सांधेदुखीवर घरगुती उपाय / Top 17 Best Remedies

सांधेदुखीवर घरगुती उपाय/ संधीवातावर आयुर्वेदिक उपचार/ सांधेदुखी लक्षणे / संधिवाताचे प्रकार / संधिवात कशामुळे होतो / sandhe dukhi gharguti upay >> आपण पाहतो की, सांधेदुखीचा आजार हा जसे जसे आपले वय वाढते त्यानुसार जास्त डोके वर काढत असतो आणि आपल्याला सांधेदुखीचा हा त्रास जरा जास्तच जाणवतो . सांधेदुखीच्या आजारामध्ये आपल्याला चालताना , बसताना तसेच काम करताना आणि उठताना, वाकतांना सांध्यामध्ये त्रास होतो. सांधेदुखीचा त्रास सतत होत असेल तर त्यावर लवकरात लवकर निदान केले पाहिजे. काही जणांना सांधेदुखीचा त्रास हिवाळयात जास्त जाणवतेा कारण हिवाळ्यामद्धे थंडीचे प्रमाण जास्त असल्याने सांधे जास्त दुखतात. थंड वातावरणामुळे वेदना या जास्त प्रमाणात होत असतात.

संधिवात म्हणजे काय – दोन हाडे एकत्र येऊन सांधे किंवा जॉईन्टस् हे बनत असतात. सांध्याची हालचाल होत असताना तेथे असलेली दोन हाडे ही एकमेकांना न घासता अगदी सहजरीत्या या सांध्याची हालचाल होत असते मात्र; जेव्हा काही कारणांनी सांध्यातील कार्टीलेजची झीज होते तेव्हा दोन्ही हाडे ही हालचाल करत असताना एकमेकांना घासू लागतात. अशावेळी या हालचालीच्या घर्षणामुळेच तेथे सूज येणे, वेदना होणे, सांध्याची हालचाल योग्यरीत्या न होणे असे त्रास होऊ लागतात. या त्रासालाच संधिवात किंवा संधीवाताचा त्रास असे म्हणतात.

संधिवात याबद्दल अजून सांगावायचे झाल्यास, बदललेली जीवनशैली यामुळे आजकाल संधिवाताचा त्रास हा अनेकजणांना होत आहे. संधिवात यामध्ये सांध्याच्या ठिकाणी सूज येते व हालचाल करताना या सांध्यात अतिशय वेदना ही होत असते. त्यामुळेच या त्रासाला सांधेदुखी असेही म्हणतात. सांधेदुखीचा हा त्रास दार्शनिक नसला तरी अतिशय वेदनादायी असतो. म्हणजे ससंधिवात दिसत नसला तरी त्याचा त्रास मात्र सहन करणार्‍या व्यक्तिला बराच होतो.

तसे पाहिले तर संधिवात हा उतारवयात होणारा आजार आहे. कारण या काळात शरीराची तसेच सांध्यातील कार्टीलेजची सुध्दा झीज झालेली असते. त्यामुळे वयाच्या 50 शी नंतर सांधेदुखी होणे ही सामान्य बाब समजली जाते.  मात्र  आजच्या बैठया जीवनशैली व व्यायामाच्या अभाव यामुळे अगदी तरूण वयात सुध्दा हा सांधेदुखीचा त्रास अनेकजणांना होत आहे. तर आता आपण पाहूया की, संधिवात होण्याची कारणे कोणती आहेत म्हणजेच संधिवात कशामुळे होतो –

Table of Contents

संधिवात कशामुळे होतो

सांधेदुखी /संधिवात कशामुळे होतो तर आपण पाहतोय की , आजकालच्या वातावरणात आणि लोकांच्या ढासळत्या आरोग्यामुळे तसेच अयोग्य व कमी पौष्टिक जेवणामुळे, कल्शियमच्या कमतरते मुळे सर्वांना सांधेदुखीचा म्हणजेच संधिवाताचा त्रास हा जरा जास्त प्रमाणात आणि कमी वयापासूनच त्रास सुरू होत आहे. वाताचा त्रास ज्यांना होतो त्यांना त्या वाताच्या त्रासातूनच सांधेदुखीचा त्रास वाढत असतो. थंडीमध्ये हात , पाय व अवयव आखडुन जातात व कुठलेही काम होत नाही. सांधेदुखीमध्ये हाडांना जोडणारे स्नायूबंध आणि तंतु यांमध्ये दुखणे निर्माण होते तसेच हांडाभोवती असलेल्या स्नायुंना देखील तीव्र वेदना सुरू होतात आणि यातून च सांधेदुखी / संधिवात हा होत असतो . संधिवातमुळे गुडघ्यामध्ये, मणक्यामध्ये, कंबरदुखीमध्ये हाताच्या , बोटांच्या सांध्यामध्ये ही सांधेदुखी ची समस्या जास्त प्रमाणात जाणवत असते.

संधिवाताचे प्रकार / संधिवात कशामुळे होतो

 अनेक कारणांमुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.  हा त्रास म्हणजेच संधिवात होण्याची काही कारणे ही पुढीलप्रमाणे आहेत त्यामुळे ही कारणे होणे तुम्ही टाळू शकता आणि या त्रासा पासून स्वतःला वाचवू शकता. –

1. उतारवय यामुळे देखील सांध्यातील कार्टीलेजची झीज होते आणि ही झीज झाल्याने संधीवात होऊ शकतो.

2. वजन जास्त वाढल्याने संधिवात होऊ शकतो. कारण वजनाचा जास्त भार हा गुडघे किंवा खुण्याच्या सांध्यावर पडल्यामुळे तेथे सांधेदुखी होऊ लागते.

3. बैठे काम व व्यायामाचा अभाव

4. फ्रॅक्चर झाल्याने किंवा सांध्याच्या ठिकाणी दुखापत झाल्याने

5. Joint disiocation मुळे ही स्थिती होऊ शकते. यामध्ये सांधे हे त्यांच्या मुळ ठिकाणापासुन निसटतात.

6. शरीरातील हार्मोनल बदल, रजोनिवृत्ती यांमुळे कॅल्शिअमची कमतरता होत असल्याने पुरूषांपेक्षा स्त्रिंयामध्ये ओस्टिओ आर्थराईटीस होण्याची जास्त शक्यता असते.

7. कुटूंबातील व्यक्तींना संधिवात असल्यास अनुवांशिकता मुळे देखील संधिवात होण्याचा धोका अधिक असतो.

संधिवाताच्या प्रकारानुसार आणि रोगाच्या स्वरूपानुसार वरील काही लक्षणे असु शकतात. परंतु संधिवात याचे प्रामुख्याने खालील काही अगदी ठळक लक्षणे ही जाणवत असतात.         

सांधेदुखी लक्षणे

सांधेदुखी हा असा आजार आहे की, ज्यामध्ये व्यक्ती मरत नाही किंवा त्याला कुठल्या हॉस्पिटल मध्ये अॅडमिट देखील व्हावे लागत नाही ; पण या आजारामुळे पाय निकामी झाल्यासारखे वाटते , जड पडतात ,किंवा लुळे पडतात. उठण्या – बसण्यास , वाकण्यास तसेच चालायचा त्रास होतो , जिना म्हणजे पायर्‍या चालणे तर अगदी अशक्य प्रायः बनते .साध्य व सोप्या भाषेत म्हणायचे तर सांधेदुखीचा आजार हा व्यक्तीला उठण्या – बसण्यास तसेच चालण्यास म्हणजेच त्यांची दैनंदिन कामे करण्यास बाधक ठरतात , त्रासदायक ठरतात .

सांधेदुखी लक्षणे

साधारणपणे संधिवात याची खालील लक्षणे ही पाहावयास मिळतात.

  • सांधे दुखू लागतात
  • सांध्यावर सूज येते
  • सांध्यांच्या ठिकाणी स्पर्श केल्यास वेदना अधिक जाणवते.
  • सांधे जखडणे
  • सांध्यातील कार्टीलेजची झीज झाल्यामुळे हाडे एकमेंकावर घासल्यामुळे
  • त्यातुन कट – कट असा आवाज येणे
  • सांध्यात पाणी होणे

अधिक दिवस संधिवाताचा त्रास असल्यास सांधे वेडीवाकडी देखील होऊ शकतात. यासारखी लक्षणे संधिवातामध्ये प्रामुख्याने असतात.

संधिवाताचे प्रकार

संधिवाताचे 200 पेक्षा अधिक वेगवेगळे प्रकार असतात. त्यातील काही प्रमुख संधिवाताचे प्रकार हे खालील प्रमाणे आहेत –

  • अर्थराइटीस सांधेसुज
  • रूमेटाॅयड अर्थराइटीस आमवात
  • गाउट अर्थराइटीस वातरक्त
  • सोरायसिसमुळे होणारी सांधेदुखी
  • इन्फेक्शनमुळे होणारी रिएक्टिव अर्थराइटीस
  • स्पोंडीलायटीस

सांधेदुखी म्हणजेच संधिवात सांधेदुखीचा त्रास होण्याचा दुष्परिणाम म्हणजे हा आजार लागला की अनेक वर्षे हा आजार व्यक्तीच्या शरीराला चिकटुन राहतो , याचा त्रास उपाय केला किंवा ईलाज केला तर लागलीच कमी होत नाही परंतु आम्ही आज असे काही सांधेदुखीवर उपाय सांगणार आहोत की, जे तुम्हाला तुमच्या सांधेदुखीच्या त्रासाला तुमच्या शरीरापासून कायमचे दूर करू शकेन.

सांधेदुखीच्या त्रासाचे गांभीर्य आणि परिणाम लक्षात घेऊनच आम्ही घेऊन आलो आहोत एका अतिशय महत्वपूर्ण माहिती सोबत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल ” सांधेदुखीवर घरगुती उपाय / संधीवातावर आयुर्वेदिक उपचार” या विशेष लेखासोबत. चला तर पाहूया, सांधेदुखीवर घरगुती उपायां विषयी …

सांधेदुखीवर घरगुती उपाय / संधिवातावर आयुर्वेदिक उपचार

संधीवातावर आयुर्वेदिक उपचार
संधीवातावर आयुर्वेदिक उपचार

ओवा आणि एरंडेल तेल -संधिवातावर आयुर्वेदिक उपचार

 जर सांधेदुखीचा त्रास होत असेल तर एक वाटी ओवा घ्यायचा एंरडेल तेल जे की, बाजारात कुठेही मिळते ते घ्यायचे व एक सुती कॉटनचा कपडा घ्यायचा त्यावर थोडे एंरडेल तेल शिंपडायचे त्यावरच ओवा टाकायचा व त्याची पुरचुंडी तयार करून घ्यायची व ही पुरचुंडी तव्यावर ठेवून गरम करून घ्यायची आणि हलकीशी ही पुरचुंडी गरम झाल्यावर जिथे सांधा दुखत आहे तिथे हळूहळू याने शेकावे . एरंडेल तेल आणि ओवा याने शेकल्याने सांधेदुखीचा त्रास ब-याच प्रमाणात कमी होतो आणि हळू हळू नाहीसा देखील होतो .

तीळ -सांधेदुखी घरगुती उपाय (sandhe dukhi gharguti upay )

सांधेदुखीवर घरगुती उपाय/ संधीवातावर आयुर्वेदिक उपचार/ sandhe dukhi gharguti upay - तिळ
तीळ – सांधेदुखीवर घरगुती उपाय / संधीवातावर आयुर्वेदिक उपचार / sandhe dukhi gharguti upay

तीळ आणि तीळ तेल हे देखील सांधेदुखी , हाडांचे दुखणे यावर उपयोगी येते . तीळ हे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात . तीळचा समावेश आपल्या आहारात केल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर आणि सांधेदुखीच्या त्रासावर चांगलाच अनुकूल परिणाम होतो आणि आपली त्या त्रासाची तीव्रता ही कमी होते . तीळमध्ये असणार्‍या अनेक गुणधर्म माहीत असल्यानेच आधीच्या काळी बाहेरच्या मसाल्याएवजी भाजी मध्ये चव येण्यासाठी आणि आळून येण्यासाठी तीळ वापरात .नैसर्गिक स्वरुपात बनवलेले तिळाचे तेल घ्यावे , आणि ते दुखत असलेल्या जागेवर , सांध्यावर , नियमित मसाज करत लावल्याने देखील सांधेदुखीचा त्रास कमी होऊन वेदना कमी होतात आणि आपली हाडे मजबूत होण्यास सुरुवात होते .

गाईच्या दुधाचे तूप – सांधेदुखीवर घरगुती उपाय

सांधेदुखीवर घरगुती उपाय/ संधीवातावर आयुर्वेदिक उपचार - गाईचे तूप
गाईच्या दुधाचे तूप

आपल्या घरात सायीचे लोणी करून तुप बनवले जाते , साय यामध्ये दुधातील भरपूर कल्शियम असते , आणि तूप केल्यास हे कल्शियम बर्‍याच प्रमाणात तुपात येते त्यामुळे तुपाचा योग्य वापर आपल्या आहारामध्ये केल्यास शरीरातील स्नायु बळकट होतात , कल्शियम चे प्रमाण वाढते आणि सांधेदुखीचा त्रास जास्त प्रमाणात होत नाही. कारण लोणी मध्ये दुधातले भरपूर कल्शियम उपलब्ध असते . तुम्ही यामध्ये गायीच्या तुपाचा किंवा म्हशीच्या तुपाचा वापर करू शकता पण ; तुप हे नैसर्गिकच असावे त्यामध्ये कुठलीही मिळावट नसावी. तुपामुळे उर्जा मिळते आणि आपली हाडे देखील बळकट होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

गरम दुध व लसूण

लसूण हा आधीच्या काळापासूनच संधिवात आणि इतर वाताचे प्रकार यासाठी वापरला जातो. लसूण संधिवात यावर आयुर्वेदिक उपचार म्हणून वापरण्यासाठी, दुधात लसणाच्या 3 ते 4 पाकळया घालून हे दूध उकळावे आणि कोमट झाल्यावर ते दुध प्यावे. या नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाया मुळे देखील संधिवाताचा त्रास हा लवकर कमी होण्यास मदत होईल.

गरम दुध व हळद

सांधेदुखीवर घरगुती उपाय/ संधीवातावर आयुर्वेदिक उपचार/ sandhe dukhi gharguti upay - हळदीचे दूध
हळदीचे दूध – सांधेदुखीवर घरगुती उपाय/ संधीवातावर आयुर्वेदिक उपचार

आपल्याला जर थंडीच्या दिवसात किंवा थंडीत संधिवात याचा त्रास होत असेन तर आपण दिवसातुन दोन वेळा हळद घालुन गरम केलेले दूध प्यावे, यामुळे आपल्या सांध्यावर आलेली सूज कमी होईल आणि आपली सांधेदुखी ही वेदना कमी होण्यास मदत नक्कीच मदत होईल.

मेथीचे व डिंकाचे लाडू -संधीवातावर आयुर्वेदिक उपचार

सांधेदुखीवर घरगुती उपाय/ संधीवातावर आयुर्वेदिक उपचार/ सांधेदुखी लक्षणे / संधिवाताचे प्रकार / संधिवात कशामुळे होतो / sandhe dukhi gharguti upay
डिंकाचे लाडू – सांधेदुखीवर घरगुती उपाय/ संधीवातावर आयुर्वेदिक उपचार

समजा, तुम्हाला अशक्तपणा आला आहे आणि त्यामुळे तुमचे सांधे दुखत आहेत तर यासाठी तुम्ही मेथीचे व डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसामध्ये नियमित खाल्ल्यास तुमचा अशक्तपणा हा भरपूर प्रमाणात दूर होऊन तुमचे हाडे देखील बळकट होऊन सांधेदुखी पुर्णपणे थांबते . मेथीमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्म असतात जे की आपले स्नायु मजबुत करण्यास मदत करतात तसेच डिंकाचे लाडुमध्ये अनेक प्रकारचे सुके मेवे टाकले जातात त्यामुळे आपल्याला योग्य ती ऊर्जा मिळण्यास मदत होते आणि सांधेदुखी कमी होण्यास देखील मदत होते तसेच आपले हाडे आणि स्नायू देखील बळकट होतात , त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात मेथीचे व डिंकाचे लाडू खावे याने आपल्याला हिवळ्याच्या दिवसात सांधेदुखीचा त्रास लाडूतून ऊर्जा मिळाल्याने फारसा जाणवणार नाही .

मेथीचे दाणे

सांधेदुखीवर घरगुती उपाय - मेथीचे दाणे
मेथीचे दाणे

संधिवात या आजारावर आणि त्रासावर मेथी चे दाणे हे देखील उत्तम आयुर्वेदिक उपचार म्हणून चांगलेच काम करते. आपल्याला जर संधिवात हा त्रास होत असेन तर आपण दररोज सकाळी अर्धा चमचा मेथीचे दाणे चावून खावेत. मेथी दाणे हे अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. मेथी या रात्री भिजू घालाव्या आणि सकाळी साखर टाकून चावून खाव्या. यामुळेही संधीवाताचा त्रास लवकर कमी होण्यास मदत होईल.

नियंत्रणात जेवण करावे

रात्री उशीरा पोटभर खाऊन तसेच झोपल्याने देखील बरेसचे नुकसान होते तसेच वजन जास्त असेल तर आपल्या पुर्ण शरीराचा भार आपल्या पायांवर पडतो व यातुनच सांधे देखील दुखतात याचाच त्रास हेाऊ नये , यासाठी रात्री हलकेसे अन्न सेवन करावे , नियंत्रणात जेवावे तसेच नियमित चालावे त्याचबरेाबर रोज एक तास मोकळ्या हवेत फिरावयास जावे. नियमित व्यायाम करावा.असे केल्यास सगळयाच आजारापासुन सुटका होण्यास मदत होईल.

योगासणे करावे

सांधेदुखीवर घरगुती उपाय/ संधीवातावर आयुर्वेदिक उपचार/ सांधेदुखी लक्षणे / संधिवाताचे प्रकार / संधिवात कशामुळे होतो / sandhe dukhi gharguti upay - योगासणे
योगासणे

योगासने करणे हे अनेक आजारावर नियंत्रण ठेवण्याचा आणि स्वताःला आजारा पासून देर ठेवण्याचा अगदी रामबाण उपाय आहे. त्यामुळे आपण दररोज व्यायाम करावा. त्यामुळे स्नायु व सांधे बळकट होतात आणि आपल्या दैनंदिन जीवनात काम करत असताना सुरळीतपणे काम करण्यास मदत करतात. व्यायामात रोज सकाळी अर्धा तास चालण्यास जावे. तसेच जॉगिंग, सायकलिंग , पोहणे, योगासने असे व्यायाम देखील आपण करू शकता.

वजन वाढणे यावर नियंत्रण ठेवणे

आपल्याला जर संधिवात किंवा हाडांचे इतर आजार होऊ नये असे वाटत असेल तर आपण आपल्या वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवावे, कारण वजन जास्त प्रमाणात वाढले तर त्यांचा विपरीत परिणाम हा थेट हाडांवर होत असतो. आपल्या पायांच्या घोट्यावर आणि गुडघ्यावर तान पडू शकतो त्यामुळे आपण आपले वजन जे जास्त प्रमाणात वाढु देऊ नका. वजन आटोक्यात कसे ठेवावे ते जाणून घ्या आणि त्यानुसार नियोजन करावे.

निरगुडीची पाणे – सांधेदुखीवर घरगुती उपाय

सांधेदुखीवर घरगुती उपाय/ संधीवातावर आयुर्वेदिक उपचार/ sandhe dukhi gharguti upay - निरगुडीची पाणे
निरगुडीची पाणे

    निरगुडीची पाने घ्यावीत व एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते गॅसवर उकळायला ठेवावे आणि त्यामध्ये निरगुडीचे पाने टाकावीत आणि ते वाफ निघे पर्यन्त उकळून घ्यावीत व त्या निघत असलेल्या वाफेने सांधे शेकावेत याने काय होत की, सांध्या वर आलेली सुजही कमी होते आणि होत असलेल्या वेदना सुद्धा बर्‍याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते . अशाप्रकारे , निरगुंडीची पाने वापरुन आपण सांधेदुखीपासून आराम मिळवू शकतो .

एरंडाची पाणे

 सांधा दुखत असेल किंवा सुजला असेल ,तर सुज आणि वेदना कमी करण्यासाठी एरंडाची पाने घ्यावीत . येरांडची पाने गरम पाण्यात वाफवून घ्यावीत आणि ती कुटावीत म्हणजेच त्याची पेस्ट बनवावी आणि जिथे सांधा दुखतआहे तिथे ती कुटलेली किंवा पेस्ट केलेली पाणे ठेवावीत आणि त्यावर एक कपडा गच्च बांधून ठेवावा याने त्या जागी होत असलेल्या वेदना पुर्णपणे कमी होतात आणि सांधेदुखी कमी होते .

बडीशोप -सुंठ-येरंड तेल यांचे मिश्रण – संधिवात दूर करते

सांधे जर दुखत असतील तर अर्धी वाटी बडीशोप घ्यावी , एक छोटा सुंठीचा तुकडा घ्यावा आणि चार कप पाणी घ्यावे आणि एंरडीचे तेल घ्यावे .याचा उपयोग पुढीलप्रमाणे करावा – बडीशेप आणि सुंठ पाण्यामध्ये टाकुन खदखद उकळून घ्यावे. चार कप घेतलेले पाणी हे एक कपच झाले पाहिजे इतपत ते उकळून घ्यावे व त्यामध्ये चार ते पाच थेंब एरंडीचे तेल टाकावे व ते पिऊन घ्यावे , याचप्रकारे असा प्रयोग महिना भर करावा याने हाडे बळकट होऊन सांधेदुखीचा त्रास नक्की कमी होईल आणि त्याच सोबत नंतर तुम्हाला बरेच दिवस सांधेदुखीचा त्रास होणार नाही , हळू हळू हा त्रास बंद होईल .

सुंठ पावडर आणि एरंड मूळ – सांधेदुखीवर घरगुती उपाय

सांधेदुखीवर घरगुती उपाय/ संधीवातावर आयुर्वेदिक उपचार / sandhe dukhi gharguti upay - सुंठ आणि एरंड मूळ
सुंठ पाऊडर आणि एरंड मूळ पाणी

दोन चमचे सुंठ पावडर घ्यावी आणि दोन चमचे एरंड मुळाची पावडर घ्यावी आणि हे देखील अर्धे पातेल्यात घेऊन पाणी घ्यावे आता हे सर्व मिश्रण खदखद उकळून घ्यावे आता त्याचे एक कप त्याचे पाणी होऊ दयावे व हा काढा पिऊन घ्यावा . असा काढा नियमितपणे घेतल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल याने हाडे बळकट होऊन सांध्यावर आलेली सुज कमी होऊन त्रास कमी होईल आणि आपली सांधेदुखी कायमची दूर होईल .

एरंडतेल मोहन म्हणून वापरावे

आपण नियमित जे पीठ मळतो त्या पीठात मोहन म्हणून साधे तेल टाकण्याएवजी येरंड चे तेल चार-पाच थेंब टाकावे , त्याने सांधे दुखी हळू हळू कमी होते . शेंगदाने किंवा सोयाबीन तेला एवजी येरंड तेल मोहनसाठी वापरावे कारण येरंडेल तेलात सांधेदुखी पासून मुक्त करणारे भरपूर घटक उपलब्ध असतात जे आपली सांधेदुखी दूर करण्यास बरीच मदत करतात . येरंडेल तेल आपल्या हाडास बळकट आणि मजबूत बनवते .

सुका मेवा , मांस , अंडी ,काल्शियम युक्त आहार

सुका मेवा , मांस , अंडी यात भरपूर प्रमाणात प्रोटीन , कल्शियम आणि इतर घटक हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात यामुळे, हाडांची झीज भरून काढण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहार म्हणजे दुध व दुधाचे पदार्थ तसेच सुकामेवा, मांस, अंडी, मासे यांचा आपल्या आहारात समावेश जरूर करावा. यामुळे आपली हाडे मजबूत होतात आणि आपला संधिवाता चा त्रास कमी होतो.

व्हिटामीन डी घ्यावे

आपल्याला माहीतच आहे की, सर्वात जास्त प्रमाणात व्हिटामीन डी हे कोवळया उन्हात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. सर्वात जास्त आणि योग्य प्रमाणात उन्हात असल्याने आपण कमीत कमी रोज दहा मिनिट तरी बसावे. यामुळे शरीराला व्हिटॅमिन- डी मुबलक प्रमाणात मिळते व त्यामुळे कॅल्शियमचे हाडात व सांध्यात शोषण होण्यास मदत होते व आपला संधिवातचा त्रास नक्कीच कमी होईल.

आम्ही सांगितलेले वरील सर्व उपाय हे सांधेदुखीवर अतिशय उपयोगी येणारे आहेत.

सारांश -सांधेदुखीवर घरगुती उपाय / संधिवात कशामुळे होतो / सांधेदुखी लक्षणे / संधिवाताचे प्रकार / संधीवातावर आयुर्वेदिक उपचार (sandhe dukhi gharguti upay)

आपल्याला जर सांधेदुखीचा त्रास होत असेन तर आमच्या ” सांधेदुखीवर घरगुती उपाय (sandhe dukhi gharguti upay) / संधिवात आयुर्वेदिक उपचार ” या लेखातील माहिती वाचूनआणि वर सांगितलेले उपाय वापरुन तुम्ही , सांधेदुखीच्या त्रासापासून निश्चितच आराम मिळवू शकता. आमच्या या लेखाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल .

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेली संधिवात कशामुळे होतो / सांधेदुखी लक्षणे / सांधेदुखीवर घरगुती उपाय / संधिवातावर आयुर्वेदिक उपचार / sandhe dukhi gharguti upay ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top