तुळशीचे उपयोग / तुळशीचे औषधी उपयोग – Uses Of Basil

तुळशीचे उपयोग / तुळशीचे फायदे / तुळशीचे औषधी उपयोग / तुळस उपयोग मराठी / तुळस माहिती मराठी / tulashiche upyog >> तुळशी /तुळशीचे रोप/ तुळशी झाड या कोणत्याही शब्दांबाबत काही माहित आहे का तुम्हांला? असे विचारायलाच नको, कारण अगदी 3-4 वर्षाच्या मुलाला देखील ‘तुळस‘ म्हणजे काय आणि ती कशी असते हे माहित असते, त्याच्या गोड-गोड बोबडया शब्दांत ते ‘‘दिवा लावला तुळशीपाशी………..‘‘ हे म्हणत असते. कारण सायंकाळी संध्या प्रार्थना करताना आपल्या घरातल्या आजी किंवा आईसोबत ते नेहमीच ही प्रार्थना म्हणत असते, तर असेही ‘तुळशीचे झाड‘ म्हणायला गेल, आणि पाहायला गेलं तर एक छोटस रोपटंच आहे ; पण त्याच्याभोवती केवढं मोठं विश्व सामावलेलं असतं याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

डोलदार आकारात, एका आड एक लपलेली हिरवीगार सुवासिक पाने आणि त्यामधुन निघालेला लांब असा दांडा घेऊन छोटया फुलांचा गुच्छ म्हणजे ‘मंजुळा‘ हे सारं तुळशीचे विश्व वातावरण प्रसन्न आणि आनंदी करून टाकते. आपल्याला माहीतच असेन, तुळशीला आपल्या भारतात धार्मिक दृष्टया अतिशय महत्त्व आहे. तुळशीमध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो. श्रीकृष्णाला तुळस फार आवडते. विष्णुला देखील तुळस प्रिय आहे. आपले वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल यांना देखील तुळस प्रिय आहे, त्यामुळे या तुळशीला वृदां, विष्णुप्रिया आणि हरीप्रिया, सौभाग्यदायीनी यांसारख्या नावाने देखील ओळखले जाते.

तुळशीचे उपयोग / तुळशीचे फायदे / तुळशीचे औषधी उपयोग / तुळस उपयोग मराठी / तुळस माहिती मराठी / tulashiche upyog

आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला धार्मिक कार्यात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. देवाच्या पुजनासाठी, प्रसादासाठी, तिर्थासाठी तुलसी पत्रांना अतिशय मानाचे असे स्थान असते. या सर्व गोष्टींमुळे तुळस ही प्रत्येकाच्याच दारात असते आणि बहुदा ती असायला ही हवी. तुळस ही पवित्र, बहुगूणी आणि बहुउपयोगी अशी एक आयुर्वेदिक आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र वनस्पती आहे . तुळशीचे औषधी उपयोग आणि फायदे हे बरेच आहेत, त्यामुळे तुळशी ही सर्वांच्याच दाराबाहेर असणे हितकरी आहे.

अशी ही इवलीसी डौलदार तुळस पुजा- अर्चासाठी, धार्मिक कार्यासाठी उपयोगी तर आहेच पण त्याचसोबत ती एक अनेक औषधी गुणांनी परिपुर्ण अशी औषधी वनस्पती आहे. औषधी वनस्पती म्हणुन देखील तुळशीचा मान आणि उपयोग अधिक केला जात आहे. तुळशीतील इतर अन्य गुणांमुळे तुळस ही बहुउपयोगी समजली जाते. तुलसीचा कसा उपयोग होतो ते आपण पुढे पाहणारच आहोत. चला तर मग करूया सुरुवात आजच्या लेखाची , ” जाणून घेण्यासाठी एक आगळी – वेगळी माहिती , तुळसीच्या उपयोगा विषयी’ तुळशीचे उपयोग / तुळशीचे उपयोग in marathi/तुळशीचे औषधी उपयोग/ तुळशीचे फायदे” या लेखात

तुळशीचे प्रकारः-

          तुळस ही सर्वत्र आढळून येत असली आणि  तुळस हे रोपटे सारखेच जरी दिसत असले तरी त्यातही तुळशीचे काही प्रकार आहे. तिची पाने, मंजुळा, आकार आणि रंग यावरून तुळशीचे काही प्रकार पडतात . तर या तुळसीचे कोणकोणते प्रकार आहेत ते पाहूया –

1.         काळी तुळस (राम तुळस असेही म्हणतात)

तुळशीचे उपयोग / तुळशीचे फायदे / तुळशीचे औषधी उपयोग / तुळस उपयोग मराठी / तुळस माहिती मराठी / tulashiche upyog - काळी तुळस
काळी तुळस

2.         हिरवी तुळस (श्याम तुळस असेही म्हणतात)

तुळशीचे उपयोग / तुळशीचे फायदे / तुळशीचे औषधी उपयोग / तुळस उपयोग मराठी / तुळस माहिती मराठी / tulashiche upyog - हिरवी तुळस
हिरवी तुळस

3.         वन तुळस

तुळशीचे उपयोग / तुळशीचे फायदे / तुळशीचे औषधी उपयोग - रान तुळस
रान तुळस

4.         श्वेत /विष्णु तुळस

5.         लिंबु तुळस

पंरतु या सर्व प्रकारांपैकी आपल्या भागात काळीतुळस आणि हिरवी तुळस हीच सर्वात जास्त प्रमाणात पाहावयास मिळते आणि धार्मिक विधीसाठी देखील हीच तुळस ग्राह्य मानली जाते आणि त्यामुळे याच तुळशी जास्त प्रमाणात वापरल्या जात असतात.

आता पाहुया या तुळशीचे उपयोग नेमके काय आहेत या विषयी अधिक माहिती

तुळशीचे उपयोग/ तुळशीचे औषधी उपयोग/ तुळशीचे फायदे(tulashiche upyog marathi)

            तुळस ही धर्मोपयोगी तर आहेच परंतु तुळशीचे महत्त्व आयुर्वेदात, वैद्यकीय क्षेत्रात देखील अप्रतिम आणि अगणित आहे. तुळस ही औषधी वनस्पती मध्ये मोडते, म्हणुन तुळस ही उपयोगी येणारी आणि सर्वात प्रथम क्रमांकावर येणारी वनस्पती आहे. या तुळशीचे अनेक उपयोग आहेत ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही, चला तर मग पाहुया ‘‘तुळस ही धर्मिक उपयोगासोबत औषधोपयोगी पडणारी वनस्पती कशी आहे /तुळशीचे औषधी उपयोग/ तुळशीचे फायदे”

प्राणवायुचा पुरवठा करते :- तुळशीचे फायदे

तुळस या बहुगूणी वनस्पतींचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा असा उपयोग म्हणजे तुळस आपल्याला सर्वात महत्वाच्या प्राणवायुचा पुरवठा करते म्हणजे आपल्याला आवश्यक तो ऑक्सीजन इतर झाडांच्या तुलनेत अधिक प्रमाणात देण्याची महत्वाची कामगिरी तुळस करत असते. वनस्पती शास्त्रांज्ञाच्या म्हणण्यानुसार, तुळस ही दिवसातील 20 तास ऑक्सीजन सोडते आणि केवळ चार तासच कार्बन डाय-ऑक्साइड सोडते.

तुळस मोठया प्रमाणावर इतर झाडांच्या तुलनेत जास्त प्रमाणात ऑक्सीजन, प्राणवायू सोडत असल्यामुळे आपल्या दारासमोर तुळस ही असावीच, तसेच सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा घातल्याने आरोग्य देखील उत्तम राहते कारण जो व्यक्ति प्रदक्षिणा घालतो त्या व्यक्तिला जास्तीत जास्त प्रमाणात प्राणवायू मिळत असतो, अशा प्रकारे धार्मिक सोबत आयुर्वेदिक दृष्ट्या देखील तुळशीला अनन्य साधारण असे महत्व हे प्राप्त झालेले आहे, हा तुळशीचा सर्वात महत्वाचा फायदा आहे.

सर्दी, खोकला, कफ यावर गुणकारी :- तुळशीचा औषधी उपयोग

तुळशीचे औषधी उपयोग / तुळस उपयोग - सर्दी खोकला साठी तुळस गुणकारी
सर्दी खोकल्यावर तुळस गुणकारी

तुळस ही एक अशी वनस्पती आहे जी अंतर्गत विकारांसाठी देखील गुणकारी आहे आणि त्याचबरोबर बर्हीगत विकारांवर देखील अतिशय फायदेशीर ठरते. खोकला-कफ झाला असेल तर, तुळशीची पाणे पाण्यात उकळुन दिल्यास घश्यातील इन्फेक्शन भरपुर प्रमाणात कमी होते. सद्यपरीस्थितीत कोरोना काळात तर जवळपास ब-याच लोकांनी तुळशीचे पाने व इतर औषधी पाने टाकुन  काढा घेतला व स्वतःचे संरक्षण केले. यावरूनच लक्षात येते की तुळस भरपूर प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते, तसेच बर्याच छोट्या – मोठ्या आजारांपासून देखील आपले संरक्षण करण्याची क्षमता देखील या इवल्याशा तुळशी मध्ये असते त्यामुळेच तर सर्दी – खोकला झाला असेन तर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुळशीच्या पाणांचा काढा दिला जातो .

रोगप्रतिकार शक्ती वाढवते :- तुळशीचे फायदे

तुळस माहिती मराठी / tulashiche upyog
तुळशीची पाने अनुशा पोटी खावीत

आपण वर सांगितल्याप्रमाणे तुळशीचे 4-5 पाने रोज सकाळी अनासे पोटी खाल्याने आपले सर्व रोगांपासुन सरंक्षण तर होतेच व आपली त्या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता देखील वाढवत असते. आपल्याला तुळशीचे पाणे गरम पाण्यात उकळून पिल्याने कोणतेही घसा किंवा कफ चे इन्फेक्शन होत नाही तसेच व्ह्यइरल आजारापासून देखील रक्षण करते.

कोणत्याही आजाराला आपल्यापासून दूर ठेवायचे असेन तर तुळशीच्या पाणांचे सेवन करावे, ते अगदी अमृताप्रमाणे काम करते, म्हणूनच तर आधीच्या काळी देखील साधी जखम झाली तर त्यावर तुळशीच्या पाणांचा लेप लावत, किंवा सतत आजारी पडत असल्यास, सतत खोकला, सर्दी कफ मळमळ पित्त किंवा आजारी पडत असण्याची समस्या असत तर अशावेळी त्या व्यक्तीस रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी तुळशीची पाने दिली जात असत .

त्वचारोगावर उपयोग :- तुळशीचे औषधी उपयोग

तुळशीचे उपयोग / तुळशीचे फायदे - त्वचेसाठी फायदेशीर
त्वचेसाठी तुळस अत्यंत फायदेशीर

तुळशीमध्ये Antibacterial गुण तर उपलब्ध असतातच पण  Skin infection वर परिणाम करणारे अनेक औषधी गुणधर्म देखील असतात. बर्‍याच लहान मुलांना पौष्टिक जेवण न जेवत असल्याने अथवा जीवनसत्त्वे आणि मूलद्रव्य यांची कमतरता पडत असल्याने अथवा कोणता त्वचेचा आजार असल्याने त्वचेवर पांढरे चट्टे पडण्याची समस्या असते, तर अशावेळी त्या जागी म्हणजे जिथे असे चट्टे पडले आहेत तिथे तुळशीच्या पाणाचा रस लावला की आपोआप हळू हळू ते दाग कमी होतात, आणि मग काही दिवसांनी दिसेनासे होताता.

त्याचबरोबर आपण पाहतो की जर शरीराच्या कोणत्याही भागावर काही कारणास्तव खाज येत असेल तर त्या जागी देखील ताज्या तुळशीच्या पानांचा रस लावला तर अॅंटीबक्टेरियल गुणधर्म मुळे त्वचासंसर्ग नाहीसा होईल. अशा प्रकारे, एक न अनेक त्वचा विकारांवर तुळशी च्या पानांचा उपयोग हा होत असतो, आणि म्हणूनच त्वचा रोगावर तुळशी ही वापरली जाते.

दुर्गंधीनाशक :- तुळशीचे उपयोग (tulashiche upyog marathi)

आपल्याला माहित असेन की, तुळशीच्या पाणाचा सुवास हा उग्र अशा स्वरूपाचा असतो, त्यामुळे दुर्गंधी घालवण्यासाठी तुळशीच्या पानांचा सर्रास वापर केला जातो. कधी कधी किंचितसा ताप आला किंवा इतर काही कारणांमुळे आपल्या तोंडातुन वास येतो, तर अशा वेळी तुळशीची पाने तोंडात कचकच चाऊन खाल्ल्याने मुखदुर्गंधी ही पुर्णपणे नाहीशी होते आणि तोंडातून येणारा वास येत नाही त्यामुळे या तोंडाच्या दुर्गंधी चा त्रास हा आपल्याला व इतरांना देखील होत नाही. त्याचबरोबर अनेक दिवसांची साय जमवून त्याचे जेंव्हा तूप कढवले जात असते, त्यात देखील तूप कढवतना तुळशीची पाणे घालावी, त्यामुळे तुपाला एक छान असा सुवास येईल आणि त्यातील काही दुर्गंधी असल्यास ती देखील नाहीशी होईल.

पचनशक्ती सुधारण्यास मदत :- तुळशीचा फायदा

जेवणानंतर आपण तुळशीच्या पाणंचे जर नियमित सेवन केले तर आपली पचनक्रिया सुरळीत होते. बर्‍याच लोकांना जेवण झाले की, अपचन अथवा ढेकर येण्याची समस्या असते, त्यामुळे त्यांची पचन शक्ति देखील मंदावते अशावेळी जेवण झाल्यानंतर सात – आठ तुलसीची पाने चावून खावी त्यामुळे पचनशक्ती सुधारते त्याचबरोबर वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि पचनशक्ती देखील सुधारते. तोंडाला आलेला खराब आणि कडूवटपणा देखील तुळशीच्या पाणाने जातो त्यामुळे ज्यांना अन्न पचन होत नाही किंवा आजारपणामुळे तसेच वयोमानाप्रमाणे जर पचनशक्ती मंदावली, कमी झाली असेन तर तुळशीच्या पानांचे सेवन करावे.

मधमाशीचा दंश झाल्यास :- तुळशीचे औषधी उपयोग

तुळशीचे उपयोग / tulashiche upyog
तुळशीच्या पानांचा लेप

आपल्याला शरीराच्या कोणत्याही भागावर जर मधमाशी किंवा इतर कोणता किटक, मुंगी चावल्यास त्या जागी अतिशय दाह होतो. मधमाशी चावल्यास तर असाह्य वेदना आणि दाह होतो अशावेळी आपण त्या जागेवर तुळशीची पाणे चोळुन लावल्यास किंवा पेस्ट करून लावल्यास त्या जागीचा दाह हा नक्कीच कमी होतो तसेच तुळशीतील माती लावल्याने देखील बराच त्रास कमी होतो, म्हणूनच तर अजूनही जुने लोक म्हणजे आपले आजी- आजोबा काही जारी चावले तरी लगेचच तुळशीतील माती आणून त्या जागी लावतात, कारण तुळशीच्या खालच्या मातीमध्ये तुळशीच्या मुळातील बरेच प्रभावशाली गुणधर्म हे त्या मातीत उतरलेले असतात.

सारांश – तुळशीचे उपयोग/ तुळशीचे फायदे/ तुळशीचे औषधी उपयोग/tulashiche upyog marathi

आमच्या वरील लेखातील, ” तुळशीचे उपयोग/तुळशीचे औषधी उपयोग /तुळशीचे फायदे ” ही माहिती वाचून तुम्ही तुमच्या घरासमोर असणार्‍या या बहूपयोगी वनस्पतीचे विविध उपयोग आम्ही सांगितले त्या प्रमाणे करून बघावे, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा आणि उपयोग होईल आणि तुमच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळेन. आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल.

वरील लेखामध्ये सांगितलेली “तुळशीचे उपयोग / तुळशीचे उपयोग in marathi/तुळशीचे औषधी उपयोग /तुळशीचे फायदे ही घरगुती माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top