मुका मार लागल्यावर घरगुती उपाय – Best 13 Home Remedies

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय / मुक्का मार / muka mar lagne >>>लहान मुलांना अनेकदा खेळताना किंवा काही काम करताना दुखापत होते मात्र रक्त येत नाही. यावेळी आपण मुका मार लागला असे म्हणतो. आपण देखील काही वेळेस काम करताना आपल्याला मुका मार लागू शकतो. बाहेर छोटा मोठा अॅक्सिडेंट झाल्यावर आपल्याला मुका मार लागू शकतो, जिन्यावरून पडल्यावर, चालताना गुडघ्याला, हाताच्या कोपर्‍याला ,पायावर, मांडीला, कुठेही मुका मार म्हणजे त्वचेच्या आत दुखापत होते त्वचेच्या आतील रक्त वाहीन्यांवर परिणाम होतेा. यामुळे अनेकदा मार लागलेला भाग थोडा काळसर पडतो अशावेळी घरगुती प्रथमोपचार केलेले उपयोगी ठरतात. मुकामार हा अनेक ठिकाणी लागु शकतो.

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय / मुक्का मार / muka mar lagne
मुका मार लागल्यावर घरगुती उपाय

मुका मार हे असे दुखणे आहे की जे ज्याचा त्रास तर होतो परंतु ते वरून दिसत नाही दुर्घटना कधीही सांगुन होत नाही. घरात किंवा घराबाहेर प्रत्येकाला या दुर्घटनेशी सामना करावा लागतो. अशावेळी न घाबरता डोकं शांत ठेवुन झटपट उपचार करणे आवश्यक असतं म्हणूनच तुमच्या घरात कायम प्रथमोपचाराचं सामान असु दयावे जखम मोठी किंवा गंभीर असल्यास प्रथमोपचार केल्यानंतरही लवकरात लवकर डाॅक्टरांकडे जावे.

मुकामार हा कधीही आणि कुणालाही लागु शकतो त्यासाठी आपल्या घरात प्रथमोपचार पेटी ही कायमची असू दयावी. काही अपघातानंतर या प्रथमोपचार वर उपाय होउ शकतो. ही प्रथमोपचार पेटी तुम्हाला मेडीकल स्टोअरमध्ये तयार स्वरूपात मिळु शकते किंवा घरच्या घरी बनवणंही सहज शक्य आहे.  या पेटीवर ठळक अक्षरात र्फस्ट एड बाॅक्स किंवा प्रथमोपचार पेटी लिहुन ती सुरक्षित ठिकाणी ठेवून दयावी.

अशा प्रकारचा मुका मार आपल्याला लागल्यावर आपण आमच्या ” मुका मार लागल्यावर घरगुती उपाय/ मुका मार लागल्यावर काय करावे” या लेखातील आम्ही सांगितलेले उपाय करावेत.

Table of Contents

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय – त्वरित करता येणारे उपाय

मुका मार लागल्यावर करता येणारे उपाय हे खालील प्रमाणे-

  • मुका मार लागलेल्या जागेवर गाठ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • मुका मार लागलेल्या जागेवर जास्त सूज येऊ नये यासाठी गच्च कापड बांधावे.
  • मुका मार लागला तर त्या जागेवर लगेचच साजूक तूप लावावे.

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे /मुका मार घरगुती उपाय /muka mar lagne

आपल्याला जर मुका मार लागल्यावर घरगुती उपाय काय करावे हे समजत नसेल तर आपण आम्ही खालील लेखात सांगितलेले घरगुती उपाय करावेत, ते केल्याने आपल्याला बराच आराम मिळेन आणि आपला त्रास देखील कमी होईल.

बर्फ ने शेकणे –  मुका मार लागल्यावर घरगुती उपाय    

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय / मुक्का मार / muka mar lagne
बर्फाने शेकणे

मुका मार लागल्यानंतर लगेचच त्यावर बर्फ लावा. बर्फाने हळुवारपणे सहन होईल तसे मुका मार लागलेल्या भागावर शेका, असे केल्याने त्या भागांवर रक्त जमा होण्याची शक्यता कमी होईल आणि सुज आली असेल तर ती देखील कमी होईल किमान दहा मिनिटे बर्फ असलेली बॅग ही मुका मार लागलेल्या भागांवर ठेवा. जवळपास वीस मिनिट तरी ही प्रक्रीया करत रहावे याने सूज आणि त्रास दोन्ही देखील कमी होईल.

कोरफड        

कोरफड - मुका मार लागणे घरगुती उपाय
कोरफड

कोरफडीत अॅंटी इन्फलेमेटरी घटक असतात यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. कोरफडीचा गर थेट जखमेवर लावल्याने जखम बरी होण्याची प्रक्रिया जलद होते. तसेच रक्ताच्या गाठीही होत नाहीत. त्यामुळे आपल्याला मुका मार लागला तर, लगेचच त्या जागी कोरफड चा गर लावावा. कोरफड मुळातच थंड असल्याने मुका मार लागलेल्या जागेच दाह शांत होतो.

अननस आणि त्यांची पाने       

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय / मुक्का मार / muka mar lagne - अननस आणि त्यांची पाने
अननस

अननसाचे सेवन केल्यानंतर देखील जखम लवकर बरी होण्यास मदत होते. अननस च्या सेवन सोबतच, जर आपण अननस ची पाणे मिक्सर करून त्याचा लेप मुका मार लागलेल्या जागेवर लावला तर त्यामुळे देखील मुका मार बरा होण्यास आणि सुज कमी होण्यास बरीच मदत होते. अननसामध्ये ब्रोमेलेन हा एन्झाइम्स असा घटक असतो. त्यामुळे मुका मार लागलेला बरा होतो आणि सूज देखील कमी होते.

भुईलोण / शेणाचा लेप – मुका मार लागल्यावर घरगुती उपाय       

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय / मुक्का मार / muka mar lagne

शेणांनी सारवलेल्या जागेवर शेंदीलोन, हळद, पाणी टाकुन त्याचा लेप काढावा आणि तो लेप काढुन गॅसवर शिजवावा आणि तो लेप मुकामार लागलेल्या जागेवर लावावा याने दोन तासांमध्ये आराम मिळतो. हया मिश्रणाल गावराणी भाषेत भुईलोणं असे म्हणतात. मुका मार लागल्यास हा घरगुती उपाय अगदी रामबाण उपाय म्हणून काम करतो. हा उपाय केल्याने मुका मार लागलेल्या जागेवर सूज देखील येत नाही.

 निरगुंडीचा पाला, हळद आणि शेंदलोण       

शेतामध्ये निरगुडी चा पाला मिळतो. तो आणायचा आणि एका पातेल्यामध्ये हळद, पाणी आणि शेंदलोण मिठ टाकुन उकळावे. आणि निरगुडीच्या पाल्याची एका कपडयांमध्ये टाकुन पूरचूंडी करावी आणि हळद व शेंदलोण मीठ टाकलेल्या पातेल्यात ती पुरचुंडी टाकावी व ते चांगले उकळून घ्यावे आणि ते पाणी मुकामार लागलेल्या जागेवर कोमट किंवा जसे सहन होईल तसे लावावे. याने देखील आराम मिळेल.

म्हशागुगुळ       

मशागुगुळ नावाचे एक आयुर्वेदीक औषध मेडीकल वर भेटते. हे औषध खडा सहानेवरून उगळून घ्यावे थोडे थोडे पाणी टाकून शिजवून घ्यावा आणि हेच मिश्रणाचे गंध तयार होते सहानेवर उगळल्यानंतर हे गॅसवर ठेवून मंद आचेवर उगळून घ्यावे आणि कोमट झाल्यावर मुकामार जेथे लागला आहे तेथे लावावे. या उपयाने काय होते की मुकामार लागल्यावर जे रक्त गोठते काळनिळे पडते. ते कमी होते.

वाळू        

बारीक वाळू घ्यावी. व ती गरम तव्यावर एका कॉटनच्या कपडयामध्ये टाकून गरम करावी. त्यातील खडे नाही घ्यायचे ते बाजूला काढायचे फक्त बारीक वाळू घ्यावी. आता ही वाळू एका पातेल्यात गरम करावी आणि गरम केलेली वाळूचा कॉटनच्या कपडयांमधील गाठ पाडून त्याचा मुकामार लागलेल्या ठिकाणी हलक्या हातानी शेक घ्यावा याने आराम मिळेन.

मोहरीचे तेल, टरफनटाईल तेल, रॉकेल         

मोहरीचे तेल, टरफनटाईल तेल, आणि रॉकेल घ्यावे हे सर्व तेल समप्रमाणात घ्यावे जसे की, एक वाटी मोहरीचे तेल एक वाटी टरफनटाईल तेल आणि एक वाटी राॅकेल असे घेऊन एका हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करावे.  हे तेल असेच चार दिवस ठेवून मुकामार लागलेल्या जागेवर हलकया हाताने चोळावे यानेदेखील आराम मिळेल काम झाल्यावर हया मिश्रणाच्या बाटलीचे तोंड पॅक बंद करून ठेवावे.

मोहरीचे तेल, हळद आणि लसूण        

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय / मुक्का मार / muka mar lagne

एका पळीमध्ये 5 ते 6 चमचे मोहरीचे तेल घ्यावे आणि त्यात अर्धा चमचा हळद घालावी आणि लसणाच्या पाच ते सहा पाकळयांची पेस्ट घेउन हे मिश्रण चांगले गरम करून घ्यावे. आणि थंड झाल्यावर या मिश्रणाने मुकामार लागलेल्या ठिकाणी मसाज करावी.

शेकणे – मुका मार लागल्यावर काय करावे     

हलक्या हाताने एखादे मऊ किंवा कॉटनचे कापड किंवा एखादी शेक देतात ती पिशवी घेऊन जिथे दुखत आहे त्या भागावर गरम पिशवी किंवा गरम कापड याने त्या मुका मार लागलेल्या जागेवर दाब दया, यामुळे मुकामार लागल्यामुळे आलेली सुज ही नक्कीच कमी होईल. गरम कापड किंवा गरम पाणी याने शेकल्यास त्या जागी बराच आराम मिळतो तसेच गाठ देखील होत नाही.म

निरगुंडीची पाणे     

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय / मुक्का मार / muka mar lagne
निरगुडीचा पाला

निरगुंडी ची पाणे घ्यावीत ही पाणे पाण्यात उकळुन घ्यावी जेव्हा हे पाणी उकळताना पाण्यातुन वाफ निघेल तेव्हा भांडयावर जाळी ठेवावी. दोन कॉटनचे कपडे पाण्यात भिजवून पिळुन घ्या. नंतर हे एका झाल्यावर एक जाळीवर ठेवुन गरम करून घ्या.  सुज किंवा दुखणा-या भागांवर ठेवुन हलक्या हाताने शेकून घ्या यामुळे आराम मिळेल.

आक्रोड चे तेल – मुक्का मार उपाय    

समजा मुका मार लागल्याने आपल्याला हाडाला दुखापत झाली असेल किंवा सुज आली असेल तर, आपण त्या मुका मार लागलेल्या जागेवर किंवा हाडावर हळुवारपणे कोमट तेल करून त्या आक्रोडाच्या तेलाने मालिश करावी . कोमट आक्रोड च्या तेलाने मालीश केल्याने आखडलेले हात आणि पाय चांगले होतात तसेच हाडावर आलेली सूज देखील उतरते.

भाजलेले जिरे – मुका मार घरगुती उपाय     

आपल्याला जर शरीरावर ककुठेही मुका मार लागला असेल आणि तो भागा सारखं सारखं अधून- मधून दुखत असेल तर आपल्याला मुका मार लागला त्या जागेचा त्रास आणि दुखणे कमी व्हावे यासाठी आपण थोडे जिरे घ्यावे आणि त्या जिर्‍याला तव्यावर थोडे भाजून ,शेकून घ्यावे. दिवसभरात 2 ते 3 चमचे असे प्रमाण घेऊन पाण्यासोबत दिवसातुन तीन वेळा सेवन करावे, हे भाजलेले जिरे चावून खाल्ल्याने सुध्दा आराम मिळतो आणि मुका मार लागलेली जागा दुखणे किंवा ठणकणे कमी हे बर्‍यापैकी कमी होते.

सारांश – मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे / muka mar lagne

आपल्याला जर मुका मार लागला असेन किंवा मुका मार लागल्याने शरीराच्या एखाद्या भागावर सूज आली असेन तर आपण आजच्या ” मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय ” या लेखात आम्ही सांगितलेले उपाय करावेत याने आपल्याला नक्कीच बराच आराम मिळेन.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले “मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय / मुक्का मार” कसे वाटले , हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीसीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

1 thought on “मुका मार लागल्यावर घरगुती उपाय – Best 13 Home Remedies”

  1. Maza accident zalela Ani mla muka maar laglay 21 diwasapurvi , pn maar laglay tithe gath lagtey hatala kay upay Karu shakte me please sanga

Comments are closed.

Scroll to Top