पोटात आग पडणे घरगुती उपाय | पोटात आग होणे – 10 Best Home Remedies

पोटात आग पडणे घरगुती उपाय/ पोटात आग पडणे कारणे / पोटात आग होणे उपाय / potat aag padane gharguti upay >>> आपण पाहतो की, सहज इच्छा झाली म्हणून एखादवेळेस बाहेरचे काहीही खाल्ल्यास जसे कि, जंक फुड खाल्ल्यास किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाल्यास पोटात आग पडते किंवा जळजळ होते. काही वेळेस असे होते की,अन्न अपचन झाले, अवेळी झाले, जागरण झाले, किंवा पित्त झाले तर पोटात दाह होणे, आग पडणे , जळजळ अशा समस्यांना सामोरं जावे लागते. आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या अशा अनेक सवयी या असू शकतात. त्यामुळे देखील पोटाचा त्रास जास्त प्रमाणात उदभवतो. पोटाच्या काही समस्यांमधीलच एक समस्या म्हणजे ‘पोटात आग पडणे’.

पोटात आग पडणे ही काही फार गंभीर अशा स्वरूपाची समस्या नाहीए परंतु, हा त्रास सहन करणे देखील काही वेळेस असाह्य वाटू लागते, आणि त्याच साठी आपला हा “पोटात आग पडणे” ह्या त्रासास कमी करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगण्यासाठीच आजचा लेख घेऊन येणार आहोत. ज्याच्या वाचनाने तुम्हाला दवाखान्याचे चक्कर मारण्याची गरज न पडताच, तुम्ही घरच्या घरीच काही घरगुती उपाय करून पोटात आग पडणे या त्रासापासून आराम मिळवू शकता. चला तर पाहूया या लेखात एक विशेष माहिती “पोटात आग पडणे, यावर घरगुती उपाय” या विषयी ….

पोटात आग पडण्याची सहसा साधारणपणे काही सामान्य कारणे असू शकतात जसे की, चहा किंवा कॉफीचे सेवन जास्त प्रमाणात करणे याकारणाने देखील पोटात आग पडते. उष्णता वाढल्यामुळे देखील पोटात आग मोठया प्रमाणात होते. पोटातील अनेक विकारांचे कारण असे आहे की, अवेळी जेवण बिघडलेली पचनव्यवस्था यामुळे पोटात आग पडून जास्त मोठया प्रमाणात पोटाच्या समस्या निर्माण होतात. पाणी कमी प्रमाणात पिल्याने देखील हा त्रास जाणवतो.

पोटात आग पडणे घरगुती उपाय/ पोटात आग पडणे कारणे / पोटात आग होणे उपाय / पोटात आग होणे यावर उपाय / potat aag padane gharguti upay

ताणतणावामध्ये जेवण करणे.  धुम्रपान मदयपानामुळे देखील खूप त्रास उदभवतो, त्यामुळे या गोष्टी आपण करूच नये. खुप वेळ काही न खाणे म्हणजे उपाशी राहून एकदाच जास्त जेवणे, साधारणपणे पोटात आग का पडते याची कारणे तर आपल्या लक्षात आलीच असतील, त्यामुळे या सर्व गोष्टी कारणे, होऊ देणे आपण टाळावे आणि तरी देखील तुम्हाला पोटात आग पडणे, हा त्रास जाणवू लागला तर आपण खालील घरगुती उपाय करून बघावे, याने निश्चितच तुमचं “पोटात आग पडणे” हा त्रास कमी होईल .

Table of Contents

पोटात आग पडणे घरगुती उपाय / potat aag padane gharguti upay / पोटात आग होणे यावर उपाय

पोटात आग पडणे, ही जरी साधारण समस्या वाटत असली तरी , त्या समस्येवर लवकर उपाय नाही केला किंवा याचा नायनाट नाही केला तर , त्याचे इतर दुष्परिणाम निर्माण होऊ शकतात त्यामुळे सुरुवतीलाच या समस्येवर उपाय करावे , ते उपाय कोणते आहेत ते पाहूया …

पोटात आग पडणे यावर तुम्ही खालील उपाय करून या समस्येपासून आराम मिळवू शकता .

1. संत्री खाणे : पोटातील आग कमी करण्यास मदत

पोटात आग होणे उपाय - संत्री खाणे
संत्री

संत्री हे फळ थंड गुणधर्माचे फळ म्हणून ओळखले जाते , त्यामुळे पोटामध्ये आग पडल्यास संत्री खाल्ल्यास देखील त्रास कमी होऊ शकतो. संत्रीमध्ये पोटातील आग थंड करण्याचे गुणधर्म असतात. मुळातच संत्री हे असे एक फळ आहे की जे रसाळ व थंड असते. संत्री खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये फ्रॅक्टोज, डेक्स्ट्रोज, खनिज आणि व्हिटॅमिन शरीरामध्ये जाताच ऊर्जा मिळते संत्री हे फळ खाणे शरीरासाठी खुप उपयुक्त आहे. संत्रीचे सेवण ज्युस करून देखील करू शकतो किंवा तसेच ही खाऊ शकतो , त्यामुळे आपल्याला जर पोटात आग पडणे , ही समस्या असेन तर , आपण संत्री खावी हा उपाय पोटातील आग कमी करण्यास फायदेशीर आहे .

2. जांभूळ : पोटात आग होणे उपाय – पोटातील आग शमविण्यास उपयुक्त

पोटात आग पडणे घरगुती उपाय/ पोटात आग पडणे कारणे / पोटात आग पडल्यावर काय करावे - जांभूळ
जांभूळ

 जांभुळ देखील अनेक रोगांवर उपयुक्त असे आरोग्यदायी असे फळ आहे. जांभुळमुळे पोटाच्या त्रासासोबत मधुमेहाचा त्रास देखील ब-याच प्रमाणात कती होण्यास मदत होते . पोट आणि मधुमेह या विकारांवर वर्षोनुवर्षे जांभूळ या फळाचा वापर करण्यात आलेला आहे. कारण जांभूळ हे असे फळ आहे की त्या फळाचे साल , बी सर्वकाही मधूमेह झालेल्या रूग्णांसाठी तसेच पोटविकार असणार्‍या रुग्णासाठी उपयुक्त ठरते. जांभूळ हे फळ सिझनवाईज खाल्लेच पाहिजे म्हणजे ज्या ऋतु मध्ये जांभूळ येते तेव्हा त्याचे सेवन केलेच पाहिजे . जांभूळ एक औषध म्हणून खायलाच पाहिजे. जांभूळ खाल्ल्याने पोटांचा त्रास नक्कीच कमी होतेा. पोटातील आग तर कमी होतेच त्याचबरेाबर जळजळ होणे, गॅस होणे, अॅसिडीटी होणे याचा त्रास देखील मोठया प्रमाणात कमी होतो. जांभळाच्या बिखावी यांची पावडर करून खाल्ल्यास देखील पोटात होणारी आग कमी होते.

3. पपई चे सेवन : पोटात आग पडणे घरगुती उपाय – पोटातील आग शांत करते

पोटात आग पडणे घरगुती उपाय - पपई
पपई

 पपई ही खुप गूणकारी असे फळ आहे आणि ते सहजपणे कुठेही मिळू शकते. पपई हे फळ पोट आणि आतडांच्या विकारामध्ये खुप उपयोगी असे आहे. पपई ही अॅसिडीटी, खोकला, गॅस, बध्दकोष्ठता सारख्या रोगामध्ये अतिशय लाभदायक आहे. पपईमधला निघणारा रस आपल्या वजनापेक्षा शंभर पट जास्त प्रोटीन पचवू शकणारे गुणकारी असे फळ आहे. यामुळे पोटामध्ये होणारी आग पपईमुळे कमी होण्यास बरीच मदत होते .  पपईचा ज्युस करून पिल्यास देखील उपयोगी ठरते.

4. टोमॅटो खाणे : पोटात आग होणे यावर उपाय

शरीरासाठी टोमॅटो हे खुप फायदेशीर असतात. टोमॅटो हे शरीरातील विशेष करून किडनीमधून रोगांचे जिवाणू काढून टाकते. टोमॅटो अनेक रोगांपासून मुक्तता मिळवून देण्यास टोमॅटो उपयुक्त असते. टोमॅटोमध्ये मोठया प्रमाणात फ़ॉस्फोरस कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन -सी असते , जे पोटातील गरमी कमी करते .  पोटात आग पडत असेल तर दिवसातून दोन वेळेस कच्चे टोमॅटो खाण्यास सुरवात करावी. टोमॅटोमुळे त्रास कमी होण्यास मदत होईल. टोमॅटो चवीला आंबट असते. परंतू ते शरीरातील क्षाराचे प्रमाण वाढवते. म्हणून त्याच्या नियमित सेवनाने पोटातील आग कमी होण्यास मदत होते.

5. पेरु : पोटातील दाह शांत करते

पेरू हे देखील पोटातील दाह , आग शांत करण्यास मदत करते . पेरुमध्ये अनेक गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी खुप मोठया प्रमाणात उपयुक्त असतात . पेरु हे थंड गुणधर्म असलेल्या फळ मध्ये येते .पेरूमध्ये व्हिटॅमिन फायबर आणि मिनरल भरपुर प्रमाणात असतात. फायबर मुळे बध्दकोष्ठता दुर होते. पेरू खाल्ल्याने पोटातील आग कमी होऊन त्रास कमी होईल.

6. बडीशोप : पोटात आग होणे उपाय

आपल्याला माहितच असेन की बडीशोप हि पोटाच्या आणि पचनाच्या जवळपास सर्वच गुणधर्मावर प्रभावी उपाय म्हणून काम करते ,जेवणानंतर बडीशेप खाणे ही अत्यंत उपयोगी आहे. बडीशेप ने अन्नपचन चांगले होते . जर आपल्याला पोटात आग पडण्याची समस्या असेन तर , बडीशेपचा काढा पिल्याने देखील पोटात होणारी आग निश्चितच रोखली जाते , कमी होते.

7. केळी खाणे : पोटातील आग शांत करण्यास उपयोगी

पोटात आग पडणे घरगुती उपाय/ पोटात आग पडणे कारणे / पोटात आग पडल्यावर काय करावे / potat aag padane gharguti upay - केळी खाणे
केळी

 केळ हे देखील पोटविकारसाठी अतिशय गुणकारी आणि चांगले फळ आहे. दिवसातून एक केळ खाल्याने पोटात होणारी आग कमी होण्यास मदत होते. केळ खाल्ल्याने पोट साफ होते , शौचास साफ होते तसेच केळ खाल्ल्याने स्नायुंची हालचाल होण्यास मदत होते. केळ खालण्याने आकुंचन प्रसरण व्यवस्थित होऊन आतडयामधील साचलेला मळ पुढे ढकलण्यास मदत होते आणि त्यामुळे जर पोटात आग होत असेन तर ती होणारी आग कमी होते.

8. गूळ : पोटातील दाह शांत करतो

गुळ देखील हे अनेक पदार्था प्रमाणेच गुणकारी असा पदार्थ आहे. पोटात जर आग होत असेल तर गुळ दररोज जेवण झाल्यानंतर खायचा गुळ चावून खायचा नाही तर तो काही वेळासाठी तोडांत ठेवायचे म्हणजे त्यानंतर गूळ तोंडात विरघळून जाईल आणि लाळ सोबत पोटात जाईल . ही प्रक्रिया जेवढी हळू कराल तेवढा त्याचा फायदा होतेा. यामुळे पोटाची पचनक्रिया सुरळीत चालते आणि क्षमताही वाढवते व पोटात होणारी आग कमी होते.

9. आले रस पोटातील दाह रोखतो

पोटात आग पडणे घरगुती उपाय/ पोटात आग पडणे कारणे / पोटात आग पडल्यावर काय करावे / potat aag padane gharguti upay - आले रस
आले

आल्याचा रस देखील पोटातील उष्णता आणि जळजळ कमी करण्यासाठी गुणकारी आहे. लिंबू आणि मधात आल्याचा रस मिसळून पाणी पिल्याने पोटातील होणारी आग शांत होते , जळजळ थांबते . या व्यतिरिक्त आल्याचा रसामध्ये अ‍ॅटीबॅक्टेरीअल गुणधर्म देखील असतात. त्यामुळे हे गुण पोटातील असलेल्या हानिकारक बॅक्टेरीयास मारतात आणि पोटातील होणारी आग थांबवतात , पोटात दाह होण्यापासून रोखतात .

10. ओवा खाणे : पोटातील आग कमी करते

पोटात आग पडणे घरगुती उपाय/ पोटात आग पडणे कारणे / पोटात आग पडल्यावर काय करावे / potat aag padane gharguti upay
ओवा

ओव्याने देखील पोटात होणारी आग शांत होण्यास बरीचशी मदत होते. ओव्याचे देखील अनेक फायदे आहेत. ओवा पोटातील उष्णता आणि गॅस दुर करण्यास मदत करतात. एका पॅनमध्ये ओवा गरम करून घ्यायचा त्याची फाईन पावडर तयार करून घ्यायची आणि हे मिश्रण कोमट पाण्यात मिक्स करायचे आणि ते पिऊन घ्यायचे याने पोटात होणारी आग कमी पुर्णपणे थांबते आणि पोटात थंडता होऊन आग पडण्याचा त्रास कमी होतो.

पोटात आग पडणे कारणे / पोटात आग कशामुळे होते

साधारणपणे खालील पोटात आग पडणे कारणे आहेत –

  • पित्त झाल्याने –आपल्या पोटात जर पित्त झाले असेन किंवा अॅसिडिटी झाली असेन तर देखील आपल्याला पोटात आग पडण्याची समस्या होऊ शकते.
  • गरम मसालेदार पदार्थ खाल्याने- आपण जर जास्त गरम पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर त्या पदार्थाच्या गरमी मुळे आपल्या पोटात आग पडू शकते.
  • चहा किंवा कॉफी जास्त घेतल्याने – दिवसभरात गरमीच्या दिवसात आपण जात जास्त प्रमाणात चहा, कॉफी चे सेवन केले तर पोटात आग पडू शकते.
  • शरीरातील उष्णता वाढल्याने – आपल्या शरीरातील उष्णता वाढली किंवा औषधी मेडिसिन घेतल्याने देखील शरीरातील उष्णता वाढते आणि पोटात आग पडते.
  • जागरण झाल्याने – रात्री जागरण केले , वेळेवर झोप नाही घेतली तरी देखील पोटात आग पडू शकते.

सारांश -पोटात आग पडणे घरगुती उपाय/ पोटात आग पडणे कारणे / पोटात आग पडल्यावर काय करावे (potat aag padane gharguti upay )

आपल्याला जर पोटात आग पडण्याचा सारखा त्रास होत असेन तर आपण आम्ही आजच्या ” पोटात आग पडणे घरगुती उपाय ” या मध्ये सांगितलेले घरगुती उपाय नक्की करून बघा त्याचा तुम्हाला उपयोग होईल, आणि तुमच्या पोटात आग पडत असेन, हे उपाय करून तुमचा त्रास निश्चितच कमी होईल .

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , पोटात आग पडणे घरगुती उपाय /पोटात आग पडणे कारणे/ पोटात आग पडल्यावर काय करावे/potat aag padane gharguti upay) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top