घसा बसणे घरगुती उपाय – Top 10 Home Remedies For Sore Throat

 घसा बसणे घरगुती उपाय /घसा बसणे यावर उपाय /गळा बसणे उपाय /ghasa basane upay >>>> घसा बसणे ही एक सामान्य समस्या आहे. पण आताच्या परिस्थितीत कोणताच आजार सामान्य राहिला नाही. प्रत्येकाला आपल्या आरोग्याची चिंता ही लागून राहिली आहे आणि याचे कारण म्हणजे कोरोना. कोरोनाने गेल्या दोन वर्षात मानवी जीवनात अनेक बदल घडवून आणले. अनेक छोट्यामोठ्या आजारांकडे आपण सध्या गांभीर्याने लक्ष देत आहोत. स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर होणार्‍या आजारांपासून वाचवण्याचा सर्वच प्रयत्न आरीत आहेत. मानसाच्या आरोग्यापेक्षा काहीच महत्वाचं नाही हे कोरोनानं जगाला दाखवून दिलं. सामन्य व किरकोळ वाटणारे आजार आजकाल मोठ-मोठ रूप घेत आहेत हे आपण पाहतच आहोत.

घसा बसणे हा देखिल तसाच एक किरकोळ व सामान्य वाटणारा असा त्रास आहे. परंतु सध्याच्या काळात मात्र घसा या अवयवाशी संबंधित कोणताही त्रास आहे असे म्हणटल्यास अगदी भीतीच वाटते. घसा बसतो किंवा गळा बसणे म्हणजेच होत काय तर, आपल्या नेहमीच्या आवाजामध्ये फरक पडतो व आपला आवाज घोगरा बनतो. घशातून शब्द बाहेर पडताना आपल्यालाथोड्या प्रमाणात किंवा इन्फेकशन जास्त असेल तर जास्त प्रमाणात त्रास होतो, बोलताना घसा हा दुखायला लागतो. घसा जास्त बोलल्यामुळे ताण पडून घश्यावर सुज देखील येऊ शकते.

घसा बसणे घरगुती उपाय /घसा बसणे यावर उपाय /गळा बसणे उपाय /ghasa basane upay
घसा बसने

आपण पाहतो की, घसा बसण्याची तक्रार हीआपणास थंड पाणी, बर्फ किंवा खराब तेलात तळलेली पदार्थ खाल्याने जाणवू शकते. घसा बसणे गळा बसणे याचे अनेक कारणे आहेत. बदललेलं हवामान हे देखील आपला घसा किंवा गळा बसण्यास कारणीभूत ठरू शकते. घसा बसणे हा तसा फार गंभीर असा आजार नाही परंतु; घसा बसणे यावर आपण वेळीच काही घरगुती उपाय करून त्यापासून आराम मिळवि शकतो. कारण कुठलाही आजार किंवा त्रास हा फार काळ आपल्या शरीरात असणे हे निरोगी आरोग्याच्या दृष्टीने काही बरोबर नाही.

म्हणूनच आपला घसा बसला असेल तर त्यावर काही घरगुती पद्धतीने उपाय करून उपचार करता यावेत याचसाठी आम्ही आजचा लेख ” घसा बसणे घरगुती उपाय /घसा बसणे यावर उपाय /गळा बसणे उपाय /ghasa basne upay” हा घेऊन येत आहोत . चला तर मग घसा बसण्याची नेमकी कारणे कोणती व त्यावर कोणते घरगुती उपचार करता येतात ते पाहूया. तर सर्वप्रथम आपण पाहूया की, घसा बसणे याची कारणे काय आहेत …….

घसा बसण्याची कारणे

साधारणपणे खालील सर्व आपला घसा बसणे किंवा गळा बसणे याची कारणे आहेत :-

  • बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत असताना आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. अचानक हवामानात बदल झाल्यामुळे त्याचा देखील आपल्या शरीरावर परिणाम होत असतो , वातावरण बदल झाला की आपण आजारी पडतो व आपला घसा बसतो/ गळा बसतो .
  • वातावरण बादल मुळे जर आपल्याला सर्दी किंवा खोकला जर झाला असेल तर यामधील इन्फेक्शन हे देखील आपला घसा बसण्याचं कारण असू शकतं.सर्दी खोकला झाला तर त्याचा सर्वात जास्त परिणाम हा घश्यावर होत असतो॰
  • आपण जर दुषित किंवा अस्वच्छ पाणी प्यायल्याने देखील आपला घसा बसू शकतो त्यामधील जंतुमुळे ही घसा बसु शकतो. आपण कुठे बाहेर गावी गेलो आणि आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये जर वारंवार बदल झाला तरी देखील आपला घसा बसतो.
  • आपण जर सतत तेलकट, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ व थंड पदार्थ यांचे सेवन गेले तरी देखील आपल्याला ही घसा बसण्याची समस्या सातावू शकते, आपला गळा आणि घसा घरब होऊ शकतो.
  • अनेकांना अगदी मोठमोठ्याने, जोरात ओरडून बोलण्याची सवय असते तसेच सतत बोलत-बडबडत राहण्याची ही सवय असते यामुळे स्वर तंत्रावर ताण पडतो व घसा बसु शकतो. गळा बसू शकतो.
  • यासर्व वरील कारणां शिवाय आपल्याला जर थायरॉइड असेल किंवा घशाचा कर्करोग/कॅन्सर यासारखे मोठे आजार झाले असतील किंवा आपले घशाचे कोणते ऑपरेशन झाले असेन तरीही ते घसा बसण्याची कारणे असु शकतात.
  • जर एखाद्याला दारू, सिगारेट किंवा तंबाखु यासारखी व्यसने करण्याची सवय असेल तर त्याला घसा बसण्याचा त्रास होवु शकतो. त्या व्यक्तीचा सारखा सारखा घसा बसू शकतो किंवा गळा बसू शकतो आणि त्याला घश्याच्या अंर्क तक्रारी देखील उद्भवू शकतात.

घसा बसणे घरगुती उपाय/घसा बसणे यावर उपाय /गळा बसणे उपाय/(ghasa basane upay) :

घसा बसला किंवा घशातील कोणतीही समस्या निर्माण झाली तर अतिशय त्रास होतो, त्यामुळे घसा बसणे घरगुती उपाय / घसा बसणे यावर उपाय / गळा बसणे उपाय या लेखातील आम्ही सांगितलेले उपाय करून तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकतात. चला तर मग पाहूया , घसा बसणे घरगुती उपाय कोणकोणते आहेत ते –

आलं आणि मध :घसा बसणे घरगुती उपाय

घसा बसणे घरगुती उपाय /घसा बसणे यावर उपाय /गळा बसणे उपाय /ghasa basane upay
आले आणि मध – घसा बसणे घरगुती उपाय

आल्याला आयुर्वेदात फारचं महत्व आहे. आलं ही एक प्रभावी औषधी वनस्पती आहे. घसा जर बसला असेल तर आल्याचा छोटा तुकडा मधासोबत चावून खावा. यामुळे घशातील कफ, सुज, इन्फेक्शन कमी होते व घशाला आराम मिळतो, तसेच आवाजही मोकळा होतो. दिवसातुन दोन ते तीनवेळा आलं व मध खावे, याने आपला त्रास नक्कीच कमी होईल आणि आराम मिळेन.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या : गळा बसणे उपाय

घसा बसणे घरगुती उपाय /घसा बसणे यावर उपाय /गळा बसणे उपाय /ghasa basane upay
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

 घसा जर बसला असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या. त्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात थोडेसे मीठ घालावे आणि त्या पाण्याणे गुळण्या कराव्यात यामुळे घशाला आलेली सुज कमी होण्यास मदत मिळते तसेच काही इन्फेकशन किंवा व्हाईरल इन्फेकशन असेल तर ते देखील कमी होते आणि त्याचसोबत आवाज/ गळा बसणे कमी होते.

मध आणि लवंग: घसा बसणे यावर उपाय

घसा बसणे यावर उपाय /गळा बसणे उपाय /ghasa basane upay
मध आणि लवंग

लवंगाची पावडर करून मधासोबत त्याचे चाटणं बनवून घ्यावे. हे चाटणं घेत राहिल्याने घशाला आराम मिळतो व आपला आवाज मोकळा होण्यास सुरवात होते. लवंग ही देखील यावर रामबाण उपाय म्हणून काम करते.

लिंबाचा रस : ghasa basane upay

लिंबू पाणी - घरगुती उपाय
लिंबू पाणी

एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावे यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होते. तसेच कोमट पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्याच्या गुळण्या केल्याने ही घशाला आराम मिळतो व घसा बसणे कमी होते.

मध

मध हे एक नैसर्गिक अ‍ॅन्टिबायोटिक गुणधर्म असणारे आहे त्यामुळे मध हे देखील अनेक आजारा वर गुणकारी आहे ,त्यामुळे कोमट पाण्यात मध मिसळून घेतल्याने घशातील सुज व इन्फेक्शन कमी होते आणि आपला गळा बसणे घसा बसणे पुर्ण पणे कमी होते. रोज सकाळ संध्याकाळ मध कोमट पाण्यात मिसळून प्यावे त्याने बराच आराम मिळेल.

लसुण

लसूण - घरगुती उपाय

घसा जर बसला असेल तर एक ते दोन लसणाच्या पाकळ्या कच्च्या चावुन खाव्यात. लसूण हा गरम असून त्याचा अतिशय उग्र वास असतो त्यामुळे घशातील कोणतेही इन्फेकशन आणि इतर समस्या राहत नाही आणि यामुळे घसा बसणे कमी होते.

ओवा

घसा बसणे घरगुती उपाय /घसा बसणे यावर उपाय /गळा बसणे उपाय /ghasa basane upay
ओवा पाणी

दोन ग्लास पाण्या मध्ये दोन चमचे ओवा घालुन ते पाणी मंद आचेवर उकळुन घ्यावे. थोड्या वेळाने पाणी कोमट झाल्या नंतर त्यात मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे घशाची सुज कमी होवुन आवाज ही मोकळा होण्यास मदत होते आणि घसा व गळा यांच्या समस्या नाहीशा होतात. लसूण या प्रमाणेच ओवा देखील या त्रासावर अनुकूल परिणाम करणारा आहे.

हळद आणि दूध

घसा बसणे घरगुती उपाय - हळदीचे दूध
हळदीचे दूध

 हळद आणि गरम दूध हे अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून ओळखले जाते. गरम दुधात हळद घालुन प्यायल्याने देखील आपल्या घशा तील इन्फेक्शन कमी होते व घशाला बर्‍यापैकी आराम मिळतो. हळदी बरोबर सुंठ पूड ही देखील दूधात घालु शकता. आधीच्या काळापासूनच जास्त खोकला किंवा सर्दी ताप अथवा इन्फेकशन असेल तर हा उपाय करत असत

कांद्याचा रस

कांदा रस - घरगुती उपाय
कांदा रस

कांद्याचे खाण्याशिवाय ही औषधी उपयोग आहेत. कांद्याच्या रसामुळे कफ पातळ होतो तसेच घसा मोकळा होतो. दिवसातुन दोन ते तीन वेळा कांद्याचा रस किंवा त्याचे चाटणं बनवुन त्याचे सेवन करावे. याने घसा बसणे गळा बसणे या समस्या नाहीश्या होतात.

घसा बसने यावर उपाय/गळा बसणे उपाय यासोबत थोडी काळजी घेतली तर हा त्रास लवकरचं कमी होइलं

  • घसा / गळा जर सारखा बसत असेल किंवा बसला असेल तर जोरात किंवा घशाला ताण देवून बोलणे टाळावे.
  • जास्त बडबड न करता आपल्या घशाला जस्तीत जास्त आराम कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे आणि घासची काळजी घ्यावी.
  • आपल्या रोजच्या जेवणात आपण थंड, तेलकट, व मसालेदार पदार्थ हे खाणं बर्‍यापैकी टाळावं.
  • घसा बसल्यास दारू, सिगारेट, तंबाखु यासारखी व्यसने असतील तर ती ताबडतोब बंद करावीत.
  • दिवसभरात भरपुर पाणी प्यावे. त्याचबरोबर रोज रात्री झोपण्या आधी कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्या व पाणी कोमट करून प्यावे.

सारांश -घसा बसणे घरगुती उपाय /घसा बसणे यावर उपाय / गळा बसणे उपाय / ghasa basane upay

आपल्याला जर सतत घसा बसणे किंवा गळा बसणे ही समस्या सतावत असेल तर आपण आम्ही आजच्या लेखात सांगितलेले उपाय तुम्ही करून बघावे त्याने आपल्याला नक्कीच बराच फायदा होईल आणि आपला त्रास पुर्णपणे कमी होईल .

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, घसा बसणे घरगुती उपाय / घसा बसने यावर उपाय / गळा बसणे उपाय /ghasa basane upay कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top