You are currently viewing रांजणवाडी घरगुती उपाय / रांजणवाडी येण्याची कारणे व त्यावर ८ सर्वोत्तम घरगुती उपाय

रांजणवाडी घरगुती उपाय / रांजणवाडी येण्याची कारणे व त्यावर ८ सर्वोत्तम घरगुती उपाय

रांजणवाडी घरगुती उपाय / रांजणवाडी येण्याची कारणे व त्या वर उपाय (ranjanwadi treatment at home in marathi / ranjanwadi in eyes / ranjanwadi upay) >> रांजणवाडी हा सर्वसाधारणपणे आढळून येणारा डोळयांचा आजार आहे. शक्यतो डोळयांच्या पापणीला आतल्या बाजूला, कडेला किंवा डोळ्याच्या पापणीला कुठेही एखादा आलेला फोड म्हणजेच रांजणवाडी. ही रांजणवाडी कधी दुखणारी वा न दुखणारीही असू शकते. हा आजार फार गंभीर स्वरूपाचा नसला तरीही रांजणवाडी आलेल्या काळापुरता, थेाडाफार प्रमाणात त्रासदायक मात्र असतो. 

चला तर मग जाणून घेऊयात रांजणवाडी येण्याची कारणे व रांजणवाडी वर घरगुती उपाय कोणते आहेत.

Topics

रांजणवाडी घरगुती उपाय | रांजणवाडी येण्याची कारणे (Ranjanwadi treatment at home in marathi / Ranjanwadi in eyes / Ranjanwadi Upay | Ranjanwadi yenyachi karane)

रांजणवाडी कशामुळे येते, रांजणवाडी येण्याची कारणे या लेखाच्या सुरवातीला आपण बघणार आहोत त्यानंतर रांजणवाडी वर घरगुती उपाय कोणते करता येऊ शकतात त्या बद्दल माहिती बघणार आहोत. जे उपाय करून तुम्ही लवकरात लवकर रांजणवाडी च्या त्रासा पासून मुक्ती मिळवू शकता.

रांजणवाडी वर घरगुती उपाय/रांजणवाडी येण्याची कारणे व त्या वर उपाय (ranjanwadi treatment at home in marathi / ranjanwadi in eyes)
रांजणवाडी वर घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे / रांजणवाडी कशामुळे येते (Reasons for coming ranjanwadi in eyes | Ranjanwadi yeanyachi karane)

रांजणवाडी येण्याची काही ठळक कारणे खालील प्रमाणे :-

उष्णता

शरीरातील उष्णता प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यामुळे देखील डोळ्याला रांजणवाडी येते.

डोळ्याची निगा न राखणे

आपण आपल्या हाताची किंवा डोळयांची योग्य निगा नाही राखल्यास रांजणवाडी येते किंवा कुणाला नंबरचा चष्मा असेल व तो नंबरचा चष्म्याचा नंबर बदलेला नसेल तरीही रांजणवाडी येते.

चष्माचा अनियमित वापर

रोजच्या रोज चष्मा नाही वापरल्यास देखील रांजणवाडी डोके वर काढते.

सतत डोळे चोळणे

सतत डोळे चोळल्यामुळे पण रांजणवाडी येऊ शकते.

पोट साफ न होणे

पोट साफ न होणे किंवा अपचन यामुळे देखील रांजणवाडी येते.

झोप पुर्ण न होणे

पूर्ण झोप न घेणे हे देखील रांजणवाडी येण्याचे कारण असू शकते.

जागरण

रात्रीचे अति जागरण केल्यास देखील रांजणवाडी येऊ शकते.

रांजणवाडी घरगुती उपाय / रांजणवाडी वर उपाय (Ranjanwadi Upay / Ranjanwadi treatment at home in marathi)

रांजणवाडी या आजाराचे दोन प्रकार असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे डोळयातील ज्या ग्रंथी असतात त्यांना सुज आल्यामुळे त्यातुन निघणारा तेलकट द्रवाचा स्त्रोत बंद होतो आणि त्यामुळे डोळयांच्या पापणीला फोड येतो. हा फोड असा असतो की तो सहसा वेदना देत नाही त्यामुळे काय होते ना जास्त त्रास होत नाही. आणि हयाच रांजणवाडीचा दुस-या प्रकार ज्यामुळे डोळयांतुन सतत पाणी वाहत राहते, डोळा लाल होतो हा रांजणवाडीचा त्रास काही प्राथमिक घरगुती उपचारांनी बरा होतो, चला तर मग जाणून घेऊयात रांजणवाडी वर आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो.

माठ किंवा रांजण च्या थंड मातीचा भुगा – रांजणवाडी पारंपरिक घरगुती उपाय

रांजणवाडी वर घरगुती उपाय/रांजणवाडी येण्याची कारणे व त्या वर उपाय (ranjanwadi treatment at home in marathi / ranjanwadi in eyes)
माठ किंवा रांजणाची थोडी माती – रांजणवाडी घरगुती उपाय

उन्हाळयात प्रत्यक जणांच्या घरी गार, थंड पाणी करण्यासाठी खापराचा माठ किंवा रांजण असतो. तर रांजणवाडी आली असेल तर त्याच रांजणाची थोडी माती म्हणजे खापराचा जो माठ किंवा रांजण असतो त्याचा थोडा मातीचा भुगा काढुन तो रांजणवाडी जिथे आली आहे तिथे लावावा याने काय होते की रांजणवाडी जर दुखत असेल तर थंड पडुन डोळयाला आराम मिळतो.

पेरुची पाने – रांजणवाडी वर घरगुती उपाय

रांजणवाडी वर घरगुती उपाय/रांजणवाडी येण्याची कारणे व त्या वर उपाय (ranjanwadi treatment at home in marathi / ranjanwadi in eyes)
पेरूचे पान – रांजणवाडी घरगुती उपाय

आजकाल प्रत्येक जण आपल्या घरगुती बगीचामध्ये कशाची ना कशाची झाडे लावत असतो. त्याचमधील पेरूचे झाड जर लावले असेल किंवा कुठेही पेरूच्या झाडांची पाने भेटतात. त्यातुन एक पेरूचे पान घ्यावे व त्याचा चांगला बारीक भुगा करून घ्यावा व तो रांजणवाडी आलेल्या जागेवर लावावा. पेरूच्या पानांमुळे रांजणवाडी बरी होण्यास बरीचशी मदत होते. पेरूच्या पानांमुळे डोळयांना आराम मिळतो. पेरूचे पाने कुटून दिवसातुन एकदा तरी लावले ना तरी होणा-या त्रासांपासून मुक्तता भेटू शकते. यामुळेच पेरूची पाने ही रांजणवाडीवर अंत्यत गुणकारी असा उपाय आहे.

बटाटा- रांजणवाडी गुणकारी घरगुती उपाय

बटाटा – रांजणवाडी घरगुती उपाय

बटाटा हा पदार्थ अनेक ठिकाणी वापरला जातो. बटाटयाचे खाण्यासाठी अनेक पदार्थ बनवले जातात. बटाटयामध्ये अनेक गुणधर्म असतात. बटाटयामध्ये असलेला स्टार्ज हा स्कीनसाठी जसा उपयोगी असतो. अगदी त्याचप्रमाणे बटाटयाचा रस काढून रांजणवाडी वर लावल्यास तो आलेला फोड सुकण्यास मदत मिळते. अशाप्रकारे हा बटाटा रांजणवाडीवर उपयोगी असा पदार्थ आहे. त्याचप्रमाणे बटाटयामुळे डोळयांची आग म्हणजेच डोळयांचे ठुसठुसणे कमी होते तसेच बटाटयामुळे रांजणवाडीमुळे डोळयांवर जे डाग पडतात ते सुध्दा कमी होतात.

लहान मुलांचे शाम्पु

रांजणवाडी हा प्रकार घाणेरडे राहणे व अस्वच्छता या कारणामुळे होतो. जर रांजणवाडी आल्यावर तुम्हाला डोळयांची निगा किंवा स्वच्छता बाळगायची असेल तर तुम्ही लहान बाळांसाठी जो शॅम्पु वापरतात जसे की,  हिमालया, जॉनसन बेबी अशाप्रकारच्या शॅम्पुचा फार चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो चेहरा किंवा केस धुतांना बाळांच्या शॅम्पुचा उपयोग केल्यास डोळयात कोणतेही हानिकारक केमिकल्स जात नाहीत आणि लहान बाळांच्या शॅम्पुचा वापर केल्यामुळे डेाळे स्वच्छ होण्यासही मदत होते. याचमुळे लहान मुलांचा शॅम्पु हा रांजणवाडीवर एक खुप आरामदायक उपाय आहे.

कोरफड – रांजणवाडी वर फायदेशीर

कोरफड – रांजणवाडी घरगुती उपाय

आजकाल प्रत्येकाच्या घरात कुंडीमध्ये कोरफड लावलेली असते. कोरफड ही खुप फायदा करणारी अशी वनस्पती आहे. कोरफडीमुळे अनेक प्रकारचे मोठमोठे आजार दुर होतात तसेच कोरफड ही रांजणवाडी आल्यावर देखील उपयोगी ठरते. कोरफड ही थंड असते. कोरफडीमुळे डोळयांला थंडावा मिळतो अगदी कमीत कमी कोरफडीचा गर रांजणवाडीला लावावा. आणि थोडा वेळ आराम करावा याने डोळयांना होणारी जळजळ कमी होईल. डोळयांची होणारी आग देखील कोरफडीमुळे कमी होते. अनेकदा डोळयांला आलेली रांजणवाडी बरीच मोठी होते, त्यामुळे डोळे उघडण्यासही त्रास होतो, यावर कोरफडीचा गर लावला तर आलेला फोड कमी होतो आणि हे लावताना त्रास देखील होत नाही.साधारण पणे सलग दोन ते तीन दिवस असे केल्यास रांजणवाडी पासून आराम मिळतो.

गावराणी तुप – रांजणवाडी घरगुती उपाय

रांजणवाडी वर घरगुती उपाय/रांजणवाडी येण्याची कारणे व त्या वर उपाय (ranjanwadi treatment at home in marathi / ranjanwadi in eyes)
साजूक तूप – रांजणवाडी घरगुती उपाय

घरात आपण साय जमा करून गावराणी तुप करतो. म्हशीचे किंवा गायीचे तुप घ्यायचे ते एक पातेल्यामध्ये टाकुन गरम करायचे आणि त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवायचा व तो तुपाचा, कापसाचा बोळा एखादया गरम वस्तुवर ठेवून गरम करायचा आणि थोडा कोमट झाल्यावर आलेल्या रांजणवाडीवर हलक्या हाताने लावायचा हा उपाय रांजणवाडीवर दिवसातुन दोनदा केल्यास रांजणवाडी लवकर जाते व कोणता त्रास होत नाही.

हळद – रांजणवाडी वर आयुर्वेदिक घरगुती उपाय

हळद – रांजणवाडी घरगुती उपाय

हळद ही एक अशी वस्तु आहे की, जी जवळपास सर्वच दुखण्यावर खुप उपयोगी आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. हळदीमध्ये अॅंटीसेप्टीक गुणधर्म असतात आणि हळद नैसर्गिक असल्यामुळे त्याने काही दुष्परीणाम देखील होत नाही.  हळद पाण्यात भिजवुन ठेवावी आणि ती डोळयांना रांजणवाडी आली आहे त्याठिकाणी लावावी आणि त्याने रांजणवाडीवर आराम मिळेल. हळदीचा लेप लावला तरी तो लेप काढतांना योग्य पध्दतीने काढावा याने रांजणवाडी आलेल्या फोडाला त्रास होणार नाही. लावलेली हळद धुताना सहसा रांजणवाडी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हातांनी हळद धुवावी.

धने – रांजणवाडी गुणकारी घरगुती उपाय

रांजणवाडी वर घरगुती उपाय/रांजणवाडी येण्याची कारणे व त्या वर उपाय (ranjanwadi treatment at home in marathi / ranjanwadi in eyes)
धने – रांजणवाडी घरगुती उपाय

धने हे सुध्दा रांजणवाडीवर उत्तम काम करतात. साबुत धने पाण्यात टाकावेत आणि त्या धने टाकलेल्या पाण्याने डोळे अलगद धुतले तरीही एखादया मलमाप्रमाणे हे काम करतात. एका भांडयामध्ये एक चमचा धण्याचे दाणे घेउन त्याला एक खळखळ उकळी काढुन घ्यावी आणि ते पाणी थंड झाल्यावर एक स्वच्छ कपडयाने डोळयांना लावून ठेवावे. याने रांजणवाडीला चांगलाच आराम मिळेल.साधारण पणे रात्री झोपण्या पूर्वी हा उपाय करावा जेणेकरून शांत झोप लागते व डोळ्याला आलेली रांजणवाडी सलत देखील नाही.

सारांश – रांजणवाडी घरगुती उपाय व रांजणवाडी येण्याची कारणे

वरील लेखामध्ये आपण रांजणवाडी येण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय बघितले तसेच ते उपाय कसे करायचे याची विस्तृत माहिती बघितली आहे. रांजणवाडी आल्यावर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही त्यावर त्वरित घरगुती उपाय केल्यास लवकर आराम मिळतो,तरी देखील तुम्हाला जर रांजणवाडी सारखा दिसणारा फोड आला असेन परंतु खूप त्रास होत असेल डोळ्याला सलत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

रांजणवाडी का येते ?

रांजणवाडी येण्याची अनेक कारणे आहेत त्यातील काही पुढील प्रमाणे :- 1) शरीरातील उष्णता वाढल्यामुळे रांजणवाडी येऊ शकते. 2) आपल्या डोळ्यांची व्यवस्थित निगा न राखल्याने देखील रांजणवाडी येऊ शकते. 3) तुम्हाला जर चश्मा असेन आणि तुम्ही रोजच्या रोज चश्मा न वापरल्याने देखील रांजणवाडी येते. 4) झोप पूर्ण न घेतल्याने 5) रात्रीचे अति जागरण केल्याने 6) अपचन किंवा पोट साफ न झाल्यास रांजणवाडी येऊ शकते. 7) तसेच हल्लीच्या वाढत्या प्रदूषनामुळे डोळ्यांना हानिकारक घटक डोळ्यांमध्ये गेल्यामुळे डोळे कोरडे पडण्याचे प्रमाण वाढते व त्यामुळे देखील रांजणवाडी येते.

आपल्याला ही रांजणवाडी घरगुती उपाय संबंधित माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (32) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (9) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (9) पोट (15) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Leave a Reply