पाठदुखी उपाय / पाठदुखी कारणे व उपाय / पाठदुखी घरगुती उपाय (pathdukhi karane ani upay in marathi) / Causes and remedies for back pain in marathi >> अनेकांना ऑफिस मध्ये बसून काम असते, त्यामुळे पाठ आखडते आणि मग ती दुखण्यास सुरवात होते. असे काही नाही की पाठदुखीचा त्रास असा हा ठराविक वयातच होतो, जास्त काळ बसण्याचे काम असेल तरी पाठ दुखतेच. कारण पाठदुखीचा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला उद्भवु शकतो. बहुधा अनेक महिलांमध्ये पाठदुखी चा त्रास दिसून येतो, कारण महिलांची घरातील अनेक कामे ही शारीरिक हालचालीं वर अवलंबून असतात. तसेच काही पुरुष ज्यांना ऑफिस मध्ये एका जागेवर बसून काम असते अशा पुरुषांमध्ये देखील पाठदुखी सारखे आजार दिसून येतात.
या लेखामध्ये आपण याच पाठदुखी ची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरवात करुयात पाठदुखी करणे आणि घरगुती उपाय.
पाठदुखी कारणे व उपाय (pathdukhi karane ani upay in marathi) / Causes and remedies for back pain in marathi
सुरवातीला आपण पाठ कशामुळे दुखते पाठदुखी ची कारणे जाणून घेऊयात, त्यानंतर पाठदुखी वर उपाय/ पाठदुखी घरगुती उपाय जाणून घेऊयात.

पाठदुखी कारणे (pathdukhi chi karane in marathi) Causes of back pain in marathi
पाठदुखी ची कारणे पुढीलप्रमाणे :-
- काही काही वेळेस जड वस्तु उचलल्याने पाठीमध्ये चमक भरते आणि मग पाठ दुखायला सुरूवात होते.
- सारखे सारखे वाकून काम केल्याने किंवा सारखे वाकल्याने सुध्दा पाठीमधले स्नायु ताणले जातात आणि त्यामुळे मग पाठीचा त्रास होवुन पाठीचे दुखणे तोंडवर काढण्यास सुरूवात होते.
- पाठीमध्ये दुखणे कधीकधी अपघात झाल्यामुळे सुध्दा होते. पाठीमध्ये एखादयावेळेस अपघातामध्ये जखम होते आणि मग पाठ दुखते.
- आपण विविध मैदानी खेळ खेळत असतो, जसे की क्रिकेट आणि कधी कधी असे खेळ खेळतांना देखील पाठीमध्ये चमक भरू शकते, किंवा पाठीचा कणा सरकला जावु शकतो, यामुळे देखील पाठीमध्ये दुखत राहते.
- कधीकधी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळया प्रकारच्या वैदयकीय परिस्थितीमुळे पाठ दुखण्याचा त्रास होतो. जसे की मुतखडा या आजारामध्ये बहुतेक जणांना पोटाच्या बरोबर मागील बाजूला दुखते.
- तर कधी आपल्या झोपेची स्थिती अवघड झाली तरी सुध्दा पाठीवर ताण पडून पाठ दुखते.
- त्याचबरोबर प्रेगनेन्सी मध्ये सुध्दा पाठ दुखते, गरोदरपणामध्ये आपल्या शरीरात विविध बदल होतात. मग अशा वेळेस पाठ सुध्दा दुखते या काळात जास्त वेळ बसण्यात आले किंवा जास्त चालले तरी पाठीला ताण पडतो आणि मग पाठ दुखते. पण गरोदरपणामध्ये पाठ दुखत असेल तर पाठ चेपायला जमत नाही. म्हणून यासाठी डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

- महिलांमध्ये मासिक पाळी च्या काळात देखील पाठदुखी जाणवते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिलांनी आराम करणे गरजेचे असते.
वरील कारणांमुळे पाठदुखी सारखे आजार होऊ शकतात आता जर तुम्ही पाठदुखी मुळे त्रस्त असाल तर पाठदुखी साठी घरगुती उपाय कोणते करता येतील ते आपण जाणून घेऊयात.
पाठदुखी उपाय | १५ सर्वोत्तम पाठदुखी वरील उपाय (pathdukhi upay/ pathdukhi gharguti upay in marathi) Remedies for back pain in marathi
पाठदुखी उपाय / पाठदुखी साठी घरगुती उपाय पुढील प्रमाणे :-
टॉवेल गरम करून पाठ शेकणे
जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला पाठदुखी चा त्रास होत असेन, तर मग अशा वेळेस तुम्हाला पाठीला मालिश करायला जमत नाही. अशावेळेस तुम्ही एक गोष्ट करु शकता, गरम पाण्यात मीठ घालायचे आणि त्यात टॉवेल भिजवायचा नंतर तो टॉवेल पिळुन घ्यायचा आणि मग टॉवेलच्या वाफेने हळुहळू पाठीला शेक दयायचा शक्यतो शेक घेतांना डायरेक्ट पाठीच्या त्वचेवर घ्यायचा नाही, कॉटनचा कपडा किंवा टॉवेल नेच हा शेक घ्यावा.
गरम पाणी आणि मीठ
पाठदुखीच्या समस्येमध्ये स्नायुंची भुमिका खुप महत्त्वाची असते. त्यामुळे पाठीचे स्नायु मोकळे करण्यासाठी गरम पाण्यात मिठ टाकून त्या पाण्याने आंघोळ जर केली तर पाठ दुखण्याच्या समस्येपासुन आराम मिळतो. साधारणपणे दिवसभर शारीरिक कष्टाचे काम केल्याने पाठ दुखत असल्यास हा उपाय केल्याने त्वरित तुम्हाला आराम मिळेल.
नारळाचे आणि मोहरीच्या तेलाने मसाज करा
पाठ दुखण्याचा त्रास असेल तर दररोज रात्री झोपताना तेलाने मसाज केल्यास पाठीला आराम मिळेल. नारळाच्या तेलामध्ये किंवा मोहरीच्या तेलामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळया टाकुन तेल चांगले गरम करून घ्या, नंतर ते तेल थंड झाल्यावर त्या तेलाने पाठीची हलक्या हाताने मालिश करावी. अत्यंत गुणकारी असा हा पाठदुखी साठी घरगुती उपाय आहे.

आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश
पाठीतील हाडे दुखत असतील तरी देखील पाठ दुखण्याचा त्रास उदभवतो. हाडांमध्ये आलेला ठिसुळपणा हे देखील पाठदुखीचे प्रमुख कारण असू शकते. आपल्या आहारात मासे, तुप, दुध, उडीदाची दाळ, अशा प्रोटीन युक्त पदार्थाच्या सेवनाने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि हाडे देखील मजबुत होतात. आणि अशा आहारामुळे पाठ दुखण्याचा त्रासापासुन देखील सुटका मिळण्यास मदत होते.
नियमित व्यायाम
आपल्या निरोगी जीवनासाठी आपले शरीर सुदृढ राहणे गरजेचे आहे, आणि आपल्याला होत असलेला पाठदुखीचा त्रास कमी करण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे. नियमित पणे रोज व्यायाम केल्याने पाठदुखीचा त्रासासोबतच इतर देखील दुखणे कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर नियमित चालल्याने सुध्दा पाठ दुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

जवसाचे तेल
जवसाच्या तेलाने पाठीवर मालिश केल्याने सुध्दा पाठदुखीचा त्रास कमी होतो. जवसामध्ये अॅन्टीऑक्सीडेंटस गुणधर्म मोठया प्रमाणात असल्या कारणाने या तेलाने मालिश केल्यास पाठ दुखणे थांबु शकते. जवसामध्ये प्रोटीनची मात्रा देखील जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबुत होण्यास मदत होते आणि पाठ दुखी थांबते.
वजन कमी करणे
शरीरातील वाढलेली चरबी म्हणजेच पुढे आलेले पोट, हे पाठीवर ताण देते. त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी करावी. अर्थातच पाठ दुखीचा त्रासकमी करायचा असेल तर वजन कमी करावे.आणि वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायामाची सवय तुमच्या शरीराला असणे गरजेचे आहे.
योगासन
पाठीचे दुखणे कमी करण्यासाठी त्रिकोणासन, भुजंगासन यांसारखी योगासने नियमित करावीत, यामुळे ओटीपोटाचे स्नायु, दंडाचे स्नायु, पायांचे स्नायु, यांची कार्यक्षमता सुरळीत चालते आणि मग पाठीचा कणा लवचिक बनतो आणि यासगळ्याचा परिणाम पाठदुखीचा त्रास नाहीसा होतो.
ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या
ड्रायव्हिंग मुळे अनेक पुरूषांना पाठदुखी चा त्रास होतो, त्यामुळे शक्यतो प्रवासाच्या आधी भरपुर विश्रांती घ्यावी म्हणजेच आराम करावा. आणि ड्रायव्हिंग करताना पाठीला योग्य आधार मिळेल अशी उशी पाठीमागे ठेवावी याने पाठदुखी चा त्रास होणार नाही.
उभे राहतानाचे पोस्चर
उभे राहताना देखील व्यवस्थित उभे रहावे, आपले वजन देान्ही बाजुंनी समतोल राहील अशा स्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करावा. नेहमी उभे राहताना तुमच्या दोन्ही पायांमध्ये ठराविक अंतर ठेऊन उभे रहा, असे केल्याने तुमचे पोस्चर व्यवस्थित बॅलेन्स राहते आणि याने देखील पाठ दुखण्याचा त्रास होणार नाही.
जमिनीवर झोपावे
जर तुमची पाठ नेहमीच दुखत असेल, तर तुम्ही झोपत असलेली मॅट्रेस ही तुमच्या पाठीला त्रास होणार नाही अशी करावी गादी, कॉट, बेड, मॅट्रेस पेक्षा खाली जमीनीवर सतरंजी किंवा घोगंडी आंथरूण झोपल्यास पाठ दुखणार नाही.
खुर्चीवर बसतानाची पोजिशन
तुमच्या बसण्याच्या व चालण्याच्या सवईंमुळे देखील पाठदुखी चा आजार जादू शकतो. त्यामुळे चालताना सुध्दा वाकुन न चालता सरळ चालावे आणि बसताना सुध्दा कुबड काढुन बसु नये सरळ ताट बसावे. खुर्चीवर बसताना पाठीला आधार मिळेल अशा खुर्चीवर बसा, तसेच एक गोष्ट नेहमी लक्षात असुध्या की तुमची पाठ ही खुर्चीवर बसल्यावर ताठ राहिली पाहिजे ज्यामुळे तुम्हाला पाठ अवघडणे किंवा चमकणे यांसारख्या गोष्टी होणार नाहीत. आणि अशा सवयींमुळे देखील तुम्हाला भविष्यात पाठ दुखण्याचा त्रास उद्भवणार नाही.

उंच टाचांच्या चपला किंवा बूट वापरणे टाळा
उंच टाचांच्या म्हणजेच हिल्सच्या चपला, बुट वापरणे हे टाळावे, कारण सरळ याचा पाठीवर आणि मनक्यावर परिणाम होतो. मग पाठ दुखणे किंवा मणक्याचे आजार चालु होतात. म्हणून उंच टाचांच्या चपला बुट जास्त करून घालु नये.

एकाच ठिकाणी व एकाच पोजिशन मध्ये बसने टाळा
एकाच ठिकाणी बराच वेळ बसणे शक्यतो टाळावे आणि सतत बसण्याचे काम असेल तर मध्ये मध्ये उठुन चालावे. असे केल्याने स्नायुंची हालचाल होते आणि मग पाठदुखी वगैरे सारखे आजार माघे लागत नाहीत आणि जर तुम्हाला आधीच पाठदुखीचा त्रास असेल तर असे केल्याने नक्कीच आराम मिळतो.

अंगठ्याने पाठीची मालीश करणे
तुम्हाला जर सतत पाठदुखीचा त्रास जाणवत असेल, आणि तुम्ही नियमित पणे तेल लाऊन पाठीची मालिश करत असाल. तर मालीश करताना एकाच पध्दतीने करावी, म्हणजे खालच्या कंबरेच्या बाजूने वरती मानेकडे अंगठाच्या मदतीने चोळावे याने नक्कीच तुमची पाठ दुखणे थांबेल.

सारांश – पाठदुखी कारणे व उपाय
लेखाच्या सुरवातीला आपण पाठदुखी कारणे बघितली आणि उत्तराधर्तात पाठदुखी उपाय वाचले असतील. वरील कारणे वाचून तुमच्या लक्षात आले असेल की पाठ कशामुळे दुखते, तर मग मित्रांनो ही पाठदुखी तुम्हाला होऊ नये असे वाटत असेन तर त्या गोष्टींची काळजी घ्या आणि तरी देखील तुम्हाला पाठदुखी चा त्रास असेन तर वरील पाठदुखी उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता. हे घरगुती उपाय करून देखील पाठ दुखी थांबत नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही पुढील उपचार घेणे जरुरीचे आहे.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले पाठदुखी उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (32) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (9) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (9) पोट (15) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)