सुतार काम साहित्य / सुतार काम माहिती मराठी – Sutar Kam in marathi

सुतार काम साहित्य / सुतार काम माहिती मराठी / sutar kam / सुतार काम >>> सुतार काम म्हणजे मानवोपयोगी वेगवेगळ्या वस्तु तयार करण्यासाठी लाकडाचा वापर करून त्या वस्तु तयार करण्याची कला म्हणजेच सुतार काम होय. सुतार काम हे आपली कला अधिक प्रगत करण्यास मदत करते. उत्तम कलाकुसर असलेला सुतार हा अतिशय सुंदर, आकर्षक आणि आखीव- रेखीव लाकडी वस्तु बनवू शकतो आणि असे लाकडी बनवणार्‍या व्यक्तीस सुतार असे म्हणतात. Impact-Site-Verification: 6b9524bc-5c6e-4021-a646-61aa2dde726d

सुतार काम हे अगदी पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. सुतार काम पारंपारिक उद्योगधंद्यात येते. बरीच लोक परंपरागत व्यवसाय म्हणून देखील हा व्यवसाय करत असतात. सुतार काम या परंपरागत व्यवसाय मध्ये सुतार लोक लाकडाचा वापर करून नवनवीन वस्तु तयार करतात. या लाकडाच्या वस्तु बनवण्यासाठी सुतार लोक वेग-वेगळे प्रकारचे लाकूड वापरत असतात. लाकडाच्या वस्तु बनवण्यासाठी सुतार लोक त्यांची वेगवेगळ्या प्रकारे रचना करत असतात. हे लाकडाचे काम करण्यार्‍या व्यक्तीस सुतार असे म्हणतात.

सुतार काम साहित्य / सुतार काम माहिती मराठी/  sutar kam / सुतार काम
सुतार काम

सुतार कामामध्ये देखील विविध प्रकार आहेत, ते प्रकार कोणते हे आपण पुढील लेखात पाहणारच आहोत. सुतार काम हे तसे अवघडच काम आहे. सुतार कामात अनेक छोट्या-मोठ्या कामाचा समावेश होतो. या सुतार कामातील प्रत्येक कामात तरबेज होण्यासाठी अनेक दिवस आपल्याला प्राथमिक शिक्षण हे घ्यावे लागते. सुतार कामाचा प्रत्यक्ष अनुभव हा घ्यावा लागतो. परंपरागत सुतार व्यवसाय करणार्‍या लोकांना त्यांचे योग्य आकलन आणि मार्गदर्शन होऊ शकते. या सुतार कामात अनेक छोट्या- मोठ्या अशा महत्वपूर्ण गोष्टी या सामावलेल्या असतात.

सुतार काम यातील या सर्व बाबींची माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठीच आम्ही हा लेख “ सुतार काम माहिती मराठी /सुतार काम साहित्य “ आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या लेखातील माहिती सुतार काम हा व्यवसाय करायचा असल्यास देखील बर्‍याच प्रमाणात उपयोगी येईल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

सुतार काम माहिती मराठी

सुतार काम माहिती आणि सुतार काम साठी कोणते साहित्य लागते या सर्व विषयीची माहीती ही या लेखात सादर करीत आहोत, ती खालील प्रमाणे;

सुतार कामात केवळ घरगुती कामासाठी किंवा घरकामासाठीच आवश्यक अश्या वस्तु बनवण्यासाठीच वापर केला जात नाही तर, इतर अनेक जे व्यवसाय आणि काम आहेत त्यासाठी साठी देखील सुतार कामातील नाविण्याचा वापर केला जातो.

सुतार काम साहित्य / सुतार काम माहिती मराठी/  sutar kam / सुतार काम

आपण पाहतो की, शेती या व्यवसायात शेतकर्‍याला लागणार्‍या वेगवेगळ्या अवजारांचीनिर्मिती ही सुतारच करत असतो. जसे की, नागर, बैलगाडी, मोघड, वखार,चाहक्या, पाभर इत्यादी शेतीसाठी लागणारे अवजारे हे, सुतारच तयार करत असतो. ही अवजारे पूर्वी पासूनच सुतार लोकांकडून तयार करून घेतली जातात.

शेतीसाठी आणि इतर कामासाठी ज्या ज्या लहान असो वा मोठ्या लाकडी वस्तु लागणार्‍या असतात, त्या सर्व लकडी वस्तु या जास्त करून सुतार द्वारेच बनवल्या जातात. त्यामुळे जर या सर्व बाबींचा आढावा घेतलात  तर आपल्या लक्षात येईल की, सुतार रोज जवळपास 10,000 ते 20,000 रुपये देखील कमवू शकतो. त्यातच जर सुतारकाम यामध्ये जास्त कौशल्य आणि कलाकुसर असेल तर म्हणजेच उत्तम सुतरकामाची कला असेल तर, तो व्यक्ती स्वतःचा असा मोठा उद्योग देखील चालू करू शकतो, तसेच चांगल्या प्रकारे रोजगार देखील मिळवू शकतो.

सुतार काम ही एक कला आहे आणि ती जर तुमच्या अंगी असेल तर या नुसार तुम्हाला सरकारी नौकरी देखील मिळू शकेन. त्याचबरोबर तुम्हाला या कामात प्रावीण्य असेल तर तुम्ही एखाद्या फर्निचर च्या कारखान्यात देखील काम करू शकता. एवढेच नाही तर हा व्यवसाय केवळ पुरुषच करू शकतात असे नाही, ईच्छा आणि याची कला असेल तर महिला देखील हे सुतार काम करू शकतात.

आपण पाहतोय की, आज सर्वच क्षेत्रात नवीन वस्तु आणि फर्निचर ला खूप मागणी आहे. कार्यालये, शाळा, घर या सर्वच ठिकाणी आपल्याला लाकडाच्या नवनवीन वस्तु असाव्या असे वाटत असते, मग त्या कामाच्या वस्तु असो किंवा मग शो च्या वस्तु असो. त्यामुळे सुतार कामाच्या वस्तु या मागणी प्रधान्य वस्तु आहेत. सुताराचा व्यवसाय हा कामाच्या वैशिष्ट्य मध्ये येणारा एक व्यवसाय आहे, आणि आजच्या या वैशिष्ट्यपूर्ण जगात सुतार कामगारांची कमतरता जाणवते आहे.

सुतार कामगारांची आणि सुतार निर्मित वस्तूंची मागणी ही, जहाज बांधणी च्या क्षेत्रात देखील बर्‍याच प्रमाणात हे तसेच बांधकाम साईट वर देखील सुतार काम करणारे लोक आणि सुतार द्वारे बनवलेल्या वस्तु आवश्यक असतात, एव्हडेच नव्हे तर जहाज बांधणीच्या क्षेत्रात देखील सुतार कामाची गरज पडत असते. सुतार काम हे देखील वेग-वेगळ्या प्रकारात विभागले गेले आहे, ते सुतार कामाचे प्रकार कोणते आहे ते आपण आता पाहणार आहोत.

सुतार कामाचे प्रकार (Sutar Kam)

  1. मोठ्या इमारतीच्या बांधकामात लागणारे आणि कंपनीच्या कामासाठी, कमानीच्या आणि कोंकरेट च्या आधारांचे तात्पुरत्या स्वरूपाचे लाकडी काम करणे.
  2. रूळगाड्या आणि रेल्वे गाड्या, आगबोटी आणि विमान यामध्ये लागणारे लाकूड काम करणे.
  3. बैलगाड्या तसेच हातगाड्या आणि घोड्याच्या गाड्या, टांगे, मेणे व पालख्या यांसारखी वाहने ही बनवणे.
  4. लाकडी भागावर नक्षी कोरणे आणि जाळीचे काम करणे.
  5. कापटे, बेंच, टेबल, खुर्ची अश्या प्रकारचे साधे आणि मानवोपयोगी तसेच शोभिवंत आणि ऊंची फर्निचर तयार करणे.
  6. पिंजरे, दार, खिडक्या, कमानी, अशा प्रकारचे साहित्य बनवणे.
  7. शेतकामासाठी लागणारे औत. बैलगाडी, असे नांगरादी लाकडी अवजारे बनवणे.
  8. जुन्या पद्धतीच्या घराला लागणारे खांब, चौकटी, कैच्या आणि तुळया असे साहित्य तयार करून त्यांची जोडणी करणे.
  9. विविध प्रकारचे पोकळ आणि भरीव हातकाम करणे.
  10. फर्निचर साठी लागणारे गोल छेदचे नक्षीदार काम लेथ यंत्रावर कापून त्याच्यावर लाखेचे रंग देणे. त्या शिवाय हवे असल्यास त्यावर तेलातील रोगण म्हणजेच व्हार्निस बसवणे.

अशा प्रकारे सुतार कामाचे विविध प्रकार आहेत. सुतार काम वरील प्रकारे वेगवेगळ्या प्रकारात आणि टप्प्यात वाटले गेले आहे. या सुतार कामात वैयक्तिक कौशल्याला देखील अतिशय असे महत्व आहे. त्यामुळे जर सुतार कामात यश मिळवायचे असेल आणि हा व्यवसाय जोमाने पुढे न्यायचा असेल तर, तुम्हाला तुमच्यातील कौशल्य हे अधिक वाढवावे लागेल.

सुतार कामासाठी प्रत्येक प्रकारच्या कामात तरबेज होण्यासाठी, कुशल आणि कौशल्यपूर्ण कामगार होण्यासाठी आपल्याला बरीच मेहनत करावी लागू शकते, त्यासाठी बरेच दिवस देखील लागू शकतात. परंतु यश आल्यावर त्याची कसर भरून निघते. काही वेळेस तुम्हाला याचे बाहेर जाऊन प्रार्थमिक शिक्षण देखील घ्यावे लागू शकते.

वरील आपण पाहिलेले सुतार कामाचे प्रकार म्हणजे एकच सुतार ही सर्व कामे करतो असे नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे सुतार काम हा वेगवेगळा सुतार करत असतो. प्रत्येक सुतार हा स्वतःच्या आवडी नुसार, कले नुसार, सुतार कामाच्या शिक्षणाप्रमाणे विशिष्ट शाखेत काम करत असतो. हळू हळू हे काम करतच प्रत्येक सुतार त्याच्या त्याच्या क्षेत्रात पारंगत होत असतो.

भारतात पूर्वी सुतारकाम हे कौशल्याचे काम जातीनिहाय आणि पारंपारिक व्यवसाय म्हणून एका पिढी कडून दुसर्‍या पिढीला शिकवले जात असत. मात्र आता सुतार काम शिकवण्यासाठी वेगवेगळ्या संस्था या निर्माण झाल्या आहेत जसे की, आय टी आय. या सारख्या काही शासकीय तर निमशासकीय आणि खासगी संस्थाकडून देखील हे सुतार काम ईच्छुकांना शिकवले जाते, सुतार कामाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आजच्या काळात कुशल आणि परिपूर्ण कारागीर तयार होऊन या सुतार कामातून कार्यक्षमता वाढली असून या कामाला आणि व्यवसायला चालना ही मिळाली आहे.

सुतार काम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड वापरले जाते, परंतु जास्त करून बाभळी या वनस्पतीचे लाकूड हे सुतार कामात जास्त वापरले जाते, कारण बाभळीचे लाकूड हे इतर लाकडाच्या तुलनेत कडक आणि टणक असते. या लाकडाच्या वस्तु बनवले थोडे सोपे जाते तसेच आपल्या भारताच्या जवळपास सर्वच राज्यात बाभळीचे लाकूड उपलब्ध असते. प्रामुख्याने घरात आणि स्वयंपाक घरात तसेच घराचे मुख्य प्रवेश द्वार आणि चौकट यासाठी सागवण हे लाकूड वापरले जाते,

कारण या सागवण च्या लाकूडला एक प्रकारचा छान सुगंध आणि सुगंधित तेल असते, जे त्या लाकूड ला कोणतीही कीड लागू देत नाही आणि वर्षानुवर्षे चांगले राहते. त्यामुळे घरातील स्वयंपाक घर , देवघर, चौकट, मुख्य प्रवेशद्वार यांसाठी सागवाणी लाकूड वापरले जाते. सागवाण या लाकूड ला कीड लागत नसल्याने आणि याच्या पासून बनवलेल्या वस्तु जास्त दिवस टिकत असल्याने हे लाकूड इतर लाकडाच्या तुलनेत महाग असते आणि लोकप्रिय देखील असते.

आता आपण पाहूया सुतार कामात कोणते साहित्य हे वापरले जाते?

सुतार काम साहित्य / Sutar Kam Instruments

सुतार कामात खालील साहित्य वापरले जाते:

सुतार काम साहित्य / सुतार काम माहिती मराठी/  sutar kam / सुतार काम
सुतार काम साहित्य (sutar kam sahitya)

सुतार कामाचे साहित्य निवडताना अथवा खरेदी करताना तुम्हाला सर्वात आधी त्या तुमच्या कामाच्या स्वरूपाचे स्पष्ट नियोजन करता आले पाहिजे. कारण कोणतेही साहित्य त्याच्या विशिष्ट उपयोगानुसार वापरले जाते. आता हे साहित्य नेमके आहेत तरी कोणते ते आपण पाहूया.

करवत

सुतार काम साहित्य / सुतार काम माहिती मराठी/  sutar kam / सुतार काम
करवत

करवत ही सुतार कामातील महत्वाच्या साहित्यात येते. करवत चा वापर हा मुख्यतः जाड लाकूड किंवा प्लायवूड कापण्यासाठी केला जातो. करवत ही अतिशय धारदार असते. तसेच करवतीचा समोरचा भाग, ज्या आधारे लाकूड कापएलआर जाते, ते v आकाराच्या टोकदार आणि धारदार दातांसारखे असते.

डबरी करवत

सुतार काम साहित्य / सुतार काम माहिती मराठी/  sutar kam / सुतार काम

डबरी करवत ही प्रामुख्याने कारखान्यात वापरली जाते. जास्त मोठ्या आकराचे किंवा जाड असे लाकूड कापण्यासाठी तिचा वापर केला जातो. मोठ्या कारखान्यात अशा करवत या मशीन वर चालवल्या जातात.

रांदा- सुतार काम साहित्य

सुतार काम साहित्य / सुतार काम माहिती मराठी/  sutar kam / सुतार काम
रांधा

रंदा हा प्रामुख्याने कापलेल्या लाकडाचे कोपरे कापण्यासाठी वापरला जातो. रांदा हा लाकडी असू शकतो किंवा मग लोखंडी देखील मिळू शकतो.

पटाशी

सुतार काम साहित्य / सुतार काम माहिती मराठी/  sutar kam / सुतार काम
पटाशी

पटाशीचा वापर हा कापलेल्या लाकडाचा ज्यादाचा भाग अगदी सफाईने काढण्यासाठी केला जातो. तसेच लकडावर खाच पाडण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

अंबर

सुतार काम साहित्य / सुतार काम माहिती मराठी/  sutar kam / सुतार काम

अंबर याचा वापर लाकडातील वाकडे झालेले खिळे काढण्यासाठी केला जातो. अंबर हा बहुधा पक्कड सारखाच दिसतो. परंतु याचे तोंड हे पक्कड पेक्षा छोट्या आकाराचे असते.

हॅमर

हॅमर म्हणजेच हातोडी, याचा वापर हा सुतार कामात असतोच.हॅमर चा वापर सुतार काम करताना खिळे मारण्यासाठी होतो.

राऊंड फाइल

सुतार काम साहित्य / सुतार काम माहिती मराठी/  sutar kam / सुतार काम
राऊंड फाइल

राऊंड फाइल याचा वापर लाकडाचे सर्व काणे-कोपरे हे मऊ आणि गुळगुळीत करण्यासाठी केला जातो.

ऑइल स्टोन – सुतार काम साहित्य

याचा वापर सुतार कामात पटाशीला धार करण्यासाठी केला जातो.

अशा प्रकारे वरील सर्व साहित्य वापरुन सुतार लोक आणि सुतार कारागीर त्याचे काम करीत असतात आणि उत्तम अश्या लाकडी वस्तूंची निर्मिती करत असतात.

सारांश- सुतार काम साहित्य/ सुतार काम माहिती मराठी/ सुतार काम/ sutar kam

आपण देखील सुतार काम करू करण्यास ईच्छुक असाल आणि त्या विषयीची संपूर्ण माहिती ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच या लेखातील माहिती वापरुन सुतार काम शिकून मोठे उद्योजक आणि कारागीर होऊ शकता. सुतार काम हा तुमचा पारंपरिक व्यवसाय नसला तरी देखील थोडी माहिती घेऊन तुम्ही हा व्यवसाय नक्कीच सुरू करू शकता.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , सुतार काम साहित्य घरगुती माहिती / सुतार काम माहिती मराठी/ सुतार काम /(sutar kam) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top