रेशीम उद्योग माहिती मराठी – 12 Main Steps & Government Grants

रेशीम उद्योग माहिती मराठी/ रेशीम धागा निर्मिती उद्योग/ रेशीम उद्योग अनुदान 2024>>> रेशीम उद्योग हा कापड निर्मिती उद्योगाशी निगडीत असा व्यवसाय म्हणजेच उद्योग आहे त्याच बरोबर हा व्यवसाय शेतीशी पूरक व्यवसाय म्हणून देखील केला जातो. रेशीम उद्योग हा व्यवसाय ज्याप्रमाणे कुकुट पालन किंवा गाई म्हशी पालन करून दुग्ध व्यवसाय म्हणून केला जातो त्याचप्रमाणे तुतीचे शेती करून आणि किक संगोपन करून रेशीम व्यवसाय केला जातो. तुतीची शेती करून आणि जवळ आहे त्या साधना द्वारे, अगदी कमी मजुरांच्या सहाय्याने आपण शेतीशी निगडीत हा रेशीम उद्योग करू शकतो.

रेशीम च्या वाढत्या मागणीमुळे सध्या हा व्यवसाय भारतात अतिशय वेगाने पुढे जात आहे. रेशीम उद्योगा च्या विकासात भारताने पश्चिमात्य देशांना देखील मागे टाकले आहे. आपल्याला माहितच आहे की, रेश्मी वस्त्र हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात महाग असे वस्त्र आहे, त्यामुळे या रेशीम उद्योग आणि धागा निर्मिती केल्याने, या व्यवसायातून आपल्याला बराच फायदा होऊ शकतो आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आणि माहितीची गरज असते आणि सर्व सर्व माहिती आपल्या पर्यंत पोहचवून आपल्या व्यवसायला योग्य दिशा देण्यासाठी आम्ही हा “रेशीम उद्योग माहिती मराठी/ रेशीम धागा निर्मिती उद्योग” लेख घेऊन आलो आहोत.

रेशीम उद्योग हा व्यवसाय विविध मार्गाने केला जातो. आपण रेशीम हा शेती शी निगडीत व्यवसाय करून खूप जास्त प्रॉफिट म्हणजेच नफा हा मिळवू शकतो. त्यासाठी फक्त आपल्याकडे माहिती पाहिजे. त्याच बरोबर व्यवसाय हा तोच निवडावा ज्यात आपल्याला आवड आहे अन्यथा व्यवसायावर दुर्लक्ष  होईल. आपला व्यवसाय मोठा करण्यासाठी नव नवीन संधीचा लाभ घ्यावा. व्यवसायासाठी आर्थिक नियोजन करणे हे देखील महत्वाचे असते. बँक कडून कर्ज घेऊन आर्थिक सोय करता येते. त्याच बरोबर सरकार तर्फे विविध व्यवसाया साठी कर्ज पुरविण्याच्या योजना देखील राबविल्या जात असतात या सर्व योजनांची माहिती घ्यावी आणि योजनांचा लाभ घ्यावा.

रेशीम उद्योग माहिती मराठी/ रेशीम धागा निर्मिती उद्योग/ रेशीम उद्योग अनुदान 2024
रेशीम उद्योग माहिती मराठी / रेशीम धागा निर्मिती उद्योग

रेशीम व्यवसाय कसा करावा, तुतीची शेती कशी करावी, रेशीम धागा निर्मिती कशी करावी आणि सरकार कडून रेशीम उद्योग अनुदान काय मिळते, या सर्व बाबींची माहिती घेऊन तुम्ही या व्यवसायात यशस्वी नक्कीच होऊ शकता. तरी या व्यवसायाची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया

रेशीम उद्योग माहिती मराठी/ reshim udyog

रेशीम उद्योग करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुतीच्या झाडांची शेती लावावी लागते. परंतु हि शेती करण्याआधी याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. आजच्या काळात तर तुतीची शेती करून आणि रेशीम उद्योग करून ग्रामीण भागात बरेच लोक पुढे गेले आहेत. रेशीम उद्योगात, रेशीम कोष तयार करण्याआधी एक संगोपन गृह देखील तयार करावे लागते ज्यात तुतीच्या झाडावरील आळया या त्यांच्या थुंकीपासून रेशीम चे कोष तयार करतात, त्यासाठी त्यांना जीवंत राहण्या योग्य वातावरण या गृहात ठेवले जाते, जर तुमच्या भागात जास्त ऊन असेल तर तिथे थंड राहण्यासाठी कूलर लावले जाते आणि तेथील वातावरण थंड ठेवेल जाते.

रेशीम उद्योग माहिती मराठी
तुतीची शेती – रेशीम शेती माहिती

रेशीम आळयांच्या संगोपणासाठी, या संगोपन गृहात जास्त गरमी आणि थंडी दोन्ही असू नये. त्यामुळे या गृहाच्या भिंती या जरा जाड बांधाव्यात. शेतीच्या उत्तर दक्षिण दिशेला हे गृह असावे, जेणे करुन गृहावर सूर्यप्रकाश जास्त पडणार नाही आणि तुतीची शेती म्हणजे तुतीचे झाडे पूर्व-पश्चिम दिशेला लावावे. तसेच हा व्यवसाय करण्यासाठी शेतीची जागा ही रस्त्यावरची किंवा जास्त वाहतूक असलेल्या जागची असू नये कारण वाहतूक मुळे तुतीच्या झाडाच्या पानांवर धूळ बसते आणि त्यामुळे ही पाणे आळयांना खाण्यायोग्य राहत नाही. त्याचबरोबर शेतीतील इतर कीटकनाशक फवारावे लागणार्‍या पिकाजवळ देखील तुतीची लागवड करू नये, कारण कीटकनाशक फवारल्यास आळया देखील मरतील.

रेशीम उद्योग माहिती मराठी/ रेशीम धागा निर्मिती उद्योग
रेशीम उद्योग – कोष निर्मिती

तुतीच्या झाडावरील आळयांकडून जे कोष बनतात हे कोष देखील बाजारात मोठ्या भावात विकले जातात म्हणजेच रेशीम उद्योगात दोन घटक समाविष्ट झालेले असतात ते म्हणजे ‘तुती उत्पादन’ आणि दुसरे म्हणजे ‘रेशीम कोष उत्पादन’. तुतीची लागवड केल्यानंतर उत्पादित झालेल्या पाल्याचा उपयोग हा शेतातील संगोपन गृहातील रेशीम आळयांचे खाद्य म्हणून केला जातो.

रेशीम शेती आणि उद्योग करण्यासाठी, त्या भागातील तापमान हे जवळपास 14 ते 42 अंश सेल्सियस असायला पाहिजे, तर तेथील आर्द्रता हो 90 ते 95 अंश असायला पाहिजे. तुतीची शेती आणि रेशीम उद्योग करण्यासाठी त्या भागात पाऊस देखील या व्यवसायास पूरक असावा म्हणजे 600 ते 2600 मिली एवढा पाऊस असावा. तर तुतीची शेती करण्यासाठी जमीन ही निचरा होणारी असावी तसेच सपाट जमीन या व्यवसायासाठी उपयुक्त ठरते.

रेशीम उद्योग करण्यासाठी तुतीच्या झाडाची लागवड करण्यासाठी साधारणपणे जून ते सप्टेंबर हा महिना योग्य आहे. जर आपल्याकडे पाण्याची उत्तम सोय असेल तर तुम्ही जून महिन्यातच तुतीची लागवड करू शकता. आता प्रश्न येतो की, तुतीच्या कोणत्या जातीची निवड करावी, तर कारण बाजारात 20 ते 25 प्रकारच्या तुतीच्या झाडांच्या जाती आहेत. परंतु आपल्या महाराष्ट्रात व्ही 1 या तुतीच्या जातीची निवड केली जाते.

रेशीम उद्योग फायदे

रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन हे प्राप्त होते. देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. विष्ठेचा गोबर गॅस आणि वाळलेला पाला यांचा वापर करून उत्तम प्रकारे गॅस आपल्याला मिळतो. शेतीस पूरक हा रेशीम शेती व्यवसाय असून तो अत्यंत कमी खर्चात होतो त्याचबरोबर शेतकर्‍यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. तुती बागेत रोग आणि कीटक यांचा प्रादुर्भाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च ही वाचतो.

इतर शेती पिकासारखे यात पूर्ण आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही. सुशिक्षित बेरोजगारांना नोकर्‍या शिवाय या रेशीम उद्योगमध्ये उत्पन्न हे मिळवता येते. साठ हजार वरुन अधिक खेड्यात हा उद्योग राबविला जातो. देशात रेशीम उद्योग आणि तुती लागवड क्षेत्र हे वाढत आहे. यशस्वी रेशीम उद्योग करण्यासाठी तुतीची शास्त्रीय दृष्टीकोणातून लागवड होणे हे गरजेचे आहे.

रोजगाराची प्रचंड क्षमता असणार्‍या या उद्योगाचे ग्रामीण विकासात मोठे योगदान टाकले आहे. रेशीमच्या अळ्यांची विष्ठा दृभ्त्या जनावराना खाद्य म्हणून वापरता येते. असे केल्याने जवळपास एक ते दीड लीटर दूध देखील वाढते. रेशीम हा उद्योग सुरू करण्यासाठी बँक कडून आर्थिक सहाह्य देखील मिळते. रेशीम उद्योगाची तुतीची दरवर्षी तळ छाटणी पासून मिळणारी तुती कोष शासना मार्फत खरेदी केली जाते. त्या कारणाने रुपये 3500 ते 4500 एकरी जास्तीत जास्त उत्पन्न प्रती वर्षी मिळते.

रेशीम धागा निर्मिती उद्योग

रेशीम धागा निर्मिती उद्योग, हा जगाच्या प्रत्येक कोपर्‍यात अत्यंत फायदेशीर आणि यशस्वी होणारा उद्योग समजला जातो. रेशीम कोष हे तुतीच्या शेतीतून मिळवले जाते आणि या कोष पासून कच्चे रेशीम सूत हे अनेक प्रकारच्या डेंनीयर मध्ये उपलब्ध होते. यातून रेशीम धागा निर्मिती केली जाते आणि रेशीम धाग्याचे उत्तम वस्त्र आणि कपडे बनवले जातात, जसे की- पैठणी, शालू, पुरुषांसाठी उपवस्त्र.

रेशीम उद्योग माहिती मराठी/ रेशीम धागा निर्मिती उद्योग
कोष पासून रेशीम धागा निर्मिती

कोष पासून तयार झालेले कच्चे रेशीम सूत हे दोन भागात विभागले जात असते. ते दोन भाग म्हणजे ताणा आणि बाणा. आता या रेशीम धागा निर्मितीतील ताणा आणि बाणा म्हणजे नेमके काय हे पाहूया

ताणा

रेशीम उद्योगात रेशीम धागा निर्मितीत ताणा म्हणजे रेशीम चा उभा धागा म्हणजेच रेशीमच्या कपड्यातील जास्त लांबीचा धागा होय. हा धागा निर्मित करताना यात सिंगल टिडस्टिंग, डबलिंग, डबल टिडस्टिंग, सेटिंग, धागा हॅंकिंग, डीगमिंग व ब्लिचिंग या प्रक्रिया केल्या जातात.

बाणा

बाणा म्हणजे रेशीमचा आडवा धागा अथवा रुंदीच्या धागा. ताणा यात जशा प्रक्रिया असतात यात देखील डब्लिंग, टिडक्स्टींग, वाईंडिंग, ब्लिचिंग, कांडी भरणे, कांडी कापड बनवताना वापरणे या सर्व प्रकिया येतात.

रेशीम उद्योग माहिती मराठी/ रेशीम धागा निर्मिती उद्योग/ रेशीम उद्योग अनुदान 2024

अशा प्रकारे रेशीम धागा निर्मिती करताना या दोन पद्धती येत असतात. आणि या नंतर रेशीम कापड हे हातमागावर विणकाम होऊन कापड तयार होते. हे रेशीम सूत देखील वेगवेगळ्या प्रक्रियातून तयार होते त्या प्रक्रिया कोणत्या हे आपण पुढील लेखात पाहणार आहोत-

वाईंडिंग

वाईंडिंग यात कच्चे रेशीम सूत रुळावर टाकून घेतले जाते.

डब्लिंग

डबलिंग या प्रक्रियेत ताणा धागा हा अधिक बळकट केला जातो. म्हणजे कापडाच्या गरजेनुसार दोन धागे,3धागे,किंवा चार धागे एकत्र घेतले जातात आणि टिडकास्ट केले जाते.

टिडकास्टिंग

रेशीम उद्योग माहिती मराठी/ रेशीम धागा निर्मिती उद्योग/ रेशीम उद्योग अनुदान 2024
रेशीम धागा निर्मिती

या प्रक्रियेत तयार केलेले म्हणजे डबलिंग केलेले तीन धागे चार धागे पीळ देऊन एकत्र केले जातात. त्यासाठी मशीनचा उपयोग देखील केला जातो. सिंगल किंवा डबल टिडकास्टिंग केले जाते. बाणा धाग्यास ताणा धाग्यापेक्षा पीळ कमी द्यावा लागतो.

सेटिंग

पीळ दिलेल्या धाग्यास आकुंचन किंवा प्रसरण होऊ नये म्हणून गरम पाण्याची वाफ दिली जाते, त्यासाठी तांब्याच्या ड्रम चा वापर केला जातो. बाणा धाग्यास पीळ कमी असल्याने 10 ते 12 मिनिटेच वाफ द्यावी लागते ते ताणा धाग्यास पीळ जास्त असल्याने 20 ते 30 मिनिटे वाफ म्हणजे सेटिंग करावी लागते.

हॅकिंग

कच्या धाग्या प्रमाणे आता या पक्क्या धाग्याच्या देखील लडया तयार केल्या जातात आणि हॅंग केल्या जातात. आणि नंतर ब्लिचिंग करून रंगीत धागा तयार केला जातो यालाच हकिंग असे देखील म्हणतात.

डिगमिंग आणि ब्लिचिंग

रेशीम धाग्यात नैसर्गिक गम व रंग असतो तो कपडे वापरताना कमी होऊ शकतो किंवा कापड आकसू शकतो, त्यामुळे कपडा मुलायम राहावा यासाठी रेशीम धागा तयार करत असताना त्याला ब्लिचिंग केले जाते.

वार्पिंग

यात इंग्रजी v आकाराच्या क्रिलवर 100-100 रीळ दोन्ही बाजूस ताणा धाग्याचे अडकवून त्याच्या क्रॉस पट्ट्या घेऊन बीम भरले जाते.

बीम सांधणी

बीमवर असलेले धागे आधीच्या वही मधील असलेल्या फनीमधून ओढून विणकाम सुरू करणे याला बीम बांधणी म्हणतात.

कांडी भरणे

यात बाणा धागा हा रिळवरून कांडी वर घेतला जातो आणि त्यासाठी मशीनचा वापर केला जातो. या कांडीवर भरलेला धागा हातमाग मध्ये रुंदीच्या धाग्याकरिता वापरला जातो.

विणकाम

बीम सांधणी आणि कांडी भरणे झाल्यानंतर तयार झालेला हा रेशीम धागा कापड निर्मिती साठी विणकाम करण्यास दिला जातो.

अशा प्रकारे या सर्व प्रक्रियेतून रेशीम धागा निर्मिती ही होत असते.

रेशीम उद्योग अनुदान 2022

आपल्याला माहितच असेल की, आपल्या सरकार कडून काही व्यवसाय करण्यास अनुदान दिले जाते. परंतु बर्‍याच लोकांना या विषयी माहिती नसते, ही माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. रेशीम उद्योगास खालील योजना अंतर्गत अनुदान दिले जाते.

रेशीम उद्योग माहिती मराठी/ रेशीम धागा निर्मिती उद्योग/ रेशीम उद्योग अनुदान 2024
Image Credit :- majhagaav.com

मनरेगा – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

या योजने अंतर्गत काही मर्यादांचे पालन आणि अटी ठेऊन लाभार्थी पात्र असेल तर योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजने अंतर्गत – तुतीची लागवड खर्च, खड्डे खोदणे, मशागत करणे, साहित्य व अवजारे देणे, संगोपन गृह बांधून देणे आणि त्यातील आवश्यक ते साहित्य देणे. यासर्व साहित्यासाठी अनुदान दिले जाते.

केंद्र पुरस्कृत योजना- सिल्क समग्र योजना

जे लाभार्थी मनरेगा ( महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, या योजनेच्या अटी आणि शर्ती मध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो म्हणजे त्यांना हे अनुदान मिळू शकते. या योजने अंतर्गत -तुतीची लागवड, संगोपन गृह उभारणी , कीटक संगोपन साहित्य, मल्टी रिलिंग मशीन, ऑटोमॅटिक रिलिंग मशीन आणि ठिबक सिंचन या साठीच्या खर्चाचे अनुदान दिले जाते.

सारांश – रेशीम उद्योग माहिती मराठी/ रेशीम धागा निर्मिती उद्योग/ रेशीम उद्योग अनुदान 2021/ रेशीम उद्योग फायदे

अशा प्रकारे वरील सर्व माहिती वाचून तुम्ही रेशीम उद्योग आणि रेशीम धागा निर्मिती उद्योग करू शकता. तुम्हाला जर शेती असेल आणि शेतीशी पुरक व्यवसाय करण्याची तुमची ईच्छा असेल तर आजचा हा कुटीर उद्योग संबंधित लेख आणि यातील माहिती ही उत्तम मार्गदर्शक म्हणून तुम्हाला अत्यंत उपयोगी येणारी आणि या व्यवसायात यश देणारी ठरेल यात काही शंका नाही.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले” रेशीम उद्योग माहिती मराठी / रेशीम उद्योग फायदे घरगुती माहिती / रेशीम धागा निर्मिती ” हे कसे वाटले, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top