गुडघेदुखीवर घरगुती उपचार / रामबाण उपाय – Best 17 Home Remedies

गुडघेदुखीवर घरगुती उपचार / गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध / गुडघेदुखीवर उपाय / गुडघेदुखीवर रामबाण उपाय / ( gudaghe dukhi var gharguti upchaar) >>> गुडघेदुखी चा त्रास हा सहसा वाढत्या वयासोबत वाढतच जातो. जस जसे आपले वय वाढू लागते आणि शरीरातील काल्शियम चे प्रमाण कमी होऊ लागते तसतसे आपल्याला गुडघेदुखी व शरीराचे इतर सांधेदुखी /स्ंनायुदुखी यांसारख्या समस्या या सुरू होतात. शरीरातील सांधे हे असे अवयव असतात जेथे दोन किंवा त्यापेक्षा जास्त हाडे एकमेकांना जुळलेले असतात. त्यामुळे या सांधे दुखीचा जरा जास्तच आणि असहय अशा वेदना होऊन त्रास होत असतो आणि आपले गुडघे हे देखील शरीरातील सांधेच असतात ,त्यामुळे गुडघेदुखी याचा अतिशय त्रास होत असतो.

आपण पाहतोय की सध्याच्या काळात मध्यम वयोगटातील लोकांना देखील कमी वयापासूनच गुडघेदुखी आणि सांधेदुखी अशा समस्या या त्रास देत आहेत, त्यामुळे गुडघे दुखीचा किंवा सांधे दुखीचा त्रास असलेल्या लोकास त्यांची दैनंदिन कामे करताना तसेच प्रवास करताना चढ-उतार करताना, एकाच जागी जास्त वेळ बसून राहिल्यास पायाला, सांध्याना आणि गुडघे यांना त्रासदायक वेदना होत असतात. गुडघे दुखीची ही समस्या तशी पाहण्यास फार गंभीर दिसत नसली तरी त्याचा त्रास मात्र पराकोटीच्या वेदांनानी भरलेला असतो. पायर्‍या चढणे उतरणे, उठ बस करणे गुडघेदुखी असेल तर अगदी अशक्यप्राय बनते.

आपल्याला माहितच आहे की, एकदा का ही गुडघेदुखी ची समस्या मागे लागली तर वाढत्या वयासोबत जस जसे वय वाढेल तसतशी वाढतच जाते. त्यामुळे कमीत कमी या गुडघे दुखीचा त्रास हा जास्त आणि असह्य होऊ नये याकरिता आपण कमीत कमी गुडघेदुखीवर घरगुती उपचार आणि गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध घेऊन आपण आपला त्रास वाढण्यापासून नक्कीच रोखू शकतो आणि आली दैनंदिन कामे सुरळीत करू शकतो. आजच्या काळात तर बर्‍याच लोकांना या गुडघेदुखी ने त्रस्त केले आहे आणि त्या साठीच आम्ही एक अतिशय महत्वपूर्ण लेख घेऊन येत आहोत, जो गुडघेदुखीवर रामबाण उपाय म्हणून वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आमच्या या लेखातील माहिती, गुडघेदुखीवर घरगुती उपचार, गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध, गुडघेदुखीवर उपाय ही सर्व माहिती वापरुन तुम्ही तुमचा गुडघेदुखीचा त्रास कमी करू शकता.

चला तर मग पाहूया विशेष लेख,जो मदत करणार आहे तुम्हाला तुमच्या गुडघेदुखी पासून आराम मिळवण्यासाठी आणि तुमचं गुडघे दुखीचा त्रास कमी करण्यासाठी. गुडघेदुखीवर घरगुती उपचार कोणते करावे आणि गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध म्हणून काय घ्यावे.

Table of Contents

गुडघेदुखीवर घरगुती उपचार / गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध / गुडघेदुखीवर उपाय / गुडघेदुखीवर रामबाण उपाय / ( gudaghe dukhi var gharguti upchaar)

गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध / घरगुती उपाय म्हणून आपण खालील औषधी घेऊ शकतो आणि त्याचा अनुकूल परिणाम होऊन तुमची गुडघेदुखी नक्कीच कमी होईल.

हळद आणि चुना

हळद आणि चुना गुडघ्याचे दुखणे दुर करण्यात खुप सहाय्यक आहे यासाठी हळद आणि चुना मोहरीच्या तेलात मिसळुन गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर हा कोमट झालेला लेप गुडघ्यांवर लावावा हा उपाय केल्याने गुडघेदुखी नक्कीच कमी होईल.

जवस आणि आक्रोड

गुडघेदुखीवर घरगुती उपचार / गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध / गुडघेदुखीवर उपाय / गुडघेदुखीवर रामबाण उपाय / ( gudaghe dukhi var gharguti upchaar
आक्रोड

जवस, आक्रोड या दोन्ही मध्ये कॅल्शिअम हे जास्त प्रमाणात असल्याने हा पदार्थ नियमित सेवन केले तर आपल्या शरीराला भरपूर काल्शियम मिळते आणि सांधे दुखणी तसेच गुडघेदुखी आटोक्यात रहायला मदत होते.

हळद, साखर, चुना पेस्ट

एक लहान चमचा हळद पावडर, एक लहान चमचा साखर पावडर, किंवा मध आणि एक चुटकी चुना हे सर्व पदार्थ आवश्यकते नुसार पाणी मिसळुन पेस्ट तयार करावी ही पेस्ट झोपण्यापुर्वी गुडघ्यावर लावावी. सकाळी धुवून टाकावी याने गुडघेदुखीला आराम मिळेल.

सुंठ पावडर आणि मोहरीचे तेल

एक लहान चमचा सुंठ पावडरमध्ये मोहरीचे तेल मिसळावे आणि याची पेस्ट तयार करून दिवसातुन ही पेस्ट दोन वेळेस गुडघ्यावर लावा. काही तासाने धुवून टाका हा उपाय केल्यास गुडघेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.

बदाम, काळी मिरे, मनुका

गुडघेदुखीवर घरगुती उपचार / गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध / गुडघेदुखीवर उपाय / गुडघेदुखीवर रामबाण उपाय / ( gudaghe dukhi var gharguti upchaar
बदाम, मनुका, काळी मिरी आणि गरम दूध

 पाच बदाम, पाच काळी मिरे, दहा मनुका आणि सहा आक्रोड गरम हे सर्व या प्रमाणात दुधांसोबत सेवन करावे. हा प्रयोग केल्याने आराम मिळेल आणि गुडघे दुखीचा त्रास कमी होईल. बदाम हे कल्शियम वाढण्यास मदत करतात. तर मनुका लोह वाढण्यास आणि मिरे हे सांधेदुखी जोईंट पेन ह्यांसारखे त्रास कमी करण्यास मदत करते त्यासाठी हा उपाय लाभदायक आहे.

भिजवलेले खजूर

गुडघेदुखीवर घरगुती उपचार / गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध / गुडघेदुखीवर उपाय / गुडघेदुखीवर रामबाण उपाय / ( gudaghe dukhi var gharguti upchaar
भिजवलेले खजूर

एक कप पाण्यात आठ खजुर रात्रभर भिजून ठेवावे. सकाळी रात्रभर भिजवलेले खजूर सकाळी रिकाम्या पोटी खावे व ज्या पाण्यात खजुर भिजवलेले आहे ते पाणी पिऊन घ्यावे यामुळे गुडघेदुखीवर आराम मिळेल.

नारळ आणि नारळ तेल

नारळ हे गुडघेदुखीसाठी एक चांगले आयुर्वेदिक औषध आहे. रोज नारळ खावे नारळाचे दुध प्यावे.गुडघ्यावर दोनदा नारळाच्या तेलाने मालीश करावी.  याने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो आणि आपल्याला आराम मिळतो. मालीश केल्याने रक्त प्रवाह सुरळीत चालतो तसेच स्ंनायुंचे आकुंचन प्रसरण देखील योग्य चालते. गुडघ्यातील स्ंनायुवर तान पडत नाही॰

दालचिनी आलं, डिंक पावडर आणि तीळ तेल

दालचिनी,आलं आणि डिंक पावडर हे सर्व तिळाच्या तेलात कालवून तो लेप दिवसातुन एकदा गुडघ्यावर लावला तर गुडघेदुखीत बराच फरक मिळतो. या उपचारणे देखील गुडघे दुखी थांबण्यास मदत होते.

गुळवेल- गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध

गुडघेदुखीवर घरगुती उपचार / गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध / गुडघेदुखीवर उपाय / गुडघेदुखीवर रामबाण उपाय / ( gudaghe dukhi var gharguti upchaar - गुळवेल
गुळवेल

गुळवेल सुध्दा गुडघे दुखी साठी एक अंत्यत प्रभावी उपाय आहे. गुळवेलीचे बोड चाऊन खाता येते किंवा त्याची पावडर करून रोज एक चमचाभर खाल्ली तर फरक पडतो आणि गुडघे दुखी कमी होते. गुळवेल चवीला अतिशय कडू असतो त्यासोबत आपण मध देखील घेऊ शकता.

मेथ्या दाणे

गुडघेदुखीवर घरगुती उपचार / गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध / गुडघेदुखीवर उपाय / गुडघेदुखीवर रामबाण उपाय / ( gudaghe dukhi var gharguti upchaar

काहींचा गुडघेदुखीचा त्रास वातावरण जरा थंड पडले की डोक वर काढतो, अशा वेळेला मेथ्या रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी चाऊन खाल्ल्यास आराम मिळतो. मेथ्या हा पदार्थ वात, संधिवात, स्नायू दुखी, गुडघे दुखी यापासून आराम देतो.

आले, सुंठ

गुडघेदुखीवर घरगुती उपचार / गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध / गुडघेदुखीवर उपाय / गुडघेदुखीवर रामबाण उपाय / ( gudaghe dukhi var gharguti upchaar - आले
आले

आल्याच तेल हे आपल्या दुखणा-या गुडघ्यावर चोळावे, सुंठ पावडर खाणे, चहामध्ये आल्याच प्रमाण वाढवणे हे सोपे उपाय केल्यास साधारण होणारी गुडघेदुखीवर आराम मिळू शकतो. अशाप्रकारे आले आणि सुंठ पावडर ही गुडघे दुखीवर आयुर्वेदिक औषध म्हणून वापरावी.

तुळशीच्या पाणाचा लेप

तुळशीची पाने - गुडघेदुखीवर घरगुती उपचार / गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध / गुडघेदुखीवर उपाय / गुडघेदुखीवर रामबाण उपाय / ( gudaghe dukhi var gharguti upchaar
तुळशीची पाने

सांधेदुखीवर तुळस हा एक नामी उपाय आहे. तुळशीच्या पानांची पेस्ट करून दुखणा-या हाडांवर सांध्यावर लावल्याने बराच फरक पडु शकतो.

पारिजातकाची फुले

पारिजातक तुम्हाला माहित असेलच ज्याचे सफेद रंगाची फुले रात्री उमलतात आणि सकाळी गळुन पडतात. या झाडाची सहा ते सात पाणे वाटुन बारीक करून पेस्ट तयार करून घ्यावी आणि एक ग्लास पाण्यात उकळया उकळून उकळून ते जेव्हा अर्धे राहील तेव्हा ते गॅस वरुण खाली काढा आणि कोमट करून दररोज रिकाम्या पोटी प्यावे असे केल्यामूळे तुम्हाला शरीरातील आणि गुडघ्यामधील वेदने पासून आराम मिळेल,हा एक सर्वात प्रभावी असा उपाय आहे.

कण्हेरी ची पाणे

कण्हेरी ची पाणे उकळून त्यांची बारीक पेस्ट बनवा आणि तिळाच्या तेलात मिक्स करून गुडघ्यावर त्या तेलाने हळुवार मालिश करावी असे केल्यामुळे गुडघ्याच्या वेदनेपासुन आराम मिळेल आणि आपला त्रास कमी होईल.

गरम दुध आणि लसूण

 एक ग्लास दुधात चार ते पाच लसुन टाकावे आणि उकळावे आणि कोमट झाल्यावर पिऊन घ्यावे. यामुळे गुडघेदुखी मध्ये आराम मिळेल. दूध मध्ये जास्त प्रमाणात कल्शियम असते जे गुडघे, पाय आणि हाडांचे इतर आजार कमी करण्यास मदत करते.

बाजरी, मका याचे सेवन

बाजरी आणि मका यांमध्ये सांधे आणि हाडाशी संबंधित सर्व आजार दूर करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे बाजरी आणि मका यांचे सेवन केल्याने देखील गुडघेदुखी पासुन आराम मिळेल.

पौष्टिक आणि कल्शियमयुक्त आहार

पौष्टिक आणि कल्शियम युक्त असा आहार हा आपल्या निरोगी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठीच कोबी, सोयाबीन, हिरव्या भाज्या सोबतच काकडी, गाजर आणि मेथी यांसारख्या पौष्टीक भाज्या खाल्ल्यास संपूर्ण शरीर देखील सदृढ राहील आणि गुडघेदुखीवर देखील आराम मिळण्यास मदत होईल. या उपायाने इतर त्रास देखील कमी होऊ शकतात.

गुडघेदुखीवर रामबाण उपाय

वरील सर्व गुडघेदुखीवर घरगुती उपचार यांच्यासोबत आपण खालील गुडघेदुखीवर रामबाण उपाय देखील करू शकतो –

  • जर हात लावताच गुडघे दुखत असतील व गुडघ्यांमध्ये सुजन आलेली असेल तर आईस थेरेपी गुडघ्याचे दुखणे व सुजण कमी करण्यास सहाय्यक आहे गुडघेदुखी होत असल्यास एका पॅकेट मध्ये बर्फ टाकून गुडघे शेकावे. यामुळे सुजन कमी होण्यास मदत मिळेल. यासोबतच हाताने गुडघ्याला हळुवार मसाज केल्यास गुडघेदुखीला आराम मिळेल.
  • बसत असताना उठत असताना गुडघाला तान पडणार नाही यासाठी खाली बसने टाळावे.
  • आपल्याला जर गुडघ्याचा बेल्ट असेन तर तो देखील वापरावा.
  • आंघोळ करताना सूती कपडा गुडघ्यावर ठेऊन गरम पाण्याने शेकावे.

सारांश – गुडघेदुखीवर घरगुती उपचार / गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध / gudaghe dukhiwar gharguti upchaar

आपल्याला जर सतत गुडघेदुखी चा त्रास होत असेन तर आपण आमच्या “गुडघेदुखीवर घरगुती उपचार / गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध ” यातील माहिती उपाय आणि उपचार करावे, यामुळे आपल्याला नक्कीच आराम मिळेन.

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, ” गुडघेदुखीवर घरगुती उपचार / gudaghe dukhiwar gharguti upchaar ” कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top