पोट बिघडणे घरगुती उपाय | १६ सर्वोत्तम घरगुती उपाय

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset) >> आजकाल लोकांना घरी स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो. म्हणून बरेसचे लोक काय करतात की रोज म्हटले तरी चालेल बाहेरचे पदार्थ आणुन खातात. तसेच शिकायला घरापासून दूर आलेले मुले – मुली रोज म्हंटले तरी बाहेरचेच पदार्थ खातात. याने पोट बिघडणे यांसारखे आजार मागे लागतात. बाहेरच्या मसालेदार, तेलकट, जंकफुड, फास्टफुड मुळे पोट दुखते / पोट बिघडते.

तसेच ते बाहेर बनवलेले अन्न ताजे असते का नाही हे आपल्याला माहिती नसते, तसेच ते लोक अन्नामध्ये किती दिवसांचे तळलेले तेल वापरतात यांसारख्या गोष्टींमुळे देखील पोट बिघडु शकते. नेहमी नेहमी आपल्याला दवाखान्यात जाणे शक्य नसते, त्यामुळे आपण पोट दुखीवर काही घरगुती उपाय करू शकतो. पोट बिघडल्यावर पचनक्रियेवर त्याचा मोठा परिणाम होतो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळयात पोटाचे आजार जास्त तोंड वर काढतात. त्यामुळे उन्हाळयात खाण्यापिण्याच्या सवयींकडे जरा जास्त लक्ष दयावे लागते. उन्हाळयात पचण्यास हलके आणि कमी तिखट असलेले पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडत नाही.

अनेकांना पोट बिघडल्यामुळे जुलाब सुध्दा लागतात आणि अशक्तपणा येऊन व्यक्ती गळुन जाते. पोट बिघडु नये यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो आणि हे उपाय घरगुती असल्यामुळे याचे कुठलेही दुष्परीणाम देखील होत नाहीत.

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)

पोट बिघडणे वर घरगुती उपाय म्हणून आपण कोणत्या वनस्पति किंवा फळे वापरू शकतो ते सुरवातीला बघूयात त्यानंतर पोट बिघडल्यावर इतर घरगुती कोणते उपाय आपण करू शकतो ते जाणून घेऊयात.

पोट बिघडणे घरगुती उपाय म्हणून उपयोगी फळे व वनस्पती

पोट बिघडल्यास विविध फळे आणि वनस्पती यांचा उपयोग म्हणून खालील वापर करू शकता;

आले, लिंबु व काळी मिरी

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
आले लिंबू व काळीमिरी – पोट बिघडणे घरगुती उपाय

पोट बिघडल्यावर आल्याचा रस, लिंबाचा रस आणि काळी मिरी पावडर थोड्या पाण्यात एकत्रित करून घ्यावी हे मिश्रण दिवसातून एकदा प्यावे.हा घरगुती उपाय केल्याने बिघडलेले पोट हे लवकर जाग्यावर येईल. तसेच तुम्ही आले चहात टाकुन पिल्यास देखील पोट बिघडले असल्यास त्या पासून होणार्‍या त्रासापासून तुम्हाला त्वरित आराम मिळतो.

मेथीचे दाणे

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
मेथीचे दाणे – पोट बिघडणे घरगुती उपाय

साधारण पणे दोन चमचे मेथीचे दाणे एक ग्लास भर पाण्यात तीस मिनिटे भिजायला ठेवावीत. त्यांनतर भिजलेले मेथीचे दाणे बारीक कुटून घ्यावेत आणि आता ते पाण्यात टाकुन पिऊन टाकावे. असे केल्याने पोट बिघडले असल्यास त्याचा बराच त्रास कमी होतो आणि लवकर आराम मिळतो. मेथी दाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे.

डाळिंबाचा रस

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
डाळिंबाचा रस – पोट बिघडणे घरगुती उपाय

पोट बिघडल्याचा त्रास जाणवत असल्यास दिवसातुन साधारण दोन ते तीन वेळा डाळिंबाच्या दाण्यांचा रस करून प्यावा. डाळिंबाचा रस पिल्यास २ दिवसात तुम्हाला बर्‍या पैकी आराम मिळतो.डाळिंब हे पोट बिघडले असल्यास उत्तम घरगुती उपाय आहे.

पपई

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
पपई – पोट बिघडणे घरगुती उपाय

पपई हे फळ डोळ्यांसोबत पोटासाठी अधिक फायदेशीर आहे. पपई खाल्ल्याने देखील पेाटाला आराम मिळतो. पपई मध्ये असे काही गुणधर्म असतात जे की पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि पपई मुळे तुमच्या पोटाचा त्रास कमी होतो.त्यामुळे तुम्हाला जर सतत पोट बोघडणे त्रास होत असेन तर तुम्ही तुमच्या आहारात पपई चा समावेश करावा.

आंब्याची कोय व चिंचुका

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
आंबा कोय व चिंचुका

आंबा हे जवळ जवळ प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचे फळ आहे, परंतु आंब्याची कोय देखील आपल्या फायद्याची असते. आंब्याची कोय आणि चिंचुका तुम्ही थोडे पाणी टाकून सहानेवर उगाळुन घ्या आणि ते चाटण खाल्ल्यास देखील पोटाला आराम मिळतो. सततच्या पोट बिघडण्याच्या या त्रासा पासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हा घरगुती उपाय करून बघा तुम्हाला निश्चित आराम मिळेन.

मायफळ

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
मायफळ – पोट बिघडणे घरगुती उपाय

लहान बाळांचे पोट बिघडले असेन आणि दुखत असेल तर बाजारात मायफळ मिळते हे मायफळ नावाचे फळ कडु असते, त्यामुळे ते कमी प्रमाणात घ्यायचे. म्हणजे म्हशीचे कच्चे दुध घ्यायचे आणि म्हशीच्या कच्च्या दुधात थेाडेसे मायफळ सहानेवर उगळायचे आणि ते उगळलेले चाटण बाळाला चाटवायचे, याने बाळाला जर जुलाब लागले असेल तर पटकन आराम मिळतो.

पोट बिघडणे वर इतर घरगुती उपाय

साबुदाणा

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
साबुदाणा

पोट जर बिघडले असेल आणि जुलाब होत असतील तर एका भांडयात एक ग्लास पाणी उकळायला ठेवायचे, त्यात दोन चमचे साबुदाणा टाका व उकळुन घ्या. तसेच एका भांडयात थोडेसे तेल आणि पाणी टाकायचे आणि नंतर साबुदाणा टाकायचा आणि तो साबुदाणा चांगला शिजवुन घ्यायचा त्यानंतर चवीपुरते मीठ टाकुन तो साबुदाणा खा याने देखील पोट बिघडणे चा त्रास कमी होतो.

जिरे

पोट जर बिघडले असेल तर जिरे खाल्ल्याने देखील त्रास कमी होतो. जि-यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. जे की पचनक्रीया सुधारण्यास मदत करते. जिरे आणि साखर कच्चे चावून खाल्ल्यास देखील त्रास कमी होतो तसेच दहयासोबत जिरे खाल्ले तरी त्रास कमी होऊन आराम मिळतो.

बडीशेप

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
बडीशेप – पोट बिघडणे घरगुती उपाय म्हणून गुणकारी

बडीशेप देखील पोट बिघडल्यानंतर फार उपयोगी ठरते. जेवण झाल्यानंतर बडीशेप खाल्ल्यास पचनक्रिया व्यवस्थित चालते तसेच गॅस देखील होत नाही.

साखर व लिंबू पाणी

एक ग्लास पाण्यामध्ये एक लिंबू पिळा त्यात साखर आणि थोडे मिठ देखील एकत्रित करून घ्या. हे मिश्रण पिल्यास देखील पोट बिघडल्यावर आराम मिळतो. पोट बिघडले असल्यास हा घरगुती उपाय तुम्ही अगदी सहजतेने करू शकता आणि हा उपाय केल्याने पोटाला त्वरित आराम मिळतो.

बेकिंग सोडा

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
बेकिंग सोडा – पोट बिघडणे घरगुती उपाय

पोट बिघडल्यावर पोटात गॅसेस होतात आणि बेकिंग सोडा हा गॅसेस दूर करण्यासाठी उत्तम उपाय आहे. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा बेकींग सोडा एकत्रित करून पिल्याने देखील पोट बिघडणे त्रास कमी होतो आणि पोटाला आराम मिळतो.

सुंठ, जिरे व काळीमिरी

सुंठ, जिरे आणि काळीमिरी सम प्रमाणात घेउन त्याचे चुर्ण बनवून ठेवावे आणि जेव्हा पोट बिघडेल तेव्हा हे चुर्ण पाण्यात टाकून पिवुन घ्यावे असे केल्याने तुम्हाला पोट बिघडणे पासून त्वरित आराम मिळेल.

हळद आणि मीठ

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
हळद आणि मीठ – पोट बिघडणे घरगुती उपाय

हळद ही आपल्याला शारीरिक व्याधींवर उत्तम उपाय ठरते. जर पोट बिघडले असेल तर एक चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ थंड पाण्यात टाकुन पिल्याने देखील पोट बिघडणे वर आराम मिळतो.

सैंधव मीठ

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
सैंधव मीठ

अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घ्या आणि ती रस कोमट पाण्यात टाका. त्यामध्ये सैंधव मीठ देखील टाका. आता हे तयार मिश्रण सकाळी व संध्याकाळी प्या. याने पोट बिघडले असल्यास आराम मिळतो.

कोरा चहा

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
कोरा चहा आणि लिंबू – पोट बिघडणे घरगुती उपाय

एका पातेल्यामध्ये एक कप पाणी टाकावे त्यामध्ये एक छोटा चमचा चहा पावडर टाकावी व एखादा चमचा साखर टाकावी आणि हे मिश्रण चांगले उकळून घ्या. आता हे तयार मिश्रण गाळुन कपामध्ये काढुन घ्या आणि त्यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाका याने बराच आराम मिळतो. यालाच आपण कोरा चहा म्हणु शकतो. पोट बिघडल्यावर हा घरगुती उपाय केल्याने त्वरित फरक जाणवतो. हा कोरा चहा पिल्यानंतर किमान 1 तास तरी काही खाऊ नये म्हणजे पोटाला आराम मिळतो.

खायचा चुना आणि गूळ

पोट बिघडणे घरगुती उपाय (pot bighadane gharguti upay in marathi / home remedies for stomach upset)
खायचा चुना आणि गूळ

खायचा चुना हा पोट बिघडणे वर गुणकारी ठरतो. थोडा खायचा चुना घ्या, त्यामध्ये गुळाचा खडा मिसळा आणि त्याच्या बारीक बारीक गोळया तयार कराव्यात आणि पोट बिघडल्यावर ही एक गोळी पाण्यासोबत घ्यावी. याने देखील पोट बिघडणे चा त्रास कमी होतो.

सारांश – पोट बिघडणे घरगुती उपाय

तुमचे जर पोट बिघडले असेन तर तुम्ही वरील पैकी कोणताही उपाय तुमच्या सोयी नुसार करू शकता. हे उपाय कसे करायचे ते विस्तृत स्वरुपात सांगण्याचा प्रयत्न आम्ही या लेखामध्ये केलेला आहेच. तुम्ही अगदी कमी खर्चात हे पोट बिघडणे घरगुती उपाय करू शकता. वरील उपाय करून देखील जर पोट दुखी पासून तुम्हाला आराम मिळत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरीचे ठरेल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले पोट बिघडणे घरगुती उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top