मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे/ मासिक पाळी न आल्यास काय करावे/ मासिक पाळी न येण्याची कारणे /masik pali mahiti >>मासिक पाळी येणे म्हणजेच हा प्रत्येक मुलीमध्ये होणारा पहिला बदल आणि तो अत्यंत महत्वाचा ठरणारा असा बदल आहे. सुरूवातीला पहिल्यांदा मासिक पाळी येणे म्हणजे तरुण मुलीस तिच्या स्त्रीत्वाकडे जाण्याचा सर्वात पहिला टप्पा समजला जातो. मासिक पाळी येण्याचे हे चक्र मुलीच्या वयाच्या सुमारे 12 ते 14 वर्षापासून सुरू होते आणि ते वयाच्या 45 ते 50 पर्यंत चालू राहते. या कलावधीत बर्याच छोट्या-मोठ्या गोष्टींचा स्त्रियांना आणि मुलींना सामना करावा लागतो.
मासिक पाळी हा महिलांच्या सदृढ आरोग्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे, त्यामुळे या विषयी असणार्या सर काही समस्या आणि त्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्याही स्त्रीला किंवा महिलेला मासिक पाळी ही वेळेच्या आधी किंवा वेळेच्या नंतर आल्यास त्याचा त्रास हा होतोच आणि त्यामुळे याची कारणे आणि यावर करावे लागणारे उपाय आपल्याला माहिती असणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
आधीच्या काळी तर मासिक पाळी याबाबत खूप चुकीच्या समजुती, रूढी आणि परंपरा होत्या; परंतु आता शैक्षणिक ज्ञान आणि शिक्षणात या गोष्टींचा आभ्यास समाविष्ट झाल्याने याबाबत असणार्या गैरसमजुती आणि अज्ञान, चुकीची माहिती या सर्व बाबी कमी झाल्या आहेत. मासिक पाळीशी निगडीत अनेक समस्या आहेत आणि त्यातील च एक म्हणजे मासिक पाळी लवकर किंवा महिन्यातून दोन वेळेस येण्याची समस्या याची करणे आणि उपाय या लेखात आपण पाहणार आहोत. हा लेख आम्ही महिला आणि मुलींच्या आरोग्य विषयक समस्यांचे समाधान करण्यासाठी आणि आरोग्य तक्रारींचे निवारण करण्यासाठी सादर करीत आहोत.

मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे / masik pali mahiti
मासिक पाळीचे हे चर्क्र सुरू झाल्यानंतर हे नियमित एका cycle मध्येच चालायला हवे, म्हणजे जसे की, मासिक पाळी ही दर 27 ते 28 दिवसांनी येते आणि ती एव्हड्या कलावधीत नियमित दर महिन्याला यायला हवी, सुरूवातीला म्हणजे पहिल्यांदा जेंव्हा मासिक पाळी येणे सुरू झाल्यानंतर एक ते दोन वर्षे तो नियमित येत नसली तर ही अनियमितता एखाद वर्षे मान्य करण्याजोगी असते परंतु नंतर मात्र मासिक पाळी येणे सामान्य होऊन साधारणपणे ती 28 दिवसांनी येणे सदृद्थ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
परंतु काही कारणाने किंवा एखाद्या असणार्या समस्येमुळे मासिक पाळी हे वेळेच्या आधीच म्हणजे 15 दिवसांनी च येते आणि या लवकर येणार्या मासिक पाळी मुळे बराच त्रास आणि शारीरिक अस्वस्थतेचा सामना करावा लागतो, तर मासिक पाळी अनियमित होण्यामागे म्हणजे मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे कोणती आहेत ती आपण जाणून घेऊयात. साधरणपणे खालील कारणे ही मासिक पाळी लवकर येण्याची समजली जातात , त्यामुळे आपल्याला नेमकी कोणती कारणे आहेत हे समजणे गरजेचे आहे.
वजन कमी होणे अथवा वाढणे – मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे

जर तुमचे वजन अचानक वाढत असेल अथवा कमी होत असेल तर मासिक पाळी ही 15 दिवसांनी येऊ शकते, कारण या काळातच हार्मोन्स देखील बदलत असतात त्यामुळे बदलेल्या हार्मोन्स मुळे मासिक पाळी वेळेच्या आधी येऊ शकते. जास्त वजन असणे हे मासिक पाळी च्या येण्याच्या प्रक्रियेवर बर्याच प्रमाणात परिणाम करते, आणि त्यामुळे वजन जास्त असलेल्या स्त्रियांना अनियमित पाळी मुळे गर्भ धारनेस देखील थोडता बहुत प्रमाणात समस्या निर्माण होतात.
वाढलेले वजन जसे मासिक पाळी येण्यावर परिणाम करते अगदी त्याच प्रमाणे जर वजन कमी झाले तर त्याचा देखील हार्मोन्स वर परिणाम होऊन एक तर मासिक पाळी लवकर येत नाही किंवा मग अगदी लवकर लवकर म्हणजेच महिन्यातून दोन वेळेस, 15 दिवसलाच येते, तर वजन वाढणे आणि कमी होणे हे अशा प्रकारे मासिक पाळी अनियमित होण्याचे कारण आहे.
सतत तणावग्रस्त मनःस्थिती टाळणे – मासिक पाळी न आल्यास काय करावे

तुमचे मन हे तुमच्या शरीरावर परिणाम करते हे काही खोटे नाही, तुमच्या मनावर कुठला ताण असेल तर, तुमचे कोणत्याही कामात देखील मन लागत नाही तसेच अशक्तपणा आणि नैराश्यता जाणवते, याचे कारण म्हणजे, जेंव्हा तुम्ही बर्याच ताण आणि टेंशन मध्ये असतात तेंव्हा सतत घेत असलेल्या तणावामुळे तुमच्या रक्तातील स्टेस्स हार्मोन्स वाढतात आणि त्याचा परिणाम सरळ तुमच्या मासिक पाळी येण्यावर होतो, म्हणून सतत तणावग्रस्त मनःस्थिती हे मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याचे कारण ठरू शकते.
थायरोईड्स आजार असल्यास

थायरोइड्स ग्रंथी द्वारे मासिक पाळी साठी आवश्यक संप्रेरक तयार होऊन नियंत्रित केले जातात. त्यामुळे थायरोइड्सशी निगडीत आजार असल्यास, थायरोइड्स कमी कार्यरत असल्यास प्रोजेस्ट्रोल आणि इस्ट्रोजेण हे दोन संप्रेरक मासिक पाळी अनियंत्रित होण्यास कारणीभूत ठरतात. काही वेळा हायपरथायरोइड्स मुळे पाळी उशिरा येते आणि जास्त रक्तस्त्राव होतो तर मासिक पाळी लवकर लवकर येते.
रक्त पातळी सारखी बदलत असल्यास

आपल्या शरीरातील रक्तपातळी ही योग्य प्रमाणात असण्याला सुद्धा महत्व आहे, शरीरातील रक्त हे सर्व कार्यास पुरववले जाते आणि शरीराला नियमितता येते. मानवी शरीरात पुरूषांचे रक्ताचे प्रमाण 12 ते 14 ग्राम रक्त असावे आणि स्त्रियांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण 10 ते 12 असावे, परंतु काही वेळेस जेंव्हा स्त्रियांच्या शरीरात ही रक्ताची पातळी कमी किंवा अचानक जास्त होते तेंव्हा त्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो.
PCOS चे संक्रमण झाल्यास -मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे

PCOS म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा हार्मोनल रोग आहे. यामुळे महिन्यातून दोन वेळेस म्हणजे 15 दिवसांनी मासिक पाळी येते. PCOS म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हेरियन सिंड्रोम, याचे जर शरीरात संक्रमण झाले तर त्याचा थेट परिणाम मासिक पाळी वर होत असतो आणि मासिक पाळी महिन्यातून दोन वेळेस येते. स्त्री- रोग तत्ज्ञच्या मते, हा लवकर लक्षात न येणारे कारण आहे, मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याचे.
जास्त ओझे असलेले सामान उचलणे
जास्त ओझे किंवा अवजड सामान जर उचलले गेले तर ओटी-पोटावर आणि गर्भ पिशवी वर अतिरिक्त तान पडून, महिन्याला मासिक पाळी येण्या एवजी 15 दिवसालाच येते. जास्त ओझे उचलले गेले तर गर्भ पिशवी आणि पोटातील इतर स्नायू यांना तान पडून तुमची मासिक पाळी हे अनियमित होऊन लवकर येऊ शकते, त्यामुळे जास्त ओझे असलेले सामान उचलणे टाळावे, कारण हे एक पाळी लवकर येण्याचे कारण आहे.
कर्करोग झाला असल्यास
गर्भ पिवशी ही मासिक पाळी व्यवस्थित येण्यासाठी निरोगी असणे हे अत्यंत महत्वाचे आह. त्यामुळे गर्भ पिशवीला जर कर्करोग ची लागण झाल्यास तरी देखील मासिक पाळी ही 15 दिवसांनीच येते आणि मासिक पाळी वेदनादायक देखील वाटू लागते, त्यामुळे हे एक मासिक पाळी लवकर येण्याचे तसेच अनियमित होण्याचे गंभीर कारण समजले जाते. याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ नये आणि समस्या जास्त वाढू नये त्यासाठी त्वरित डॉक्टरांना भेट द्यावी.
गर्भाशयात गाठी/ फाईब्रोइड्स झाल्यास

महिलाच्या गर्भाशयात फाईब्रोइड्स होणे सध्या यांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे आणि हे सामान्य देखील झाले आहे परंतु याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण याचे गंभीर परिणाम देखील उद्भवू शकतात. ही समस्या वयाच्या 40 शी नंतर जास्त करून निर्माण होते, हा एक कॅन्सर नसलेला ट्यूमर आहे यास गर्भाशयच्या गाठी असे देखील म्हणतात. ह्या कारणामुळे मासिक पाळीत जास्त राक्त्स्त्राव आणि वेदना होऊ शकतात तसेच वेळप्रसंगी गर्भ पिशवी देखील काढून टाकावी लागू शकते. या कारणामुळे महिन्यातून दोन वेळेस किंवा अधिक वेळेस देखील मासिक पाळी येऊ शकते.

गर्भ पिशवी वर सूज आल्यास
गर्भ पिशवीला ईजा होणे, जखम होणे किंवा गर्भ पिशवीत काही समस्या निर्माण झाल्यास देखील महिलाच्या गर्भ पिशवीवर सूज येऊ शकते आणि गर्भ पिशीवीशी निगडीत कोणतीही समस्या निर्माण झाली तरी त्याचा थेट परिणाम हा मासिक पाळीवर होत असतो. त्यामुळे गर्भ पिशवीवर सूज येणे हे कारण देखील मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याचे एक कारण आहे. त्यामुळे कधीही अशी समस्या वाटत असल्यास सोनोग्राफी करावी जेणे करून त्यानुसार आपल्याला विलाज करता येईल. गर्भ पिशवी वर सूज येण्याचे कारण देखील बरेच असू शकतात.
अल्सर झाला असल्यास- मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे
अल्सर हे देखील मासिक पाळी लवकर येण्याचे आणि अनियमित होण्याचे एक महत्वाचे कारण आहे. अल्सर म्हणजे काय तर, पोटातील लहान आतड्याला जखम होणे किंवा आतडयात काही समस्या निर्माण होणे होय, अल्सर ची समस्या ही पोटातील लहान आतड्यांशी संबंधित आहे. आतड्यांशी संबंधित असा महिलांच्या पोटात जर अल्सर चा आजार झाल्यास देखील मासिक पाळी 15 दिवसांनी येऊ शकते.
राजोनिवृत्ती जवळ आली असल्यास – masik pali mahiti
निसर्ग नियमांनुसार प्रत्येक स्त्रीला वयाच्या तरुणपणात चौदाव्या वर्षापासून ते पंचेचाळीस ते पन्नास वर्षापर्यंत मासिक पाळी येत असते. या वर्षांनंतर मासिक पाळी येणे बंद होते त्यालाच राजोनिवृत्ती म्हणतात. या एवढ्या कलावधीत जर चाळीस -पंचेचाळीस वर्षापर्यंत मासिक धर्म नियमित वेळोवेळी 28 दिवसांच्या अंतराने येत असेल आण अचानक चाळीशीनंतर 15 दिवसांनी किंवा लवकर येणे, जास्त रक्तस्त्राव होणे अशा समस्या जाणवत असतील तर त्याचे कारण राजोनिवृत्ती जवळ आली असल्यास, ही समस्या उद्भवू शकते.
तर ही वरील सर्व झाली मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे ; परंतु काही वेळेस मासिक पाळी वेळेवर येत नाही, संपूर्ण महिना संपल्या नंतर देखील बर्याच दिवसांनी येते, तर याचे कारण काय आहे, हे देखील आपल्याला माहीत असायला हवे.

मासिक पाळी न येण्याची कारणे
नियमित मासिक पाळी येणे हे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. काही नैसर्गिक कारणाने मासिक पाळी न आल्यास ते चिंतेचे कारण नसते; परंतु काही वेळा मासिक पाळी न येणे, हे शारीरिक आणि अंतर्गत समस्येचे लक्षण देखील असु शकते त्यामुळे याचे कारण जाणून घेतले पाहिजे, प्रामुख्याने मासिक पाळी न येण्याची खालील कारणे आहेत.
- थायरोइड्स किंवा मधुमेह असणे – थायरोइड्स हा आजार हार्मोन्स वर परिणाम करतो, त्यामुळे पूर्ण महिना भरात मासिक पाळी न येण्याचे सर्वात महत्वाचे कारण हे थायरोइड असणे हे आहे.
- शरीरा मध्ये रक्त कमी असणे – शरीरात आवश्यक तेवढी रक्ताची पातळी नसेल, तर देखील मासिक पाळी येत नाही. साधारण पाने ज्या महिलाना केवळ 6 किंवा 7 ग्राम रक्त असते त्यांना ही मासिक पाळी न येण्याची समस्या येऊ शकते.
- गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केलेले असणे – बर्याच महिला या गर्भ राहू नये साठी गर्भ निरोधक गोळ्या घेत असतात, आणि त्या 28 दिवसापेक्षा जास्त घेतल्या गेल्यास, हे देखील मासिक पाळी न येण्याचचे कारण बनतात.
- हार्मोनल असंतुलन होणे – शरीरातील हार्मोनल असंतुलन होणे हे देखील मासिक पाळी लवकर न येण्याचे आणि महिना महिना न येण्याचे एक कारण आहे. महिलांच्या हार्मोन वरच त्यांच्या मासिक पाळी चा कालावधी अवलंबून असतो.
- जास्त व्यायाम करणे – शरीरला आवश्यक त्या पेक्षा अधिक कसरत किंवा व्यायाम केल्यास देखील मासिक पाळी लवकर येते किंवा संपूर्ण महिना येत नाही.
- गरोदर राहणे – हे देखील एक मासिक पाळी न येण्याची कारणे यात महत्वाचे कारण आहे. गर्भ धारणा झालेली असल्यास देखील मासिक पाळी येत नाही, त्यामुळे मासिक पाळी ची डेट चुकल्यास 4 ते 5 दिवसात गर्भ निदान चाचणी करून घ्यावी.
- प्रसूती नंतर स्तनपाण करणे – प्रसूती नंतर बाळाला स्तन पान करत असताना, शरीरातील हार्मोन्स आणि रक्ताची पातळी ही कमी अधिक होत असते आणि त्यामुळे देखील मासिक पाळी येण्यास अडथळा येऊ शकतो.
- PCOS असणे – PCOS म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा हार्मोनल रोग आहे. यामुळे महिन्यातून दोन वेळेस म्हणजे 15 दिवसांनी मासिक पाळी येते किंवा संपूर्ण महिनाभर देखील मासिक पाळी येत नाही.
साधारणपणे वरील सर्व कारणे ही, मासिक पाळी न येण्याची आहेत, या सर्व कारणांमुळे मासिक पाळी वेळेवर येणे चुकते आणि इतर समस्या ह्या यामुळे निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी शक्य असल्यास ज्या काही चाचण्या कराव्या लागत असतील त्या करून घ्याव्यात. महिलांच्या वयाच्या 45 ते 50 पर्यंत नैसर्गिकरीत्या राजोनिवृती येई पर्यंत नियमित आणि वेळेवर मासिक पाळी येणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
सारांश – मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे / मासिक पाळी न येण्याची कारणे/ मासिक पाळी न आल्यास काय करावे
तुम्हाला जर असा मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याचा त्रास असेल तर किंवा महिन्यातून दोन वेळेस मासिक येत असेल तर त्याचे कारणे ही वरील लेखात सांगितलेले असू शकतात, त्यामुळे यावर लवकर उपचार करावेत, कारण जर मासिक पाळी 15 दिवसांनी येत असेल तर त्यामुळे तुम्हाला अतिशय शारीरिक थकवा जाणवू शकतो. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर यावर उपाय आणि उपचार करावेत.
आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेली, ” मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे ” ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (9) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (9) पोट (15) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)
I’m gone to say to my little brother, that he should also pay a visit this weblog on regular basis to get
updated from newest gossip.