घसा कोरडा पडणे उपाय | घसा कोरडा पडण्याची कारणे

घसा कोरडा पडणे उपाय (ghasa korada padane upay ) >>> घसा हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपला घसा हा आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भुमिका बजावत असतो. आपल्याला सौम्य, मृदु आणि लयबध्द आवाजात बोलण्यासाठी महत्त्वाची भुमिका ही केवळ आपला घसाच बजावत असतो. घशात कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास आपल्याला बेचैन झाल्यासारखे वाटते . त्यामुळे घसा चांगला असणे हे उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कुणाच्या ही आवाजावरून किंवा बोलण्यावरून त्याचा घसा ठिक आहे कि नाही, हे आपण समजु शकतो. लहान बाळ रडले जरी,तरी त्या बाळाच्या आवाजावरून आईला त्याचे आरोग्य लक्षात येते कारण घशामध्ये जर खरखर असेल तर लगेचच ‘कफ झाला‘ असे आपण म्हणतो.

                        घसा हा शब्द ऐकण्यासाठी जरी छोटा असला तरी त्याचे आरोग्य चांगले असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ‘‘नाक , कान, घसा चिकित्सक‘‘ ही घसाची समस्या निवारण आणि आरोग्य तपासणारी महत्त्वाची वैद्यकिय क्षेत्रातील एक शाखा आहे. घशाच्या तक्रारीवर इलाज करण्याकरीता विशिष्ट चिकित्सक असतात , यावरून आपल्या लक्षात आलेच असेल घसा हा छोटा वाटत असला तरी तो निरोगी असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच याच्या समस्येच्या शाखा विस्तृत आहेत :

परंतु काही वेळा आपल्या घशाच्या छोटया मोठया तक्रारीवर आपण घरगुती इलाज देखील करू शकतो आणि आपली घशाची समस्या नाहीशी करू शकतो त्यासाठीच आम्ही आज हा अतिशय महत्वाचा लेख घेऊन येत आहोत. तो म्हणजे “घसा कोरडा पडणे उपाय / घसा कोरडा पडण्याची कारणे /घसा कोरडा का पडतो” या विषयाच्या माहितीसोबत .

घसा कोरडा पडणे उपाय / ghasa korada padane upay
घसा कोरडा पडणे

सध्या बाहेर कोरोनाचा प्रार्दुभाव वाढलेला असल्यामुळे आपल्याला आपल्या घशाच्या कसल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही, कोणत्याही संसर्गजन्य विषाणुचे आपल्या शरीरात अंतर्गमन आपल्या नाकाद्वारे किंवा तोंडातुन घशाद्वारे होऊ शकते. त्यामुळे आपण घशाची वेळोवेळी काळजी घेणे सध्या अनिवार्य झाले आहे ,नव्हे ; आपल्या घशाची काळजी ही आपण घेतलीच पाहिजे .

                        घसा याच्या अनेक तक्रारीपैकीच एक तक्रार म्हणजे सतत सारखा ‘घसा कोरडा पडणे‘ . घसा सतत नेहमी नेहमी कोरडा पडणे, सुकल्यासारखा वाटणे, किंवा घसा ओढणे हे सर्व तक्रारीचे प्रकार आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर देखील उदभवु शकतात. सारखा किंवा नेहमी नेहमी घसा कोरडा पडणे हे काही उत्तम आरोग्याचे लक्षण नाही. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या उभ्या राहु शकतात

त्यामुळे ‘‘ घशामध्ये खवखव, घसा ओढणे, घसामध्ये जळजळ होणे किंर्वा घसा कोरडा पडणे ‘‘ या सर्व गोष्टींवर औषधोपचार घेणे किंवा काही उपाययोजना करणे अतिशय आवश्यक आहे आणि यांसाठी आजचा आमचा हा लेख आपल्याला अतिशय फायदेशीर ठरणार आहे . चला तर मग , पाहूया काय म्हणते आजची आमची माहिती….. घसा कोरडा पडणे यावर घरगुती उपायांविषयी …सर्व प्रथम आपण पाहूया, घसा कोरडा पडण्याची कारणे/ घसा कोरडा का पडतो –

घसा कोरडा का पडतो / घसा कोरडा पडण्याची कारणे :-

                        आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपण पाहतो की , गंभीर आजाराच्या तुलनेत साध्या आणि छोटया मोठया आजारांकडे आपण जरा जास्तच दुर्लक्ष करतो . हेच छोटे मोठे आजार नंतर रौद्र रूप धारण करतात आणि त्या छोटया मोठ्या समस्येचे मोठे आजार बनतात त्याचसाठी आधी आपण त्या आजाराची कारणे कोणती आहेत हे शोधले पाहिजे आणि मग त्यावर उपाय केले पाहिजे . आता आपण जाणून घेऊया, घसा कोरडा का पडतो / घसा कोरडा पडण्याची कारणे काय आहेत-

  • ऋतु बदल झाल्याने – आपण पाहतो की, ऋतु बदल झाला , म्हणजे हिवाळ्यानंतर उन्हाळा आला की , जास्त चालले तरी आपला घसा कोरडा पडतो.
  • तेलगट खाल्ल्याने – जास्त प्रमाणात तळलेले किंवा तूपगट पदार्थ खाल्ले की घसा कोरडा पडतो, सतत तहान लागते, घसा ओढतो व कोरडा पडतो.
  • इन्फेकशन झाल्याने –घशात कोणत्या प्रकारचे इन्फेकशन झाल्यास देखील घसा कोरडा पडतो.खवखवल्या सारखे वाटते आणि सतत तहान लागते.
  • सतत तोंड उघडे ठेवणे / पळणे / तोंडाने श्वास घेणे / घोरणे – या सर्व गोष्टीमुळे देखील घसा कोरडा पडतो . तोंडाने श्वास घेणे आणि रात्री झोपेत घोरणे यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि घसा कोरडा पडतो . साधारणतः या सर्व कारणांमुळे घसा कोरडा पडतो .

घसा कोरडा पडणे उपाय /(ghasa korada padane upay)

कोणतीही समस्या किंवा आजार हे गंभीर होण्याआधीच जर त्यावर घरगुती उपाय केल्यास , त्या समस्या आणि त्रास नक्कीच नाहीसा होतो किंवा घरगुती उपचार घेतल्याने पुर्णपणे कमी देखील होतो . त्याचप्रमाणे ‘घसा कोरडा पडणे‘ यावर देखील आपण स्वतः काही उपाय करू शकतो ते उपाय कोणते आहेत ते पाहूया . साधारणतः घसा कोरडा पडणे यावर खालील उपाय हे फायदेशीर ठरतात .

पाणी भरपुर पिणेः-

घसा कोरडा पडणे उपाय - भरपूर पाणी प्या
भरपूर पाणी प्या

आपल्या शरीरात ज्याप्रमाणे रक्ताचे, काल्शियम,जीवनसत्व, मूलद्रव्य यांचे प्रमाण हे बरोबर असले पाहिजे. अगदी त्याचप्रामाणे शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील बरोबर असले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक दोन तासाला अर्धा ग्लास पाणी घेतले पाहिजे. जेवण करताना देखील पाणी घेऊनच आपण जेवणाला बसले पाहिजे. योग्य प्रमाणात पाणी आपल्या शरीरात असण्यासाठी पाणी भरपुर प्रमाणात पिले पाहिजे. त्यामुळे जास्त चालले किंवा पळले तर घशाला कोरड पडणार नाही, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही आणि आपला घसा कोरडा पडणार नाही. सतत पाणी पिल्याने घशाचे कोणतेही इन्फेकशन राहत नाही .

तोंड बंद करूणच झोपावेः

घसा कोरडा पडण्याला झोपेत घोरणे हे देखील एक कारण
झोपताना तोंड बंद करूनच झोपावे

आपण पाहतो की, ब-याच वेळेस आपल्या सवयीच आपल्याला घातक ठरत असतात. सवयींचे व्यसन बनते आणि व्यसन चा लवकरच आजार बनतो. त्यामुळे आपल्याला जर काही चुकीच्या सवयी असतील ज्या आपल्या आरोग्यासाठी अयोग्य ठरू शकतात तर अशा सवयींना आपण वेळीच आळा घातला पाहिजे. ब-याच जणांना तक्रारी असतात की, सकाळी उठल्यानंतर आमचा घसा हा कोरडा पडतो,

तर या मागचे कारण कधी शोधण्याचा प्रयत्न केला का? आपल्याला असणार्‍या चुकीच्या सवयींचा आपण विचार केला का ? जर आपण रात्री झोपतांना तोंड उघडे ठेवुन झोपत असाल तर तात्काळ आपली सवय बदलावी कारण त्यामुळे आपला घसा कोरडा पडतो. झोपताना तोंड उघडे ठेऊन झोपलो तर श्वसन करताना, घोरताना घशात जास्त हवा जाते आणि शरीरातील पाणी उडते व आपला घसा कोरडा पडतो, ओढल्यासारखा वाटतो .त्यामुळे रात्री झोपताना तोंड बंद करूनच झोपावे .

गरम पाण्याची वाफ घेणेः-

वाफ घेणे - घसा कोरडा पडणे उपाय / ghasa korada padane upay
वाफ घेतल्याने देखील घसा नीट होतो

सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण सर्वांनीच गरम पाण्याचे वाफेचे आणि त्याच्या फायद्याचे महत्व बघितले त्यामुळे घसा दुखत असेल, ओढत असेल किंवा घशाचे अजुन कोणत्याही प्रकारचे इंन्फेक्शन किंवा त्रास असेल तर आपण रोज रात्री गरम पाण्याची वाफ अवश्य घ्यावी. त्यामुळे घशामध्ये जर कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरीयल इंन्फेक्शन असेल तर, ते गरम वाफेमुळे ताबडतोब घशातच नष्ट होते , शरीरात प्रवेश करण्या आधीच नष्ट होईल .कोणतेही बॅक्टेरीयल इंन्फेक्शन घशामधूनच शरीरात जाते त्यासाठी शरीरात जाण्याआधीच त्याला नष्ट करावे, त्यामुळे गरम पाण्याची वाफ घ्यावी त्याने दिवसभर घसा कोरडा देखील पडणार नाही .

गरम पाण्यात मध टाकुन घ्यावाः-

गरम पाणी आणि मध - घसा कोरडा पडणे घरगुती उपाय
मध आणि गरम पाणी

आर्युवेदीक औषध यामध्ये मध या घटकाला अतिशय महत्त्वाचे असे स्थान प्राप्त झालेले आहे. मध हा अनेक आजारांवरचा रामबाण उपाय म्हणून आणि गुणकारी औषधोपचार, गुणकारी औषधोपचारात समाविष्ट असलेला अत्यंत प्रभावी असा घटक आहे. आपला घसा जर कोरडा पडत असेल तर कोमट पाण्यात 2 चमचे मध टाकुन ते पाणी प्यावे त्यामुळे घसा हा ओलसर राहतो, दिवसभर आपल्या घशाला याने आराम आणि ओलावा मिळण्यास मदत होते.

तोंडाने श्वास घेउ नयेः-

तोंडाने श्वास घेतल्याने देखील घसा कोरडा पडतो
तोंडाने श्वास घेऊ नये

आधी सांगीतल्याप्रमाणे काही वेळेस आपल्या सवयीच आपल्याला आजाराकडे नेऊ शकतात. आपण पाहतो की , ब-याच लोकांना तोंड उघडे ठेवुन ते तोंडावाटे श्वास घेण्याची सवय असते . त्यामुळे देखील घसा कोरडा पडु शकतो. घसा कोरडा पडु नये यासाठी तोंड बंद करून श्वास घ्यावे त्यामुळे तोंडातील घशातील ओलावा हवेद्वारे कमी होणार नाही. आपल्या घशाला हवा आणि हवेतील धूलकन घासून जाणार नाहीत आणि आपला घसा हा कोरडा पडणार नाही .

खडीसाखर चघळावीः-

खडीसाखर
खडीसाखर खाल्याने घसा कोरडा पडत नाही

बर्‍याच लोकांना प्रोब्लेम असतो की चालत असताना किंवा पळत असताना अथवा सतत काम करत असताना त्यांचा घसा हाआपोआपच कोरडा पडत असतो . अशावेळी घसा कोरडा पडु नये, घशातील ओलावा कायम राहावा यासाठी खडीसाखरचे काही दाणे सतत चघळत राहावे, त्यामुळे घसा कोरडा पडणार कारण खडीसाखर तोंडात असल्याने लाळ सतत तयार होत राहील आणि घशाला ओलावा मिळेल, आणि आपला घसा कोरडा पडणार नाही .

जीभ आणि ओठ कोरडे पडु देऊ नयेः-

आपण पाहतो की, बाहेर जास्त उंष्णता असेन तर किंवा ओठाला हवा लागली तर, कुठलेही काम करत असताना आपली जीभ आणि ओठ हे कोरडे पडु शकतात . अशावेळी आपण आपल्या ओठ आणि जीभ यांची काळजी घ्यावी . सतत त्याचा ओलसरपणा हा कायम ठेवण्यासाठी पाणी प्यावे किंवा साखरेचे दाणे किंवा विलायची चघळत राहावी, त्यामुळे घशातील ओलावा हा कायम राहील व घसा कोरडा पडणार नाही. सतत दहा ते पंधरा मिनिट नंतर पाणी प्यावे . त्यामुळे जीभ आणि ओठ ओले राहतील आणि घसा कोरडा पडणार नाही .

अशाप्रकारे वरील सर्व उपाय वापरुन आपण आपला घसा कोरडा पडू नये यांसाठी प्रयत्न करू शकतो आणि आपला घसा कोरडा पडणार नाही याची काळजी घेऊ शकतो. त्याचा नक्कीच आपल्याला भरपूर फायदा होईल आणि आपला घसा सारखा कोरडा पडण्याची समस्या ही पुर्णपणे नाहीशी होईल .

सारांश -घसा कोरडा पडणे उपाय/घसा कोरडा पडण्याची कारणे/ ghasa korada padane upay

आपल्याला जर सारखा घसा कोरडा पडण्याची समस्या असेन तर, आपण आमचा आजचा वरील लेख ” घसा कोरडा पडणे उपाय ” या लेखातील काही उपाय करून आणि माहिती वाचून, आपल्याला घसा कोरडा पडणे, या समस्येचे निराकरण करू शकता. आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल .त्यामुळे आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही अवश्य करून बघा .

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले घसा कोरडा पडणे घरगुती उपाय /घसा कोरडा पडण्याची कारणे /(ghasa korada padane upay कसे वाटले , हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top