शुगर कमी करण्याचे उपाय – शुगर ची लक्षणे (signs of diabetes)

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय / मधुमेह उपचार मराठी/ शुगर साठी आयुर्वेदिक औषध / signs of diabetes >>> आजकाल च्या धका-धकीच्या जीवनात आपण पाहतो की बर्‍याच लोकांना अनेक आजारांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. व्यक्तीच्या जीवनातील नियमित जीवनशैली, खाण्यापिण्यात झालेले बदल यामुळे त्यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागतो. त्या पैकीच एक आजार म्हणजे शुकर त्यालाच आपण इंग्रजी मध्ये डायबटीज असे म्हणतो. शुगर म्हणजेच डायबटीज ही रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे होणारा आजार आहे.

रक्तातील साखरेची पातळी वाढली तर शुगर होण्याची समस्या ही निर्माण होते. जर आपल्याला शुगर झाली असेन तर आपल्याला आपल्या शरीराच्या अनेक भागात नकारात्मक परिणाम हे दिसायला लागतात. शुगर झाल्यामुळे इन्श्युलीन याच्या निर्मितीत थोडा बहुत अडथळा निर्माण होत असतो, त्यामुळे शरीरातील ग्लुगोज हे प्रमाणापेक्षा अधिक वाढू लागते, आणि आपल्याला साखरेची बिमारी लागू शकते, म्हणजेच आपल्याला डायबटीस (diabetes) हा आजार होऊ शकतो.

शरीरातील ग्लुकोज प्रमाणा पेक्षा जास्त वाढण्या व्यतिरिक्त देखील, याशिवाय व्यक्तीने प्रमाणा पेक्षा एखाद्या गोष्टीचे जास्त टेंशन किंवा मानसिक ताण घेतल्यास देखील आपली शुगर ही वाढू शकते, रक्तातील शुगरच्या प्रमाणात वाढ होते. मानवी शरीरातील आवश्यक हार्मोनच्या असंतुलनामुळे देखील आपणास शुगर होतो. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला जीवंत राहणे व आपले कार्य करणे या गोष्टीं साठी सर्वात जास्त ग्लुकोज ची आवश्यकता असते.

आपले जेवण झाल्यावर अन्नाचे पचन होते. अन्ना तील कार्बोह्यड्रेड युक्त पदार्थाचे रूपांतर साखरेत होते. ही अतिरिक्त साखर ग्ल्यकोजेण च्या स्वरुपात राखीव साठा म्हणून स्ंनायु मध्ये व लीवर मध्ये साठवली जाते. ते आतड्यां मधून रक्तात मिसळते. रक्तातून ती आपल्या शरीरात व शरीरा तून संपूर्ण पेशीत पसरते, आणि सर्व पेशींना पुरवली जाते. आहार पचनाच्या या तत्वावर इन्स्युलीन चे काम सुरू होते. तर आता सर्वप्रथम आपण इंसुलिन म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे.

पोटामध्ये जठराच्या मागच्या बाजूला स्वादुपिंड (pancress) नावाचा एक अवयव असतो. स्वादु पिंड ही एक ग्रंथी आहे. शरीरातील पचनावर नियंत्रण ठेवणारी, आपले हार्मोन्स व पाचक रस हे स्वादूपिंडामद्धे तयार होत असतात. स्वादु पिंडामध्ये आयलेट्स ऑफ लाँगर्हांस नावाचे पेशींचे पूजके असतात, यामध्ये वेग वेगळ्या पेशींचा समावेश असतो. त्यामधील बीटा या प्रकारच्या पेशी ह्या इंसुलिन निर्मितीचे कार्य करत असतात. शरीराच्या गरजे नुसार कमी जास्त प्रमाणात इंसुलिन हे रक्तामध्ये सोडले जात असतात.

रक्तातील साखरेचा शरीरातील पेशींमध्ये प्रवेश होणे या गोष्टी साठी देखील इंसुलिन ची आवश्यकता असते, म्हणजेच आपण अशी कल्पना केली की, पेशी मित्ती (cell well) ही एखाद्या कुलूपाने बंद केली आहे. तर ग्लुकोजच्या प्रवेशा साठी हे कुलूप उघडणे गरजेचे आहे. या कुलूपाला शास्त्रीय भाषेत (receptor) असे म्हणतात. प्रत्येक कुलूपासाठी एक ठराविक प्रकारची किल्ली असते. तशीच या receptor साठी इंसुलिन ही किल्ली आहे. इन्स्युलीन मुळे ग्लुगोज पेशीला वापरता येते त्याशिवाय यकृता तील साखरेच्या उत्पादकाला प्रतिबंध करण्याचे काम इन्स्युलीन करत असते म्हणजेच रक्तातील साखर ही पेशी पर्यंत पोहचवने व यकृतातील साखरेवर नियंत्रण ठेवणे, अशा दोन्ही मार्गानी रक्त शर्करा नियंत्रण ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे असे हे काम इन्स्युलीन करत असते त्यामुळे आपल्या शरीरात इन्स्युलीन निर्मिती आणि त्याचे कार्य हे योग्य असणे अतिशय महत्त्वाचे आहे.

Table of Contents

शुगर ची लक्षणे सांगा / signs of diabetes

शुगर ची लक्षणे आपल्याला ओळखता आले आणि आपण त्यावर लगेचच घरगुती उपाय केले तर आपली शुगर आटोक्यात येऊ शकते आणि आपली शुगर वाढणे देखील बंद होते त्यामुळे आपल्याला आधी शुगर वाढल्याची लक्षणे ओळखता आली पाहिजे, ती लक्षणे खालील प्रमाणे –

  • शुगर वाढल्यास सर्वात जास्त जाणवणारे लक्षण म्हणजे भूक खूप लागते , लवकर पोट भरत नाही.
  • शुगर वाढल्यास सारखी सारखी लघवी येते आणि आपल्या शरीरातील पाणी कमी होते.
  • जास्त लघवी झाल्याने आणि शरीरातील पाणी कमी झाल्याने आपल्याला तहान देखील जास्त लागते, हे देखील शुगर वाढल्याचे लक्षण आहे.
  • सतत थकल्या सारखे वाटत असेल तर देखील शुगर वाढलेली असू शकते.
  • डोळ्याला देखील अंधुक दिसू लागते, अंधारी आल्यासारखी वाटते , डोळे जड पडतात. म्हणजेच दृष्टी दोष च्या समस्या शुगर वाढल्यास जास्त जाणवतात.
  • आपल्या शरीरावर खाज येऊ शकते, हे लक्षण देखील शुगर वाढल्यास जाणवते.
  • आपल्याला जर काही लागले किंवा कसली जखम झाली तर ती जखम अजिबात लवकर भरत नाही, हे देखील शुगर वाढल्याचे लक्षण आहे.
  • फंगल इन्फेकशन सतत होणे.
  • शुगर वाढल्यास हात -पाय बधीर पडण्याचे लक्षण देखील जाणवते.

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर साठी घरगुती उपाय

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय /  मधुमेह उपचार मराठी/ शुगर साठी आयुर्वेदिक औषध / signs of diabetes
शुगर साठी घरगुती उपाय

बर्‍याच वेळा आपण काही घरगुती उपाय करून देखील एखाद्या आजारावर नियंत्रण ठेऊ शकतो. बी पी आणि शुगर यांच्या जर टॅब्लेट / गोळ्या सुरू केल्या तर त्या परत बंद करता येत नाहीत त्यामुळे आपली शुगर कमी करण्याचे उपाय जे आम्ही या लेखात सांगत आहोत ते आपण नियमित करावे त्याने नक्कीच फायदा होईल. शुगर कमी करण्याचे उपाय खालील प्रमाणे आहेत

फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा – शुगर कमी करण्याचे उपाय

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय / signs of diabetes - फळभाज्या
फळभाज्या

शुगर कमी करण्यासाठी रोजच्या आहारात कारले, काकडी, टोमॅटो, सलगाम, करवंद, भोपळा,पालक, मेथी व गोबी या भाज्या जास्त प्रमाणात खाव्या. त्याचबरोबर बटाटे आणि रताळे हे सतत खाणे टाळावे. याने शुगर कमी होण्यास आणि नियंत्रणात राहण्यास मदत देखील होते. पालेभाज्या आणि फळे शरीरातील मिनरल्स आणि इतर घटक मिळतात.

कोणती फळे खावीत व कोणती फळे खाऊ नयेत

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय / signs of diabetes - फळे
फळे

शुगर वाढल्यास मुळातच जास्त प्रमाणात साखर असलेली फळ खाल्ली तर शुगर जास्त वाढू शकते त्यामुळे सर्व फळं यामध्ये संत्री, पपई ,डाळिंब , पेरु ही फळे नियमित खावीत. शिवाय आंबा, केळी ,लीची व द्रांक्ष ही फळे कमी प्रमाणात खावे कारण यात शुगर जास्त प्रमाणात असते.

गर असलेल्या व्यक्तींना काय खावे, काय खाऊ नये या बाबत खूप संभ्रम असतो. शुगर कंट्रोल करण्यासाठी अधिकाधिक फळांचे सेवन करावे कारण शुगर असलेल्या लोकांना जास्त प्रमाणात भूक लागते आणि अन्न खाल्ले तर त्यातून शुगर वाढते, त्यामुळे फळे खावी, फलतील रसामुळे पोट भरेल आणि भूक देखील लागणार नाही व शुगर देखील वाढणार नाही. शुगर च्या रुग्णांनी कलिंगड आणि अननस सोडून सगळी फळे खावी, असे डॉक्टर सांगतात. या दोन फळांना सोडून बाकी सर्व फळात ग्लुकोज फक्त 55 पेक्षा देखील कमी असते.

ड्रायफूड खावे

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय / signs of diabetes
ड्रायफूड

आक्रोड अंजीर व बदाम हे ड्रायफूड जास्त प्रमाणात खावे मात्र बेदाणे किंवा अंजीर कमी प्रमाणात खाणे किंवा नियमित खाणे टाळावे.शुगर च्या रुग्णांनी साखर गूळ उसाचा रस चॉकलेट व जास्त गोड पदार्थ हे अजिबात खाऊ नयेत याचे सेवन केल्याने साखर वाढण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो असे गोड पदार्थ खाणे टाळावे त्यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

लसूण – मधुमेह उपचार मराठी

शुगर साठी घरगुती उपाय/ शुगर कमी करण्यासाठी काय करावे/ मधुमेह उपचार मराठी/ शुगर साठी आयुर्वेदिक औषध/ home remedies for diabetis in marathi
लसूण

लसूण चे सेवन केल्यास शुगर आजार हा झपाट्याने कमी होण्यास मदत होते. दररोज लसूणच्या कच्च्या पाकळ्या खाल्याने शरीरात इंसुलिन सेन्सिविटी वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील ब्लड शुगर देखील कमी होते आणि तुमची शुगर नियमित नियंत्रणात राहण्यास बराच फायदा होतो. अशाप्रकारे लसूण खाणे, कच्चा लसूण अनशेपोटी खाणे याने आपली शुगर ही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

व्यायाम करणे

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय / signs of diabetes - व्यायाम करणे
व्यायाम करणे

नियमित व्यायाम हे सर्व रोगावरचा रामबाण उपाय आहे त्यामुळे शुगर असल्यास तर दररोज अर्धा तास चालणे व्यायाम करणे आणि नियमित चालणे व योगासने व प्राणायाम करणे सर्वात फायदेशीर व उत्तम आहे त्यामुळे शुगर वाढण्यावर नियंत्रण होते.

तुळशीच्या पानाचे सेवन करावे

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय / signs of diabetes
तुळशीची पाने

शुगरच्या रुग्णांनी दररोज उपाशी पोटी तुळशीची पाणे 3 ते 4 नियमित खावीत, त्यामुळे शुगर कमी होण्यास मदत होत. तुळशीची पाणे अॅंटी औक्सिडंट्स आणि आवश्यक घटक शरीरातील इन्स्युलीन साठवून ठेवणार्‍या व सोडणार्‍या पेशींना योग्यरित्या मदत करते.तुळशीच्या पानांमध्ये शुगर आजार बरा करण्यासाठी 100 % गुणधर्म असतात, जसे की, अॅंटीऔक्सिडेंट आणि शुगर कमी करणारे तेल.

रोज सकाळी तुळशीच्या पानांचा रस काढून प्यावा किंवा तुळशीचे पाणे खावी. त्यामुळे आपल्या शरीरात यूजेनौल, मेथल युजेनल आणि कॅरियाफोलीन च्या वाढीस मदत होते.असा तुळशीच्या पानांचा रस आपण रोज सकाळी अनुशा पोटी घेतल्यास आपल्या शुगरच्या आजारावर बरेच नियंत्रण राहते आणि शुगर वाढणे हळूहळू कमी होऊन, तुमची रक्तातील वाढलेली शुगर नियंत्रणात येते.

बडिशोप खावी

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय / signs of diabetes - बडीशेप
बडीशेप

अनेक लोकांना जेवण झाल्यानंतर बडीशोप खाण्याची सवय असते, खरोखरच ती सवय आरोग्यास अत्यंत फायदेशीर असते. त्यामुळे पचन देखील होते, मुख दुर्गंधी देखील नाहीशी होते आणि शुगर देखील वाढत नाही, त्यामुळे जेवण झाल्यानंतर शुगर असल्यास अवश्य बडीशोप खावी. त्याने शुगर कमी होते आणि वाढत नाही.बडिशोप ही साखर असलेल्या व्यक्तीने खाणे लाभदायक असते. त्यामुळे शुगर असलेल्या व्यक्तीने जास्तीत जास्त प्रमाणात बडिशोप खाणे हे देखील फायदेशीर ठरते.

मेथीचे दाणे

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय / signs of diabetes - मेथीचे दाणे
मेथीचे दाणे

हिवाळ्यात मेथीचे दाणे खाणे गुणकारी असते, त्याशिवाय रोज सकाळी व संध्याकाळी ताज्या गव्हाचा व ज्वारीचा रस आपल्या आहारात घेतला पाहिजे. मेथी दाणे हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे.

दालचीनीचा आहारात समावेश करणे

शुगर साठी घरगुती उपाय/ शुगर कमी करण्यासाठी काय करावे/ मधुमेह उपचार मराठी/ शुगर साठी आयुर्वेदिक औषध/ home remedies for diabetis in marathi
दालचिनी

आपल्या आहारमध्ये दालचीनी चे सेवन करणे साखर असल्यास हितकारी ठरते. कारण दालचीनी मध्ये बायोएकिटीव्ह कंपाऊंड असते हे शुगरच्या विरूध आणि शुगरला प्रतिबंध करण्यास मदत करते.दालचीनी देखील शुगर कमी करण्यास मदत करते. दालचीनी मुळे इंसुलिन ची संवेदन क्षमता वाढून तुमच्या रक्तातील शर्कराची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे शुगरवर नियंत्रण राहते. त्याचबरोबर दररोज अर्धा चमचा दालचीनी पावडर खाल्याने इंसुलिनची क्षमता वाढून वजन कमी करण्यास मदत होते त्याच बरोबर हृदय विकाराच्या त्रासापासून आराम मिळतो.

कोरफड गर आणि ताक पिणे

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय / signs of diabetes - कोरफड गर
कोरफड गर

ज्या लोकांना शुगर ची समस्या आहे त्यांनी कोरफडचे रस ताकामध्ये गर घालून पिऊ शकतो. त्यामुळे शरीरातील साखरेच्या प्रमाणात संतुलनास मदत होते.

भरपूर पाणी पिणे

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय /  मधुमेह उपचार मराठी/ शुगर साठी आयुर्वेदिक औषध / signs of diabetes
कोमट पाणी प्यावे

बर्‍याच लोकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. पाण्यात देखील शुगर काही प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे तसेच थंड पाणी पिण्यापेक्षा, पिण्याच पाणी थोड कोमट करून प्यावे. सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीर दिवसभर ऊर्जापूर्ण राहते आणि शुगर देखील वाढत नाही. त्याच बरोबर कोमट पाणी पिल्याने चरबी देखील कमी होते आणि वजन देखील कमी होते.शुगर असल्यास त्या व्यक्तीने जास्त प्रमाणात पाणी प्यावे. कारण शुगर वाढल्यास जास्त प्रमाणात लघवी येते आणि शरीरा तील पाण्याचे प्रमाण हे कमी होते.पाणी जास्त पिल्याने आपण हेल्दि म्हणजेच निरोगी राहतो व आपली साखरेची बिमारी नियंत्रणात येते.

अपमारी च्या पानांचा रस

अपमारी या वनस्पतीचे पाणे खाल्ल्याने किंवा त्याचा रस पिल्याने देखील शुगर म्हणजेच साखरेचा आजार पुर्णपणे नष्ट होऊ शकतो. अपमारी ची पाणे ही

शुगर साठी आयुर्वेदिक औषध

शुगर साठी खालील आयुर्वेदिक औषध म्हणून खालील आयुर्वेदिक औषधी उपचार करावेत त्याने आपला हा शुगर चा त्रास नक्कीच कमी होईल.

कारल्याचा रस घेणे आणि कडूलिंबाचा रस

कारल्याचा रस तसेच कडूलिंबाच्या पानांचा रस हा देखील आपल्या शरीरातील वाढलेली साखर कमी करण्यास मदत करते. कडूलिंबाच्या पाणामुळे इंसुलिनची संवेदनक्षमता ही वाढते. तसेच शुगर साठी आवश्यक हायपोग्लायसोमिक या औषधाची गरज कमी होते. रक्तप्रवाह देखील सुरळीत होऊन रक्तातील शर्करेची पातळी ही नियंत्रणात राहते. शुगर साठी घरगुती उपाय म्हणून कडूलिंबाच्या पानांचा वापर रोज अनुशा पोटी रस प्यावा. भारतात मोठ्या प्रमाणात आठळणार्‍या या झाडाच्या पानांचे अनेक औषधी उपयोग आहेत.

शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर ची लक्षणे सांगा / शुगर साठी घरगुती उपाय / signs of diabetes - कारल्याचा रस
कारल्याचा रस

काही खाल्ले तर लगेच शुगर वाढते आणि नाही खाल्ले तरी देखील शुगर वाढते, तर अशावेळी शुगर नियंत्रणात राहावे यासाठी सकाळी अनुशा पोटी कारल्याचा रस घ्यावा. कारल्याचा रस कडू लागत असल्याने त्यात रस काढून घ्यावा. एक चमचा कारल्याचा रस आणि चार ते पाच थेंब लिंबाचा रस घ्यावा, त्यात थोडे धनेपूड आणि जिरेपूड व काळे मीठ अगदी थोडे टाकावी. हा कारल्याचा पिल्याने दिवसभर काही खाल्ले तर लगेच शुगर वाढणार नाही.

गुळवेल काढा – शुगर साठी आयुर्वेदिक औषध

चवीला अतिशय कडू असणार्‍या या कारले आणि गुळवेल यासारख्या वनस्पती शुगर म्हणजेच गुळवेल. गुळवेल ची पाने किंवा वाळलेला गुळवेल हा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यासाठी गुळवेल या औषधी वनस्पतीची पावडर बाजारात मिळते ती गरम पाण्यात उकळून गाळून प्यावी किंवा गुळवेल ची पाने रात्रभर पाण्यात भिजत घालावी आणि सकाळी त्या गुळवेल च्या पानांसहित पानी गरम करून गाळून थंड करून प्यावे.

विजयसार औषधी वनस्पती

विजायसार ही एक औषधी वनस्पती आहे जी अनेक आजारांवर उपयोगी पडते कारण या औषधी वनस्पती मध्ये अॅंटीहायपरलिपीडिक तसेच लिपोप्रोटीन हे गुणधर्म हे रक्तातील कोलेस्ट्रॉल ची आणि साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हाला आधी पासूनच शुगर म्हणजेच मधुमेहचा त्रास असेल तर त्या पासून होणार्‍या त्रासाला कमी करण्यास ही आयुर्वेदिक औषध मदत करते. जसे की, वारंवार लघवी येण आणि लघवी करताना जळजळ होणे, चक्कर सारखे होणे.

त्रिफळा चूर्ण – शुगर साठी आयुर्वेदिक औषध

त्रिफळा चूर्ण हे तीन महत्वाच्या औषधी वनस्पती च्या योग्य प्रमाणात घेऊन बनवलेल्या मिश्रणापासून बनवले जाते. त्रिफळा चूर्ण म्हणजे आवळा, हिरडा आणि बहेरा किंवा मंजिष्ठ आणि गोक्षुरा या आयुर्वेदिक वनस्पती च्या मिश्रणाने बनवले जाते. वजन कमी करण्यासाठी तसेच रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपयोग केला जातो. हे त्रिफळा चूर्ण तुम्ही रोज 1 चमचा पाण्यात मिसळून किंवा उकळून पिऊ शकता किंवा नुसते देखील खाऊ शकता.

आवळा पावडर आणि हळद

शुगर साठी घरगुती उपाय/ शुगर कमी करण्यासाठी काय करावे/ मधुमेह उपचार मराठी/ शुगर साठी आयुर्वेदिक औषध/ home remedies for diabetis in marathi
आवळा आणि हळद

आवळा पावडर ही बाजारात उपलब्ध असते. ही आवळा पावडर आणि हळद पावडर एकत्र करून त्याचा काढा करून पिल्याने ते एक उत्तम आयुर्वेदिक अॅंटीबेक्टेरियल प्रमाणे काम करते आणि आपली शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. हळद आणि आवळाची पावडर यांहया मिश्रणाला निशा- अमलकी असे म्हंटले जाते आणि यात रक्तातील साखर वाढण्याची क्षमता कमी करण्याचे गुणधर्म असतात. दोन चमचे आवळा पावडर आणि अर्धा चमचाला कमी हळद पावडर घ्यावी आणि ते मिश्रण उकळून घ्यावे आणि नंतर गाळून थंड करून प्यावे.

पुदिना पाने – शुगर साठी घरगुती उपाय

शुगर साठी घरगुती उपाय/ शुगर कमी करण्यासाठी काय करावे/ मधुमेह उपचार मराठी/ शुगर साठी आयुर्वेदिक औषध/ home remedies for diabetis in marathi
पुदिना पाने

पुदिना पाने हे देखील औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत, पुदिना पाने खाल्याने आरोग्यास अनेक लाभदायक फायदे हे होतात. शुगर साठी घरगुती उपाय म्हणून पुदिना पानांचा वापर करण्यासाठी पुदिन्याची पाने रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी आणि सकाळी ते पाणी गाळून अनुशा पोटी पिऊन घ्यावे.

सारांश – शुगर ची लक्षणे सांगा (signs of diabetes) / शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर साठी घरगुती उपाय

आपल्याला जर वरील शुगर झाल्याची वरील लक्षणे जाणवली तर आपण या बदला वर लक्ष द्यावे आणि ही लक्षणे जाणवत असल्यास आम्ही या लेखात सांगितलेली वरील शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर साठी घरगुती उपाय, या लेखा तील उपाय करावे त्याने आपला त्रास कमी होईल आणि वाढणार नाही. हे उपाय केल्याने नक्कीच आपली शुगर ही नियंत्रणात येईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , शुगर ची लक्षणे सांगा / शुगर कमी करण्याचे उपाय / शुगर साठी घरगुती उपाय/ (signs of diabetes) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top