ऍसिडिटी कशामुळे होते / हायपर ऍसिडिटी ची लक्षणे / ऍसिडिटी वर उपाय सांगा / acidity upay in marathi >>>> ऍसिडिटी म्हणजेच दुसरे तिसरे काही नसून मराठीत आपण ज्याला आम्लपित्त असे म्हणतो तेच, या ऍसिडिटी चा त्रास हा प्रत्येक व्यक्तीला केंव्हा ना केंव्हा तरी होतोच. त्यातल्या त्यात ज्या व्यक्तीचे अवेळी जेवण, जागरण, जड पदार्थ खाणे, एकाच जागी बसून राहणे यांसारख्या सवयी असतात त्यांना तर या ऍसिडिटी चा अतिशय त्रास होतो म्हणजे या लोकांना सतत ऍसिडिटी होत असते. कधी कधी निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे,फास्ट फूड मुळे तर कधी कामाच्या गडबडीत जेवणाच्या वेळा न पाळल्यामुळे किंवा अपुरी झोप झाल्याने ऍसिडिटी होते. लहानांपासून ते मोठयांपर्यंत सर्वानाच ऍसिडिटी (आम्लपित्त) चा त्रास हा होतो.
या ऍसिडिटी च्या त्रासाविषयीच अधिक माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही आजचा हा लेख घेऊन येत आहोत, “ऍसिडिटी कशामुळे होते / हायपर ऍसिडिटी ची लक्षणे” हा लेख यातील माहिती आपल्याला नक्कीच अतिशय उपयोगी येईल आणि आपला त्रास देखील कमी होईल॰
Table of Contents
ऍसिडिटी कशामुळे होते
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, ही ऍसिडिटी होते तरी का , तर हा ऍसिडिटी चा त्रास होतो कारण की, आपल्या जठरात प्रमाणापेक्षा थोडे जरी जास्त आम्ल तयार झाले तरी देखील आपल्याला ही ऍसिडिटी होते. नेहमी बाहेरचे मसालेदार तिखट अन्न खाणे,तळलेले अन्न वारंवार खाणे. तसेच धूम्रपान व मद्यपान केल्याने,तंबाखू खाल्याने, सततची काळजी केल्याने व ताण घेतल्याने देखील ऍसिडिटी चा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण या सर्व सवयी सोडाव्या ज्याने आपल्याला हा ऍसिडिटी (आम्लपित्त) चा त्रास होऊ शकतो.
काही वेळेस आपण पाहतो की, काही वेळेस वरील सवयी नसताना देखील काही लोकांना या ऍसिडिटी होण्याचा सारखा त्रास असतो, सतत छातीत जळजळ आणि आम्ल पित्त याचा त्रास एचपीटी असतो तर अशा वेळेस आपल्या पचनक्रियेत देखील बिघाड असू शकतो , त्यांवेळी या लोकांनी एक वेळेस वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. काही वेळेस शरीर प्रकृती मध्ये काही अनियमित आणि असंतुलित झाले तरी देखील हा त्रास होऊ शकतो. आपल्याला जर अल्सर झाला असेल तरी देखील ऍसिडिटी होऊ शकते, त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेतलेला बरा. असे केल्यास आपण हायपर ऍसिडिटी ला रोखू शकतो.
ऍसिडिटी वर तात्पुरता उपाय करून उपयोग होत नाही. नेहमी सोडा पिणे, इनो घेणे किंवा अंटासिड घेणे यांसारख्या गोष्टींचे आपल्या शरीरावर गंभीर परिणाम हे होऊ शकतात नव्हे होतातच. अंटासिड घेतल्यावर शरीरातील ऍसिड व न्यूडलाइझ कमी होते व शरीरातील ऍसिडिटी कमी होते परंतु अंटासिड मुळे पेप्सीन (पचनासाठी आवश्यक असलेले एक एन्झाइम) चे कार्य सुद्धा कमी होते. हा त्याचा एक विपरीत परिणाम आहे त्यामुळे या गोष्टी तुम्ही ऍसिडिटी कमी करण्यासाठी खाताल तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम हे नक्कीच होतील.
ही झाली ऍसिडिटी कशामुळे होते, या विषयी माहिती आता आपण पाहूया की, हायपर ऍसिडिटी ची लक्षणे कोणती आहेत ती-
हायपर ऍसिडिटी ची लक्षणे
हायपर ला वैद्यकीय भाषेत गॅस्ट्रो इसोफेजियल डिसेस GRD असे म्हणतात. ऍसिडिटी झाल्यावर लवकर नियंत्रणात आणावे कारण जास्त त्रास झाला तर उलट्या होऊन शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते आणि हे झाल्याची याची लक्षणे ही खालील प्रमाणे आहेत –
- छातीत अतिशय जळजळ म्हणजे हार्टबर्न सारखा त्रास होणे हे हायपर ऍसिडिटी चे लक्षण आहे.
- करपट ढेकर येणे ,सतत आंबट पाणी येणे, उलटी आल्यासारखे वाटणे.
- भयानक डोके दुखणे, डोक जड पडणे, चक्कर येणे.
- उलट्या होणे, काहीही खाल्ले तरी ते न पचणे.
- पोटाच्या वर आणि छातीच्या खाली डाव्या बाजूला दुखणे.
- उलट्या होऊन शरीरातील पाणी कमी होणे. ही सर्व लक्षणे हायपर ऍसिडिटी ची लक्षणे आहेत.
ऍसिडिटी वर उपाय सांगा / acidity upay in marathi
आता आपण या पुढील लेखात पाहूया की, आपल्याला जर हा त्रास झाला तर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ते –
बडीशेप :- acidity upay in marathi
जेवणानंतर बडीशेप खाणे हे ऍसिडिटी होणाऱ्या लोकांसाठी चांगले आहे. बडिशोप खाणे, ह्याने अन्न पचन चांगले होण्यास मदत होते व ऍसिडिटी चा त्रास सुद्धा कमी होतो. हल्ली बाजारामध्ये बडीशेप चा काढा म्हणजेच कुट्टा देखील मिळतो, हा पिल्याने आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे अपचन आणि पोट फुगत नाही. अशा प्रकारे बडीशेप हा ऍसिडिटी वर सोपा पण प्रभावी उपाय आहे.
ताजे ताक:- ऍसिडिटी वर उपाय
ताजे ताक म्हणजे पृथ्वीवरील अमृतच आहे.छातीत जळजळत असेल तर ताजे ताक नुसतेच किंवा सेंदव मीठ व कोथिंबीर बारीक चिरून टाकून पिल्यास ताबडतोब आराम मिळतो. मसालेदार व तिखट पदार्थ खाल्याने जर ऍसिडिटी चा त्रास होत असेल,तर ताक हा त्यावर रामबाण उपाय आहे.ताक पोटातील ऍसिडिटी शमवण्याचे काम करते.
लवंग
वातूळ पदार्थ खाताना किंवा तयार करतानाच त्यामध्ये लवंग घातली तर गॅसेसचा त्रास होत नाही.त्याचप्रमाणे आयुर्वेदात लवंगीला महत्वाचे स्थान आहे. पोटाच्या विकारा साठी लवंग गुणकारी आहे.लवंगीत कार्मीनेटिव्ह गुणधर्म म्हणजेच वात न होण्याचे गुणधर्म असल्याने लवंग खाल्यास गॅसेस चा त्रास होत नाही.लवंग व वेलची जेवणानंतर खाल्यास ऍसिडिटी चा त्रास सुद्धा कमी होतो.
आलं (अद्रक)
आल्यामध्ये तर अनेक औषधी गुण आहेत.आल्यामध्ये अन्नपचनासाठी आवश्यक तसेच दाह्यशामक गुणधर्म आहेत.आल्याचा तुकडा चावून खाल्यास किंवा आल्याचा रस घेतल्यास ऍसिडिटी झाली असेल तर त्याचा त्रास कमी होतो. त्यामुळे हा उपाय पित्त किंवा इतर त्रास असेल तर हा उपाय नक्की करून बघावा.
शहाळ्याचे पाणी
शहाळ्याचे पाणी पिल्याने शरीरातील ऍसिडीक लेव्हल कमी होऊन अल्कलाइन होते.ह्याने शरिरात आवश्यक असलेले म्युकस तयार होते.यामुळे शरीरात जर अतिरिक्त प्रमाणात ऍसिड तयार झाल्यास पोटाचे रक्षण होते.शहाळ्याचे पाणी पिल्याने अन्नपचन सुधारते व ऍसिडिटी आटोक्यात येते. शहळ्याचे पाणी पिल्याने पाण्याचे प्रमाण देखील वाढते.
केळी
केळीमध्ये नैसर्गिक ऑटासीईस असतात,ऍसिड रिफ्लक्स मध्ये केली बफर चे काम करते.थोड्याप्रमाणात जर ऍसिडिटी चा त्रास होत असेल तर केळी खाणे हा त्यावरील योग्य आणि सोपा उपाय आहे.
टरबूज (कलिंगड)
ऍसिडिटी वाढली असताना कलिंगड खाल्याने सुद्धा आराम मिळतो.कलिंगडाने ऍसिडिटी कमी होते,तसेच ऍसिड रिफ्लक्स सुद्धा कमी होते. उन्हाळ्यात तर कलिंगड कलिंगड अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर असे ठरते. कलिंगड हे अतिशय थंड गुणधर्म असणारे फळ समजले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात तर कालिंगड हे नक्की खावे याचा बराच फायदा होतो.
सफरचंद
सफरचंद खाल्याने देखील कमी अधिक प्रमाणात ऍसिडिटी चा त्रास कमी होतो. सफरचंद हे आधीच्या काळा पासूनच आरोग्यदायी फळ समजले जाते. eat apple a day, keep doctor away असे म्हणतात.
डाळिंब
डाळिंब खाल्याने देखील अन्न पचन चांगले होते आणि त्यामुळे ऍसिडिटी होत नाही.
थंड दूध:- ऍसिडिटी वर उपाय
ऍसिडिटी झाल्यावर असे मानले जाते की थंड दूध पिल्याने ऍसिडिटी चा त्रास कमी होतो.हा एक अत्यंत गुणकारी उपाय म्हणून देखील वापरला जातो.दूध पिल्याने पोटातील ऍसिड कमी होते,तसेच दुधात कॅल्शिअम अल्कलाइन असल्याने त्याचामुळे पोटातील ऍसिड न्यूट्रलाइज होते.ज्यांना थंड दुधाची ऍलर्जी नाहीये अश्यानी हा सोपा ऍसिडिटी वरील घरगुती उपाय केला पाहिजे.
जिरे
पोट दुखले की ओवा व जिऱ्याचा काढा देणारी आपली आजी जिऱ्याचे गुणधर्म जाणून होती.जिरे हे फार चांगले ऍसिड न्यूट्र लाइझर आहे.जिरे खाल्याने अन्न पचन तर होतेच व ऍसिडिटी देखील कमी होण्यास मदत होते.
गुळ
गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते,त्यामुळे आतड्यांची शक्ती वाढते.आणि जेवण संपवताना एक गुळाचा खडा खाल्यास अन्न पचन चांगले होते.गुळामुळे आपली पचनसंस्था अल्कलाइन राहते व ऍसिडिटी कमी होऊन समतोल साधला जातो.
दालचिनी
दालचिनी मुळे अन्न पचन संस्था सुधारते व शरीरात पोषकमुल्ले देण्याचे काम सुरळीत होते.तुम्हाला जर ऍसिडिटी चा त्रास होत असेल तर दालचिनी चा काढा उपयुक्त आहे.दालचिनीचे अनेक फायदे आहेत त्यातील हा एक.
तुळशीची पाने
तुम्हाला ऍसिडिटी मुळे थोडी जरी जळजळ जाणवत असेल तर लगेच तुळशीची पाने चांगली चावून चावून खा,किंवा साधारणपणे ३ ते ४ पाने कपभर पाण्यात उकळून त्याचा काढा करून पिल्यास ऍसिडिटी चा त्रास कमी होतो.
सारांश – ऍसिडिटी कशामुळे होते / हायपर ऍसिडिटी ची लक्षणे / ऍसिडिटी वर उपाय सांगा / acidity upay in marathi
आपल्याला जर अशा प्रकारचा त्रास म्हणजे हायपर ऍसिडिटी ची लक्षणे दिसल्यास आपण आमच्या आजच्या “ऍसिडिटी कशामुळे होते/ ऍसिडिटी वर उपाय सांगा/हायपर ऍसिडिटी ची लक्षणे / acidity upay in marathi ” या लेखातील माहिती , लक्षणे आणि उपाय वाचावेत याने आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि आपला त्रास कमी होईल.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , ऍसिडिटी कशामुळे होते /हायपर ऍसिडिटी ची लक्षणे / ऍसिडिटी वर उपाय सांगा घरगुती उपाय/(acidity upay in marathi) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)