रुईचे पाण वापरण्यासाठी हे पाण घ्यावे आणि स्वच्छ धुवावे त्यानंतर त्याला त्या पानाच्या देठापासून थोडे तोडावे आता यातून एक पांढर्‍या रंगाचा चिक बाहेर येईल. हा पाण्यासारखा, दुधा सारखा दिसणारा चिक जो रुई च्या पांनातून बाहेर येईल तो  तसाच पानाच्या सहाय्यानेच कुरूप झालेल्या जागेवर लावावा. त्यामुळे कुरूप जिरण्यास मदत होईल.

गरम मीठ – kurup on foot home remedies

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment
गरम मीठ

मीठ हे देखील कुरूप कमी करण्यास आणि त्याचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते. त्यासाठी मीठ घ्यावे आणि ते गरम करून घ्यावे आणि ते गरम मीठ एका कॉटन च्या कपड्यात बांधावे. आता या गरम मीठाच्या बनवलेल्या कपड्याने कुरूप झालेल्या जागी चांगले शेकावे. गरम मीठ लवकर थंड होत नाही आणि त्याचा शेक देखील खूप चांगल्या प्रकारे बसतो. तसेच मीठ असल्याने त्या जागी किंवा कुरूप मध्ये काही इन्फेकशन झाले असेल तर ते देखील नाहीसे होते आणि कुरूप कमी होण्यास मदत होते. असे सतत चार पाच दिवस केल्यास तुमचे झालेले कुरूप हे लवकर बरे होईल आणि थोड्या दिवसात नाहीसे देखील होईल.

कॉर्न कॅप्स – कुरूप उपचार

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment

कॉर्न कॅप्स म्हणजे एक प्रकारची मेडिकल मध्ये मिळणारी पट्टी आहे. आपण मेडिकल मधून ही कॉर्न कॅप आणून कुरूप झालेल्या जागी लावावे. कॉर्न कॅप ही लहान आणि मोठ्या दोन्ही आकारात उपलब्ध असते. त्यामुळे आपल्याला झालेल्या कुरूपच्या आकारानुसार ही कॉर्न कॅप लहान -मोठ्या आकारात मिळते त्यामुळे आपल्या कुरूप च्या आकारा उसर ही मेडिकल मधून कॉर्न कॅप आणून आपल्या कुरूप झालेल्या जागी लावावी त्याने भरपूर आराम मिळतो आणि जर कुरूप चा आकार हा छोटा असेल तर ते कुरूप ह्या कॉर्न कॅप च्या वापराणे पुर्णपणे बारे देखील होते. मात्र कुरूप चा आकार हा छोटा असावा.

खोबरेल तेल

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment
खोबरेल तेल

खोबरेल तेल हे देखील कुरूप झालेल्या लोकांना बर्‍याच प्रमाणात मदत करते. खोबरेल तेल थोडे कोमट गरम करून कुरूप झालेल्या जागी त्याने मसाज करावा याने कुरूप दूर होण्यास आणि कमी होण्यास बर्‍याच प्रमाणात मदत होते. खोबरेल तेलात अॅमेगा- 3 हा गुणधर्म असल्याने त्यापासून त्वरित आराम मिळतो. कोमट खोबरेल तेलणे मसाज केल्याने ते कुरूप मऊ पडून काही दिवसात नाहीसे होते.

हळद

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment
हळद

हळद ही अनेक आजारावर अतिशय गुणकारी आणि प्रभावशाली अशी आहे कारण हळद अनादिकाळापासून आयुर्वेदिक पदार्थमध्ये गणली जाते. हळद ही कुरूप वर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार म्हणून वापरण्यासाठी खोबरेल तेलात मिक्स करावी आणि कुरूप झालेल्या जागी लावावी. ही लावलेली हळद जवळपास दोन ते तीन तास नंतर धुवावी, हळद धुतल्या नंतर त्यावर विटामीन c च्या कॅप्सुल ने हळुवार मसाज करावी. असे केल्याने कुरूप पासून आराम मिळतो आणि त्याच्या वेदने पासून सुटका होते.

गावा कडील उपाय

खेड्यातील लोक कुरूप वर खडी मीठाचा चटका देतात. त्याचबरोबर गुळाच्या खड्याचा देखील चटका कुरूप झाले असेल तर त्यावर देतात. काही ठिकाणी तर खापराच्या तुकड्याला देखील गरम करून गरम गरम असतानाच त्याचा चटका दिला जातो आणि त्याने हमखास फरक देखील पडतो. आपल्याला हे उपाय करण्यास नक्कीच भीती वाटेल परंतु या उपायाने बराच फायदा हा होतो.

पपई – कुरूप वर घरगुती उपाय

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment
पपई

पपई ही देखील कुरूप झाले असेल तर ते कमी करण्यास अतिशय फायदेशीर ठरते. आपल्याला माहितच असेल की पपई मध्ये भरपूर प्रमाणात कल्शियम असते त्यामुळे पपई चे तुकडे हे मिक्सर मधून बारीक करून त्याचा रस हा कुरूप झालेल्या जागेवर लावावा. हा पपई च्या रसचा उपाय नियमित तीन ते चार दिवस केल्याने आपला कुरूप चा त्रास हा नकीच कमी होईल आणि आराम मिळेन.

मोहरीचे तेल

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment
मोहरी तेल

मोहरीचे तेल हे देखील कुरूप वर अत्यंत गुणकारी असे औषध आहे. कुरूपच्या जागेवर मोहरीचे तेल नियमित लावल्याने कुरूप मऊ पडून लवकरात-लवकर पुर्णपणे बरे होण्यास मदत होते आणि त्याचा त्रास देखील होणार नाही.

 तिळाचे तेल

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment
तिळाचे तेल

तिळाचे तेल हे देखील कुरूप दूर करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून अत्यंत फायदेशीर ठरतो.कुरूप चा आकार हा लहान असो किंवा मोठा असो, दोन्ही प्रकारचे कुरूप कमी करण्यासाठी तिळाचे तेल हे फायदेशीर ठरते आणि तिळच्या तेलाच्या वापराणे कुरूप लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा हा त्रास कमी करायचा असेल तर हा उपाय करावा.

कडूलिंबाचा पाला – कुरूप उपचार

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment
कडूलिंबाचा पाला

कडूलिंबाचा पाला हा त्वचेच्या सर्व समस्या वर आयुर्वेदिक उपाय आहे. कडूलिंबाच्या पाल्याने सर्वच त्वचेसंबंधी आजार असल्यास ते नाहीसे होतात. सर्व प्रथम पाला नीट करून घ्यावा आता हा पाला मिक्सरमधून दळून घ्यावा आणि कुरूप झालेल्या जागीवर लावावा आणि शक्य असल्यास त्या जागेवर कपडा भांधून ठेवावा. असे दिवसातून दोन ते तीन वेळा करावे असे केल्याने कुरूप पुर्णपणे ठीक होतात. जर उन्हाळ्याचे दिवस तर हा मिक्सर केलेला काढा आपण फ्रीज मध्ये ठेऊन देखील वापरू शकता.

मध – कुरूप कमी करण्यासाठी घरगुती उपाय

कुरूप साठी घरगुती उपाय /कुरूप वर उपाय /कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप उपचार/kurup on foot home remedies/ kurup on foot treatment
मध

मधच्या वापराने देखील कुरूप पुर्णपणे ठीक होऊन आराम मिळतो एक चमचा मध घेऊन त्यात एक ते दोन थेंब खोबरेल तेल टाकावे , आणि आता हे कुरूप झालेल्या जागेवर लावावे. मध असल्याने त्वचेवरील कोणतीही जखम बरी होण्यास मदत होते. त्यानंतर कोमट पाण्याने धुवावे असे केल्यास त्वचेवरील कुरूप पुर्णपणे बरे होऊन आराम मिळतो आणि काही दिवसात हे कुरूप नाहीसे होतात.

वरील सर्व उपाय हे खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरणारे असे आहेत. हे सर्व उपाय केल्याने याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही. कुरूप हा दिसण्यास आणि वाटण्यास लहान आजार असल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण नंतर हा आजार मोठा मोठा होत जातो, त्यामुळे कुरूप झाले असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता घरच्या घरी त्यावर उपाय करावे त्याने नक्कीच फरक पडेल आणि कुरूप कमी होईल.

सारांश – कुरूप साठी घरगुती उपाय/ कुरूप वर घरगुती उपाय/ कुरूप उपचार/ कुरूप होण्याची कारणे

आपल्याला जर कुरूप झाले असेल किंवा कुरूप झाले आहे किंवा नाही याबाबत संभ्रम असेल तर आपण या लेखातील कुरूप होण्याची कारणे आणि लक्षणे तसेच कुरूप वर घरगुती उपाय कोणते आहेत, हे जाणून घ्यायचे असतील तर आपण ह्या लेखातील आम्ही सांगितलेले कुरूप साठी घरगुती उपाय आणि उपचार करावे. याने आपला त्रास आणि कुरूप हे नक्कीच कमी होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, कुरूप साठी घरगुती उपाय/ कुरूप वर घरगुती उपाय /कुरूप होण्याची कारणे/ kurup on foot home remedies कसे वाटले, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

1 thought on “कुरूप साठी घरगुती उपाय – Kurup On Foot Best 12 home Remedies”

  1. נערות ליווי באילת

    Itís difficult to find knowledgeable people for this topic, but you sound like you know what youíre talking about! Thanks

Comments are closed.

Scroll to Top