पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय / पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय / पोटातील गॅस उपाय / पोटात गॅस झाल्याची लक्षणे (potatil gas kami karnyache upay) >>> आपल्या आजच्या जीवनात, हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अगदी कधी ही आणि कुठे ही काहीही खाल्ल जातं, कारण आपण पाहतो की,”स्ट्रीट फूड “चे चाहते आणि स्ट्रीट फूड प्रोव्हायडर चांगलेच वाढले आहेत ,खवव्ये गिरी देखील सध्या बर्याच प्रमाणात विस्तारली आहे म्हणजे नवनवीन पदार्थ अगदी उत्तम प्रकारे बनविण्यात बरेच लोक यशस्वी झाले आहेत, यात सोशल मीडियाची मोठी कामगिरी आहे, जसे की यू ट्यूब वर देखील बर्याच नवनवीन पदार्थांच्या रेसिपी या शिकवल्या जातात आणि त्यानुसार आपण बनवतो देखील.
यामुळे होतय असं की, अनेकांना पोटाचे विकार, पोट दुखी, पोट फुगणे या समस्या होण्याची दाट शक्यता वाढलेली आहे. त्यामधलाच एक विकार म्हणजे पोटात होणारा गॅस. उलट सुलट खाण्याच्या सवयीमुळे तसेचं अवेळी खाण्यामुळे पोटात गॅस तयार होतो आणि मग नंतर हा झालेला गॅस बाहेर पडे पर्यंत आपल्याला त्रास देतो. पोटात गॅस होणे तसे फारचं सामान्य समस्या आहे. पण त्यामुळे होणारी वेदना फारचं त्रासदायक असते. त्यासाठी पोटातील गॅस बाहेर पडणे फार गरजेचे असते.
पोटात गॅस झाला तर त्याचा अतिशया त्रास होतो आणि आपण अगदी बेचैन होतो, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित जेवण देखील जात नाही आणि झोप देखील लागत नाही. अशावेळी पोटात झालेल्या गॅस चा त्रास होऊ नये, म्हणुन त्यावर झटपट उपाय करण्याची गरज असते आणि त्याचसाठी आम्ही घेऊन येत आहोत माहिती “पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय /पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय” याविषयी. चला तर मग, जाणून घेऊया की, कोणकोणते घरगुती उपाय करून तुम्ही पोटातील गॅस बाहेर काढू शकता, किंवा कोणते घरगुती उपाय केल्यानंतर पोटात गॅस होण्याचा त्रास आणि समस्या निर्माण होणार नाही, आणि या उपायाने पोटातील गॅस बाहेर पडेल, पोटातील गॅस कमी होईल. सुरूवातीला आपण पाहूया की पोटात गॅस झाल्याची लक्षणे काय आहेत
Table of Contents
पोटात गॅस झाल्याची लक्षणे :
आता खुपदा असं होतं की आपल्याला नेमकं काय होतय हे कळत नाही. म्हणजे डोकेदुखी किंवा अंगदुखी आपल्याला कळू शकते. पण पोटात गॅस होतो म्हणजे नक्की काय होत हेचं आपल्याला माहीत नसतं. म्हणुन जाणून घेऊया पोटात गॅस झाल्यानंतर नेमकं काय होत ते……. पोटात गॅस झाल्याची लक्षणे कोणती आहेत ते पाहुयात.
पोटात अचानक दुखायला लागणे आणि पोटात अगदीचं मुरडा आल्यासारखे वाटणे.
पोटात गॅस झाल्यानंतर अनेकांना अस्वस्थ वाटत राहते.
तसेच जर हा गॅस योग्य पद्धतीने बाहेर नाही पडला तर मात्र छातीत दुखल्यासारखे वाटायला लागू शकते.
सतत गॅसचा त्रास होत असेल तर पोट फुगून शौचास ही त्रास होवू लागतो.
गॅस जर बाहेर नाही पडला तर बेचैन होते आणि सारखे सारखे पोट दुखू लागते. तर हे सर्व लक्षणे पोटात गॅस असण्याची असतात आणि आता आपण पाहूया की, पोटातील गॅस बाहेर पाडण्यासाठी चे घरगुती उपाय (potatil gas kami karnyache upay).
पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी घरगुती उपाय / पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय/पोटातील गॅस उपाय / potatil gas kami karnyache upay
पोटात गॅस झाला असेल तर तो बाहेर पाडण्यासाठी खालील उपाय करावेत, याने त्रास होणार नाही आणि पोट पूर्वव्रत होईल.
ओवा :– पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय
अनेक खाद्यपदार्थांमध्ये ते पदार्थ बनवत असताना त्यामध्ये आवर्जुन ओवा हा घातला जातो. ओव्यामधील थायमॉल नामक केमिकल पोटातील गॅस्ट्रिक ज्युस कमी करून पचन सुधारण्यास मदत करतात. यामुळे पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होते .जर तुम्हाला पोटात मुरडा आल्यासारखे होत असेल तर साधारण बडीशेप जितकी खातो तितक्या प्रमाणात ओवा आपल्या हातात घ्यायचा तळहातावर ओवा थोडा चोळून मग तो खायचा आहे. ओव्याचा वास आणि ओव्याच्या रसामुळे छान आराम मिळेल. त्यामुळे गॅस जर पटकन बाहेर पडायला हवा असेल तर ओवा चावताना तुम्ही त्यावर गरम पाणी प्यायले तरी चालू शकेल. त्यामुळे लगेच आराम मिळतो आणि पोटातील गॅस हा बाहेर पडतो .
हिंग : पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय
गॅसपासून सुटका मिळवण्याचा अजुन एक झटपट घरगुती उपाय म्हणजे फोडणी मद्धे हिंग वापरणे. जर पोटात गॅस भरला असे वाटत असेल तर एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा हिंग मिसळून प्यायल्याने गॅस मोकळा होण्यास मदत होते तसेच जर पोटात मुरडा आला असेन तर हिंग व पाणी यांची पेस्ट बनवुन पोटावर लावावी. ही पेस्ट नाभीजवळ वर्तुळाकार दिशेने लाऊन थोडावेळ मसाज करावा आणि ही पेस्ट सुकली की काही वेळाने वेदना कमी होण्यास मदत नक्कीच मदत होईल व पोटाला हळूहळू आराम मिळेन.
लवंग : पोटातील गॅस उपाय
लवंग ही सूज, गॅस्ट्रिक पेन, तसेच पोट फुगणं यासारख्या सर्व समस्यांवर एक पारंपारिक उपाय मानली जाते. लवंग चघळल्याने किंवा जेवणानंतर वेलची सोबत एक चमचा लवंगाच्या पावडरचं सेवन केल्यामुळे अॅसिडचा स्त्राव होतो. ज्यामुळे अॅसिडीटी कमी होते आणि पोटात तयार झालेला गॅस बाहेर पडण्यास मदत होते. लवंग ही पचनास देखील मदत करते, आणि गरम मसाल्याच्या पदार्थात येत असल्याने, पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत करते.
आले
पोटात सारखा गॅस होण्याची समस्या असेन तर,आहारामध्ये आल्याचा वापर नियमित करावा त्याचा बराच फायदा होतो. आल्यामध्ये असे काही रासायनिक आणि आयुर्वेदिक घटक आणि द्रव्य असतात ज्यामुळे गॅसची समस्या कमी होवु शकते आणि पोटाला आराम मिळतो .तसेच अनेकदा पोटात गॅस झाल्यावर मळमळल्यासारखे होते. त्यावर आराम म्हणुन आल्याचा तुकडा चघळू शकता. अगदी ओव्याप्रमाणेचं आल्याचा तुकडा ही चघळत राहायचा. आल्याचा चोथा होईपर्यंत तुम्ही त्याचा रस प्यावा. त्यावर थोडे कोमट पाणी प्यायल्याने देखील नक्कीच आराम मिळतो.
लिंबू रस आणि कोमट पाणी
दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून तो प्यायल्याने गॅस पासून सुटका होण्यास मदत होते. काहीही खाण्यापूर्वी सकाळी उठल्यानंतर लिंबू चहा जरी घेतला तरी ही आराम मिळू शकतो. अशाप्रकारे कोमट पाणी आणि लिंबुरस हे पोटातील गॅस उपाय म्हणून वापरले जाते. आले हे पित्त शामक देखील आहे, त्यामुळे जर गॅस किंवा पित्त असेल तर याच्या वापरणे नक्कीच कमी होईल.
सोडा
जर ओवा किंवा आलं सहज उपलब्ध होणार नसेल तर गॅस कमी करण्यासाठी तुम्ही सोडयाचा सुद्धा उपयोग करू शकता. सोड्याचा एक घोट देखील गॅसेसवर कमालीचा फायदेशीर ठरतो. सोडा पिल्यामुळे गॅस ठेकरावाटे बाहेर पडतो, आणि अन्न पचायला मदत होते. म्हणूनच जंकफूड सोबत कोल्ड्रींक्स असते याचे कारण पचन व्हावे असे आहे. सोडा हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून वापरला जाणारा.
भोपळा : पोटातील गॅस वर उपाय
भोपळा हा पचनसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो . जेव्हा आपण जेवन झाल्यानंतर अन्नाचे पचन होत नाही तेव्हा पोटात गॅस नक्कीच होतो . अशावेळी भोपळ्याची भाजी गॅसच्या समस्येला कमी करण्यास मदत करते . त्यामुळे या भाजीचे सेवन करावे .
मसाज : पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय
पोटावर योग्य पद्धतीने मसाज केल्यामुळे देखील गॅस बाहेर पडण्यास मदत होते . पाठीवर झोपून, पोटात वेदना होणार्या जागी वर्तुळाकार दिशेने बोटांनी मसाज करावा त्यामुळे पोटातील गॅस हळूहळू बाहेर पडतो आणि पोटाला आराम मिळतो .
पवन मुक्तासण : पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय
पवनमुक्तासन हे आसन करून देखील आपन पोटात झालेल्या गॅस पासून सुटकारा मिळवू शकतो आणि आपल्या पोटाला आराम मिळेन. पवनमुक्तासण हे पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय म्हणून अनादिकाळापासून केले जाते. कारण या व्यायामाने पोटावर आणि पोटातील आतड्यावर तान आणि भार पडून गॅस बाहेर पडण्यास मदत होते.
सारांश – पोटातील गॅस बाहेर पाडण्यासाठी घरगुती उपाय/पोटातील गॅस बाहेर काढण्यासाठी उपाय /पोटातील गॅस कमी करण्याचे उपाय / (potatil gas kami karnyache upay)
आपल्याला जर सारखा पोटात गॅस होण्याची समस्या असेन तर आपण वरील माहिती “पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय / पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी घरगुती उपाय/ पोटातील गॅस उपाय / potatil gas kami karnyache uapy” ही माहिती वाचुन आपण नक्कीच आपल्या त्रासापासून आराम मिळवू शकता आणि पोटात गॅस कमी होण्यास मदत देखील होईल.
आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय /कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)