You are currently viewing दाढ दुखीवर घरगुती उपाय – Top 15 Best Home Remedies

दाढ दुखीवर घरगुती उपाय – Top 15 Best Home Remedies

दाढ दुखीवर घरगुती उपाय / दाढ दुखीवर उपाय/ दाढ दुखीवर गोळी/ dadh dukhi tablet >>> दाढ दुखी हा असा आजार आहे जो सामान्य माणसांमध्ये कधी न कधी दिसून येतोच. दातांच्या समस्या यामध्ये सर्वात त्रासदायक समस्या म्हणजे दाढ दुखी ची समस्या आहे. दाढ दुखी मुळे जेवण न जाणे झोप न लागणे अशा बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते . आपल्याला जर दाढ दुखीचा त्रास होऊ लागला, तर आपण अगदी बेचैन होतो. दाढ दुखी ने आपण नाही न काही खाऊ शकत नाही न पिऊ शकत, गरम आणि थंड पदार्थ तर अगदी दाढ आणि यांना झोंबतात. दाढ दुखीचे दुखणे एकदा का सुरू झाले तर बरेच दिवस कमी होत नाही. त्यामुळे यावर लगेचच उपाय करावेत.

दाढ दुखीवर घरगुती उपाय

दाढ दुखी ही अत्यंत त्रासदायक अशी असते, यावर परिणामकारक उपाय करता यावेत यासाठी आणि दाढ दुखीने परेशान आणि त्रस्त अशा लोकांसाठी आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत. या लेखातील माहितीच्या आधारे आपण दाढ दुखी पासून आराम मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया, दाढ दुखीवर घरगुती उपाय / दाढ दुखीवर उपाय कोणकोणते आहेत आणि दाढ दुखीवर गोळी / dadh dukhi tablet.

दाढ दुखीवर प्राथमिक व सामान्य उपचार

साधरण दाढ दुखी वर आपण खालील प्राथमिक आणि सामान्य उपाय करू शकतो ज्याने तुमचा त्रास हा वाढणार नाही आणि त्रास होणार नाही.

1) मुलायम ब्रश वापरणे जेणेकरून ब्रश करताना हिरड्यांना जखम होणार नाही

2)दिवसातून दोन वेळा ब्रश करणे व तोंडाची चांगली निगा राखणे हे झाले प्राथमिक उपाय जे सर्वांनीच करावेत

3) जर आपण गोड खाल्ले आणि आपल्याला आधीच कव्हिटीचा त्रास असेल तर आपण गोड खाल्यानंतर चूळ अवश्य भरावी.

4) ब्रश झाल्यानंतर आपण आपल्या हिरड्यांवर बोटाने मसाज करावी, दोन्ही हिरड्यांवर बोटांनी मसाज करावा, त्यामुळे दातांवर आणि दाढीवर हिरड्यांची पकड पक्की होते आणि दात व दाढ यांच्या समस्या निर्माण होत नाहीत.

तर हे आहेत सामान्य दाढ दुखीसाठी करण्यात येणारे काही उपाय आणि उपचार. आता आपण जाणून घेणार आहोत दाढ दुखीवर घरगुती उपाय कोणते आहेत, जे केल्याने आपला दाढ दुखीचा त्रास कमी होईल आणि आराम मिळेन.

दाढ दुखीवर घरगुती उपाय / दाढ दुखीवर गोळी / दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय (dadh dukhi tablet )

दाढ दुखीचा होणारा त्रास हा अतिशय वेदना दायक आणि काही वेळेस असहय होणारा त्रास आहे, त्यामुळे यावर वेळीच उपचार आणि उपाय करावेत तर हे उपाय कोणते आहे याची माहिती खालील लेखात सांगत आहोत.

मुळ्याचा रस

दाढ दुखीवर घरगुती उपाय / दाढ दुखीवर उपाय/ दाढ दुखीवर गोळी/ dadh dukhi tablet
मुळ्याचा रस

पांढरा मुळा घ्या प्रथम तो बारीक किसून घ्या.आता त्याला फडक्या मध्ये घालून पिळून त्याचा साधारण एक कप रस काढा. या रसा मध्ये एक चमचा मीठ घालावे व चांगले मिक्स करून घ्यावे या तयार मिश्रणाची दिवसातून दोन वेळा सकाळी व संध्याकाळी चूळ भरा हा उपाय सलग पंधरा दिवस केल्यास दाढ दुखी पासून चांगला आराम मिळेल.

लिंबाचा रस

लिंबू रस

लिंबाचा रसा यासह हिंग हा खात्रीशीर आणि सामान्य उपाय आहे. एक उबदार कापड घ्या त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि हिंग चांगले मिक्स करून बांधा आणि जी दाढ किंवा दात दुखत आहे त्याच्या खाली ठेवाआणि वरच्या दातांनी दाबा. किंवा वेदना कमी होईपर्यंत दर २०मिनिटांनी दुखणार्‍या दातांवर लावत रहा याने आपली लवकरात लवकर दाढ दुखायची नक्कीच थांबेल.

मीठाच्या कोमट पाण्याने गुळण्या

दाढ दुखीवर घरगुती उपाय / दाढ दुखीवर उपाय/ दाढ दुखीवर गोळी/ dadh dukhi tablet
मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करा

एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या व अर्धा चमचा मीठ घालून मिसळा आणि या मिश्रणाने चूळ भरा. चूळ भरून झाल्यानंतर आपण याच पाण्याला तोंडात ठेऊन हिरड्यांवर आणि दाढ वर मसाज करावी. हा उपाय केल्याने दाढ दुखी थांबवण्यासाठी नक्कीच मदत होईल. मीठ हे जंतु नाशक आणि वेदना शामक आसल्याने याचा दुहेरी फायदा होईल जसे की, कीड कमी होणे आणि दात दुखणे थांबणे.

लसूण

लसूण

हजारो वर्षापासून लसूण आपल्या औषधी गुणधर्मामुळे ओळखला आणि वापरला जातो.लसनामध्ये जंतुनाशक म्हणजे अँटिबायोटिक गुणधर्म असतात हे केवळ दाढ दुखीला कारणीभूत असलेल्या हानीकारक अश्या बॅक्टरीया ला नष्ट करत नाही तर लसूण हा वेदना निवारक म्हणून देखील कार्य करू शकतो. म्हणून जर दाढ दुखत असेल तर याचा वापर करावा.

पेरु ची पाणे

पेरूची उकळलेली पाने

पेरूच्या पानांमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात.जे सूज आणि वेदना कमी करतात.ताज्या पेरूची पाने धुवून ती थेट खाल्ली जाऊ शकतात किंवा त्यांना गरम पाण्यात उकळून त्यांचा माऊथ वॉश म्हणून वापरल्याने दाढ दुखी कमी होऊ शकते. हा उपाय अतिशय उत्तम आणि प्रभावशाली समजला जातो.

लवंग आणि लवंग तेल

दाढ दुखीवर घरगुती उपाय / दाढ दुखीवर उपाय/ दाढ दुखीवर गोळी/ dadh dukhi tablet - लवंग तेल
लवंग तेल

पारंपारिक दाढ दुखीच्या उपचारांसाठी लवंगचा वापर केला जातो.कारण लवंग चा वापर केल्याने लवंगमधील तेल प्रभावीपणे वेदना सुन्न करू शकते.आणि जळजळ देखील कमी करते.तसेच लवंग मध्ये युपेंनॉल असते जे एक नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे.

दाढ दुखायला लागल्यावर एखादी लवंग तोंडात घालून त्यातील रस चोखावा किंवा लवंगचे तेल कापसाला लावून दुखणाऱ्या दाढेला ठेवावे.अगदी दोन मिनिटांमध्ये फरक जाणवेल.

कांदा

दाढ दुखीवर घरगुती उपाय / दाढ दुखीवर उपाय/ दाढ दुखीवर गोळी/ dadh dukhi tablet - कांदा
कांदा

कांद्यामध्ये देखील बॅक्टरीयाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो आणि सोबतच दातदुखी नियंत्रित करण्यास देखील कांदे चांगलीच मदत करतात.कांदा हा दातदुखीच्या विविध उपायांपैकी एक आहे जे संसर्गजन्य जंतूंचा नाश करून वेदनेतून मुक्तता देऊ शकतात.

कांद्याचा तुकडा घ्यावा आणि दुखत असणाऱ्या दाढेवर ठेवावे आणि चावावे.साधारण 10 मिनिटे दाढेमध्ये दाबून ठेवावे आणि त्या नंतर आपले तोंड पाण्याने स्वच्छ धुवावे.दिवसातून कमीतकमी एकदा असे दोन ते तीन आठवड्यापर्यंत सतत करावे.

लवंग तेल आणि हळद

हळदीच्या बॅक्टरीया विरोधी गुणधर्मामुळे दाढ दुखी कमी करण्यास मदत होते.तेल आणि हळद एकत्र करून जाडसर पेस्ट बनवावी, कापसाचा बोळा पेस्ट मध्ये बुडवून दाढेमध्ये साधारण 10 मिनिटे ठेवावा व पेस्ट गिळू नये.चांगल्या परिणामांसाठी दिवसातून कमीतकमी एकदा किंवा दोनदा पुन्हा पुन्हा हा उपाय करावा.दाढ दुखी पासून नक्कीच आराम मिळतो.

काकडी

काकडी ही थंड म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळे दाढ दुखीवर चांगला उपाय म्हणून आश्चर्यकारकपणे काम करते.काकडीमध्ये हेमोस्टॅटिक प्रभाव देखील आहे,ज्यामुळे वेदनाग्रस्त भागात रक्ताचा प्रवाह रोखला जातो ज्यामुळे वेदना कमी होते.

एक चमचा किसलेली काकडी घ्यावी आणि त्यामध्ये लिंबाचा रस काही थेंब मिसळावा.हे तयार मिश्रण बनवल्या नंतर जी दाढ दुखत आहे तिथे लावावे आणि साधारण 10 मिनिटे ठेवावे.जेंव्हा वेदना कमी होईल तेंव्हा थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवावे आणि आवश्यक असल्यास ही प्रक्रिया दाढ दुखी कमी होईपर्यंत सतत करावी.

ग्रीन टी

दाढ दुखीवर घरगुती उपाय - ग्रीन टी
ग्रीन टी

ग्रीन टी हे आरोग्यासाठी उपयुक्त असलेले आणखी एक उत्पादन आहे ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे कर्करोग प्रतिबंध आणि हृदय व रक्तवाहिन्यां संबंधी रोगांमध्ये प्रभावशाली असतात. ह्या व्यतिरिक्त ग्रीन टी मध्ये दाहक विरोधी गुणधर्म देखील असतात जे दाढेमध्ये होणारी वेदना कमी करू शकतात. साधारणपणे आपण पाहतो की, दाढ दुखत असेल तर बरेच लोक चहा घेत नाहीत तर त्यांनी हा ग्रीन टी घ्यावा.

मध

दाढ दुखीवर उपाय/ दाढ दुखीवर गोळी/ dadh dukhi tablet - मध
कोमट पाण्यात मध

मधामध्ये बॅक्टेरियाची वाढ प्रतिबंधित करण्याचे गुणधर्म असतात आणि जखमेला बरे करण्यासाठी देखील मध लाभदायक आहे. दाढ दुखी थांबवण्यासाठी कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध घालून तोंड स्वच्छ धुवून घ्यावे. या उपायाने कीड निघण्यास देखील मदत होते आणि तो दाढ निर्जंतुक होते. कोमट पाण्यात मध टाकल्यास याने गुळण्या कराव्या. त्याने जास्त फायदा होईल.

तुळशीच्या पानांचा रस

तुळशीच्या पानांचा रस

दाढ दुखत असल्यास तुळशीची पाच ते दहा पाने स्वच्छ धुवून नंतर ती कुटून त्याचा रस काढावा आणि त्यात कापराच्या तीन ते पाच वड्या मिसळाव्यात.कापसाचे तीन ते चार बोळे या मिश्रणात भिजवून दुखणाऱ्या दाढेत ठेवावेत.त्यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते.दधदुखीवर हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. तुळशीच्या पानाच्या उग्र रसाने दाढ दुखणे अगदी पळून जाईल.

मिरे पावडर आणि मीठ

साधारण एक चतुर्थांश चमचा मिठात एक चिमुटभर मिरे पावडर मिसळून त्यात थोडा मध टाकून त्याची गोळी बनवावी. आता ही गोळी दुखणाऱ्या भागात लावावे याने दाढ दुखीवर आराम मिळेल आणि तुम्हाला आराम मिळेन.

मोहरीचे तेल आणि मीठ

मोहरी तेल

तीन ते चार थेंब मोहरीच्या तेलामध्ये एक चिमुटभर मीठ टाकावे या मिश्रणाने दाढेमध्ये,दातांमध्ये किंवा हिरड्यांवर मसाज केल्याने आराम मिळतो. तसेच सूज आली असेल तर ती देखील कमी होते.

तेजपत्ता

तेजपत्ता हा वेदनाशामक आहे.दुखण्यापासून त्वरित आराम मिळण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे तेजपत्ता मिक्सर मधून बारीक करून घ्यावा आणि त्यात थोडा मध घालून किंवा लिंबाचा रस घालून त्याची पेस्ट बनवावी, व त्याची गोळी बनवून दाढ खाली ठेवावी, असे केल्याने दाढेमध्ये होत असलेली आग कमी होऊन दाढ दुखणे नक्कीच थांबते.

दाढ दुखीवर गोळी / dadh dukhi tablet

दाढ दुखीवर गोळी घेत असताना सर्व प्रथम आपण आपल्याला कोणत्या गोळीचा साइड -इफ्फेक्ट होत नाही किंवा विपरीत परिणाम होत नाही याची शहानिशा करूनच गोळी घ्यावी किंवा तसेच आपले वजन 20 किलो च्या वर असावे आणि वय 10 वर्षे च्या वर असावे.

1) Sumoflam Tablet

2) Ketorol – DT Tablet

3) Combiflam Tablet

वरील 3 पैकी कोणतीही 1 गोळी घ्यावी जेवण करून 2 टाइम. पण आपले वजन 20 किलो च्या वर असावे आणि वय 10 वर्षे च्या वर असावे.जर वय 10 वर्षे च्या कमी असेन तर आर्धी गोळी घ्यावी सकाळ – संध्याकाळ.

4) Vepan -500 mg Tablet ही एक अॅंटीबाईओटीक टॅब्लेट आहे याने इन्फेकशन आणि सूज कमी होते . वरील 3 पैकी कोणतीही 1 टॅब्लेट आणि त्या सोबत Vepon Tablet घ्यावी. जास्त त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा ।

सारांश – दाढ दुखीवर घरगुती उपाय / दाढ दुखीवर उपाय / दाढ दुखीवर गोळी / dadh dukhi tablet

आपल्याला जर दाढ दुखीचा त्रास होत असेन तर आपण आमच्या आजच्या ” दाढ दुखीवर घरगुती उपाय/ दाढ दुखीवर उपाय / दाढ दुखीवर गोळी / dadh dukhi tablet ” या लेखातील उपाय आणि माहिती यांच्या आधारे उपाय करू शकता आणि त्याने आपल्याला नक्कीच आराम मिळेन. तरी देखील आपल्याला कोणतीही गोळी घेण्याआधी जर रिएक्शन येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि आपले उपाय आणि गोळी बंद करावी.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले “दाढ दुखीवर घरगुती उपाय / दाढ दुखीवर उपाय /दाढ दुखीवर गोळी / dadh dukhi tablet” कसे वाटले , हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीसीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Leave a Reply