ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय – Top 8 Best Home Remedies

ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय / ताप येण्याची कारणे / ताप कमी करण्याचे उपाय (taap kami karnyache upay) >>> ताप येणे हा आजार सामान्य जरी वाटत असला तरी तो गंभीर रूप धारण करू शकतो त्त्यामुळे या ताप वर लागलीच उपचार करून त्याचा नायनाट केला पाहिजे .आपण पाहतो पावसाळयात किंवा उन्हाळयात वातावरण बदलल्यामुळे अनेक लोकांना ताप येतो आणि आजकाल कोरोना या रोगाच्या विविध varient नी खुप थैमान माजवले आहे. ताप येणे हे एक कोरोनाचेच लक्षण आहे. तर यासाठी आपण काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय केले पाहिजे ज्यामुळे इतर गंभीर समस्या उद्भवणार नाहीत.

लहान मुलांना देखील ताप येतो आणि ही एक सामान्य गोष्ट आहे. ब-याच पालकांना आपल्या मुलांना ताप आला कि चिंता वाटते आणि चिंता वाटने देखील सहाजिकच आहे. मग हा आलेला ताप कमी करण्यासाठी आई-वडील सर्व उपचार करतात. समजा ताप साधारण असेल तर चिंतेचे कारण नाही हा ताप तुम्ही घरगुती उपायांनी कमी करू शकता. पण ताप जर जास्त असेल तर डॉक्टरांकडे जाउन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यकच आहे.

थंडी वाजून आल्यावर देखील ताप येतो. ताप येणे म्हणजे अंग गरम होणे, अशक्तपणा जाणवणे, आणि काही लोकांना तर सर्दी आणि खोकला असला की ताप हमखास येतो. ताप आल्यावर डोके दुखते अंग दुखते, घशाला त्रास होतो, थंडी वाजते, असे काही आपल्या सोबतच घडत असते. पण ताप हा एक गंभीर आजार नसला तरीही येाग्य वेळी यावर औषधोपचार करावेत जर ताप जास्तच वाढला किंवा जास्त त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जायला पाहिजे पण साधारण ताप असेल तर ती आपण घरगूती उपायांनी देखील कमी करू शकतो.

ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय / ताप कमी करण्याचे उपाय(taap kami karnyache upay)

1. तुळस- ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय

        ताप आलेल्या व्यक्तीसाठी तुळस हा एक खुप चांगला आणि उपयोगी असा घरगुती उपाय आहे. तुळस ही वनस्पती प्रत्येकाच्या घरात असते आणि तुळशीमुळे ऑक्सिजन मिळतो म्हणून तुळस ही अवश्य दारात असावी रोज सकाळी तुळशीची चार ते पाच पाने खाल्ल्यास व्यक्तीला ताप सर्दी यासारखे आजारांना तोंड देण्याची वेळ येणार नाही. तुळस हा एक अतिशय उत्तम आर्युवेदीक उपचार आहे. आणि यामुळे शरीराला कोणतेही नुकसान पोहचणार नाही.

ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय / ताप येण्याची कारणे / ताप कमी करण्याचे उपाय (taap kami karnyache upay)
तुळशीच्या पानांचा काढा

तुळशीचा वापर ताप कमी करण्यासाठी याप्रकारे करावा – गॅसवर पाणी उकळायला ठेवावे. आणि त्यामध्ये तुळशीचे पाच ते सहा पाने एक चमचा सुंठ पावडर किवा अख्खी सूंठ टाकली तरी चालेल आणि साखर हे सर्व मिसळून घ्यायचे आणि गॅसवर खळखळ उकळून घ्यायचे छान उकळी आली की गॅस बंद करायचा आणि ते मिश्रण एका चाळणीच्या सहाय्याने ने गाळून घ्यायचा आणि हा काढा ताप आल्यावर पिऊन घ्यायचा. याने ताप लवकरात लवकर कमी होतो.

2.  आले /अद्रक- ताप कमी करण्याचे उपाय

ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय / ताप येण्याची कारणे / ताप कमी करण्याचे उपाय (taap kami karnyache upay)
गरम पाण्यात आले आणि मध टाकून प्या

       ताप हा अनेक कारणांनी येतो पण खोकला, सर्दी झाल्यामुळे तर ताप हमखास येतो.  त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे अद्रक . अद्रक मध्ये अॅटीइन्फलेमेट्री गुणधर्म असतात. जे की, शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि त्यामुळे तापापासुन सुटका मिळू शकते. आल्याचे पाच ते सात तुकडे घ्यायचे आणि ते पाण्यात उकळून ते पाणी प्यायचे . नंतर ते पाणी गाळून घ्यायचे आणि थोडेसे गरम असतानाच त्यामध्ये मध टाकून पिऊन घ्यायचे याने ताप कमी होतो.

3.  लसूण

लसूण - घरगुती उपाय
लसूण

       लसुण हा पदार्थामध्ये वापरल्यास तो अन्नाची तर चव खुप सुंदर बनवतोच पण लसुण या व्यतिरीक्त ताप कमी करण्यासाठी देखील खुप उपयुक्त असा आहे. लसणामध्ये अॅंटीफंगल आणि अॅंटीबॅक्टेरीयल घटक असतात जे शरीरासाठी खुप फायदेशीर ठरतात. लसणामध्ये डायफोरेटीक गूणधर्म देखील असतात. लसणाच्या पाकळयांचे साल काढून टाकायचे आणि तशीच कच्चे लसूण ताप आल्यावर चघळायचे याने ताप आल्यावर खुप आराम मिळतो आणि ताप उतरतो .

4.  पुदिना आणि अद्रक रस

पुदिना पाने - घरगुती उपाय
पुदिना

     कोणताही व कसल्याही प्रकारचा ताप आल्यास सर्वात उत्तम पर्याय म्हणजे पुदिना आणि अदरक मिक्स असलेला काढा. हा काढा पिल्यावर ताप खुप पटकन उतरण्यास मदत होते. पुदिन्यामुळे शरीरातील उष्णता ब-यापैंकी बाहेर पडते हा काढा ताप उतरविण्यास खूप फायदेशीर ठरतो . हा काढा पूढील पद्धतीने बनवावा – एका पातेल्यामध्ये पाणी घ्यावे आणि ते उकळायला गॅसवर ठेवावे. त्यात आल्याचे तीन ते चार तुकडे टाकावे. नंतर त्यामध्ये चार ते पाच पुदिन्याचे पाने टाकावेत आणि दोन चमचे मेथीचे दाणे टाकावेत आणि सर्व मिश्रण चांगले उकळून घ्यावे आणि हे मिश्रण उकळल्या नंतर ते गाळून घ्यावे आणि नंतर त्यामध्ये थोडासा मध टाकावा आणि पिवून घ्यावे याने ताप लवकर कमी होतो.

5. थंड पाण्याची पट्टी ठेवणे

थंड पाण्याची पट्टी डोक्यावर ठेवणे
थंड पाण्याची पट्टी डोक्यावर ठेवा

        थंड पाणी एका पातेल्यामध्ये घ्यावे असे दोन पातेले घ्यावेत आणि अशाच प्रकारे दोन कॉटनचे कपडे घ्यावेत आणि ते आपल्या माथ्यावर बसतील इतपत त्याची घडी घालुन घ्यावी आणि नंतर ती घडी घातलेली पट्टी पुर्णपणे पाण्यामध्ये मिळवून घ्यावी आणि ती पिळून घ्यावी व त्यानंतर ती पट्टी तशीच ज्याला ताप आला आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावर ठेवावी अशीच प्रक्रीया अंग थंड होईपर्यन्त केल्यास ताप पटकन उतरतो आणि आजारी व्यक्तीस आराम मिळतो .

6.मुलेठी चा काढा

         व्हायरल तापामध्ये अशक्तपणा खुप वाढतो. तसेच थकवा देखील जाणवतो. यासाठी हा ताप कमी करण्यासाठी मुलेठीचा काढा हा अतिशय उपयुक्त असा उपाय आहे. आणि मुलेठी हा आर्येुवेदीक उपाय असल्यामुळे याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत. मुलेठीचा काढा पुढीलप्रमाणे बनवावा – गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवावे त्यामध्ये तुळशीचे पाने आणि मुलेठीच्या काडया टाकून छान अशी उकळी येऊ दयावी आणि ते पाणी उकळल्यानंतर गाळून घ्यावे व त्यात मध मिसळून दिवसातून जवळपास दोन वेळा प्यावे याने ताप निश्चित कमी होतो.

7. हळदीचे दूध

        हळदीमध्ये अनेक गुणधर्म असतात जे की, ब-याच आजारांवर उपयुक्त आहेत आणि हळद प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील खुप उपयुक्त ठरते त्यामुळे ताप आल्यास हळदी चा वापर करावा याने बराच आराम मिळतो . एक ग्लास दुध गरम करायचे त्यामध्ये हळद टाकून ते दुध उकळून घ्यायचे आणि तसेच गरम गरम दुध पिऊन घ्यायचे याने ताप कमी होतो तसेच हळद आणि गुळाच्या गोळया बनवाव्यात आणि त्यावर एक ग्लास पाणी गरम प्यावे याने देखील ताप लवकर कमी होण्यास मदत होते .

8. पाणी जास्त पिणे

ताप आल्यानंतर , ज्या व्यक्तिला ताप आला आहे त्याला जास्तीत जास्त पाणी पिण्यास द्यावे , त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही आणि पाणी जास्त पिल्याने ताप आलेल्या व्यक्तीस जास्तीतजास्त लघवी येते आणि लघवी वाटे काही इन्फेकशन असेल तर ते निघून जाते आणि याचा ताप कमी होण्यास बराच फायदा होतो .

ताप येण्याची कारणे

ताप येण्याची कारणे ही वेगवेगळी असू शकतात तरी त्यातील ही काही साधारणपणे खालील प्रमाणे सांगता येतील –

  1. आपण कुठले व्हायक्सीन म्हणजेच लस घेतली तर आपल्याला ताप येऊ शकतो कारण त्यामुळे आपल्या शरीरात अॅंटीबोडीस तयार होत असतात.
  2. आपल्याला कुठे व्हाईरल इन्फेकशन झाले म्हणजे जिवाणूजन्य इन्फेकशन झाले तरी देखील ताप येऊ शकतो;
  3. आपल्याला जर का बक्टेरियल इन्फेकशन झाले म्हणजेच विषाणूजन्य इन्फेकशन झाले तर ते देखील ताप येण्याचे कारण ठरू शकते.
  4. शरीरात कुठे गाठ झालेली असेन किंवा जखम झालेली असेल तर ते देखील ताप येण्याचे कारण असते.
  5. उन्हाळ्याच्या दिवसात भर उन्हात दिवसभर काम केले, चालले तर ताप येऊ शकतो.
  6. हिवाळ्यात थंड कपडे अंगावर ठेवले तर ते देखील ताप येण्याचे कारण असू शकते, अशा प्रकारे वरील काही ताप येण्याची कारणे असू शकतात, मात्र एक आठवडच्या वर ताप राहिला तर मात्र आपण वैद्यकीय सल्ला घ्यावा , आवश्यक त्या चाचण्या कराव्या.

सारांश – ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय / ताप कमी करण्याचे उपाय (taap kami karnyache upay)

अशाप्रकारे तुम्ही ताप आल्यास आमच्या ” ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय / ताप कमी करण्याचे उपाय / ताप येण्याची कारणे ” या लेखातील माहिती वाचून आपला ताप घरच्या घरी लवकरात लवकर कमी करू शकता, आणि जर कमी नाही झाला तर वैद्यकीय सल्ला मात्र अवश्य घ्यावा.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय /ताप येण्याची कारणे /ताप कमी करण्याचे उपाय / taap kami karnyache upay) ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top