पोट फुगणे उपाय | पोट फुगणे वर 9 सर्वोत्तम घरगुती उपाय

पोट फुगणे उपाय / पोट फुगणे घरगुती उपाय / पोट फुगणे कारणे / pot fugane gharguti upay >>> पोटाच्या बाबतीतल्या समस्या ह्या अनेक कारणांमुळे उद्भवतात आणि हया समस्या काही वेळा साधारण ही असु शकतात आणि त्या आपण घरच्याघरी सुध्दा बर्‍या करू शकतो. काही छोट्या मोठ्या समस्येतील एक समस्या म्हणजे पोट फुगणे. पोट फुगणे ही एक समस्या आहे, जी आपल्याला अति गंभीर वाटत नसल्याने दुर्लक्षित करतो.

परंतु आपण त्याकडे लक्ष नाही दिले, त्यावर उपाय नाही केले तर त्रासदायक ठरू शकते आणि या समस्येमुळे आपल्याला बराच त्रास होतो आणि यामुळे आपले कशातच लक्ष लागत नाही. या त्रासामुळे झोप सुध्दा लागत नाही किंवा कुठल्याही कामात मन लागत नाही. पटापट जेवण केले, गॅस पकडणारे चुकीचे अन्न खाल्ले किंवा खाण्याच्या वेळेत बदल झाला की पोट फुगल्यासारख्या समस्या ह्या तोंड वर काढतात.

            पोट फुगी चा त्रास हा जास्त करून रात्रीचे उशिरा जेवन, जड अन्नाचे जेवण, यामुळे सुध्दा होतो, हा त्रास असेन तर रात्री चांगली झोप सुध्दा लागत नाही. रात्रीची व्यवस्थित झोप न झाल्याने मग दिवस सुध्दा खराब होतो. काही लोकांना अति जास्त खाल्ल्याने पोट फुगते. काहींचे कमी खाल्ल्याने सुध्दा पोट फुगते आणि जेवणाच्या वेळा बिघडल्याने सुध्दा पोट फुगते. तसेच भुक लागलेली आहे आणि त्या वेळेला जेवले नाही तरी देखील पोट फुगण्याचा त्रास उद्भवतो.

पोट फुगणे म्हणजे नेमकं काय तर जास्त खाल्ल्याने किंवा अपचन झाल्याने गॅस होत असेल तर आणि पोट कडक झाल्यासारखे वाटत असेल तर हेच पोट फुगणे याचे लक्षण आहे. जर पोट फुगल्यावर लवकरात लवकर उपचार नाही केले तर यामुळे जुलाब सुध्दा होतात आणि उलटयां होण्यासारखा त्रास सुध्दा होतेा. आपण हा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपचार करून आपला त्रास लवकरात लवकर कमी करू शकतो. चला तर मग पाहूया -आजच्या लेखात माहिती, पोट फुगणे घरगुती उपाय याविषयी .

पोट फुगणे घरगुती उपाय(pot fugane gharguti upay)

पोट फुगणे ही एक साधारण समस्या जरी असली तरी, त्यावर उपाय करणे हे अतिशय महत्वाचे आहे, नाही तर या त्रासचा आपल्याला भरपूर त्रास होऊ शकतो, त्याचबरोबर दुसरे आजार देखील आंगे लागू शकतात, त्यामुळे आम्ही आज जो “पोट फुगणे यावर घरगुती उपाय” लेख घेऊन येत आहोत, यातील माहिती जर आपल्याला पोट फुगणे ही समस्या असेन तर त्याचे समाधान आणि त्रास कमी करण्यास नक्कीच उपयोगी येईल .

लसूण आणि मध -पोट फुगणे उपाय

पोट फुगणे उपाय / पोट फुगणे घरगुती उपाय / पोट फुगणे कारणे / pot fugane gharguti upay
लसूण आणि मध – पोट फुगणे उपाय

काही काही वस्तु आपल्या घरात अशा असतात ज्यांचा वापर आपण आपले काही लहान सहान आजार, दुखणे कमी करण्यासाठी करू शकतो आणि आपल्याला याची माहिती देखील नसते, तर असेच दोन पदार्थ आहेत की, ज्यांच्यापासुन आपण पोट फुगण्याच्या त्रासापासुन स्वतःला वाचवु शकतो. लसुण आणि मध असे हे दोन पदार्थ आहेत ज्यांच्यापासुन आपल्याला पोट फुगण्याच्या त्रासापासुन सुटका मिळु शकते.

थोडासा लसणाचा रस काढुन तुम्ही त्याचे सेवन करू शकता ,नुसते लसुण खावे वाटले नाही तर तुम्ही त्यामध्ये मध टाकुन सुध्दा तुम्ही खाऊ शकता. असे केल्याने पोट फुगण्याची समस्या खुप प्रमाणात कमी होऊ शकते.  नेहमी नेहमी पोट फुगत असेल तर हा उपाय नक्कीच करून बघा, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

मेथीचे दाणे – पोट फुगणे समस्या पळविते दूर

पोट फुगणे उपाय / पोट फुगणे घरगुती उपाय / पोट फुगणे कारणे / pot fugane gharguti upay - मेथीचे दाणे
मेथी

पोट फुगण्याच्या समस्येवर अजुन एक उपाय म्हणजे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे याने सुध्दा पोट फुगणे या त्रास पासून मुक्त होण्यास खूप फायदा होतो. हा उपाय करण्यासाठी मेथीचे दाणे एक चमचा घ्यावे आणि गॅसवर एका पातेल्यात पाणी टाकुन हे मेथीचे दोण सात ते आठ मिनिटे उकळु दयावेत आणि हे चांगले उकळल्यास चाळणीच्या साहाय्याने गाळुन घ्यावे आता हे पाणी आणि मेथीचे दाणे वेगवेगळे करावेत आणि उकळलेले पाणी थेाडेसे थंड झाल्यावर ज्यांचे पोट फुगले आहे त्यांना पिण्यास दयावे. अशाप्रकारे हा उपाय केला तर  पोट फुगण्याच्या समस्येपासून लवकरात लवकर आराम मिळु शकतो. आपल्या आजूबाजूला अनेक आर्येुवेदातील माहिती असणारे लोक किंवा वैद्य हा घरगुती उपचार करण्याचा सल्ला देतात. या उपायाने नक्कीच हा त्रास कमी होतेा आणि आराम मिळतो.

पूदीना -पोट फुगणे घरगुती उपाय

पुदिना
पुदिना

पुदीना हा सुध्दा ज्या प्रमाणे इतर अनेक आजारावर उपयोगी येतो त्याचप्रमाणे पोट फुगल्यावर देखील उपाय म्हणून खुप फायदेशीर ठरतो कारण यात भरपूर प्रमाणात मिंट उपलब्ध असते जे पोट विकार वर काम करते . सहसा आपल्या घरांमध्ये पुदीना हा उपलब्ध असतोच ,तर याच पुदीन्याचे चार ते पाच पाने घ्यावीत.

पोट फुगणे उपाय / पोट फुगणे घरगुती उपाय / पोट फुगणे कारणे / pot fugane gharguti upay - पुदिना पाने
पुदिना पाने – पोट फुगणे उपाय

एक ग्लास पाणी घ्यावे आणि एका पातेल्यात पाणी आणि पुदीन्याची पाणे टाकावीत आणि हे मिश्रण छान उकळु दयावे आणि नंतर पाने बाजुला करून ते उकळलेले पाणी पिवुन घ्यावे याने काय होते की, पोटात जमा झालेला गॅस पटकन बाहेर पडतो आणि पोट फुगण्याच्या या त्रासापासुन सुटका होऊन आपल्याला आराम मिळतो.

लिंबुरस आणि काळे मीठ – पोट फुगणे रोखते

लिंबू रस - घरगुती उपाय
लिंबू रस

 लिंबु तर हा खुप सोपा आणि प्रभावी उपाय आहे. पोट फुगण्याचा त्रास दुर करण्यासाठी लिंबु हे फार उपयुक्त ठरते . लिंबू हे प्रत्येकाच्या घरात असतच त्यामुळे पोटफुगीचा त्रास बरा करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर लिंबाचा वापर करू शकता.

काळे मीठ - घरगुती उपाय
काळे मीठ / सेंदव मीठ

एक लिंबु घ्यायचे ते कापायचे आणि एक ग्लास पाणी घेऊन एका पुर्ण लिंबाचा रस त्या पाण्यामध्ये काढायचा आणि आता त्यामध्ये थोडेसे चवीपुरते काळे मीठ टाकायचे. घरात उपलब्ध नसेल तरीही काही हरकत नाही. पण असल्यास उत्तमच आणि मग हे मिश्रण चांगल्याप्रकारे ढवळुन घ्यावे आणि पोट फुगल्यास हे मिश्रण पिवुन घ्या. पिल्या पिल्याच तुम्हाला ढेकर येईल आणि फरक जाणवेल व लगेचच तुमचा पोट फुगीचा त्रास कमी देखील होईल आणि तुम्हाला आराम जाणवेल .

ओवा आणि सैंधव मीठ – पोट फुगी करते गायब

पोट फुगणे उपाय / पोट फुगणे घरगुती उपाय / पोट फुगणे कारणे / pot fugane gharguti upay - ओवा
ओवा

एक चमचा ओवा घ्यावा आणि थोडेसे सेंधव मीठ घ्यावे आणि हे मिश्रण तसेच किंवा ओवा बारीक करून हे मिश्रण तुम्ही पाण्यात टाकुन सुध्दा पिऊ शकता याने काय होईल तर, पोटातील गॅस आपोआप बाहेर पडेल आणि पोट फुगण्याच्या त्रासापासुन मुक्तता मिळेल असे तुम्ही जेवण झाल्यावर आणि रात्रीचे जेवण झाल्यास केले तर तुम्हाला पोट फुगीचा अजिबात त्रास होणार नाही आणि पोटात हलकेसे वाटेल.

आले – पोट फुगणे घरगुती उपाय फायदेशीर

आले - घरगुती उपाय
आले / अद्रक

आले हे सुध्दा सगळयाच्या घरात उपलब्ध असतेच. आल्याचा वापर आपण सहसा चहामध्ये किंवा सर्दी झाल्यास काढयामध्ये टाकण्यासाठी करतो. पण आल्याचा अजुन एक फायदा होऊ शकतो तो म्हणजे पोट फुगीचा त्रास होत असल्यास आपण हा उपाय करावा. पोट फुगी वरील हा उपाय खुप त्वरीत परिणाम होणारा आणि लवकरात लवकर आराम देणारा रामबाण असा उपाय आहे. आल्याचा तुकडा घ्यायचा आणि त्याला थेाडेसे काळे मीठ लावायचे आणि हे चावुन खायचे याने काय होते की गॅस बाहेर पडतो तसेच पित्त देखील होत नाही आणि पोट फुगत नाही. पोटातील अनावश्यक हवा गॅस पास होऊन पोटाबाहेर पडते .

लिंबुरस-अद्रकरस-मध –

 एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा अद्रकाचा रस एकत्र करायचा, वाटल्यास त्यात थोडी साखर टाकावी आणि आता तो प्यायचा. यात तुम्ही थोडास मध देखील टाकु शकता तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर तसेच पिवु शकता. पोट फुगीचा त्रास न होण्यासाठी हे मिश्रण रात्रीच्या जेवणानंतर पिल्यास अन्न पचन व्यवस्थित होते आणि गॅस होत नाही आणि गॅस नाही झाला की पोट देखील फुगत नाही. अद्र्क आणि लिंबू हे पोटाच्या कोणत्याही विकारा वर फायदेशीर आहे, खास करून अपचन, गॅस बाहेर पाडणे आणि पोट फुगी कमी करणे, यासाठी लिंबुरस, अद्रक रस आणि मध हा सर्वोत्तम उपाय आहे.

बेकिंग सोडा -पोट फुगणे उपाय

बेकींग सोडा, हा देखील पोट फुगीवर रामबाण उपाय आहे. बेकिंग सोडयाच्या सेवनामुळे देखील पोट फुगत नाही. बेकींग सोडा हे एक अतिशय स्टा्रंग एसिडिटी ब्रेकर आहे, जे की पोटात तयार होणा-या आम्लशयाशी लढते आणि तुम्हाला पोट फुगणयाच्या त्रासापासुन मुक्त करते. हा उपाय करण्यासाठी एक कप गरम पाण्यामध्ये छोटा चमचा बेकींग सोडा टाकायचा आणि ते मिश्रण पटकन पिऊन घ्यायचे हे दिवसातुन एकदा केले तर पोटफुगीचा त्रास होणार नाही.

कोमट पाणी आणि खोबरेल तेल –

कोमट पाणी हे पोटाच्या आजारापासून आराम मिळवण्यासाठी उत्तम समजले जाते, एक कप कोमट पाणी घेऊन त्यात  खोब-याचे तेल एक चमचा टाकून ते पाणी कोमट असतानाच पिल्यास देखील पोटफुगीचा त्रास कमी होईल आणि तुम्हाला पोट फुगी या त्रासापासून आराम मिळेन. कोमट पाणी पिल्याने पोटात किंवा घशात काही जंतु झाले असतील तर ते देखील मरतात, आणि पोटाचे आरोग्य सुधारण्यास बरीच मदत होते

पोट फुगणे कारणे

पोट फुगणे कारणे
पोट फुगणे कारणे

जड अन्न खाणे- पोट फुगीचे कारण

एकाच जागी बराच वेळ बसने – पोट फुगी कारण ठरते

जंकफूड / फास्ट फूड खाणे -पोट फुगीस कारणीभूत

व्यसनाधीनता – पोट फुगी चे कारण बनते

अमाश्यातील जीवाणुंची वाढ – पोट फुगी होऊ शकते

साधारणपणे वरील सर्व पोट फुगी होण्याचे कारण ठरू शकतात, म्हणजे वरिल सर्व गोष्टी मुळे पोट फुगी होऊ शकते.

सारांश – पोट फुगणे उपाय / पोट फुगणे घरगुती उपाय (pot fugane gharguti upay)/ पोट फुगणे कारणे

आपल्याला जर पोट फुगणे, पोटात गॅस भरणे यांसारखी समस्या असेन तर, आमच्या आजच्या लेखातील, “पोट फुगणे घरगुती उपाय” ही माहिती अतिशय उपयोगी येईल आणि आपल्या त्रासाचे आणि समस्येचे या लेखातील माहीतीमुळे निश्चितच निराकरण होईल. त्यामुळे तुम्हाला जर पोट फुगणे यांसारखी समस्या असेन तर तुम्ही आमचा वरील लेख आवर्जून वाचा. आमच्या या लेखातील माहिती आणि उपाय हे तुमच्या समस्येपसून तुम्हाला नक्कीच आराम देण्यास मदत करतील आणि तुमचा पोट फुगणे हा त्रास कमी होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, पोट फुगणे उपाय /पोट फुगणे घरगुती उपाय (pot fugane gharguti upay)/ पोट फुगणे कारणे, हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top