रव्याचे लाडू रेसिपी मराठी – Best Recipe Of Ravya’s Laddu

रव्याचे लाडू / रव्याचे लाडू रेसिपी मराठी / रव्याचे लाडू कसे बनवायचे / रव्या चे लाडू रेसिपी / ravyache ladu recipe in marathi >>> रव्याचे लाडू हे जवळपास सर्वच जनाचे आवडीचे असतात. रव्या चे लाडू हे खाण्यास अतिशय मऊ आणि रुचकर लागतात तसेच आपण पाहतो की, बेसन पासून बनविलेले लाडू खाल्याने काही वेळेस, वयस्कर लोकांना त्रास होतो, कारण बेसन हे हरभरा डाळ पासून बनलेले असते, त्यामुळे रव्याचे लाडू हे गोड पदार्थातील सर्व प्रकारच्या लाडुंमध्ये सर्वात बेस्ट समजले जातात.

रव्याचे लाडू / रव्याचे लाडू रेसिपी मराठी / रव्याचे लाडू कसे बनवायचे / रव्या चे लाडू रेसिपी / ravyache ladu recipe in marathi
रव्या चे लाडू

आपल्याकडे तर दिवाळीचा फराळ असो किंवा नवरात्रीचा नैवेद्य असो अथवा मुलांसाठी छोटामोठा नाश्ता असो, रव्याचा लाडू हा पदार्थ असतोच असतो. त्याचबरोबर घरी कुणी पाहुणे आले तर त्यांना शिदोरी किंवा मग आपल्याला बाहेर गावी जायचे असेन तर सोबत घेण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणून रवा लाडू हा पर्याय अगदी सगळेच वापरतात.

रव्याचे लाडू हे खाण्यास त्रासदायक नसतात, तसेच बनविण्यास सोपे असतात आणि टिकण्यास दीर्घकालीन असतात, त्यामुळे आपण कधीही आणि कोणत्याही सणासाठी तसेच प्रवासासाठी किंवा शिदोरी साठी हे रवा लाडू बनवतोच. चला तर मग पाहूया, सर्वांपेक्षा हटके आणि जबरदस्त चविस्ट असे रवा लाडू कसे बनवायचे याची सर्वोत्कृष्ट रेसिपी आजच्या आपल्या “रवा लाडू / रवा लाडू रेसिपी मराठी” या लेखात . ही माहिती वापरुन तुम्ही अगदी रवाळ आणि मऊ असे रव्याचे लाडू बनवू शकता .

रव्याचे लाडू कसे बनवायचे /रव्याचे लाडू रेसिपी मराठी/रव्याचे लाडू ची रेसिपी

रव्याचे लाडू / रव्याचे लाडू रेसिपी मराठी / रव्याचे लाडू कसे बनवायचे / रव्या चे लाडू रेसिपी / ravyache ladu recipe in marathi
रव्या चे लाडू रेसिपी

आपल्याला जर रव्याचे लाडू बनवायचे असतील तर आमच्या लेखात खालील प्रमाणे सांगितलेले साहित्य आणि कृती वापरुन रव्याचे लाडू बनवावेत. रव्याचे लाडू आपण चाचणीचे किंवा विनाचाचणीचे असे दोन्ही प्रकारे बनवू शकतो. चला तर पाहूया, रव्याचे लाडू बनविण्यासाठी कोणते साहित्य लागेल आणि ते कसे बनवावे, याची साधी, सोपी आणि रंजतदार कृती, ज्याने लाडू तोंडात टाकताच विरघळतील असे रवा लाडू –

रव्याचे लाडू बनविण्यासाठी लागणारे साहित्य

रव्याचे लाडू बनविण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे :

  1. बारीक रवा – तीन वाटी
  2. साजूक तूप – पाच ते सहा चमचे
  3. साखर – दोन वाटी
  4. पाणी – दीड ते दोन वाटी
  5. विलायची पावडर – तीन चमचे
  6. ड्रायफूड पावडर – तीन चमचे
  7. चारोळी – सजावट साठी

रव्या चे लाडू बनविण्याची कृती

वरील सर्व साहित्य वापरुन अगदी उत्तम असे रव्या चे लाडू बनविण्याची कृती आम्ही सांगत आहोत आणि त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. अगदी साखरे पासून च्या चाचणीचे देखील मऊ लाडू आपण बनवू शकता.        

सगळयात आधी पहिल्यांदा तीन वाटी रवा घ्यावा, सहा चमचे साजूक तूप टाकून मस्त सुगंध येई पर्यन्त मध्यम आचेवर भाजुन घ्यायचा आहे. साजुक तुपाने रवा लवकर आणि छान भाजला जातो तसेच फ्लेवर देखील छान येतो. लाडू साठी बारीक रवा घ्यायचा आहे. रवा अगदी हलकासा भाजुन घ्यायचा आहे.  लालबुंद नाही करायचा मध्यम आचेवर दहा मिनिट रवा भाजुन घ्यायचा आहे. भाजत असताना रवा खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यावी. भाजत असताना एकसारखा रवा हलवत राहावा, जेणे करून रवा खाली लागणार नाही, आणि करपट वास देखील येणार नाही.

सगळयांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रव्याचे लाडु करत असतांना रव्याचा रंग बदलला नाही पाहिजे. पण त्याच बरोबर रवा खमंग आणि मस्त हलकापुलका भाजला गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला रवा मध्यम आचेवर एक सारखा हालवुन घ्यावा लागेल. भाजुन घ्यावा लागेल. जेव्हा तो एकसारखा भाजला जातो तेव्हा त्याचा रंग फारसा बदलत नाही परंतु थोडा हलकासा ब्राऊन दिसतो आणि मस्त स्मेल येतो. अगदी पंधरा शुभ्र रवा थोडा तपकिरी झाला आणि छान सुगंध आला की गॅस बंद करावा.

हा रवा थोडा थंड झाला की हा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. रवा वापरत असतांना रवा अगदी बारीक असला पाहिजे. जर आपल्याला रवा मिक्सरला बारीक नसेल करायचा तर आपण नाही केला तरी चालतो जर आपल्याला हवे असेल तर आपण करू शकतो.  मिक्सरला रवा लावुन घ्यायचा आहे. बॉम्बे हा रवा बाजारात उपलब्ध असतो तो देखील रव्या च्या लाडू साठी उत्तम रवा आहे.

रवा छान भाजून झाल्यानंतर जर जाडसर असेन तरच मिक्सर मधून काढावा लागेन, अन्यथा बोंम्बे रवा असेन तर मिक्सर करण्याची गरज नाही. आता आपण रवा लाडू साठी लागणारी चाचणी करून घ्यावी.

आता साखरेचा पाक म्हणजेच चाचणी बनवुन घ्यायची आहे, तर त्यासाठी एका भांडयात दोन वाटी साखर घ्यायची आहे. तीन वाटी बारीक रव्यासाठी दोन वाटी साखर घ्यायची आहे, जर आपल्याला जास्त गोड लाडू हवे असतील तर तीन वाटी साखर घेऊ शकता यामध्ये तीन पाव वाटी पाणी टाकायचे. साखर आणि पाणी हे छान असं मिसळुन घ्यायचे आहे. मिसळुन घेतल्यानंतर त्याला पाच मिनिट एक चांगली उकळी घ्यायची आहे , म्हणजे साखरेचा छान एकतारी पाक होईल या ठिकाणी साखरेचा छान असा एकतारी पाक झाला की , गॅस आता मध्यम आचेवर करायचा आहे . सात ते आठ मिनिट हा पाक आपण मिडिअम आचेवर उकळी येईल तोपर्यंत ठेवायचा आहे.

छान दाटसार असा एकतारी पाक तयार झाला की नाही हे योग्य प्रकारे तपासून घ्यायचे आहे. पाक हा बरोबर झाला पाहिजे . जर पाक सैल झाला तर लाडू चिकट होतील आणि ते वळले जाणार नाही, म्हणजेच बांधले जाणार नाही आणि त्याचबरोबर पाक जर खुप दाट झाला तर म्हणजे 2-3 तारी पाक झाला तर आपले रवा लाडु खुप घट्ट आणि टणक होतील आणि ते लाडू खाण्यास सुध्दा त्रास होईल. रवा लाडु परफेक्ट बनवण्यासाठी ,आपण अगदी बरोबर असा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे.

हा पाक नीट झालाय का नाही हे आपण चेक देखील करू शकतो. साखरेचा पाक एकतारी आहे की नाही, हे तपासण्यासाठी थोडासा पाक आपण काढून घ्यायचा आहे. कधीही गरम पाक असताना तो नीट झालाय का नाही असे चेक करायचे नाही ,कारण आपण चेक करण्यासाठी गरम पाकामध्ये आपल्याला नीट काही कळणार नाही. कारण पाक जेवढा तो गरम असतो. तेवढा तो सैल असतो. तर पळीवर पाक घ्यायचा आणि त्या पाकला थंड होऊ द्यायचे.

पाक थोडासा थंड झाला की, तो दोन चिमटीमध्ये घ्यायचा आणि दोन बोटात पाक धरून बोटे दूर करायची जर दोन बोटात साखरेच्या पाकची एक तार झाली तर आपला पाक बरोबर झाला असे समजावे आणि जर घट्ट झाला खूप जास्त दाटसर झाला तर लाडू अतिशय टणक आणि कडक होतील.

एकतारी साखरेचा पाक झाला असेन तर गॅस बंद करायचा आणि त्यात तीन चमचे विलायची पावडर आणि दोन-तीन चमचे ड्रायफूड पावडर टाकावी. आपल्याला आवडत असेन तर जायफल देखील टाकू शकतो. काजू बदाम पिस्ता काप देखील टाकू शकतो.

आता या पाकमध्ये आपण आधी भाजुन घेतलेला रवा या पाकमध्ये टाकावा आणि पुर्णपणे पाकात मिक्स करून घ्यावा. थोडे पाक आणि सारण थंड झाल्यानंतर आपण त्याचे छान गोल गोल असे लाडू बांधून घ्यावे. जर पाक नंतर घट्ट झाला आणि लाडू बांधणे कठीण होऊ लागले तर लाडू बांधताना हातांना थोडे दूध लावावे याने छान लाडू वळतील .

रवा लाडू
रवा लाडू

अशाप्रकारे आपण साखरेचा पाक करून म्हणजेच चाचणी करून रवा लाडू बनवू शकतो. आता आपण पाहूया बारीक साखर वापरुन आणि तूप वापरुन रवा लाडू , म्हणजे विना चाचणी चे रवा लाडू बनवण्याची कृती काय आहे ते –

साखरेची चाचणी न करता बनविलेले रवा लाडू

रव्याचे लाडू / रव्याचे लाडू रेसिपी मराठी / रव्याचे लाडू कसे बनवायचे / रव्या चे लाडू रेसिपी / ravyache ladu recipe in marathi

आपल्याला जर साखरेच्या चाचणीत लाडू आवडत नसतील तर आपण दोन वाटी भाजलेला रवा, दोन वाटी बारीक केलेली साखर, आणि एक ते दीड वाटी तूप, वेलची पूड, घ्यावी आणि लागल्यास थोडे दूध टाकावे आणि त्याचे लाडू वळावेत, हे लाडू देखील खाण्यास अतिशय चविष्ट लागतात. चाचणी चे किंवा पाकचे लाडू कडक होऊ शकतात परंतु हे लाडू कडक होत नाहीत

सारांश -रव्याचे लाडू रेसिपी मराठी/ रव्याचे लाडू कसे बनवायचे/ रव्याचे लाडू ची रेसिपी

आपल्याला जर रव्याचे लाडू बनवायचे असतील तर, आमच्या वरील लेखातील “रव्याचे लाडू” ही रेसिपी आपल्याला अतिशय उपयोगी येणारी आहे, त्यामुळे जर आपल्याला रव्याचे लाडू बनवायचे असतील तर, आम्ही सांगितलेली माहिती, साहित्य आणि कृती वापरुन आपण रव्याचे लाडू बनवावे, त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि आपले लाडू उत्कृष्ठ असे बनतील.

आपल्याला वरील लेखामध्ये सांगितलेली रव्या चे लाडू / रव्या चे लाडू कसे बनवायचे ही घरगुती रेसिपी / रव्या चे लाडू ची रेसिपी (ravyache ladu recipe in marathi)कशी वाटली, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top