पुदिन्याची चटणी | विविध प्रकारची पुदिना चटणी रेसिपी मराठी

पुदिन्याची चटणी / पुदिना चटणी रेसिपी मराठी – विविध प्रकारची पुदिना चटणी कशी करायची (pudina chatani recipe in marathi)>>आपल्याला माहीतच आहे की पुदिना हा आपल्या मानवी शरीरासाठी अतिशय लाभदायक आहे. याचे सेवन केल्याने हा आपल्या मानवी शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. पुदीन्यामध्ये अॅटीऑक्सीडंट्स यांसारखे अनेक घटक असतात, जे की अन्न पचविण्यासाठी खुप उपयोगी ठरतात. पित्त झाले असल्यास, जर पुदीना खाल्ल्या तर नक्कीच आराम मिळेल. पुदिना कोणत्याही पद्धतीने खाल्ला तरी तो आपल्या शरीरासाठी लाभदायीच आहे. अनेक जन पुदिन्याची चटणी बनवत असतात. ही चटणी विविध प्रकारे बनवली जाते, तर आपण या लेखामध्ये पुदीन्याची चटणी विविध प्रकारे कशी बनवतात ते आपण या लेखात पाहणार आहोत.

पुदिन्याची चटणी / पुदिना चटणी रेसिपी मराठी - विविध प्रकारची पुदिना चटणी कशी करायची (pudina chatani recipe in marathi)
पुदिना (pudina)

पुदिन्याची चटणी / पुदिना चटणी रेसिपी मराठी – विविध प्रकारची पुदिना चटणी कशी करायची (pudina chatani recipe in marathi)

पुदिन्याची चटणी ही अनेक प्रकारे बनवली जाते, त्यातील काही विशिष्ट ५ प्रकारच्या पुदिना चटणी बनवण्याची रेसिपी आम्ही या खालील लेखात दिलेली आहे. यातील कोणतीही प्रकारची चटणी तुमच्या घरी करून बघू शकता. चला तर मग जाणून घेऊयात चार विविध प्रकारच्या पुदिन्याची चटणी बनावण्याची रेसिपी काय आहे.

पुदिन्याची चटणी / पुदिना चटणी रेसिपी मराठी - विविध प्रकारची पुदिना चटणी कशी करायची (pudina chatani recipe in marathi)
चटणी (pudina chatani recipe in marathi)

तुरीची डाळ व साखर घालून करता येणारी पुदिना चटणी

या प्रकारच्या चटणी साठी लागणारे साहित्य:-

  • सहा ते सात हिरव्या मिरच्या, चार ते पाच लसणाच्या पाकळया, एक आल्याचा तुकडा, चवीपुरती साखर, चवीपुरते मीठ, दोन वाटया खिसलेले खोबरे, कोथंबीर, दोन चमचे लिंबाचा रस, एक चमचा तुरीची डाळ, आणि दोन चमचे जिरे इत्यादी.

चटणी करण्याची संपुर्ण कृती :-

  • पुदीन्याची पाने, कोथंबीर, मिरच्या, आले स्वच्छ पाण्याने धुवुन घ्यावे.
  • खिसलेले ओले खेाबरे, पुदीन्याची पाने, कोथंबीर, डाळ, आले, लसुण, हिरव्यामिरच्या, मीठ, साखर, लिबांचा रस, जीरे, आणि थोडेसे थंड पाणी हे सर्व जिन्नस एकत्र करा. मग मिक्सरचे भांडे घ्यावे व त्यामध्ये हे सर्व मिक्स केलेले जिन्नस बारीक वाटुन घ्या. हे सर्व वाटणं एकदा फिरवण्याने बारीक होत नाही, त्यामुळे एकदा फिरवुन बाहेर काढुन एकदा चमच्याने फिरवुन घ्यावे आणि छान बारीक वाटुन घ्यावे.
  • पुर्ण बारीक करून झाल्यावर ही झाली तुमची चटणी तयार. ही पुदिना चटणी तुम्ही पोळी, पराठा, वरणभात, इडली यांसोबत खाऊ शकता खुप टेस्टी लागते.

कडीपत्त्याची पाने आणि शेंगदाने घालून करावयाची पुदिन्याची चटणी :-

या प्रकारच्या चटणी साठी लागणारे साहित्य :-

  • आर्धीवाटी ताजी पुदीन्याची पाने, चिरलेली कोथंबीर, आर्धीवाटी कडीपत्त्याची पाने, पाच ते सहा लसणाच्या पाकळया, दोन आल्याचे तुकडे, थोडेसे काळे मीठ चवीपुरते मीठ, दोन चमचे लिंबाचा रस, पाच हिरव्या मिरच्या, दोन चमचे जिर्‍याची पावडर आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे इत्यादी साहित्य वापरावे. आता पाहूया याची कृती काय आहे

चटणी बनवण्याची संपुर्ण रेसिपी :-

  • सर्वात पहिले वर सांगितलेले सर्व साहीत्य काढुन घ्यावे.
  • पुदीना, कोथंबीर, मिरच्या, कडीपत्ता हे सर्व स्वच्छ धुवून घ्या.
  • मिक्सरचे भांडे घ्यावे त्यामध्ये आल (अद्रक), लसुण, मिरच्या व पुदीना याची चांगली बारीक पेस्ट बनवून घ्या.
  • त्यामध्ये मग चवीपुरते मीठ, थोडे काळे मिठ, लिंबाचा रस आणि जि-याची पावडर टाकावी.
  • ही चटणी बारीक वाटलेली चटणी नंतर एका भांड्यामध्ये काढुन घ्या.
  • आता गॅसवर फोडणीची कढई ठेवा, त्यामध्ये तेल टाका. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात जिरे टाका. मग कडीपत्ता टाका आणि त्यानंतर साल काढलेले शेंगदाणे टाका. फोडणी चांगली तडतडु दया आणि नंतर ही गरमगरम फोडणी त्या पुदीन्याच्या वाटणावर टाका. अशा रीतीने होईल तुमची कडीपत्ता आणि शेंगदाणे घातलेली पुदिना चटणी तयार.

कैरी व साखर वापरुन बनवा चटणी

या प्रकारच्या चटणी साठी लागणारे साहित्य :-

  • एका मोठया आकाराची कैरी, आर्धी वाटी पुदीन्याची पाने, दोन चमचे जिरे, चार हिरव्या मिरच्या, चवीपुरती साखर आणि मीठ इत्यादी साहित्य वापरुन स्वादिष्ट अशी कैरी, साखर आणि पुदिना चटणी बनवता येते. ती कशी बनवावी याची कृती ही खालील प्रमाणे आहे.

चटणी बनवण्याची संपुर्ण कृती :-

  • सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून घ्यावी.
  • त्यानंतर त्या कैरी वरची साल काढुन बारीक फोडी करून घ्या.
  • मग एक मिक्सरचे भांडे घ्या, त्यामध्ये कैरीच्या फोडी टाकुन एकदा फिरवुन बारीक करून घ्या.
  • नंतर कैरी असलेल्या भांडयातच पुदीन्याची पाने, जिरे आणि मिरच्या टाकुन बारीक करून घ्या.
  • आता या तयार मिश्रणात चवीपुरते मीठ आणि साखर टाका.
  • अशाप्रकारे आपली स्वादीष्ट पुदीना कैरीची चटणी तयार आहे.
  • ही चटणी मस्त आंबट गोड अशी खूप छान लागते.

आले व चणा डाळीचे दाळव घालून बनवलेली पुदिना चटणी

या प्रकारची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

  • एक वाटी पुदीन्याची पाने, कोथंबीर बारीक चिरलेली, एक चमचा जिरे, एक चमचा चणा डाळीचे दाळव, सहा ते सात लसणाच्या पाकळया, चार हिरव्या मिरच्या, एक चमचा बारीक कुटलेले अद्रक, चवीनुसार मीठ आणि साखर, थेाडासा लिंबाचा रस आणि थोडेसे पाणी.
  • ही चटणी आपण सॅंडविचवर लावण्यासाठी तयार करत आहोत.

ही पुदिना चटणी पुढीलप्रमाणे बनवावी:-

  • सर्वप्रथम हे सर्व घेतलेले पदार्थ स्वच्छ करून घ्यावेत.
  • त्यांनतर मिक्सरच्या भांडयात कोथंबीर, लसुण, आल, पुदीना, जिरे, चणा डाळीचे दाळवं टाकुन हे सर्व वाटण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.
  • आणि हे वाटण बारीक वाटल्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि साखर टाकुन थोडेसे पाणी टाकुन पुन्हा बारीक करून घ्यावे. अशा रीतीने आपली सँडविच सोबत खायची ही पुदिना चटणी तयार झालेली आहे. सॅंडविच बनवताना ही चटणी ब्रेडला लावून सॅंडविच बनवावे. ही पुदिना चटणी लावल्यामुळे सँडविच खुप चविष्ट लागते.
पुदिन्याची चटणी / पुदिना चटणी रेसिपी मराठी - विविध प्रकारची पुदिना चटणी कशी करायची (pudina chatani recipe in marathi)
Green pudina

टोमॅटो आणि हिंग घालून चटणी कशी करायची

या प्रकारची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

  • जवळपास वीस ते पंचवीस पुदीन्याची पाने घ्यावी , लाल चार टोमॅटो, एक चमचा जिरे, मोहरी, चार ते पाच लसुण पाकळया, चार लाल मिरच्या, एक चमचा खोब-याचा किस, एक चमचा हिंग, फोडणीसाठी तेल आणि चवीपुरते मीठ इत्यादी साहित्य योग्य प्रमाणात घ्यावे.

चटणी बनवण्याची रेसिपी:-

  • सर्वात पहिले टोमॅटो गॅसवर आख्ये भाजुन घ्यावेत, भाजल्यावर थंड होवु दयावे आणि मग त्याची साल काढुन टाकावीत.
  • नंतर मिक्सरचे भांडे घ्या, त्यात साल काढलेले टोमॅटो, जीरे, पुदीना, लसुण, खोबरे, घालुन बारीक करुन घ्यावे.
  • त्यांनतर गॅसवर कढई ठेवुन त्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे टाकुन तडतडु दयावे आणि मग त्यामध्ये लाल वाळलेल्या मिरच्या टाकाव्यात. आता ही तयार झालेली फोडणी त्या वाटणावर टाकावी.
  • ही पुदिना चटणी चपाती किंवा पराठयाबरोबर खायला दयावी. ही चटणी पराठ्या सोबत खायला खुप टेस्टी लागते.

वरील सर्व प्रकारे पुदिना आणि विविध प्रकारच्या चटणी तुम्ही बनवू शकता, पुदिनाची चटणी चॅट पदार्थात अगदी अप्रतिम चव देते, सॅंडविच आणि भेळ यात देखील पुदिना चटणी लावावी.

सारांश

अशा प्रकारे वरील लेखामध्ये आपण एकूण पाच प्रकारच्या पुदिना चटणी बनवण्यासाठी कोणते व किती साहित्य घ्यायचे आणि या चटणी कशा बनवायच्या हे आपण बघितले आहे, त्या तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या घरी करून बघू शकता. यातील कैरी घालून बनवलेली चटणी चवीला सर्वोत्तम लागत असून आरोग्यास देखील चांगली असते. ती तुम्ही एकदा अवश्य बनवून बघावी.

आपल्याला ही पुदिन्याची चटणी प्रकार रेसिपी विषयी माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top