केस गळतीवर घरगुती उपाय | केस गळती थांबवण्यासाठी ११ घरगुती उपाय

केस गळतीवर घरगुती उपाय / केस गळती थांबवण्यासाठी उपाय (kes galati gharguti upay) >> केस गळती हा काय इतर आजारांप्रमाणे वेदना दायक आजार नाहीये,परंतु सततच्या केस गळतीने अनेक जण त्रस्त असतात. आणि लवकरात लवकर ही केस गळती थांबवावी म्हणून अनेक जण काही न काही करत असतात. केस गळती हा प्रामुख्याने सर्वच व्यक्तींना त्रासदायक वाटणारा प्रकार आहे. केस गळती कारणे पुढील प्रमाणे :- काहीजणांचे प्रदूषणामुळे, काहींचे कोंड्यामुळे तर काही जणांची तणावपुर्ण जीवनशैलीमुळे केस गळती होत असते. वेगवेगळे शाम्पु किंवा विविध प्रकारचे कलर केसांना वापरल्यास देखील केस गळती होते आणि ते केस गळती या समस्येशी झगडत असतात.

तज्ञांच्या मते काही प्रमाणात होणारी केस गळती हे ठीक आहे, मात्र जेव्हा केस गळती 50 ते 100 च्या वर जाते तेव्हा मात्र ही धोक्याची घंटा आहे असे समजावे. अशा वेळी केस गळतीवर काही घरगुती उपाय करणे हे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात केस गळती थांबवण्यासाठी उपाय / केस गळतीवर घरगुती उपाय कोणते आहेत याविषयी माहिती.

केस गळतीवर घरगुती उपाय / केस गळती थांबवण्यासाठी उपाय (kes galati gharguti upay)

केस गळतीवर घरगुती उपाय आपण या लेखामध्ये बघणार आहोत, खाली दिलेले उपाय केल्यास तुम्हाला केस गळतीवर नक्कीच फरक दिसेल.आणि या त्रासासाठी तुम्हाला इतर काही औषध वगैरे घेण्याची आवश्यकता देखील भासणार नाही.

लसूण – केस गळतीवर घरगुती गुणकारी उपाय

लसूण - केस गळतीवर घरगुती उपाय
लसूण – केस गळतीवर घरगुती उपाय

लसणामध्ये सल्फर चे घटक असतात म्हणूनच पारंपरिक केस वाढीच्या औषधांमध्ये लसणाचा वापर प्रामुख्याने आढळून येतो. लसणाचा वापर केस गळती थांबण्यासाठी उत्तम उपाय ठरू शकतो. लसणाचा वापर केस गळतीवर पुढील प्रमाणे करावा, लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्याव्यात आणि त्यामध्ये खोबऱ्याचे तेल घालावे आता हे मिश्रण गरम करून घ्यावे. मिश्रण थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळाशी लावावे. साधारण ३०मिनिटे तेल लावून ठेवावे त्यानंतर केस धुवून टाकावेत. आठवड्यातून किमान दोन वेळा असे केल्यास केस गळती थांबते.

हीना पावडर – केस गळतीवर लोकप्रिय उपाय

केसांना नैसर्गिक रंग देण्याच्या प्रक्रियेत हीना पावडर प्रामुख्याने वापरली जातो. मात्र मुळापासून केस घट्ट करण्याची क्षमता सुद्धा हीना मध्ये आहे. हीना पावडर चा वापर केस गळतीवर घरगुती उपाय म्हणून पुढीलप्रमाणे करावा 250 ग्राम राईच्या तेलात 60 ग्राम हीना पावडर किंवा धुतलेली हीना ची पाने घालावीत. हे तयार मिश्रण आवश्यक तेवढ्या प्रमाणात घेऊन टाळूवर मसाज करावी आणि उर्वरित हवाबंद डब्यात ठेवावे. तसेच सुकी हीना पावडर दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवावी व तासाभराने केस धुवून टाकावेत. असे आठवड्यातून किमान एकदा तरी करावे केस गळती थांबवण्यासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरेल.

नारळ – केस गळतीवर फायदेशीर

केसांच्या वाढीसाठी तसेच त्यांच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नारळातील उपयुक्त मेद, प्रोटीन आणि मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते. केस गळतीसाठी नारळाचे दूध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते. ह्याचा वापर केस गळतीवर घरगुती उपाय म्हणून पुढीलप्रमाणे करावा,

नारळाचे तेल गरम करून घ्यावे व केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावावे व त्यानंतर साधारण एक तासाने केस धुवून टाकावेत. यांखेरीस नारळाचे खोबरे बारीक खिसून घ्या आणि त्याचे दूध काढून घ्यावे व हे दूध टाळूवर लावावे आणि रात्रभर ते तसेच ठेवावे व सकाळी कोमट पाण्याने केस धुवावेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने केस गळती थांबवण्यासाठी निच्छित मदत होईल.

कांद्याचा रस – केस गळतीवर घरगुती उपाय कांदा

केस गळतीवर घरगुती उपाय कांदा
कांदा केस गळतीवर घरगुती उपाय

कांद्यात देखील लसनाप्रमाणेच सल्फर चे घटक असतात, त्यामुळे कांदा हा केस गळतीवर घरगुती उपाय म्हणून फायदेशीर ठरतो. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळती वर नियंत्रण मिळवता येते.याचा वापर कसा करावा ते पुढीलप्रमाणे:- एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा व हा रस टाळूवर पंधरा मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर एखाद्या सौम्य शाम्पूने केस धुवून टाका व ते वाऱ्यावर सुकू ध्या. असे आठवड्यातून दोनदा केल्यास केस गळती कमी होईल.

आवळा– केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय

केस गळतीवर घरगुती उपाय आवळा
केस गळतीवर घरगुती उपाय आवळा

केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी आवळा नक्कीच फायदेशीर ठरतो. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी व अँटीऑक्सिडंट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केस गळती थांबवतो. आवळ्याचा वापर केस गळती थांबवण्यासाठी पुढीलप्रमाणे करावा :- आवळ्याचा अर्क अथवा पावडर, लिंबाच्या रसात एकत्र करावी व हे मिश्रण केसांना लावून सुकू द्यावे. आणि केस सुकल्यावर केस कोमट पाण्याने धुवून टाकावेत असे केल्याने केस गळणे थांबू शकते.

अंडी – केस गळतीवर उत्तम घरगुती उपाय

केस गळती थांबवण्यासाठी उपाय अंडी
केस गळती थांबवण्यासाठी उपाय अंडी

अंड्यातील अनेक घटक हे केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉस्फरस, आयोडीन, झिंक हे घटक केसांच्या वाढीस मदत करतात. अंड्याचा वापर केस गळती थांबवण्यासाठी पुढीलप्रमाणे करावा :- एका अंड्यातील पांढरा भाग, एक चमचा ऑलिव्ह तेलात मिक्स करावा व हे मिश्रण चांगले फेटून घ्यावे आणि केसांना लावून ठेवावे. त्यानंतर १५ ते २० मिनिटानंतर थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवून टाका. आठवड्यातून एक ते दोन वेळा केस गळती वरील हा घरगुती उपाय केल्यास केस गळती निश्चित कमी होईल.

जास्वंद 

जास्वंद - केस गळती थांबवण्यासाठी उपाय
जास्वंद – केस गळती थांबवण्यासाठी उपाय

जास्वंद हे फूल आणि त्यातील द्रव्य हे केसांना अत्यंत पोषक असतात, केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून देखील वाचवतात. जास्वंदचा वापर केस गळती थांबवण्यासाठी पुढीलप्रमाणे करावा :- काही जास्वंदची फुले कुटून घ्या व ती तीळ किंवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र तयार करून घ्या. हे तयार झालेले मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा आणि नंतर थंड पाणी आणि सौम्य शाम्पू ने केस धुवून टाकावेत. जास्वंदपासून केलेला हा केस गळतीवर घरगुती उपाय गुणकारी ठरतो.

मेथी – केस गळतीवर घरगुती उपाय मेथी

केस गळतीवर घरगुती उपाय मेथी
केस गळतीवर घरगुती उपाय मेथी

केस गळतीच्या उपचारांसाठी मेथीही अतिशय चांगली असते. मेथीचा वापर केस गळती थांबवण्यासाठी पूढील प्रमाणे करावा :- साधारण एक कप मेथीचे दाणे रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी ते भिजलेले मेथीचे दाणे वाटून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि शॉवर कॅप लावा. साधारण ४०मिनिटे हे केसांना तसेच ठेवा आणि नंतर केस धुवून टाका. किमान महिन्यातून एकदा हा उपाय करा, तुमची केस गळती पासून नक्कीच सुटका होईल त्याचबरोबर तुमचे केस लांब, दाट आणि चमकदार देखील दिसतील.

कोरफड

केसगळती घरगुती उपाय - कोरफड
कोरफड – केसगळती घरगुती उपाय

कोरफड ही आपल्या त्वचेसाठी फायदेशीर तर आहेच शिवाय कोरफड ने केस गळणे देखील थांबू शकते. कोरफडीचा वापर केस गळती थांबवणे साठी पुढील प्रमाणे करावा :- कोरफडीच्या आतला जो गर असतो तो चाकू च्या मदतीने काढून घ्यावा, नंतर तो गर मिक्सरमध्ये फिरवावा आणि त्याची छान पेस्ट करून घ्यावी. ही तयार पेस्ट रोज डोक्याला म्हणजेच केसांना तेल लावल्यासारखे लावावी व हलक्या हाताने मालिश करावी याने देखील केस गळणे थांबू शकते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस गळती वरील हा घरगुती उपाय केल्यास केस गळती लवकर कमी होईल.

झेंडूचे फूल

केस गळती थांबवण्याचे उपाय झेंडूचे फूल
केस गळती थांबवण्याचे उपाय – झेंडूचे फूल

झेंडूच्या फुलाला हिंदू धर्मामध्ये सणावाराला खूप महत्व असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, झेंडूचे फुल हे केस गळतीवर घरगुती उपाय म्हणून देखील वापरता येते. झेंडूचे फुल बारीक करून त्याचा रस काढून घ्यावा, हा रस नारळाच्या तेलात टाकून उकळून घ्या. आता हे तयार मिश्रण थंड झाल्यावर एका बाटलीत भरून ठेवावे. हे तयार मिश्रण रोज केसाला लावल्याने केस गळणार नाहीत. साधारण १५ दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला केस गळती कमी झाल्याचे दिसेल.

शिकेकाई 

शिकेकाई ही केस गळतीवर गुणकारी ठरते. शिकेकाईच्या बियांमध्ये थोडे पाणी टाकून बारीक करून घ्या. व त्याची पेस्ट तयार झाल्यावर ती पेस्ट केसाला लावून अर्धा तासानंतर केस स्वच्छ धुवा. ही पेस्ट केसांसाठी नैसर्गिक शॅम्पूचे काम करते. आठवड्यातून साधारण तीन वेळा ही पेस्ट केसांना लावल्यास तुमची केस गळती कमी होण्यास मदत होईल.

सारांश – केस गळतीवर घरगुती उपाय

तुम्ही जर केस गळतीने त्रस्त झाले असाल तर तुमच्यासाठी हा लेख उपयोगी ठरणारा असा आहे. या लेखात केस गळण्याच्या या समस्येवर सर्वांसाठी घरगुती उपाय कोण कोणते करता येतात हे आपण बघितले. यातील तुम्हाला जे उपाय घरच्या घरी करता येणे शक्य आहेत ते तुम्ही करून बघा, याचा तुम्हाला निश्चित केस गळती कमी करण्यास आणि थांबवण्यास फायदा होईल.

केस गळण्याची कारणे

केस गळती ही शरीराला वेदना देणारी समस्या नसली तरी त्याच्यामुळे अनेक जण त्रस्त असतात. अशी ही नकोशी वाटणारी केस गळण्याची अनेक कारणे आहेत त्यातील काही पुढीलप्रमाणे :- काहीजणांचे प्रदूषणामुळे, काहींचे कोंड्यामुळे तर काही जणांची तणावपुर्ण जीवनशैलीमुळे केस गळती होत असते. वेगवेगळे शाम्पु किंवा विविध प्रकारचे कलर केसांना वापरल्यास देखील केस गळती होते. शरीरातील हार्मोन्स चे असंतुलन, पौष्टिक आहाराची कमतरता, टाळूला अपुरा रक्त पुरवठा, वायू प्रदूषण, काही वेळा जास्त वैद्यकीय औषधे घेतल्याने देखील केस गळती होते. केस गळतीवर घरगुती उपाय त्वरित न केल्यास केस गळती ही वाढत जाते.

आपल्याला केस गळतीवर घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला सांगा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top