कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय – 12 Best Remedy for dry cough

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / कोरड्या खोकल्यावर उपाय सांगा / कोरडा खोकला उपाय /कोरडा खोकला औषध / korda khokla>>> कोरडा खोकला येणे हा असा फार काही गंभीर आजार नाही, परंतु जर आपण या आजारावर लवकरात लवकर उपचार केले नाही तर हा कोरडा खोकला येणे अधिक वाढून याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. आपल्या शरीरात आणि लंग्स मध्ये कोणत्याही प्रकारचा कोरडा खोकला मुरणे हे आपल्या हेल्थ साठी योग्य नाही तसेच सतत कोरडा खोकला येत असल्यास क्षय रोग किंवा अस्थमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आपण खोकल्याची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहेच, पण त्या बरोबरच आपण या कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय देखील करू शकता. जे प्रार्थमिक उपचार आणि उपाय म्हणून तुम्हाला बर्‍याच प्रमाणात त्रास कमी करण्यास मदत करतील.

सतत जर कोरडा खोकला येत राहिला तर आपल्या स्वरयंत्रावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, आपल्या घशावर सूज येऊ शकते ,आपला घसा बसू शकतो , आवाज घोगरा होऊ शकतो , लंग्स चे इन्फेकशन होऊ शकते, त्यामुळे आपण यावर वेळीच योग्य ते उपचार आणि उपाय करावेत. बर्‍याच जणांना असा कोरडा खोकला येण्याची समस्या असते, आणि त्यांच्यासाठीच आम्ही हा कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय हा लेख घेऊन येत आहोत.

या उपायांना आपण घरचा वैद्य असे देखील म्हणू शकतो. हे घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधीही चांगलेच. आपल्याला जर असा कोरडा खोकला येत असेल आणि आपण घरगुती उपाय करण्याचा विचार करत असाल तर आमचा ” कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / korda khokla ” हा लेख आपल्या साठी अतिशय उपयुक्त आहे आणि ज्यातील माहिती आपला कोरडा खोकला कमी करण्यास निश्चितच आपल्याला बरीच उपयोगी येईल.

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय/ कोरडा खोकला उपाय /कोरडया खोकल्यावर उपाय सांगा / कोरडा खोकला औषध / korda khokla

आपल्याला जर कोरडा खोकला येण्याची समस्या असेल तर आपण आमच्या या लेखात आम्ही सांगितलेळे खालील उपाय करावेत याने आपला हा कोरडा खोकला येण्याचा त्रास नक्कीच कमी होईल आणि आपल्याला आराम मिळेन.

मिठाच्या पाण्याने गुळण्या करा

घशात खवखव होणे किंवा कोरडा खोकला जाणवल्यास अनेकदा घरगुती उपाय देखील गुणकारी ठरतात. कोरडा खोकला येत असल्यास घरगुती उपाय म्हणून गरम पाणी घ्या आणि त्या गरम पाण्यामध्ये साधारण अर्धा ते एक चमचा मीठ टाका आणि ते चांगले मिक्स करा. त्यानंतर त्या मीठ मिश्रित पाण्याने गुळण्या करा. याने घश्याला त्वरित आराम मिळेल.दिवसातून दोन ते तीन वेळा मीठ मिश्रित गरम पाण्याने गुळण्या केल्यास कोरडा खोकला निश्चितच कमी होतो.

मध – कोरडा खोकला उपाय

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / कोरड्या खोकल्यावर उपाय सांगा / कोरडा खोकला उपाय /कोरडा खोकला औषध / korda khokla - मध
मध

कोरडा खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने गोळा करण्यात आलेला मध हा अतिशय गुणकारी ठरतो. सकाळी रोज एक चमचा मध अर्धा कप कोमट पाण्यात घेतल्यास घसा साफ होतो,व जळजळ कमी होते, आणि कोरडा खोकला असेल टीआर तो देखील कमी होतो.एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून तेच पाणी सलग ३ ते ४ दिवस घेतल्यास कोरडा खोकला पुर्णपणे कमी होतो.

पुदिन्याची पाने -कोरडा खोकला औषध

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / कोरड्या खोकल्यावर उपाय सांगा / कोरडा खोकला उपाय /कोरडा खोकला औषध / korda khokla
पुदिण्याची पाने

पुदिन्याच्या पानांमध्ये मेंथोल असते, जे घशातील नसांना ऍक्टिव्ह करण्याचे काम उत्तम रीत्या निभावत असते. पुदिन्याची पाने ही घश्यामध्ये जाणवणारा कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात. कोरडा खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून चहा मध्ये ४ ते ५ पुदिन्याची पाने टाकून तो चहा पिल्यास कोरड्या खोकल्यावर अगदीच आराम मिळतो आणि आपला त्रास देखील कमी होतो.

मार्शमेलो रूट – कोरडा खोकला औषध

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / कोरड्या खोकल्यावर उपाय सांगा / कोरडा खोकला उपाय /कोरडा खोकला औषध / korda khokla - मार्शमेलो रूट
मार्शमेलो रूट

कोरडा खोकला दूर करण्यासाठी मार्शमेलो रूट हा अगदी प्राचीन काळापासून करण्यात येणारा उपचार मानला जातो. मार्शमेलो रूट हे कोरड्या खोकल्या मुळे आपल्या घशातील होणारी खवखव दूर करण्यास मदत करतात. घशाच्या किंवा कफ आणि सर्दी शी निगडीत कोणत्याही समस्येसाठी , हे मार्शमेलो रूट अतिशय उपयोगी ठरते.

लोकोरिस रूट – korda khokla upay

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / कोरड्या खोकल्यावर उपाय सांगा / कोरडा खोकला उपाय /कोरडा खोकला औषध / korda khokla - लोकोरिस रूट
लोकोरिस रूट

कोरड्या खोकल्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी व कफ कमी करण्यासाठी लोकोरिस रूट हे अतिशय उपयोगी ठरते.लोकोरिस रूट टाकून तयार केलेला चहा पिल्यास घसा मोकळा होण्यास मदत होते. हा घरगुती उपाय केल्यास आपला कोरडा खोकला येण्याचा त्रास लवकरच दूर होईल. लोकोरीस रूट चा चहा हा पित्त कमी करण्यास देखील मदत करते.

हळद

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / कोरड्या खोकल्यावर उपाय सांगा / कोरडा खोकला उपाय /कोरडा खोकला औषध / korda khokla - हळद
हळद

हळद ही अॅंटीसेप्टिक म्हणून प्रभावी पणे काम करते, अँटी व्हारल आणि अँटिइन्फलेंटरी एजंट म्हणून हळद ही शरीराला कोणत्याही प्रकारचे संक्रमण रोखण्यास मदत करते. हळदीच्या योग्य वापराने श्वसन नलिकेला देखील फायदा होतो,आणि ब्रांकायटी व टॉन्सिल वर उपायकारक ठरते. हळदीच्या या गुणधर्म मुळे कोरड्या खोकल्यास आळा बसतो आणि आपल्याला आराम मिळतो.

गरम पेय

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / कोरड्या खोकल्यावर उपाय सांगा / कोरडा खोकला उपाय /कोरडा खोकला औषध / korda khokla - गरम पेय
गरम पेय

सर्दी,कफ व खोकला असणाऱ्या व्यक्तींना शरीराचे तापमान व्यवस्थित राखणे आणि हायड्रेट राहणे हे अत्यंत आवश्यक आहे. कोरडा खोकला जाणवत असल्यास गरम पेय पिल्याने घशाला आराम मिळतो आणि खोकला येणे देखील थांबतो. गरम पाणी आणि हर्बल चहा घेतल्याने घशात होणारी खवखव देखील कमी होण्यास मदत होते.

आल्याचा प्रभावी वापर

आले
आले

आले हे खोकल्यावर अत्यंत गुणकारी मानले जाते.आल्यामध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी इंफ्लेमेंटरी गुण असतात.ते इम्युनिटी वाढवतात आणि श्वसन मार्गातील अडथळे दूर करतात तसेच कफा प्रमाण कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावतात.

गाईच्या दुधाचे तूप आणि काळी मिरी

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / कोरड्या खोकल्यावर उपाय सांगा / कोरडा खोकला उपाय /कोरडा खोकला औषध / korda khokla
काळी मिरी आणि तूप

गाईच्या दुधापासून बनवलेले तूप साधारण १५ ते २० ग्राम घ्यावे,त्यामध्ये १० ते १२ काळी मिरी घेऊन एका वाटीत गॅसवर गरम करायला ठेवावी.ज्यावेळी या तुपामधील काळी मिरी फुटायला लागेल,त्यावेळी ते गॅस वरून खाली घ्यावे. गॅस वरून उतरविले ले मिश्रण जास्त वेळ तसेच न ठेवता ते थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये वाटून घेतलेली खडीसाखर मिक्स करा आणि हे मिश्रण कोरडा खोकला असणाऱ्या व्यक्तीने खावे.हे खाल्यानंतर साधारणपणे एक तास तरी काहीही खाऊ किंवा पिऊ नये.हा उपाय साधारण एक दिवसाआड करावा याने कोरडा खोकला जाण्यास मदत होते.

खडीसाखर 

खडीसाखर चघळत राहिल्याने देखील कोरडा खोकला बरा होण्यास मदत होते,इतकेच नाही तर तुम्ही खडी साखरेची पावडर करून थोड्या थोड्या वेळाने खात राहिल्यास देखील तुमचा कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो.तुम्हाला जर वरचेवर खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही नेहमी खडीसाखर जवळ ठेवावी यामुळे तुम्हाला कोरड्या खोकल्याचा त्रास होणार नाही.नियमित खडीसाखर खात राहिल्यास घशावर प्रदूषणाचा परिणाम होत नाही आणि कोरडा खोकला देखील दूर होतो.

डाळिंबाच्या सालीचा पाला

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / कोरड्या खोकल्यावर उपाय सांगा / कोरडा खोकला उपाय /कोरडा खोकला औषध / korda khokla - डाळिंबाच्या सालीचा काढा
डाळिंबाच्या सालीचा काढा

डाळिंबाची साल अथवा या सालीचा काढा करून त्यात तूप आणि सेंदव मीठ घाला.हे मिश्रण कोरडा खोकला होत असल्यास त्या व्यक्तिला खायला दिल्यास कितीही खोकला झाला असेल तरी देखील या उपायाने आपल्याला त्वरित आराम मिळतो आणि आपला कोरडा खोकला येणे बंद होते.

लवंग

लवंग आणि मध - कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय
लवंग आणि मध

कोरड्या खोकल्यावर लवंग देखील गुणकारी आहे,साधारण ५ ते ६ लवंग तव्यावर भाजून थोड्या गार झाल्यावर  चमच्याने दाबून बारीक करून किंवा जाडसर पूड करून घ्या.त्यानंतर साधारण १५ ते २० मिली लिटर मध घेऊन त्यामध्ये ही लवंग पूड मिक्स करून ठेवावी.हे तयार चाटण साधारण प्रत्येक तासाने थोडे थोडे चाटत राहिल्याने कोरड्या खोकल्यामध्ये लगेच फरक पडतो.तसेच रात्री झोपताना हे चाटण घेतल्यास रात्री झोपेत खोकल्याची उबळ येत नाही व कोरड्या खोकल्या पासून आराम मिळतो.

सारांश -कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय /कोरड्या खोकल्यावर उपाय सांगा / कोरडा खोकला उपाय / कोरडा खोकला औषध

आपल्याला जर सतत किंवा कधी कधी कोरडा खोकला येण्याचा त्रास होत असेल, यामुळे आपण त्रस्त झाले असाल तर आमच्या ” कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / कोरडा खोकल्यावर उपाय सांगा ” या लेखातील उपाय वापरुन आपला त्रास कमी करण्यात नक्की यश मिळवू शकता. त्यामुळे आपल्याला जर कोरडा खोकला येत असेल तर आपण हा लेख नक्की वाचवा.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले “कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय / कोरड्या खोकल्यावर उपाय सांगा ” कसे वाटले , हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीसीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top