सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय | सर्दी खोकल्यावर १० सर्वोत्तम उपाय व त्यांची संपुर्ण माहिती >> जगभरासाठी सध्या सर्दी आणि खोकला म्हणजे एक मोठी समस्या ठरत आहे. पाऊस आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी-खोकल्याचा त्रास हमखास जाणवतो. आजकालच्या बदलत्या वातावरणामुळे ह्या आजाराचं प्रमाण वाढलं आहे. बदललेलं हवामान, धूळ, माती, प्रदूषण, थंड पदार्थांचं अति प्रमाणात सेवन, व्हायरल इन्फेक्शन यांसारख्या कारणांमुळे सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवू शकते.
सर्दीमुळे ताप, अंगदुखी, कणकण यासारखं जाणवायला लागत, डोकं जड होत. सर्दी-खोकल्यामुळे नाक गळणं, घसा दुखणं, डोकेदुखी यांसारख्या त्रासदायक गोष्टी आपल्या शरीराला जाणवू लागतात. सर्दी खोकला झाला की अनेक लोक लगेच दवाखान्यात धाव घेतात. पण कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या भितीमुळे लोक दवाखान्यात जाण्याचं मुद्दामहून टाळत आहेत. सर्दी – खोकला हा सामान्य आजार आहे, पण सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी ही सगळी कोरोनाची लक्षणे आहेत, त्यामुळेच लोक दवाखान्यात जाण्यास घाबरत आहेत. परंतु असे न करता आधी कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे आणि जर चाचणी निगेटिव आल्यास सर्दी खोकल्यावर दवाखान्यात न जाताही आपण घरच्या घरी आयुर्वेदिक व नैसर्गिक पद्धतीने उपचार करू शकतो.
चला तर मग जाणून घेवूया सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय कोणते आहेत, व ते कसे अंमलात आणायचे.
सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय व उपायांची अंमलबजावणी / सर्दी खोकल्यावर १० सर्वोत्तम उपाय व त्यांची संपुर्ण माहिती (sardi khokala gharguti upay)
सर्वात आधी आपण आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुतले पाहिजेत. याबरोबरच आपल्या वस्तू, कपडे यांचीही योग्य ती स्वच्छता ठेवली पाहिजे. जेणेकरून सर्दी खोकल्या सारख्या आजरांपासून तुम्ही दूर राहू शकाल. आणि एवढी काळजी घेऊन देखील जर सर्दी खोकल्याचा त्रास झालाच तर सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय खाली दिलेले आहेत ते करा.
मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या – सर्दी खोकल्यावर सर्वोत्तम घरगुती उपाय

आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्दी खोकला झाला किंवा घसा दुखु लागला खवखवू लागला तर सर्वात आधी आपल्याला मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो. मीठ आणि कोमट पाण्यामुळे कफ कमी होतो तसेच घश्याला ही आराम मिळतो. मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास किंवा सकाळी अनुषा पोटी थोडे मीठ टाकून पिल्यास तुम्हाला उलटी होईल किंवा खोकल्या वाटे सर्दी मुळे तयार झालेला कफ बाहेर पडेल. असे सलग दोन ते तीन दिवस केल्यास तुम्हाला सर्दी आणि खोकल्या पासून निच्छित आराम मिळेल.
हळद आणि दूध – सर्दी खोकल्यावर लोकप्रिय घरगुती उपाय

प्राचिन काळापासून हळदीचा वापर अनेक आजारांवर रामबाण औषध म्हणून केला जातो. त्यातील एक म्हणजे सर्दी आणि खोकला. हळद स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होते. हळद खूप गुणकारी आहे कारण त्यामध्ये अँटीऑक्सीडंटचे प्रमाण खूप असते. हळद आणि गरम दूध हा सर्दी खोकल्यावरील सर्वात सोपा घरगुती उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूधात एक छोटा चमचा हळद घालून त्याचे सेवन करावे.हळद घालून तापवलेले दूध रात्री झोपताना पिल्यास तुमचा घसा शेकला जातो आणि खोकला कमी होण्यास मदत होते. हळदीचे दूध पिल्यानंतर शक्यतो पाणी पिऊ नये. सलग चार ते पाच दिवस हळदीचे दूध रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास तुमचा सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होतो.
आले (अद्रक) – सर्दी खोकल्यावर फायदेशीर

आल्याला आयुर्वेदातील सर्वात प्रभावी औषधी वनस्पतींपैकी एक मानलं जात. आल्यामध्ये अँटीव्हायरल गुण चांगल्या प्रमाणात असतात. आल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आलं जर कच्च खाल्लं किंव्हा आल्याचा चहा करून प्यायला तरी सर्दी-खोकल्याचा त्रास नक्की कमी होतो. आल्यासोबत लिंबू आणि मधाचा उपयोग ही तुम्ही करू शकता. गरम पाण्यात आलं चेचून त्यात लिंबाचा रस व चवीसाठी मध घाला. हे पाणी गरम असतानाच पिवून घ्या यामुळे विषाणू विरुद्ध लढायला मदत होते. तसेच नुसते आले देखील तुम्ही चघळत राहिला तरी खोकल्यापासून आराम मिळतो. यांखेरीस आल्याचे तुकडे करून त्यावर थोडे मीठ लौन देखील तुम्ही खाऊ शकता.
तुळशीची पाने – सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय

आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला माता मानलं जात. तुळस ही एक पवित्र व औषधी वनस्पती आहे. भारतात तुळशीला घरगुती औषधाचा भंडार मानल जातं.तुलशीची ताजी पाने चावुन खाल्ल्याने सर्दी खोकला बरा होतो. तुलशीची पाने कुटून त्यांना मधासोबत घेतल्यास गळ्यातील कफ दूर होण्यास मदत होते. आपण तुलशीच्या पानांचा काढाही बनवू शकतो त्यामुळेही सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो. एक ग्लास पाण्यामध्ये 10-12 तुळशीची पाने आणि आलं टाकून ते पाणी अर्धे होइपर्यंत उकळत राहावे. यामध्ये तुम्ही लिंबाचा पाने, पेरुची पानेही घालू शकता. पाणी उकळून नीम्मे झाल्यावर गरम गरम ते पाणी प्यावे, यामुळे घशाला आराम मिळतो व सर्दी-खोकला बरा होण्यास मदत होते.
गाजराचा रस – सर्दी खोकल्यावर गुणकारी
गाजराचा रस हा सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून उत्तम आहे. गाजराचा ज्यूस घेतल्याने देखील तुमची सर्दी लवकर कमी होऊ शकते. शक्यतो सकाळी हा गाजराचा रस घ्यावा याने तुमची सर्दी लवकर पिकते व कफ वाटे शरीराबाहेर फेकली जाते. साधारण सलग 4 दिवस गाजराचा रस पिल्यास तुमचा सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो.
काळीमिरी ची पावडर – सर्दी खोकल्यावर घरगुती जालिम उपाय

काळी मिरी मध्ये पेपरीन असते जे की तुमची सर्दी कमी करण्यास गुणकारी ठरते,काळी मिरी पावडर व त्यामध्ये थोडी हळद आणि थोडेशे पाणी टाकून त्यांचे मिश्रण करा. हे मिश्रण सकाळी चाटण म्हणून घेतल्यास सर्दी खोकल्यावर उत्तम घरगुती उपाय होईल. सलग तीन ते चार दिवस हे मिश्रण घेतल्यास सर्दी व खोकला कमी होतो.
दालचिनी – सर्दी व खोकल्यावरील रामबाण उपाय
दालचिनी ही सर्दी व खोकल्यावरील रामबाण उपाय आहे. दालचिनी ही सर्दी सोबतच इतर विविध प्रकारचे होणारे संक्रमण शमवण्यास मदत करते. दालचिनी च चहा देखील तुम्ही सर्दी खोकला कमी करण्यासाठी घेऊ शकता,दालचिनी घालून तयार केलेला चहा सलग चार दिवस दिवसातून दोन वेळेस घेतल्यास तुमची सर्दी जाईल. दालचिनी पासून आणखी एक सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही दालचिनी पाण्यात टाकून पाणी चांगले उकळा आणि ते पाणी गाळून घ्या व त्यामध्ये थोडेसे मध घाला हे मिश्रण सकाळी अनुषा पोटी घ्या. असे केल्याने देखील सर्दी खोकला कमी होईल.
कांदा – सर्दी खोकल्यावर गुणकारी उपाय
सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून कांदा देखील गुणकारी आहे. कांदा हा तुमच्या श्वसनाच्या अडथळयांना सहजरीत्या दूर करतो,त्या ठिकाणी असलेल्या जीवाणूना नष्ट करतो. त्याच बरोबर कांद्या मुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक देखील शरीराबाहेर काढून टाकले जातात.सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही कांदा बारीक कापून घ्या आणि त्या कापलेल्या कांद्यावर थोडे मध टाका आणि हे चांगले मिसळून तसेच झाकून रात्रभर ठेवा. सकाळी अनुषा पोटी त्या मिश्रणाला सुटलेले पाणी प्या. साधारण सलग 5 दिवस असे केल्यास तुम्हाला सर्दी – पडस यांपासून निच्छित आराम मिळेल.
लसूण – सर्दी खोकल्यावर अत्यंत फायदेशीर घरगुती उपाय

लसूण हा अॅंटी फंगल, अॅंटी व्हायरल आणि अॅंटी बॅक्टेरियल पदार्थ आहे. त्यामुळे सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून लसूण चांगला पर्याय ठरू शकतो. लसणामध्ये एलिसिन नामक एक रसायन असते जे सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. लसणाच्या ५-६ कुडया तुपात भाजून खाल्ल्याने आराम मिळतो. लसूण सर्दी-खोकल्याच संक्रमण झपाटयानं दूर करतं. लहान मुलांना जर सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर लसूण आणि जिरे एका सुती कापडात बांधून त्याची फुरचुंडी बनवा आणि त्याचा वास बाळाला द्या तसेच झोपताना बाळाच्या उश्याला ही फुरचुंडी ठेवा. असे केल्याने दोन ते तीन दिवसात सर्दी आणि खोकल्यापासुन बाळाला आराम जाणवेल.
मसाले – सर्दी खोकल्यावर उपयोगी

भारतीय स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असणारे विविध मसाले हे अत्यंत गुणकारी असतात. त्यांच्यामधील शक्तिशाली अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे ते जलद रिकव्हरीसाठी फायदेशीर ठरतात.
दालचिनीचे छोटे तुकडे, दोन काळी मिरी, दोन वेलदोडे, तीन लवगा, आल्याचा बारीक तुकडा, थोडासा गवती चहा, ५-६ तुळशीची पाने चार कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला किंवा पाणी निम्मे झाल्यानंतर त्यात साखर घालून हा काढा प्या. हा काढा रोज सकाळी एकदा असा सलग चार ते पाच दिवस घेतल्यास तुम्हाला निच्छित सर्दी खोकल्या पासून मुक्ति होण्यास मदत होईल.
सर्दी खोकल्यावर उपाय म्हणून ही काळजी घ्यावी
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुवा.
गवती चहा आणि आल्याचा गरम गरम चहा प्या.
सकाळ- संध्याकाळ गरम पाण्याची वाफ घ्या.
सारांश – सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय
सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून वरील उपाय तुम्ही बघितलेच यांसारखे उपाय करून देखील आराम वाटत नसल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याउपायांची अंमलबजावणी व्यवस्थित करणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही व सर्दी खोकल्यावर हे घरगुती उपाय गुणकारी ठरणार नाही.
आपल्याला सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, तसेच आपल्या सूचना देखील कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (9) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (9) पोट (15) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)