दाबेली रेसिपी / दाबेली कशी बनवायची – Best Recipe Of Dabeli

दाबेली रेसिपी/ दाबेली कशी बनवायची /dabeli recipe marathi >>> आजकाल आपण पाहतोय की, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रोज-रोज तोच नाश्ता आणि जेवण करण्याचा भारीच कंटाळा आलेला दिसतोय, चमचमीत आणि चटपटीत अशा पदार्थांचे चाहते हे सर्वच लोक झालेले आहेत आणि तसेही आपल्या खाण्याच्या सवयीत आणि आवडीत थोडा बादल हा हवाच आणि त्याच साठी आम्ही आज हा विशेष रेसिपी लेख घेऊन येत आहोत, “दाबेली रेसिपी” यातील माहिती साहित्य आणि कृती वापरुन आपण घरच्या घरी अगदी उत्तम अशा प्रकारची दाबेली बनवू शकता.

लहान मुलांनाच नव्हे तर वयस्कर लोकांना देखील हा दाबेली पदार्थ आवडतो. दाबेली ही कुठल्याही जंक फूड मध्ये येत नाही तसेच यात जड किंवा पचन होण्यास देखील मदत करणारी असल्याने आपण हा पदार्थ घरी बनवून घरातील लहानसोबत मोठ्या व्यक्तींना देखील देता येते. आपल्याला माहितीच असेल की मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी त्यांना हे आंबवलेले पदार्थ देखील खाण्यासाठी द्यावे, या आंबवलेल्या खाण्याने त्यांची पचन शक्ती सुधारते. दाबेली बनवण्यासाठी पाव लागतात जे की आंबवलेल्या पदार्थामध्ये येतात॰

दाबेली हा असा पदार्थ आहे जो आपली भूक देखील भागवतो, पौष्टिकता देखील प्रदान करतो, आणि त्याचबरोबर चटपटीत अशी चव देखील देतो. त्यामुळे सर्वांचा दाबेली अगदी मनातून आवडते. आजच्या काळात बाहेरचे पदार्थ बाहेरून आणून खाण्यास बरेच जण घाबरत आहेत त्यामुळे आपल्याला फूड इन्फेकशन होण्याची भीती असते, त्यामुळे सर्वच जण घरच्या घरीच असे चटपटीत पदार्थ बनवणे पसंद करतात.

दाबेली रेसिपी/ दाबेली कशी बनवायची /dabeli recipe marathi
दाबेली (dabeli)

चला तर आज काही चटपटीत करूया

आज आपण दाबेली घरी बनवूया …..

            बर्‍याच वेळेस आपण दाबेली ही विकत घेऊनच खातो. घरी बनवत नाही. परंतु, आपल्या घरी आपल्या स्वतःच्या हाताने आपण बनवलेले पदार्थ खाण्यात जी मज्जा आणि आनंद असतो न तो काही औरच असतो. ती मज्जा काय आहे आणि कशी असते ते आपण घरीच दाबेली बनवून घेऊ शकता. आपण आपल्या आवडीप्रमाणे आमची ही कृती आणि साहित्य वापरुन घरच्या घरी अगदी उत्तम अशी दाबेली बनवू शकता तिही अत्याधिक चविष्ट !

दाबेली रेसिपी / दाबेली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

आपल्याला जर उत्तम आणि अगदी चटपटीत अशी दाबेली बनवायची असेल तर आपण खालील साहित्य वापरुन दाबेली बनवावी. आपल्या आवडी आणि सवयी प्रमाणे आपण साहित्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता.

दाबेली रेसिपी/ दाबेली कशी बनवायची /dabeli recipe marathi - दाबेली साहित्य
दाबेली साहित्य

दाबेलीचे पाव – छोट्या आकाराचे 4 ते 5

मोठे बटाटे- सात ते आठ

दाबेली मसाला- चार चमचे

लाल तिखट – अर्धा छोटा चमचा

बारीक शेव – अर्धी वाटी

तेल – अर्धा चमचा

काळे मीठ – चवी पुरते

चिंचेची गोड चटणी – अर्धी वाटी

पुदिना आणि हिरवी मिरची व कोथिंबीर – पास ते सहा हिरवी मिरची आणि दहा -पंधरा पुदिना पाने

कांदे बारीक चिरलेले – चार मोठ्या आकाराचे कांदे

टोमॅटो बारीक चिरलेला – दोन मोठे टोमॅटो

कोथिंबीर बारीक चिरलेली – आपल्या आवडीनुसार

मसाला शेंगदाने- पाच चमचे

पुदिना चटणी – अर्धी वाटी

चवीनुसार मीठ – आपल्या सवयीनुसार अर्धा चमचा

डाळींबाचे दाणे –अर्धी वाटी

दाबेली रेसिपी/ दाबेली कशी बनवायची /dabeli recipe marathi

वरील सर्व साहित्य वापरुन आपण अगदी नंबर एक अशी दाबेली आपल्या घरी करू शकता. आता आपण वरील सर्व साहित्य वापरुन दाबेली कशी बनवायची त्याची कृती काय आहे ते पाहूया.

दाबेली कशी बनवायची/ दाबेली कशी बनवतात/ dabeli recipe marathi

सर्वप्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. आपल्याला हवे तेवढे बटाटे कुकर मधून उकडून घ्यावे. आणि नंतर ते स्मश करून घ्यावे.आता दाबेलीचे सारण बनवण्यासाठी दोन माध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यावे. एका पॅन मध्ये किंवा कढई मध्ये दोन छोटे चमचे तेल टाकावे आणि त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा.हा कांदा थोडा लालसर झाला की, त्या मध्ये आर्धा चमचा किंवा आपल्या आवडी प्रमाणे लाल मिरची पावडर टाकावी,

हळद टाकावी,मीठ टाकावे आणि जवळपास दोन मद्यम आकराचे चमचे भरूनदाबेली मसाला टाकावा आणि चवीनुसार त्यात मीठ टाकावे. कांदा आणि आपण टाकलेली सर्व मसाले तेलात आता छान मिक्स होऊ द्यावी आणि ती सर्व मिक्स एकजीव झाल्यावर  त्यामध्ये आपण उकडून स्मश केललेले बटाटे टाकावी आणि पूर्ण तेल व मसाल्यात छान सर्व साहित्य एकजीव होऊ द्यावे.

आता या मिश्रणाला छान वाफ येई पर्यंत अर्धी वाटी शेंगदाने छान खरपूस भाजून घ्यावे आणि त्याचे साल काढून त्याचे म्हणजे एक शेंगदाण्याचे दोन भाग करावे आणि जवळपास एक किंवा दोन डाळिंब सोलून त्याचे दाणे काढून घ्यावे.

आता गॅस वर असलेले बटाट्याचे मिश्रण छान वाफळे गेले असेल ते बंद करावे आणि थोडे थंड होऊ द्यावे. आता या मिश्रण मध्ये अजून वॉरतून आर्धा छोटा चमचा दाबेली मसाला टाकावा.

ही कृती झाल्यानंतर आता दाबेली बनवण्यासाठी मध्यम आकाराचे दोन कांदे अगदी बारीक कापावे आणि एक टोमॅटो देखील बारीक कापावा आणि हे कांदा टोमॅटो एकत्र करून बटाट्याच्या मिश्रण वर टाकावे. त्यावरच आपण खरपूस भाजून साल काढलेले शेंगदाने टाकावे तसेच सोलून ठेवलेले डाळिंब देखील टाकावे आणि आता हे सर्व साहित्य म्हणजे सारन छान पैकी मिक्स करून घ्यावे.

हे झाले आपले दाबेलीचे सारण तयार ,आता आपण दाबेलीला लावण्याच्या पुदिण्याची चटणी आणि चिंचेची चटणी याची रेसिपी काय आहे आणि कृती कशी आहे हे पुढील लेखात पाहणार आहोत,

पुदिना चटणी बनवणे

दाबेली साठी पुदिना चटणी बनवण्यासाठी पुदिना स्वच्छ धुवून घ्यावा आणि त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकावी. चवी नुसार मीठ आणि लिंबू रस चे चार ते पाच थेंब टाकावे व थोडी धनेपूड आणि काळे मीठ टाकून हे मिश्रण मिक्सर मधून काढावे. पुदिना चटणी ही कोणत्याही पदार्थाला अगदी चटपटीत चव देण्यास मदत करते, ही पुदिना चटणी पावच्या एक बाजूस लावावी आणि चिंचेची चटणी एका बाजूस लावावी.

दाबेली रेसिपी/ दाबेली कशी बनवायची /dabeli recipe marathi - पुदिना चटणी
पुदिना चटणी

आता चिंचेची चटणी बनवण्यासाठी चिंचेचा कोळ काढावा आणि त्यात त्याच्या दुप्पट गूळ बारीक करुन टाकावा आणि त्याला एक उकळी येऊ द्यावी. आता त्यात थोडे काळे मीठ, लाल चटणी आणि मीठ टाकावे असेल चाट मसाला टाकावा. झाली आपली चिंचेची चटणी आणि पुदिण्याची चटणी तयार.

या प्रकारची बनवलेली पुदिना चटणी ही दाबेली साठी तसेच इतर पदार्थ जसे की, सॅंडविच वडापाव, भेल यासाठी देखील तुम्ही वापरू शकता.

दाबेली बनवणे- दाबेली कशी बनवायची

आता दाबेली बनवण्यासाठी पाव मधोमध दोन भाग न करता कापावा आणि त्या पाव च्या एक साइड ला चिंचेची चटणी लावावी आणि दुसर्‍या बाजूला पुदिण्याची चटणी लावावी, आता पाव च्या मध्ये आपण जे दाबेलीचे सारण बनवले आहे ते एक ते दोन चमचे टाकणे आणि पाव च्या दोन्ही बाजू बंद कराव्या.

दाबेली रेसिपी/ दाबेली कशी बनवायची /dabeli recipe marathi
दाबेली कशी बनवायची

आपल्या तयार झालेल्या दाबेलीचा बन आता एका फ्राय पॅन वर बटर टाकून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यावा. फ्राय करून घ्यावा. आता त्याला एका प्लेट मध्ये बारीक शेव घेऊन त्यात डीप करावे आणि दाबेलीच्या वरच्या बाजूला बारीक नायलोण शेव लावावी. झाली आपली गरमागरम दाबेली तयार. आता आपल्या आवडीनुसार ही दाबेली सौस सोबत किंवा चिंचेच्या चटणी सोबत सर्व्ह करावी.

अशा प्रकारे आपली अगदी हॉटेल स्टाइल मस्त झक्कास अशी दाबेली घरच्या घरी आपण उत्तम प्रकारे बनवू शकता. ही दाबेली घरी बनवलेली असल्याने पूर्णपणे हायजीन आणि उत्कृष्ठ असणार यात काही शंका नाही.

सारांश -दाबेली रेसिपी /dabeli recipe marathi /दाबेली कशी बनवतात

आपल्याला जर अगदी उत्तम आणि चवदार अशी दाबेली बनवायची असेल तर आपण आमच्या या लेखातील साहित्य आणि कृती वापरुन दाबेली बनवू शकता, ही रेसिपी आणि साहित्य वापरुन तुम्ही दाबेली बनवली तर घरातील सर्व लोक नक्कीच खूप आवडीने खातील आणि तुम्ही घरच्या घरी ही दाबेली बनवलेली असल्याने कोणतेही आजार किंवा अस्वछ्तेचा प्रश्न देखील येणार नाही.

आपल्याला वरील लेखामध्ये सांगितलेली “दाबेली रेसिपी / दाबेली कशी बनवायची /दाबेली कशी बनवतात / dabeli recipe marathi” कशी वाटली, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top