तोंड आल्यावर घरगुती उपाय / २० सर्वोत्तम उपाय (tond yene upay)

तोंड आल्यावर घरगुती उपाय / तोंड आल्यावर काय करावे (tond yene / tond alyavar gharguti upay) >> आपल्यातील बर्‍याच जणांना तोंड येते,तोंड येणे म्हणजे जिभेला फोड येणे. काहींना जिभेच्या वर फोड येतात तर काहींना जिभेच्या खालच्या बाजूला,आणि काहींना तोंडाच्या आत मध्ये इतर ठिकाणी देखील फोड येतात. सतत तोंड येणे ही बरीच जणांची समस्या आहे. तोंड येत कशाने हे समजुन घेणं गरजेचं आहे. विशेषतः गर्मीच्या दिवसांत ही समस्या प्रामुख्याने जाणवते. पचनक्रियेत बिघाड होणे, याशिवाय जास्त मसालेदार, तळलेले पदार्थ खाणे यामुळे देखील तोंड येण्याची ही समस्या उद्भवू शकते.

तोंड येणे ही खूपच सामान्य समस्या असली तरीही त्याने भंयकर असा त्रास होतो व जेवणच काय तर साधे पाणी पिणही कठीण होउन बसते. बोलतानाही भंयकर त्रास सहन करावा लागतो त्यामुळे तोंडातील हे फोड काढून टाकणे गरजेचे आहे. यासाठी या लेखामध्ये आपण तोंड येणे वर घरगुती उपाय कोणते कोणते आहेत ते बघणार आहोत, आणि याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल.

चला तर मग जाणून घेऊयात तोंड आल्यावर घरगुती उपाय कोणते आहेत tond yene in marathi या लेखात.

तोंड आल्यावर घरगुती उपाय / तोंड आल्यावर काय करावे (tond yene upay /tond alyavar gharguti upay)

तोंड आल्यावर घरगुती उपाय कोणते करता येतात ते या लेखामध्ये आपण बघणार आहोत. लेखाच्या सुरवातीला तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणून कोणत्या वनस्पती वापरता येतात ते आपण बघणार आहोत. नंतर मसाल्याचे पदार्थ ज्यांचा उपयोग तुम्ही आलेले तोंड घालवण्यासाठी करू शकता. आणि लेखाच्या उत्तरार्धात आपण तोंड आल्यावर करता येणारे इतर घरगुती उपाय बघणार आहोत.

तोंड आल्यावर घरगुती उपाय करण्यासाठी उपयोगी वनस्पती (tond alyavar gharguti upay karnyasathi upyogi vanaspati)

कोरफड

तोंड आल्यावर घरगुती उपाय / तोंड आल्यावर काय करावे (tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay)
कोरफड – तोंड आल्यावर घरगुती उपाय (tond alyavar gharguti upay)

कोरफड ही अत्यंत गुणकारी आणि शीतल म्हणजेच थंड गुण असणारी औषधी वनस्पति आहे. कोरफड ही जवळपास सगळयाच जखमांवर काम करते. त्याचप्रमाणे तोंड आल्यावरही कोरफडीचा पुरेपुर उपयोग होतो. कोरफडीचा गर काढुन तोंडावरील फोडांवर लावल्याने आराम मिळतो.सलग तीन दिवस हा उपाय केल्याने आलेले तोंड लवकर कमी होते.

कोथंबीर व धने

कोथंबीर व धने - तोंड आल्यावर घरगुती उपाय / तोंड आल्यावर काय करावे (tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi)
कोथंबीर व धने – तोंड आल्यावर घरगुती उपाय

तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही कोथंबीर देखील वापरू शकता. तुम्ही कोथंबीर व धने तोंड आल्यावर दोन प्रकारे वापरु शकता. एक म्हणजे हिरवी ताजी कोथंबीर पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यानंतर त्याने गुळण्या कराव्यात असे केल्याने तोडांतील फोड कमी होतात व लवकर आराम मिळतो. तसेच तोंडातील छाले बरे करण्यासाठी कोथंबीर वाटून तिचा रस काढून तोंडात आलेल्या फोडांवर तो लावा तर धने पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा व त्या पाण्याच्या गुळण्या करा याने देखील तोंडाला आराम मिळेल.

तुळशीची पाने

तुळशीची पाने - तोंड आल्यावर घरगुती उपाय
तुळशीची पाने – तोंड आल्यावर घरगुती उपाय

तुळशीचे महत्व आयुर्वेदामध्ये सांगितले आहेच, तुळस ही आपल्या मानवी शरीरासाठी एक ना अनेक प्रकारे फायदेशीर आहेच. तसेच तोंड आल्यावर देखील तुम्ही तुळशीच्या पानांचा उपयोग करून होणारा त्रास कमी करू शकता. तुळशीची साधारण दोन ते तीन पाने ही चावून चावून त्याचा रस प्यावा, त्याने तोंडाला आराम मिळेल. किंवा तुळशीची चार ते पाच पाने घ्या त्याचा रस काढा त्यात तुप मिक्स करा हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावा याने देखील आराम मिळेल आणि तोंडातील उष्णता ही बर्‍यापैकी कमी होईल.

विडयाची पाने

tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi
विडयाची पाने

कोणत्याही सणावाराला आपण पुरणपोळी चे जेवण केल्यावर आवर्जून पान खातो,परंतु हेच पान तोंड आल्यावर देखील त्यावर उपाय म्हणून गुणकारी ठरते. तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणून विडयाच्या पानांचे चुर्ण तयार करून त्यात थोडा मध मिसळा. आणि हे मिश्रण चाटण म्हणून जिभेला जिथे जिथे फोड आले आहेत तिथे लावल्याने देखील जिभेचे फोड लवकर कमी होतात.दिवसातून एकदा असे सलग तीन दिवस हा उपाय केल्यास तोंड आलेले निश्चित कमी होते.

लिंबाचा रस व मध – गुणकारी घरगुती उपाय

लिंबाचा रस व मध - tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi
लिंबाचा रस व मध

लिंबू हे अपचन,जुनाट सर्दी,पोटाचे विकार यांवर गुणकारी आहेच पान त्या बरोबरच लिंबू हे तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणून देखील तुम्ही वापरू शकता. लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने तोंडात आलेले फोड कमी होऊन त्याने होणार्‍या त्रासापासून आराम मिळतो. तसेच नुसते मध पाण्यात मिसळुन गुळण्या केल्या तरी तोंडाला आराम मिळेल.

जाईच्या झाडाची पाने – तोंड आल्यावर घरगुती उपाय

जाईच्या झाडाची पाने - tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi
जाईच्या झाडाची पाने

जाई चे फूल खूप छान असते परंतू त्याचसोबत या जाईच्या झाडाची पाने देखील आपल्या फायद्याची असतात. तर मित्रांनो जाईच्या झाडाची पाने चावल्याने देखील तोंड आलेले बरे होते.त्यामुळे जर तुमच्या दारात किंवा कुंडी मध्ये जर जाईचे रोपटे असेल तर त्याचे पान हे तोंड आल्यावर त्यावर घरगुती उपाय म्हणून तुम्हाला उपयोगी येतील आणि तुमचा त्रास कमी करतील॰

पेरूच्या झाडाची पाने

पेरूच्या झाडाची पाने - तोंड आल्यावर घरगुती उपाय
पेरूच्या झाडाची पाने – तोंड आल्यावर घरगुती उपाय

पेरूच्या झाडाची पाने देखील तोंड आल्यावर एक चांगला घरगुती उपाय ठरतात. पेरूच्या झाडाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास घसा आणि जीभ स्वच्छ होते आणि तोंडातील फोड बरे होतात.

लसूण व आले – तोंड आल्यावर करावयाचा जालिम पण गुणकारी घरगुती उपाय

लसूण व आले - tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi
लसूण व आले

लसूण आणि आले हे दोन्ही तसे तर उग्र आहेत परंतु हे देखील तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणून फायदेशीर आहेत. साधारणपणे दोन ते तीन लसुण पाकळया आणि एक इंच आले घ्यावे, आणि हे दिवसातुन जास्तीत जास्त वेळा चावुन खा. किंवा चहा आणि जेवणातुनही देखील खाऊ शकता. कारण आल्याने तोंड आलेले कमी होउ शकते.

तोंड आल्यावर घरगुती उपाय करण्यासाठी उपयोगी मसाल्याचे पदार्थ (tond alyavar gharguti upay karnyasathi upyogi masalyache padarth)

इलायची – तोंड आल्यावर गुणकारी उपाय

इलायची - tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi
इलायची

इलायची देखील या तोंड येण्याच्या समस्येसाठी उपयुक्त आहे. इलायचीच्या दाण्याची बारीक पुड करून त्यात मध मिसळावा व ती पेस्ट जीभेवरील फोडांवर लावावी त्याने तोंड आल्यावर जी तोंडात जळजळ होत असते किंवा तोंडात सलत असते त्यापासून बचाव होतो.

हळद – तोंड आल्यावर फायदेशीर

हळद - तोंड आल्यावर घरगुती उपाय / तोंड आल्यावर काय करावे (tond yene / tond alyavar gharguti upay)
हळद – तोंड आल्यावर घरगुती उपाय (tond yene upay in marathi)

हळद ही अनेक रोगांवर उपयोगी असा पदार्थ आहे. तोंड आल्यावर देखील त्यावर उपाय म्हणून हळद फारच उपयुक्त ठरते. कोमट पाण्यात थोडी हळद टाकून गुळण्या केल्याने देखील आराम पडतो. तसेच हळदीमध्ये मध किंवा दुध मिसळून ते तोंडातील जखमेवर किंवा फोंडावर लावल्यास काही वेळ असेच ठेवुन थोडया वेळाने स्वच्छ पाण्याने धुवावे याने आलेले तोंड कमी होण्यास मदत होते.

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध - tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi
ज्येष्ठमध

जेष्ठमध हे देखील इतर पदार्थांसारखेच औषधी वनस्पती समजले जाते त्यासाठी हा उपाय करण्यासाठी तुपाचा थेंब टाकून त्यावर ज्येष्ठमध उगळून गंध तयार करावे, तोंडातील अंर्तभागात हे गंध सगळीकडे झोपताना लावावे असे चार ते पाच दिवस रोज रात्री चुळ न भरता करावे याने तोंड आलेल्या जागेवर सलणे बंद होते व या त्रासपासून आराम मिळतो.

सोनकाव

तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही सोनकाव देखील वापरू शकता. सोनकाव सायीमध्ये मिसळून व्रणावर लावा आणि थोडावेळ तसेच ठेवा. असे केल्याने देखील तोंड आल्यावर तोंडातील व्रणामुळे होणार्‍या वेदना कमी होतात.

जास्वंदी तेल

जास्वंदी चे तेल - tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi
जास्वंदी चे तेल

जास्वंदी देखील तोंड आल्यावर करावयाच्या घरगुती उपायांमध्ये येते. तोंड आल्यावर जास्वंदीचे तेल हे गुणकारी उपाय ठरते, तोंड आलेल्या ठिकाणी जास्वंदी तेल लावा किंवा जास्वंदी तेलाने गुळणी करावी.असे केल्याने देखील तोंडातील फोडांमुळे होणारा त्रास कमी होतो.

तूप – गंधर्वहरीतकी – बहाण्याचा मगज

तुम्हाला जर सारखेच तोंड येत असेन तर बद्धकोष्टाचा त्रास असू शकतो तर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर साधारण दोन ते तीन तासांनी चार चमचे तूप घ्यावे, ज्यामुळे जिभेला आलेले फोड ओसरून जीभ पूर्ववत मऊ होण्यास मदत होते. त्यानंतर एक कप गरम पाण्याबरोबर गंधर्वहरीतकी किंवा बहाण्याचा मगज घ्यावे.हे घेतल्याने पोट साफ होते. साधारण रोज रात्री सलग दोन ते तीन दिवस असे केल्याने तुमचे तोंड आलेले कमी होईल. हे सर्व करत असताना तिखट किंवा आंबलेले पदार्थ खाणे टाळावे.

तोंड आल्यावर करता येणारे इतर घरगुती उपाय (tond alyavar karta yenare itar gharguti upay)

नारळ पाणी

नारळ पाणी - tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi
नारळ पाणी

नारळ पाणी हे शरीरात थंडावा निर्माण करण्याचा उत्तम स्त्रोत आहे. त्याचबरोबर नारळ पाणी पिल्याने तोंड येणही कमी होते, तोंडातील फोडांवर या पाण्याचा मारा केल्यास जळण कमी होते. तर फोड नाहीसे होण्यास मदत होते.त्यामुळे तोंड आल्यावर सलग दोन ते तीन दिवस नारळ पाणी पिल्याने होणार्‍या त्रासापासून आराम मिळतो.

कोमट पाणी व मीठ

मीठ व पाणी - तोंड आल्यावर घरगुती उपाय / तोंड आल्यावर काय करावे (tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi)
मीठ व पाणी – तोंड आल्यावर घरगुती उपाय

एक ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घाला हे पाणी थेाडा वेळ तोंडात ठेवून नंतर गुळण्या करा हा उपाय दिवसातुन तीन वेळा केल्याने तोंड लवकर बरे होते आणि तोंडात आलेले फोड कमी होतात.

सुके खोबरे – तोंड आल्यावर करावयाचा सर्वात सोपा पण गुणकारी उपाय

सुके खोबरे - tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi
सुके खोबरे

खोबरे या पदार्थात स्निग्धता असते, त्यामुळे तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणून सर्वात सोपा उपाय म्हणून सुके खोबरे चांगले चावून खावे. सुक्या खोबर-याचे तुकडे चावून खाल्ल्यास तोंडात एक तेलकट द्रव पसरते व त्यामुळे तोंडात आलेले फोड व झालेल्या जखमा मऊ होतात आणि होणार्‍या त्रासापासून आराम मिळतो. हे खोबरे त्या जखमेवर मलम प्रमाणे काम करते.

भरपूर पाणी प्या – सारखे तोंड येत असेल तर हा उपाय करा

तुम्हाला सारखे तोंड येणाचा त्रास होत असेन तर, तुम्ही एक सवय स्वतःला लाऊन घ्या. ती म्हणजे भरपुर पाणी प्या, कारण भरपूर पाणी पिल्याने पोट साफ होते व शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होते. पोट जर साफ असेन तर सहसा तोंड येणे यांसारखे त्रास होत नाहीत.

तुरटी – तोंड आल्यावर घरगुती उपाय

तुरटी - tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi
तुरटी – तोंड येणे उपाय

तुरटी ही जखमा भरण्यासाठी गुणकारी असते. आणि हीच तुरटी तोंड आल्यावर देखील उत्तम घरगुती उपाय म्हणून वापरता येते. तुरटी घातलेल्या पाण्याने किंवा मिठाच्या कोमट पाण्याने चुळ भरल्यास/ गुळण्या केल्यास वेदना काही काळात कमी होतात.

बर्फाचा खडा – तोंड आल्यावर सर्वात सोपा घरगुती उपाय

बर्फाचा खडा - तोंड येणे उपाय - tond yene / tond alyavar gharguti upay / tond yene upay in marathi
बर्फाचा खडा – तोंड येणे उपाय

तोंड आल्यावर त्या फोडांवर बर्फाचा खडा फिरवल्याने देखील आराम मिळू शकतो. तोंड येण्याचे मुख्य कारण हे शरीरातील उष्णता असते. त्यामुळे बर्फ शरीरात थंडावा निर्माण करून आराम पोहाचवतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर तोंड आले तर हा उपाय केल्याने निच्छित फरक पडतो. उष्णतेमुळे तोंड आले असेल तर बर्फाचा उपाय नक्की उपयोगी येईल.

सारांश – तोंड आल्यावर घरगुती उपाय (tond alyavar gharguti upay)

तोंड आल्यावर घरगुती उपाय व ते कसे अंमलात आणायचे याची विस्तृत माहिती आपण या लेखामध्ये बघितली आहेच. वरील उपाय केल्यावर देखील जर तुमचे तोंड आलेले कमी होत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तोंड का येते ?

अपचन झाले किंवा शरीरातील उष्णता वाढली की त्याचे होणारे परिणाम म्हणजे तोंड येणे होय. तोंड येण्याची इतर ही करणे असू शकतात जसे की रात्री अपरात्री जागरण झाल्यास देखील तोंड येते. कित्येकदा पोट साफ न झाल्यास देखील तोंड येते. तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेन तरी देखील तुम्हाला सारखे तोंड येऊ शकते. त्यामुळे तोंड कशामुळे आले हे काही शाश्वत सांगता येत नाही परंतु तोंड येण्याची प्रमुख कारणे वरील प्रमाणे असू शकतात. त्यावर घरगुती उपाय केल्याने देखील आलेले तोंड कमी होऊ शकते.

आपल्याला तोंड आल्यावर घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, तसेच आपल्या सूचना देखील कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top