पाय मुरगळणे घरगुती उपाय / पाय मुरगळणे घरगुती उपचार / पाय लचकणे घरगुती उपाय / pay murgalne upay >>>> आजच्या धावत्या जीवनशैली मुळे धावपळ, घाई, लगबग ह्या सर्व गोष्टी आपल्याला टाळता येत नाही. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला गर्दी, वर्दळ, वेळेचा अभाव, गडबड या सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पाय मुरगळण्यासारख्या समस्याही टाळता येत नाहीत. पाय मुरगळणे हि खरतर एक सामान्य समस्या आहे. अनेक वेळा चालता चालताही पाय मुरगळतो. पायाखाली अचानक कोणतीतरी वस्तू किंव्हा दगड आल्यानेही पाय मुरगळतो. चालताना पाय घसरला किंव्हा चुकून पाय उलटा अगर वाकडा पडला तरीही पाय मुरगळू शकतो.
एखादा डोंगर, टेकडी किंव्हा चढण असलेला भाग जेंव्हा आपण चढत असतो तेंव्हा पाय मुरगळण्याची शक्यता जास्त असते. जर चालताना पाय व्यवस्थित टाकले गेले तरीही पाय मुरगळू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे आजकाल लोक रस्त्यावरून चालताना सुद्धा मोबाईल मध्ये डोकी घालून चालत असतात त्यामुळे पाय मुरगळणे यांसारख्या अनेक समस्या वाढल्या आहेत. पाय मुरगळणे हे जरी सामान्य असले तरी त्यामुळे होणारा त्रास हा असह्य असतो. पाय मुरघळणे, पाय लचकणे हे दुखणं मोठे आणि आपल्या सहनशक्तीच्या पलीकड जेव्हा जात तेव्हा अगदी लगेच डॉक्टर ना दाखवावं, हलगर्जी पणा करू नये.
पाय मुरगळल्यास आपण लगेचच घरगुती उपाय नाही केले तर त्याचा त्रास होऊन, ती जागा काळी पडण्याची शक्यता असते, तर काही वेळेस नस देखील लचक बसल्याने, पाय मुरगळल्याने दबली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यावर लगेचच डॉक्टर ला दाखवावे जर जास्त त्रास होत असेल तर क्ष किरण चाचणी करावी, एमआरआय किंवा अन्य चाचण्या करव्यात॰
परंतु ; जर आपल दुखणं जर कमी प्रमाणात असेल, सहन करण्याजोगे असेल तर आपण घरगुती पद्धतीने त्यावर उपचार करू शकतो. तर हे आपला पाय मुरगळला वर करण्याचे घरगुती उपाय कोणते आहेत हे आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठीच आम्ही ” पाय मुरगळणे घरगुती उपाय ” हा लेख आम्ही घेऊन येत आहोत. आपला किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा पाय मुरगळला असेल किंवा लचकला असेन तर आपण हे उपाय करून पाहावेत, याने आपल्याला भरपूर फायदा नक्कीच होईल.
Table of Contents
पाय मुरगळणे घरगुती उपाय / पाय मुरगळणे घरगुती उपचार/ पाय लचकणे घरगुती उपाचार/ pay murgalne upay
आपला जर पाय मुरगळला असेल आणि आपल्याला त्याचा त्रास होत असेल तर आपण आमच्या आजच्या या लेखातील घरगुती उपाय आणि घरगुती उपचार करून पहावेत त्याने आपला त्रास नक्कीच कमी होईल आणि आपल्या पायाला आराम देखील मिळेन. हे उपाय करून देखील जर आपला त्रास कमी नाही झाला तर आपण वैद्यकीय सल्ला मात्र अवश्य घ्यावा.
विश्रांती घ्यावी आणि पायाला देखील विश्रांती द्यावी
आपला जर पाय मुरगळला असेन, पाय लचकला असेल तर आपण सर्वात आधी जो पाय मुरगळला आहे, त्या पायाला आराम किंवा विश्रांती देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या मुरगळ लेल्या पायाची जास्त प्रमाणात हालचाल करू नये त्या पायाला आराम पडेल असे करावे. मुरगळलेल्या पायावर जास्त दबाव पडणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे पायाची सुज वाढणार नाही व पाय कमी प्रमाणात दुखेल परंतु त्याचबरोबर हळूहळू पायाचा व्यायाम करावा.
मुरगळलेल्या पायाला बर्फाचा शेक द्यावा
पाय जर मुरगळला असेल तर त्याला लगेच बर्फाचा शेक द्यावा यामुळे पायाची सूज कमी व्हायला मदत होते. बर्फ लावताना तो एकाद्या टॉवेलमध्ये किंव्हा जाड कापडामध्ये घालून त्याचा आपल्या मुरगळलेल्या पायावर शेक द्यावा अशा प्रकारे बर्फाचा वापर करावा. दिवसातून २-३ वेळा १५ मिनिटे तरी पायाला बर्फाचा शेक द्यावा. असे केल्याने मुरगळलेल्या पायाचे दुखणे कमी होईल आणि आणि नस देखील मोकळी होईल आणि त्रास व वेदना जाणवणार नाही.
मुरगळलेला पाय हा उंची वर ठेवावा
आपल जो पाय मुरगळला गेलेला आहे किंवा लचकला आहे आपण तो पाय उंचीवर राहील याची काळजी घ्यावी म्हणजे तो पाय झोपताना उंचीवर ठेवावा. झोपताना त्या मुरगळलेल्या पायाखाली उशी घ्यावी जेणे करून तो पाय उंच राहील आणि त्यावर आलेली सूज ही काही प्रमाणात कमी होईल. त्याच प्रमाणे खाली बसत असताना मुरगळलेल्या पायाखाली स्टूल घ्यावा जेणे करून तो पाय उंची वर राहील . यामुळे पायाला आराम मिळतो आणि सूज आणि दुखणे दोन्ही कमी होईल.
लचकलेल्या पायाला बॅण्डेज बांधणे : पाय लचकणे घरगुती उपाय
आपला पाय जर लचकला असेन किंवा मुरगळला गेला असेल आणि नंतर थोडा दुखत असेल तर, त्या दुखणाऱ्या जागेवर, त्या पायावर बॅण्डेज बांधणे हा देखील चांगला उपाय आहेला बॅण्डेज बांधल्याने सूज देखील येणार नाही आणि त्या जागी रक्त देखील गोठणार नाही. पण बॅण्डेज जास्त घट्ट बांधू नये. यामुळे पायाला आराम मिळतो. या होत्या प्राथमिक गोष्टी. आता आपण घरच्या घरी करता येणारे घरगुती उपाय आणि उपचार कोणते आहेत ते बघू ……
हळदी चा लेप लावणे
हळदीचा लेप सुज आणि वेदना कमी करण्यासाठी गुणकारी ठरतो. हळदीमध्ये अँटी-बायोटिक गुणधर्म असल्यामुळे हळदीचा वापर दुखापत किंव्हा वेदना यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी होतो. दोन चमचे हळदीमध्ये थोडेसे पाणी मिसळून त्याचा लेप तयार करावा. हलकेसे गरम करून दुखणाऱ्या जागेवर तो लेप लावावा यामुळे आराम मिळतो सूज कमी होते आणि मार लागला असेल तर त्याचे कोणतेही बक्टेरियल इन्फेकशन देखील होत नाही.
मीठाच्या कोमट पाण्यात पाय भिजवणे
एक टब भर गरम पाण्यात मूठ भर मीठ टाकून या पाण्यात अर्धा तास मुरगळलेला दुखत असलेला पाय बुडवून ठेवल्यास दुखण्या पासून आराम मिळतो. यानंतर पाय कोरडा करावा व त्यावर बँडेज बांधावे. मुरगळलेला पाय पूर्ण बरा होईपर्यंत रोज दिवसातून एकदा तरी मिठाचा शेक दिला पाहिजे. याने बराच आराम मिळतो आणि स्नायू मोकळे राहतात तसेच रक्तप्रवाह देखील सुरळीत चालतो.
कढवलेले लसूण आणि तेल – या मिश्रणाने मसाज करा
गरम तेलात लसूण तळून घ्यावा आणि लसून बाजूला करून ते तेल काढून घ्यावे आणि आता त्या तेल मध्ये थोडे खोबरेल किंव्हा बदामाचे तेल मिसळावे. आता हे मिश्रण कोमट करून घ्यावे. हे तेल थोडे थंड आणि कोमट झाल्यानंतर मुरगळलेल्या पायाच्या भागावर या तेलाने पाच ते दहा मिनिट मसाज करावा. दिवसातून २-३ वेळा असा मसाज करावा असे केल्यामुळे मुरगळलेल्या किंवा लचकलेल्या पायाचे दुखणे व सुज दोन्ही देखील पुर्णपणे कमी होण्यास मदत होते.
मोहरीचे तेल : pay murgalne upay
पाय जर मुरगळला असेल किंवा लचकला असेल तर मोहरीच्या तेलाचा उपयोग आपण उपाय आणि उपचार म्हणून करू शकतो. एका छोट्या भांड्यात ५-६ चमचे मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद आणि पाच ते सहा सोललेल्या लसणाच्या पाकळ्या कुटून घालाव्यात. हे मिश्रण मंद आचेवर गरम करून घ्यावे म्हणजेच लसूण यात तळून घ्यावा आणि आता थंड झाल्यावर याने पायावर मसाज करावा. यामुळे पायांच दुखणं हे बर्याच प्रमाणात कमी होत.
आमच्या आजच्या लेखात सांगितलेले वरील सर्व पाय मुरगळणे घरगुती उपाय उपाय हे घरच्या घरी करता येण्यासारखे आहेत. जर तुमचा पाय मुरगाळला असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करुन बघा या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
सारांश – पाय मुरगळणे घरगुती उपाय / पाय मुरगळणे घरगुती उपचार / पाय लचकणे घरगुती उपाय / pay murgalne upay
आपला जर पाय मुरगळला असेन आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल आणि या वेदनेतून तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर तुम्ही आमच्या ” पाय मुरगळणे घरगुती उपाय/पाय मुरगळणे घरगुती उपचार/पाय लचकणे घरगुती उपाय/ pay murgalne upay” या लेखातील घरगुती उपाय करावेत याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेन आणि आपला त्रास कमी होऊन, आपला पाय पूर्ववत होईल.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , पाय मुरगळणे घरगुती उपाय/ पाय लचकणे घरगुती उपाय / पाय मुरगळणे घरगुती उपचार / (pay murgalne upay) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात