लहान मुलांच्या पोटदुखीवर घरगुती उपाय (lahan mulanchya pot dukhivar gharguti upay) >> बाहेरचे काहीही खाल्ल्याने किंवा इतर कारणाने आपले पोट बिघडते आणि ते दुखते देखील, त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये पोट दुखण्याच्या समस्या केाणत्या न कोणत्या कारणांनी उद्भवतात. आणि जर तुमचे बाळ हे दोन वर्षाच्या आतील असेल, तर ते का रडत आहे हे तुम्हाला लवकर कळतही नाही. दोन तीन वर्षांच्या पुढील लहान मुले सांगु तरी शकतात की पोट दुखत आहे.
पण अगदीच लहान मुलांचे पोट दुखत असलेले बाळ आपल्याला सांगु शकत नाही आणि मग ते बाळ सतत रडत राहते. सहा महिन्यांपर्यंतचे बाळ फक्त आईचे दुध पित असते. त्यामुळे जर बाळांचे पोट दुखत असेल तर ते आईने काही तिखट किंवा लहान बाळांना न पचणारे अन्न खाल्ले तर त्या बाळाचे पोट दुखते आणि मग ते बाळ रडते आणि आपल्या लवकर लक्षात येत नाही.
तसेच दोन ते तीन वर्षांच्या पुढील लहान मुले सांगु शकतात, आई माझे पोट दुखत आहे आणि मग आपण त्यावर लवकरात लवकर काही घरगुती उपाय करू शकतो. या मुलांचे पोट जास्त खाल्ल्याने, तिखट, अतिमसालेदार पदार्थ किंवा जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने दुखते. तसेच पोटात जंत देखील होतात. आणि या व्यतिरिक्त अनेक अशी कारणे आहेत, ज्याच्यामुळे लहान मुलांचे पेाट दुखते. पोटदुखीमुळे मुलांचे खेळण्यात लक्ष लागत नाही, त्यांना झोप येत नाही तसेच त्यांना काही खेळावे सुध्दा वाटत नाही. आणि मग याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होऊन मुलांना त्रास होते, त्यांचे वजन देखील कमी होते. त्यामुळे यावर प्रभावी असे घरगुती उपाय करून आपल्या मुलांना आपण पोटदुखीच्या त्रासापासुन वाचवु शकतो.
लहान मुलांच्या पोटदुखीवर घरगुती उपाय (lahan mulanchya pot dukhivar gharguti upay)
आपल्या लहान मुलाचे पोट दुखत आहे हे लक्षात आल्यावर तुम्ही घरच्या घरी काही उपाय करून त्या वेदनांपासून त्याला आराम मिळेल असे करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात असेच काही साधे आणि सोपे घरच्या घरी करता येणारे लहान मुलांच्या पोट दुखीवरील घरगुती उपाय.
हिंग – लहान मुलांच्या पोटदुखीवर गुणकारी घरगुती उपाय

लहान मुलांचे पोट जर दुखत असेल, तर तुम्ही आपल्या मुलांना हिंग देवु शकता. हिंग हा लहान मुलांच्या पोटदुखीवर रामबाण असा उपाय आहे. हिंगामुळे शरीरातील हवा बाहेर पडते आणि पोटांच्या वेदना कमी होतात. थोडेसे पाणी घ्यावे त्यामध्ये हिंग मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा. ही तयार पेस्ट बाळाच्या पोटावर लावा. पेस्ट बाळाच्या बेंबीच्या आतमध्ये जावु देउ नका. किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये हिंग पावडर मिसळुन पेस्ट तयार करून घ्या, या पेस्ट ने बाळाच्या पोटावर हलक्या हाताने मसाज करावी असे केल्याने बाळाला पोट दुखी पासून आराम मिळू शकतो.
मध – पोटदुखीवर उपयोगी

कोणत्याही प्रकारच्या पोट दुखीवर मध हा एक खुप चांगला उपाय आहे. लहान मुलांची पोटदुखी कमी करण्यासाठी मधामध्ये अॅंटीऑक्सीडेंट सारखा स्त्रोत आहे. थोडेसे मध घ्या आणि ते कोमट पाण्यामध्ये टाकुन आपल्या मुलांना प्यायला दया असे केल्याने बाळाचे पोट दुखणे थांबते आणि लहान मुलांना मध गोड असल्यामुळे आवडते देखील. हा उपाय दोन वर्षापुढील मुलांवर करावा दोन वर्षांच्या आतील मुलांना हे देवु नये.
आंबा आणि चिंचुका – पोटदुखी थांबवण्यासाठी अत्यंत गुणकारी

आंब्या मधील जी कोय असते ती देखील एक औषध प्रमाणे कार्य करते त्यासाठी पोट दुखत असेल तर आंब्या मधील कोय ही पाण्यासोबत सहाने वर उगळावी, आणि त्याचबरोबर चिंचुका सुध्दा पाण्यासोबत सहानीवर उगळावा. चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि ही तयार पेस्ट तुम्ही तुमच्या बाळाला चाटवावी. बाळाला जुलाब लागले असतील तर ते कमी होतील आणि बाळाचे पोट दुखणे नक्कीच थांबेल.
दही – लहान मुलांच्या पोट दुखीवर फायदेशीर

आपल्या मुलांना दही खाऊ घाला आणि हा घरगुती उपाय करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की, दही हे ताजे असावे फ्रिजमधले थंड दही नसावे. दहयामध्ये असे गुण असतात की जे लहान मुलांचे पोट दुखण्यापासुन आराम देतात. थोडेसे मेथीचे दाणे कुटून बारीक करून घ्या आणि त्यामध्ये दही टाकावे. हे तयार मिश्रण तुमच्या मुलांना खायला दया. यामुळे लहान मुलांचे पोट दुखणे कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्यासोबतच पोटदुखीच्या काळामध्ये आपल्या बाळाला मुगाच्या दाळीची खिचडी किंवा भात खाऊ घालावा. यामुळे पोटात आग न पडता पोट शांत होईल आणि पोट दुखणार देखील नाही.
मुलांच्या पोटात गॅस होणार नाही याची काळजी घ्या
अगदीच जे लहान बाळ असतात जे की आईच्या दुधावर असतात. अशा बाळांचे पोट जर दुखत असेल तर, त्या बाळाला दुध पाजल्या पाजल्या झोपु न देता उभे करून त्याचा ढेकर निघू ध्यावा. बाळाला हळुच खांदयावर घ्या आणि पाठिवर हळुवारपणे हात फिरवत रहा आणि बाळाची मान देखील व्यवस्थित पकडा असे जोपर्यंत बाळ ढेकर काढत नाही तेापर्यंत करा. यामुळे बाळांच्या पोटात नुसती हवा भरणार नाही आणि त्याचे पोट देखील दुखणार नाही.हे तुम्ही नियमित पाने केले पाहिजे म्हणजे जेंव्हा बाळाचे पोट दुखत नसेल तेंव्हा देखील कारण असे केल्याने तुमच्या बाळाला पोटात गॅस होणे यांसारख्या गोष्टी होणार नाहीत.
जायफळ – पोट दुखीवर आयुर्वेदिक उपाय

जायफळ हे देखील पोट दुखी थांबवण्यासाठी गुणकारी आहे, जायफळामुळे देखील बाळाचे पोट दुखत नाही. बर्याच वेळेस लहान मुलांच्या पोटात गॅस तयार होतो आणि बाळ चिडचिड करते. अशावेळेस बाळाला जेवणातुन किंवा दुधातून जायफळ खावु घालावे याने नक्कीच आराम मिळु शकतो. सहा महिन्याच्या आतील बाळाला जायफळ कमी प्रमाणात दयावे आणि थोडया मोठया मुलांना तुम्ही जरा जास्त जायफळ आहारामध्ये दिल्यास नक्कीच पोटदुखीवर आराम मिळतो.
ओव्याची वाफ दिल्याने देखील मुलांची पोट दुखी थांबते
लहान बाळाचे पोट दुखत असेल आणि बाळ खुपच रडत असेल तर आईने ओवा खायचा आणि त्या खाल्ल्येल्या ओव्या ची वाफ बाळाच्या पोटावर सोडावी. किंवा पोटावर फुकावे किंवा एका सुती कपडयांत ओवा टाकावा आणि तो कपडा तव्यावर गरम करून घ्यावा आणि बाळाचे पोट शेकावे. ती ओव्याची केलेली पुरचुंडी जास्त गरम नसावी. कारण आपल्या बाळाला जास्त गरम सहन होत नाही. असा प्रयोग दिवसांतुन दोनदा केल्यास बाळाचे पोट दुखणे थांबते.
मध आणि आल्याचा रस – पोट दुखीवर गुणकारी

साधारण एक चमचा मध आणि एक चमचा आल्याचा रस घ्यावा. हे दोन्ही योग्यप्रकारे मिक्स करून त्यामध्ये चिमुटभर मीठ टाका. आणि हे चाटण आपल्या मुलांना चाटायला द्या. असे दिवसातुन साधारण तीन ते चार वेळा करा. हा उपाय दोन वर्षाच्या पुढील मुलांसाठी करावा. याने त्यांचे पोट दुखणे किंवा पोटातील कळा थांबण्यास मदत होईल.
साखर आणि मीठ टाकलेले पाणी
एक ग्लास स्वच्छ पाणी घ्यावे त्यामध्ये एक चमचा साखर टाकावी आणि थोडेसे मीठ टाकुन हे मिश्रण चांगले ढवळुन घ्यावे. हे तयार मिश्रण आपल्या मुलांचे पोट दुखत असल्यास त्यांना पाजत रहावे असे केल्याने लहान मुलांचा पोटदुखीचा त्रास हा निश्चित कमी होईल. साखर आणि पाणी यामुळे डीहायड्रेशन देखील होते आणि शरीरातील पाणी भरून निघण्यास मदत होते.
जिरे, मीठ आणि लिंबाचा रस
जिरे आणि मीठ सारख्या प्रमाणा मध्ये घ्या आणि हे लिंबाच्या रसात टाका. जिरे आणि मीठ भिजेल इतका लिंबाचा रस घ्यावा आणि सात दिवस हे तयार मिश्रण काचेच्या हवाबंद बाटलीत भरून ठेवा. आणि सात दिवसानंतर हे मिश्रण उन्हात वाळवा आणि हे मिश्रण कोरडे करून त्याची पुड बाटलीत भरून ठेवा. आणि जेव्हा पोट दुखेल तेव्हा ते आपल्या मुलांना खायला दया.हा लहान मुलांच्या पोटदुखीवर उत्तम घरगुती उपाय आहे.
सारांश – लहान मुलांच्या पोट दुखीवर घरगुती उपाय (lahan mulanchya pot dukhivar gharguti upay)
लहान मुलांच्या पोट दुखीवर घरगुती उपाय आपण वरील लेखामध्ये पहिले, वरील सर्व उपाय हे घरच्या घरी अगदी सहजतेने तुम्ही करू शकता. तुमचे बाळ दोन वर्षापेक्षा कमी वयाचे असेन तर तुम्हाला हे उपाय करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. वरील पैकी उपाय करून देखील तुमच्या बाळाला पोट दुखी पासून आराम मिळत नसेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले लहान मुलांच्या पोटदुखीवर घरगुती उपाय तुम्हाला कसे वाटले, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (32) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (9) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (9) पोट (15) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)
पोट दुखी २ वर्षा च बाळ
सध्या चा इतिहास
घरगुती उपाय
२ वर्षा च्या बाळाला कोणत्या लसी देतात