पोट दुखीवर घरगुती उपाय / पोट दुखीवर उपाय – 8 Best Remedies

पोट दुखीवर घरगुती उपाय/ पोट दुखणे / पोट दुखीवर उपाय / pot dukhivar gharguti upay >>> माणूस आयुष्यभर धडपडतो, काम करतो, काबाडकष्ट करतो, कमावतो ते फक्त आणि फक्त पोटासाठी. त्याच्या या धडपडीमागे महत्त्वाचा हेतू असतो तो म्हणजे त्याचं व त्याच्या कुटूंबाचं पोट व्यवस्थित भरलं जावं. आधी माणूस कंदमुळे, फळे, कच्चे मांस, झाडाचा पाला खावुन पोट भरायचा. पण नंतर आगीचा शोध लागला मग तो अन्न शिजवून खावू लागला. नंतर यामध्ये अजुनचं सुधारणा होत गेली व आपण वेगवेगळ्या चवीचे पदार्थ हे वेगवेगळे मसाले घालून बनवू लागलो.

खाण्याची ,आवडी निवडी ची आणि वेगवेगळ्या पदार्था ची जसजशी प्रगती होत गेली तसतशी पोटाची समस्या ही वाढतं गेली. आता तर पोटात दुखणं ही अगदीच सामान्य समस्या बनली आहे. आजकाल पोटात दुखतचं नाही असा माणुस सापडणं म्हणजे केवळ अशक्य गोष्ट आहे. पोटदुखीची तशी बरीच काही कारणं आहेत आणि ती म्हणजे वेळी-अवेळी खाणं, फास्ट फूड, आइस्क्रिम, बाहेरच खाणं याकडे माणसाचा वाढलेला कल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदललेली जीवनशैली, मेहनतीच्या कामांचा अभाव, व्यायामाचा अभाव. यांसारख्या असंख्य कारणांमुळे पोटदुखीची ही समस्या वाढत चालली आहे.

या सर्व गोष्टीमुळे तर कधी शरीरिक बिघाड झाल्यास देखील, आपल्याला पोट दुखी जाणवू शकते. पण जर आपली पोटदुखी ही सामान्य कारणामुळे असेन तर काही पोट दुखीवर घरगुती उपाय करून देखील आपण त्यापासून आराम मिळवू शकतो,

पोट दुखी –

या समस्येवर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे नाही तर त्याचे रूपांतर गंभीर आजारात होऊ शकते. पोटात कळ येणे, मुरड येणे, सारखे सारखे चमक निघत असल्यासारखे वाटणे, पोट गच्च जड पडणे, अन्न पचन न होणे हे सर्व पोट दुखी ची लक्षणे आहेत , त्यावर उपाय करून आपण हा त्रास कमी करू शकतो.

पोट दुखीवर घरगुती उपाय(pot dukhivar gharguti upay) :             

1. लिंबू : पोट दुखीवर घरगुती उपाय

पोट दुखीवर घरगुती उपाय/ पोट दुखणे / पोट दुखीवर उपाय / pot dukhivar gharguti upay - लिंबू पाणी
लिंबू पाणी

लिंबू हा पोटदुखीवरील अगदी जालीम उपाय आहे. लिंबू प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतो. लिंबाच्या रस आल्याचा रसामध्ये मिक्स करून प्यायल्याने पित्ताच्या त्रासामुळे होणारी पोटदुखी अगदी लगेचं थांबते आणि यामुळे पोटाला आराम ही मिळतो. लेमन टी हा सुद्धा पोटदुखीवरील एक अत्यंत चांगला उपाय आहे यानेही पोटदुखी कमी होण्यास मदत होते.

2. आलं :

पोट दुखीवर घरगुती उपाय/ पोट दुखणे / पोट दुखीवर उपाय / pot dukhivar gharguti upay - आले
आले

आल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आलं आयुर्वेदातील औषधी वनस्पतींपैकी एक आहे. आलं हा ही स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असणारा घटक आहे. आलं हे सुद्धा पोटदुखीवरील एक रामबाण उपाय आहे. आल्याचा रस काढून त्याचा जर हालक्या हाताने पोटावरून मसाज केला तर पोटाचे दुखणे लगेच थांबते. जर आल्याचा रस लिंबाच्या रसासोबत घेतल्याने ही पोटदुखी थांबते. आल्याचा छोटा तुकडा तोंडात चघळत रहा, जेव्हा आल्याचा रस पोटात जायला सुरू होतो तेव्हा पोट दुखणं कमी होत.

3. मध :

मध - पोटदुखी वर घरगुती उपाय
मध

मध हे सुद्धा खूप गुणकारी औषध आहे. मधाचे खूप सारे फायदे आहेत. मधाचा उपयोग खास करून वजन कमी करणे, चरबी कमी करणे यासाठी करतात. पोटदुखी थांबवण्यासाठी सुद्धा मधाचा उपयोग केला जातो. लेमन टी मध्ये थोडे मध मिक्स करून प्यायल्याने मधाचा औषधी गुणधर्म अधिक वाढतो व पोटदुखीपासून आपल्याला आराम मिळतो.

4. पुदिना :

पुदिना
पुदिना

पुदिना आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरतो त्यामुळे जेवणाला एक वेगळीच चव येते. पुदिन्याच्या पानांपासून बनवण्यात येणाऱ्या रसाचा उपयोग पोटाचं दुखणं कमी करण्यासाठी होतो. पुदिन्यामधील औषधी गुणधर्मचा उपयोग पोटदुखी थांबवण्यासाठी केला जातो. त्यामुळे पुदिन्याचा वापर पोटदुखीवर बनवण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या काढ्यांमध्ये केला जातो.

5. जिरे :

कोणत्याही फोडणीसाठी जिरे खूपचं महत्त्वाचे असतात. त्याप्रमाणेच जिरे पोटदुखी कमी करण्यातही महत्त्वाची भुमिका निभावतात. जर पोट दुखतं असेल तर कच्चे जिरे चावून खाल्याने किंवा त्याचा रस काढून तो प्यायल्याने हि पोट दुखणं थांबतं. जिऱ्याचं पाणि देखील आपण पोटदुखी थांबवण्यासाठी बनवू शकतो. पोटदुखी ज्यावेळी असेल त्यावेळी कोमट पाण्यामध्ये जिरे टाकून ते पाणि प्या.

6. ओवा :

पोट दुखीवर घरगुती उपाय/ पोट दुखणे / पोट दुखीवर उपाय / pot dukhivar gharguti upay - ओवा
ओवा

ओवा शरीराची पचनशक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे अधिक खाल्लेलं अन्न पचन्यास मदत होते. जर पोट दुखतं असेल तर अनेक घरांमध्ये सर्वात आधी ओवा खाण्यासाठी दिला जातो. ओव्याचं पाणि प्यायल्याने ही पोटदुखी कमी होते.

7. तुळशी :

रान तुळस - घरगुती उपाय
तुळस

तुळस ही एक पवित्र व औषधी वनस्पती आहे. भारतात तुळशीला घरगुती औषधांचा खजिना म्हणून ही ओळखलं जातं. तुळशीच्या पानांपासून बनवण्यात येणाऱ्या काढ्यामुळे  पोटदुखी कमी होते. तुळशीची पाने चावून खाल्ल्याने ही फरक जाणवतो.

8. मुळा :

मुळा हादेखील पोटदुखी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. पोट दुखतं असेल तर मुळ्याचा रस काढून त्यामध्ये काळी मिरी व थोडसं मीठ मिसळून तो रस प्या यामुळेही पोटाला आराम मिळतो.

सारांश -पोट दुखीवर घरगुती उपाय/ पोट दुखीवर उपाय / pot dukhivar gharguti upay

आपल्याला जर पोट दुखीची समस्या जाणवत असेन आणि जर तुम्हाला या त्रासापासून आराम मिळवायचा असेन तर , आपण आमच्या आजच्या लेखातील उपाय वापरुन या त्रासापासून मुक्त होऊ शकता.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, पोट दुखीवर घरगुती उपाय /पोट दुखी/pot dukhivar gharguti upay हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

 

Scroll to Top