ताप आल्यावर काय करावे – Best Ways to take care in case of fever

ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / ताप येण्याची कारणे / tap alyavar kay karave >>> आजकाल आपण पाहतो की, ताप येणे हा सामान्य आजार जरी असला तरी, सध्याच्या काळात मात्र सर्वच लोक ताप येण्याला भीत आहे आणि त्यापासून स्वतः चे रक्षण करत आहेत. ताप हा सामान्य आजार आहे, ही मानसिकता या कोरोना काळात लोप पावली आहे. ताप येणे म्हणजे काय तर, जेव्हा मानवी शरीराचे तापमान हे सामान्य तापमानापेक्षा जास्त होते किंवा वाढते तेंव्हा ताप आला असे आपण म्हणतो. खरतरं ताप हा आजार नाहीच पण ताप येणं हे एक लक्षण आहे.

आपण पाहतो, आपल्याला किंवा घरातील माणसाला कधी कधी वेगवेगळ्या कारणांमुळे ताप येत असतो, जसे की जंतुसंसर्गामुळे येणारा ताप, किटाणूंमुळे म्हणजेच डास चावल्यामुळे येणारा ताप, कुठले बक्टेरियल इन्फेकशन झाल्यास येणारा ताप यांसारख्या बर्‍याच कारणांमुळे ताप हा येऊ शकतो. जर हा असा कोणत्याही कारणामुळे ताप आल्यास काही गोष्टी केल्या तर आपण अडचणीत येऊ शकतो आणि त्याने गंभीर समस्या देखील होऊ शकतात. त्यामुळे ताप आल्यावर काय करावे, याविषयीची माहिती ही आपल्याला माहीत असावी.

ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / ताप येण्याची कारणे / tap alyavar kay karave
ताप आल्यावर काय करावे

ताप आला की शरीराचं तापमान वाढतं, त्यामुळे शरीरात शिरलेले जंतू तग धरू नयेत व त्यांच्याशी लढा देता यावा हा हेतु असतो. पण जंतूंशी लढा देण्याच्या व तापमान वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये भरपुर ऊर्जा ही खर्च होते. त्यामुळे ताप आला असेल तर, आपल्या शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ खाण्याची गरज असते. तसेच वाढलेल्या तापमानात शरीरातील पाणी जास्त प्रमाणात वापरले जाते, घामावाटे ते शरीराबाहेर टाकले जाते म्हणून अशावेळी द्रव पदार्थांची गरज असते. शरीरात पाणी भरपूर असायला हवे. त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी वाढेल असे पदार्थ खावेत.

चला तर मग बघूया, ताप आल्यावर नेमकं काय खाल्ल पाहिजे, आहार कसा असला पाहिजे, जेणे करून ताप कमी होण्यास मदत होते आणि आपल्याला ताप आल्यामुळे जो अशक्तपणा आलेला असतो, तो भरून निघण्यास मदत होते त्यासाठी ” ताप आल्यावर काय करावे ,ताप आल्यावर काय खावे ,ताप आल्यावर काय खाऊ नये आणि ताप येण्याची कारणे कोणती आहेत” ते आजच्या आपल्या या लेखात …..

ताप आल्यावर काय करावे (tap alyavar kay karave) / ताप आल्यावर काय खावे / ताप आल्यावर काय खाऊ नये

ताप आल्यानंतर आपला आहार हा योग्य असायला हवा आणि त्याचसाठी आम्ही हा लेख घेऊन येत आहोत – त्यातील माहिती आपण ताप आल्यानंतर उपयोजावी, त्याचा आपल्याला बराच फायदा होईल.सुरवातीला आपण ताप आल्यावर काय खावे ते पाहुयात त्या नंतर ताप आल्यावर काय खाऊ नये आणि लेखाच्या शेवटच्या टप्प्यात आपण ताप येण्याची कारणे बघणार आहोत.

ताप आल्यावर काय खावे –

ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / ताप येण्याची कारणे / tap alyavar kay karave
आहार

प्रथिने आणि जीवनसत्वे युक्त आहार

ताप आल्यामुळे आपल्या शरीरातील WBC ( white blood cell )कमी झालेले असतात त्यामुळे आपल्याला शरीराची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी, प्रथिन युक्त व जीवनसत्वांनी परिपुर्ण असा आहार असला पाहिजे. त्यामुळे आपल्या आहार हा परिपूर्ण असला पाहिजे तसेच तापात घरी बनवलेले साधे, पचायला हलके असणारे अन्न आपण खावे.

डाळ व तांदळाची मऊ खिचडी

ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / tap alyavar kay karave - डाळ खिचडी
डाळ खिचडी

ताप आल्यावर आपण डाळ व तांदळाची मऊ खिचडी खावी. दलिया, मेतकुट भात, वेगवेगळ्या भाज्या घालून बनवलेला उपमा, वरईचा भात, तांदुळ/ज्वारी/नाचणीची उकड, रवा किंवा नाचणीची खिर यांसारखे खायला म्हणजेच गिळायला सोपे असणारे पदार्थ खावेत. हे पदार्थ पचयाला देखील हलके असतातन तसेच आपल्या शरीराला ऊर्जा देखील देखील पुरवतात.

सुका मेवा

सुका मेवा हा सकस आणि पूर्ण आहार समजला जातो. सुका मेवा हा आपल्याला भरपूर प्रमाणात ऊर्जा आणि शक्ति प्रदान करते त्यामुळे ताप आल्यावर सुका मिवा खावे. अंजिर, मनुके, काजू, बदाम, आक्रोड यांसारखा सुकामेवा खावा. मुग किंवा नाचणीचे लाडू बनवून तेही ताप आल्यावर खावे. यामुळे शरीरास जास्त प्रमाणात उर्जा मिळते आणि ताप आल्याने आपल्याला आलेला अशक्तपणा देखील कमी होतो.

अंडी आणि मासोळी

ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / ताप येण्याची कारणे / tap alyavar kay karave
अंडी व आमलेट

तापा या सोबत जर अतिसार नसेल तर आहारात उकडलेली अंडी, ओमलेट, मऊ शिजवलेला मासा यासारखे पदार्थ समाविष्ट करावेत. यामुळे शरीराला आवश्यक असणारी सर्व प्रथिने मिळतात. ताप आल्यामुळे आपल्या शरीराची जी झीज झाली आहे ती भरून निघण्यास मदत होते.

दूध आणि पनीर

दूध हे पुरान्न म्हणून ओळखले जाते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे ताप आल्या नंतर खाल्यास बराच फायदा होतो. दूध, मऊ शिजवलेले पनीर, भात व खिचडी सोबत एक चमचा तुप यांचाही आहारात समावेश करावा. पण जेवनात तेल, तुप, लोणी यांचा वापर कमी प्रमाणात करावा त्यामुळे खोकला येण्याची शक्यता असते. अशा प्रकारे दूध आणि पनीर द्यावे.

दही भात , ताक

ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / ताप येण्याची कारणे / tap alyavar kay karave - दही भात
दही भात

घरी लावलेले ताजे दही, ताक यांचा ही जेवनात समावेश करावा. दुधापेक्षा दही, ताक पचायला हलके व सोपे असते. दही-भात, ताकाची कढी यांचाही समावेश जेवनात करू शकतो.

पालेभाज्याचे सूप आणि फळे

ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / ताप येण्याची कारणे / tap alyavar kay karave - पालेभाज्यांचे सूप
पालेभाज्यांचे सूप

नाश्त्याच्या वेळी नाश्त्या सोबत पालेभाज्याचे सूप घ्यावे. पालेभाज्याचे सूप घेतल्यास आपल्याला आलेला अशक्तपणा हा पुर्णपणे भरून निघण्यास मदत होते आणि आपल्या शरीरातील पाणी देखील वाढते. त्याचसोबत आपण फळे देखील खावे.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या, उकडलेल्या भाज्या यांचा आहारात समावेश करावा. यामुळे पौष्टिक व प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक शरीरास मिळतात.त्यामुळे ताप आल्यावर हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाव्या॰

फळांचा ज्यूस

ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / ताप येण्याची कारणे / tap alyavar kay karave - फळांचा ज्यूस
फळांचा ज्यूस

ताप येतो तेव्हा शरीरातील पाणी कमी होत. त्यामुळे तापात पाण्याची व इतर द्रवपदार्थांची गरज दुप्पटीने वाढते. तसेच शरीरात जीवाणुंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते म्हणून भरपुर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे. सफरचंद, केळी, पपई, डाळिंब यासारखी फळे खावीत. यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते व शरीराला ही फायदा होतो.

चिकन चे सूप

ताप आल्यावर काय खावे - चिकन सूप
चिकन सूप

ताप आला असेल तर चिकन चे सुप प्यावे. चिकन सुपमुळे रोगाप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, तसेच जीवाणूंची संख्या ही नियंत्रित करता येते. इतर द्रवपदार्थांमध्ये नारळ पाणी, भाज्यांचे पातळ सुप, टोमॅटो सुप, हुलग्याचे सुप, काढा, मुगाचे कढण यांचा समावेश करावा.

कोकम सार

ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / tap alyavar kay karave - कोकम
कोकम

ताप आल्यास कोकम सार प्यायला द्यावे ,यामुळे भूक लागते तसेच औषधांमुळे होणारी अ‍ॅसिडीटी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ताप आल्यावर कोकम पिण्यास द्यावे. कोकम हे ताप आल्यावर दिल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि ताप आल्याने जी झीज झालेली असते टी देखील भरून निघते त्यामुळे कोकम सार पिण्यास द्यावा.

हळद व हळदीचे दूध

ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / tap alyavar kay karave - हळद दूध
हळद दूध

हळदीचा वापर स्वयंपाकात जास्त प्रमाणात करावा. हळद जंतुनाशक असुन जंतुसंसर्ग कमी करण्यास फायदेशीर असते. म्हणुन काढ्यामध्ये, खिचडीत, वरणात हळद जास्त वापरावी तसेच हळद-दूध प्यावे.

तुळस , पुदिना , गवती चहा याचा काढा

ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / tap alyavar kay karave - गवती चहा
गवती चहा

ताप आल्यावर कोणताही काढा बनवताना त्यामध्ये तुळस, पुदिना, गवती चहा यांचा समावेश करावा. कडिपत्त्याची चटणी खावी. याने ताप आल्यावर जे साइड इफेक्ट होतात ते फारसे जाणवत नाहीत.

ताप आल्यानंतर काय खावू नये

  • आंबट पदार्थ खाणं टाळावं.
  • तेलकट, चमचमीत-मसालेदार पदार्थ खावू नयेत.
  • बाहेरच, रस्त्यावरील तसेच फास्ट फूड खावू नये.
  • थंड पदार्थ खावु नयेत.

  ताप आल्यावर योग्य आहार व पुरेशी काळजी घेवून आपण स्वतःला तंदुरूस्त ठेवू शकतो.

ताप येण्याची कारणे

  • ताप हा आपण जास्त फिरल्याने , ऊन लागल्याने येऊ शकतो.
  • आपल्याला डास चावल्याने कुठला आजार झाला असेन तर ताप येऊ शकतो.
  • बक्टेरियल इन्फेकशन झाल्यास देखील ताप येऊ शकतो.
  • आपली एखादी शस्त्रक्रिया झाल्यास देखील ताप येऊ शकतो.
  • वातावरणात बदल झाल्याने सर्दी खोकला ताप येऊ शकते.

सारांश – ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / ताप येण्याची कारणे / tap alyavar kay karave

आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला जर ताप आला असेन किंवा ताप येऊन गेला असेन आणि अशक्तपणा वाटत असेल , तसेच ताप आल्यावर काय करावे, काय खावे, असे प्रश्न आपल्याला असतील तर आपण आमच्या ” ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / tap alyavar kay karave” ता लेखातील माहिती आणि उपाय वापरावेत.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, “ताप आल्यावर काय करावे / ताप आल्यावर काय खावे / ताप येण्याची कारणे / tap alyavar kay karave “हे घरगुती उपाय  हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top