घराची रचना – घराची रचना कशी असावी – विस्तृत माहिती

घराची रचना कशी असावी / घराची अंतर्गत सजावट / Gharachi rachana marathi mahiti >> घर आणि घराची रचना ही योग्य आणि अगदी शास्त्राला अनुसरून असावी, तसेच आपले शारीरीक आरोग्य, आर्थिक भरभराट आणि कौटुंबिक व सामाजिक संबंध हे योग्य दिशेने प्रस्थापित व्हावे, यासाठी आपल्याला आपल्या घराची रचना ही सहाय्यकारी ठरते आणि त्यासाठीच आपले घर आणि घराची रचना योग्य असावी. असा आजच्या जगात प्रत्येकाचा अट्टहास आणि प्रयत्न असतो. यासाठीच आम्ही आज अशाच एका महत्वपूर्ण माहिती सोबत येत आहोत, ती माहिती म्हणजे ‘घराची रचना ‘.

आजच्या काळात घराचे म्हणजे वास्तूचे ‘वास्तुशास्त्र’ प्रगत असल्यामुळे, नविन प्लाट घेऊन घर बांधणा-यांना ‘वास्तुशास्त्र’ चा आधार म्हणजे जणू काही वास्तु देवाचा आर्शिवादच मिळाला असे म्हणावे लागेल. परंतु ज्यांनी आपल्या घराची रचना, आखणी, बांधकाम आधीच केलेले आहे, आणि सध्या त्यांची जी वास्तु आहे ती सदोष आहे असे वाटल्यास , म्हणजेच काही चुकीच्या पद्धतीने घराचे बांधकाम झालेल असल्यास अशा वास्तु साठी देखील वास्तुशास्त्रात बरेच काही तोडगे आणि उपाय सांगण्यात आलेले आहे त्याचा आपण नक्की विचार करावा. त्यात सांगितलेल्या तत्त्वा चा आणि तोडग्यांचा आपण स्विकार करावा.

घरात काय असावे ? काय नसावे ? कोणती गोष्ट कोणत्या जागी असावी ? चुकीच्या जागी स्थापित असेल, तर काय करावे ? अशा एक ना अनेक गोष्टींवर प्रश्नांवर वास्तुशास्त्रात बरेच तोडगे ही सांगितलेले आहेत. जर अनावधानाणे आपल्या घराची रचना, दिशा किंवा काही अयोग्य गोष्टींचे स्थापित्य झाले, असेल तर किंवा सतत अस्वास्थ, आरोग्याच्या तक्रारी, आर्थिक नुकसान/ आर्थिक भरभराटीस अडथळा, कौटुंबिक कलह, कोर्ट – कचेरीत अपयश, अपघात तसेच पाती-पत्नी मधील कलह मतभेद यांसारख्या समस्या भेडसावत असतील, तर वास्तुशास्त्राचे मार्गदर्शन करणारे मोठ-मोठे वास्तुशास्त्राज्ञ – जसे आनंद पिंपळगावकर, नितिन परमार यांसारख्या दिग्गज वास्तुशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या वास्तुरचनेत म्हणजेच घराच्या रचनेत किंवा घरातील वास्तुत बदल केल्यास निश्चितच आपल्या समस्या दुर होण्यास भरपुर मदत होईल .

या लेखात आम्ही वरील समस्या निर्माण होवु नये , यासाठी ‘घराची रचना‘ यावर काही माहिती सादर करीत आहोत, आम्हांला विश्वास आहे की, त्याचा आपणा सगळयांना निश्चितच चांगलाच उपयोग होईल आणि उदभवणा-या समस्यांचे आधिच निरसण केले जाईल . सुरूवातीला आपण पाहुया की घर आणि घराची रचना म्हणजे नेमके काय?

घराची रचना – घराची रचना कशी असावी / घराची अंतर्गत सजावट / Gharachi rachana marathi mahiti)

आपण राहतो ते गृह/ घर म्हणजे केवळ चार भिंती नसुन आपल्या शारीरीक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक तसेच आर्थिक भरभराटीचे आणि समृध्दीचे ‘केंद्रस्थान म्हणजे आपले राहते घर‘ म्हणजे एवढया सर्व गोष्टींचा मधला दुवा हे आपले राहते घर आहे, त्यामुळे घराची रचना करत असताना शास्त्रांना धरून विचार करावा . आपल्या घराची रचणा शास्त्रोक्त पद्धतीने करावी . आपले राहते घर म्हणजे धर्म-अर्थ – काम आणि मोक्ष या चारही पुरूषार्थाची पुर्तता करणारे केंद्रस्थान म्हणून ओळखले जात असते . घरातील सकारात्मक उर्जेचा संचार हा आपल्या घरातील वास्तुपुरूषाला जागृत ठेवत असतो.

घराच्या चूकीच्या रचनेमुळे किंवा घरात सजावटीसाठी ठेवलेल्या पण वास्तुसाठी अशुभ असलेल्या गोष्टींमुळे आपल्या घरात नकारात्मक उर्जेचा संचार होवुन आपल्या घरात सतत लहान मोठया समस्या, अडचणी, आर्थिक नुकसान, आरोग्याच्या समस्या , मतभेद किंवा कौटुंबिक कलह हे उदभवु शकतात. अशा समस्या टाळण्यासाठी घराची रचना ही योग्य दिशांचा आणि त्याच्या प्रभावाचा विचार करूनच करावी. सुरूवातीला पाहूया माहिती , घराच्या प्रवेशद्वारा विषयी –

घराचे मुख्य प्रवेशद्धार

घराची रचना / घराची रचना कशी असावी / घराची अंतर्गत सजावट - मुख्य प्रवेशद्वार
घराचे मुख्य प्रवेशद्वार

            घराचे मुख्य प्रवेशद्धार हे अतिशय महत्त्वाचे असते. संपुर्ण घराचे प्रतिनिधित्व जणु काही प्रवेशद्धारच करत असते , असे म्हणण्यास काही हरकत नाही, मुख्य प्रवेशद्धारातुन सकारात्मक आणि दैवी ऊर्जा ही आपल्या घरात प्रवेश करते. घराचे मुख्य प्रवेशद्धार हे नेहमी पुर्व दिशेलाच असावे. मुख्य प्रवेशद्धार पुर्वेला शुभ मानले जाते. घरातील व्यक्तीला उत्तम शारीरीक आणि मानसिक आरोग्य लाभते. घरात सुख शांति आरोग्य वैभव यांचा नेहमी वास राहतो . घराचा मुख्य प्रवेशद्धार हा पुर्वेला असेल तर , घरात सुर्याचा प्रकाश आणि दैवी शक्ती चा संचार खेळता राहील. पुर्व दिशेचा स्वामी सुर्य आहे. त्यामुळे घराण्याचे नाव आणि घरातील सदस्य सुर्याप्रमाणे तेजोमय आणि प्रचलित राहतील. मुख्य प्रवेशद्धार हे इतर खोल्यांच्या तुलनेत मोठया आकाराचे असावे तसेच प्रवेशद्वार हे सागवानी लाकडाचे असावे .

घरातील देवघर

घराची रचना / घराची रचना कशी असावी - देवघर
घरातील देवघर

            घरातील देवघराला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. आपल्या देवघरातच आपल्या देव-देवतांचा वास असतो. घरातील देवघरातून देवांची कृपादृष्टी ही आपल्यावर राहते . त्यामुळे ईश्वराला प्रिय आणि वैध्य असणारी दिशाच ,आपल्या घराची रचना करताना देवघरासाठी निवडावी. देवघरासाठी नेहमी ईशान्य दिशा निवडावी कारण या दिशेला ईश्वरांचा वास असतो . देवघर ईशान्य दिशेला पुर्व-पश्चिमेला असायला हवे. देवघरात नेहमी तेलाचा दिवा तेवत असावा तसेच देवघरात पुजा करत असताना आपले तोंड हे पश्चिमेकडे असावे. ईशान्य दिशा ईश्वराची दिशा असते. त्यामुळे देवघर ईशान्य दिशेलाच असावे.

घरातील स्वयंपाक घर

घराची रचना / घराची रचना कशी असावी / घराची अंतर्गत सजावट - स्वयंपाक घर
स्वयंपाक घर

            असे म्हणतात की स्वयंपाक घरात अन्नपुर्णा मातेचा आणि लक्ष्मीचा वास असतो, तसेच सर्वाचा आत्मा तृप्त आणि शांत करण्याचे महत्त्वाचे कार्य स्वंयपाक घरात केले जाते, त्यामुळे घराची रचना करताना स्वयंपाक घराच्या योग्य दिशेचा आणि रचनेचा विचार अवश्य करावा. स्वयंपाक घर हे घराच्या ईशान्य दिशेस असावे आणि गॅस ओटा /शेगडी ही नेहमी आग्नेय दिशेला असावी. आग्नेय ही दिशा अग्निदेवताची असते. त्यामुळे आग्नेय दिशेला गॅस शेगडी असावी. त्यामुळे सर्वाची भुक भागविण्याची / पोटातील अग्नि शमविण्याची महत्वाची कर्तबगारी घरातील महिला अगदी उत्कृष्ठपणे पार पाडु शकतील .

स्वयंपाक घराची दिशा योग्य असण्यासोबत आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे स्वयंपाक घरात हवा नेहमी खेळती राहीली पाहिजे, याकडे देखील लक्ष दयावे. स्वयंपाक घरातील खिडक्या ह्या पुर्व- पश्चिम असाव्या त्यामुळे सकारात्मक शक्ती घरात आकर्षित होईल आणि सकारात्मकतेचा घरात संचार होईल .

शयनकक्ष

घराची अंतर्गत सजावट / Gharachi rachana marathi mahiti - शयनकक्ष - Bedroom
शयनकक्ष – Bedroom

            घरातील शयनकक्ष हा आपण दिवसभर थकुन घरी आल्यानंतर रात्रीच्या विसाव्यासाठीचा महत्त्वाचा कक्ष समजला जातो. घरातील मुख्य पुरूषाचे शयनकक्ष हे नेहमी दक्षिण पश्चिम दिशेला असावे. त्यामुळे मुख्य पुरूषाला म्हणजेच घरातील कमावत्या व्यक्तीला शारीरीक आणि मानसिक स्थैर्य आणि आर्थिक भरभराट मिळेल. शयनकक्षातील बेड हा सागवानी/ लाकडी असावा लोखंडी असु नये, तसेच झोपण्याची दिशा पुर्व-पश्चिम असावी उत्तरेकडे पाय करून झोपु नये. पुर्व-पश्चिम झोपल्याने वैज्ञानिक दृष्टया देखील फायदाच होतो. त्यामुळे सकारात्मक उर्जा आणि शक्तीचा आपल्या शरीरात प्रवेश होतो . घराची रचना करत असताना मुख्य बेडरूम जर सांगितलेल्या योग्य दिशेत असेल तर त्याचा अनुकूल परिणाम नक्कीच होईल .आपल्या घराची आणि घरातील व्यक्तीची भरभराट होईल .

लिविंगरूम / हॉल

घराची रचना / घराची रचना कशी असावी / घराची अंतर्गत सजावट / Gharachi rachana marathi mahiti - लिविंग रूम - हॉल
लिविंगरूम / हॉल

            लिविंगरूम किंवा हॉल हा शक्यतो संपूर्ण घराच्या सर्व खोल्यांच्या मधोमध असावा , मधोमध हॉल सर्वोत्कृष्ट समजला जातो . घरात लिविंग हाल मध्ये अथवा इतरत्र कुठेही सजावटीसाठी महाभारतातील प्रसंग चित्रे किंवा इतर कोणत्याही पदधतीचे जंगली जनावरांचे चित्र, तसेच बुडणारे जहाज असे फोटो चुकूनही लाऊ नये . कारण ह्या प्रकारचे फोटो तणावग्रस्त वातावरण तयार करतात आणि घराच्या प्रगतीत बाधा बनतात . महाभारतातील प्रसंगाचे चित्र हे भांडनाचे प्रतिनिधित्व करते तर बुडणारे जहाज याचे चित्र घराच्या अधोगतीस , पैश्यांचा अपव्यय यांस कारणीभूत ठरते .

घराच्या मुख्य दारासमोर असलेली लिवींग रूम देखील शुभ मानली जातो . तसेच पुर्व आणि उत्तर दिशेकडे तोंड असलेले लिविंग रूम देखील योग्य आहे . हॉल नेहमी स्वच्छ सुशोभित असा असावा , कारण सुंपुर्ण घराचे प्रतिनिधित्व हे लिविंगरूम करत असते . आपल्या घराची आणि घरातील सदस्य तसेच त्यांचे संस्कार यांचे प्रतिनिधित्व घरातील लिविंग रूम करत असते त्यामुळे लिविंग रूम ची रचना योग्य आणि स्पष्ट अशी असावी .अशी रचना असलेली लिविंग रूम आपल्या घराचे प्रतिबिंब छान ठेवण्यास मदत करते .

संडास – बाथरूम

घरातील संडास - बाथरूम
घरातील संडास – बाथरूम

आपल्या घराची रचना करत असताना संडास – बाथरूम ची दिशा ही देखील योग्य असणे अतिशय महत्वाचे आहे . कारण घरातील इतर रूम प्रमाणे याला देखील वास्तुशास्त्रात अनन्यसाधारण असे महत्व आहे .नेहमी संडास – बाथरूमची दिशा ही उत्तर दिशा असेन , याची काळजी घ्यावी आणि याच रचनेत संडास – बाथरूम बसवावे . घरातील संडास बाथरूम हे कधी ही ईशान्य किवा पूर्व दिशेला असू नये कारण ही दिशा ईश्वरांची दिशा आहे .

ईशान्य पूर्व आग्नेय दिशेला संडास बाथरूम अयोग्य आणि अपायकरक मानले जाते . त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ति घरा बाहेर पडत नाहीत ,याउलट आपल्या घरात वाईट आणि अयोग्य गोष्टींचाच संचय हा होण्याची शक्यता जास्त असते . जर आपल्या घरात या दिशेस आधी पासूनच संडास असेन तर , दिवस-रात्र संडास मध्ये हिरव्या रंगाचा दिवा म्हणजेच लाइट चालू ठेवावा असे केल्याने वाईट गोष्टी होण्याची संभाव्यता कमी होईल ॰

सारांश -घराची रचना / घराची रचना कशी असावी /घराची अंतर्गत सजावट / Gharachi rachana marathi mahiti .

अशाप्रकारे आम्ही वर सांगितलेली माहिती वापरुन आपण जर आपल्या घराची रचना केली , तर त्याचा तुमच्या घरावर आणि तुमच्या घरातील सदस्यांवर अनुकूल परिणाम होईल आणि तुमची व घराची निश्चितच भरभराट होईल यात काही शंका नाही . आम्ही सांगितलेली माहिती आणि उपयोजन हे आपल्याला नक्की उपयोगी येईल आणि त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल .

आपल्याला वरील लेखामध्ये , सांगितलेली “घराची रचना – माहिती” या विषयीची माहिती आणि घरगुती उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top