सोरायसिस घरगुती उपाय – 8 Best Psoriasis Home Remedies

सोरायसिस घरगुती उपाय / सोरायसिस घरगुती उपचार / सोरायसिस मराठी माहिती / psoriasis treatment in marathi >>> आपल्याला माहितच आहे की ,सोरायसिस हा त्वचेसंबधीचा एक आजार आहे. ज्यामध्ये त्वचेवर एक जाड आवरण तयार होते यावर नेहमी नेहमी बाहेर जाऊन मेडीकल मधुन मनाने औषध आणण्यापेक्षा, आपण काही घरगुती उपचार करू शकतो. सोरायसिस म्हणजे त्वचेवर लाल चट्टे पडतात आणि त्या जागेवर खाज सुटते तसेच त्वचेवर खवले देखील पडू शकतात , हे सोरायसिस या विकारांचे बेसीक म्हणजे सर्वसाधारण असे काही लक्षणे आहेत.

सोरायसिस घरगुती उपाय / सोरायसिस घरगुती उपचार /सोरायसिस मराठी माहिती / psoriasis treatment in marathi - सोरायसिस
सोरायसिस

आपल्या डोक्यामध्ये टाळू असतो डोक्यात कोंडा झाला म्हणून आपण जास्त त्याकडे लक्ष देत नाही.  पण असे समजुन आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये. याची सुरूवात कोपरे, कानांच्या मधुन, टाळूवरून किंवा ढोपराच्या त्वचेवरून होते हा रोग संसर्गजन्य नाही , पण या रोगांवर योग्य ते उपाय केले पाहिजेत ,नाहीतर त्याला नंतर आटोक्यात आणणे अतिशय कठीण होते .

सोरायसिस घरगुती उपाय / सोरायसिस घरगुती उपचार /सोरायसिस मराठी माहिती / psoriasis treatment in marathi

 सोरायसिस म्हणजे काय –  सोरायसिस या आजारामुळे रक्तातील पांढ-या पेशीत बदल पडतात . सोरायसिस या आजारामुळे त्वचा खराब होते. त्वचेवर घाणेरडे डाग पडतात जे आपल्या सौंदर्या वर विपरीत परिणाम करतात . या आजारामध्ये त्वचेच्या एका भागावर जास्त त्वचेचे थर निर्माण होतात . आर्युर्वेदात या विकाराला कृष्ठरोग असे म्हणतात . कृष्ठरोगाचा एक प्रकार म्हणजेच महारोग आहे परंतु सगळेच कृष्ठरोगाचे प्रकार महारोगात गणले जात नाहीत.

सोरायसिस घरगुती उपाय / सोरायसिस घरगुती उपचार - आयुर्वेदिक उपाय

हा रोग जंतूसंसर्गाने होणारा रोग नाही . काही प्रकारामध्ये हा रोग आनुवांशिक असतो . हा रोग आपल्या घरातल्या एखादया व्यक्तीला असेल तर हा रोग आनुवांशिकतेमुळे पुढच्या पिढिच्या एखादया व्यक्तीला होऊ शकतो परंतु होईलच असे नाही . जास्तच जर सोरायसिसचा त्रास असेल तर तो डॉक्टरकडे जाऊन तो बरा करण्याचे सल्ले घ्यावेत परंतु हा रोग कमी प्रमाणात असेल तर तो आपण घरगुती औषधोपचारांनी कमी करू शकतो.

सोरायसिस घरगुती उपाय / सोरायसिस घरगुती उपचार /सोरायसिस मराठी माहिती / psoriasis treatment in marathi

सोरायसिस साठी करण्यात येणारे काही घरगुती उपाय हे खालील प्रमाणे आहेत, या उपाय आणि उपचाराने तुम्ही तुमचा हा त्रास आणि आजार कमी करू शकता

दही : सोरायसिस आजारावर फायदेशीर

सोरायसिस घरगुती उपाय / सोरायसिस घरगुती उपचार /सोरायसिस मराठी माहिती / psoriasis treatment in marathi - दही
दही

सोरायसिस वर घरगुती उपाय म्हणून दही हा उत्तम उपाय आहे . दहयामुळे त्वचा मॉइश्चराइज होण्यास मदत होते आणि यामुळे त्वचेवर खडबडेपणा जाणवत नाही म्हणजे त्वचेला हात लावल्यास त्वचा रठ लागत नाही किंवा कोरडी पडत नाही . जर आपण सोरायसिस झालेल्या जागी दही लावल्याले तर, भरपूर प्रमाणात पोषक तत्वे त्वचेला मिळतात आणि त्वचेचा रुक्षपणा जातो व बर्‍याच समस्या नाहीशा होतात . दही लावल्याने हा आजार पसरत नाही आणि इतर हानिकारक प्रकार देखील उद्भवत नाही , यासाठी घरी बनवलेले ताजे दही वापरले तर ते सर्वात उत्तम राहील . दहयाचा वापर सोरायसिस कमी करण्यासाठी पुढीलप्रमाणे करावा –

शरीराच्या  ज्या भागावर, त्वचेवर लाल चट्टे पडले आहेत त्या भागावर वीस ते तीस मिनिटे दहयाने हलक्या हाताने मसाज करावी आणि नंतर ती जागा एखादया आर्युवेदीक फेस वॉशने धुवून टाकावी . दहयामध्ये अॅटीबॅक्टेरीअल गुण असतात जे की त्वचेसाठी खुप उपयोगी असतात आणि आपला सोरायसिस चा त्रास कमी करण्यास मदत करतात .

नारळ तेल : सोरायसिस आजारावर योग्य घरगुती उपाय    

सोरायसिस घरगुती उपाय / सोरायसिस घरगुती उपचार /psoriasis treatment in marathi - नारळ तेल
नारळ तेल

 नारळाचे तेल हे केसांसाठी व त्वचेसाठी भरपुर प्रमाणात उपयोगी येत असते . नारळाच्या तेलामुळे त्वचेसंबंधीची प्रत्येक समस्या दुर होण्यास बर्‍याच प्रमाणात फायदा होतो . संकल्पदवारे होणा-या शोषणामुळे त्वचेला कोरडेपणा आणि त्यावर पापुद्रा पुन्हा न येऊ देण्यास नारळाचे तेल मदत करते. नारळाच्या तेलाचा वापर आपण पुढीलप्रमाणे करावा –

नारळाचे तेल एका वाटीत घेऊन मंद आचेवर हलकेसे कोमटे करावे आणि नंतर त्वचेवर हळुवारपणे मालीश करावी ,त्यामुळे नक्कीच सोरायसिसपासुन बराच आराम मिळतो . नारळाच्या तेलामुळे त्वचा कोरडी सुध्दा पडत नाही व यामुळे कुठलाही हानिकारक अपाय देखील होत नाही . कोमट नारळाच्या तेलाने मसाज केल्याने डेड स्कीन देखील त्रास न होता निघून जाते .

अॅलोव्हेरा जेल : सोरायसिस वर उत्तम उपचार

अॅलोव्हेरा जेल , हे देखील त्वचेसाठी खुप उपयोगी असे आहे. अॅलोव्हेरा जेलमध्ये असणार्‍या अॅटीसेप्टीक गुणांमुळे स्कल्प सोरायसिसच्या उपचारासाठी बर्‍याच प्रकारे उपयोगी येणारे गुणधर्म आहे. यामुळे त्वचेची होणारी आग जळजळ खाज चांगल्या प्रमाणात कमी होऊ शकते . अॅलोव्हेरा जेलमुळे त्वचेला थंडावा मिळुन त्वचा थंड राहते याचा उपयोग सोरायसिस कमी करण्यासाठी पुढीलप्रमाणे करावा –

अॅलोव्हेरा जेल घ्यावे आणि त्यामध्ये लव्हेंडर ऑईल हे एक चमचा मिसळावे आणि आता हया मिश्रणांनी सोरायसिस झालेल्या त्वचेवर केंसवर मालीश करावी. पंधरा ते वीस मिनिटे अशी मालीश दिवसातुन एकदा तरी करावी आणि नंतर एखादया आर्येवेदीक शाम्पुने धुवून टाकावे . काही दिवसातच आराम मिळतो आणि या उपायाचा फायदा देखील होतो .

मीठाचे कोमट पाणी : सोरायसिसला पळवते दूर

कोमट पाण्याने केलेल्या आंघोळीमुळे त्वचेला आराम मिळू शकतो. विशेषतः जर सोरायसिसचा त्रास असेल ,तर मात्र रोज आंघेळीच्या कोमट पाण्यात थोडेसे मीठ टाकावे . मीठ टाकल्यामुळे शरीराला येणारी खाज ही कमी प्रमाणात होते. काही डॉक्टर सोरायसिस आजार झालेल्या लोकांना समुद्राच्या मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला देतात , कारण समुद्राच्या पाण्यामध्ये खूप प्रमाणात मिनरल्स असतात आणि ते समुद्री पाण्यापेक्षा इतर बोअरवेल किंवा नळ याच्या पाण्यापेक्षा जास्त खारट असते . त्यामुळे समुद्राचे पाणी नसेन तर अंघोळीच्या कोमट पाण्यात मीठ टाकावे त्याने सोरायसिसचा त्रास कमी प्रमाणात होतेा.

हळद : सोरायसिस साठी घरगुती उपचार

हळद ही प्रत्येक त्वचेच्या आजारावर अतिशय उपयुक्त समजली जाते . शरीरावर झालेल्या कोणत्याही जखमेसाठी किंवा इन्फेकशन झालेल्या जागेवर हळद लावली जाते तसेच त्वचेचा रंग उजळवण्यासाठी देखील हळद उपयुक्त ठरते . हळदीमध्ये अॅंटीसेप्टीक आणि अॅटीफंगल असे गुणधर्म असतात जे बर्‍याच आजारा सोबत सोरायसिस वर देखील चांगला परिणाम करतात . हळदीमुळे त्वचेवर आलेले चट्टे , लालसर पणा , खाज तसेच त्वचेचा वाढत जाणारा थर यामध्ये बदल जास्त प्रमाणात होऊ शकतो . हळदीचा लेप किंवा हळदयुक्त क्रिम , जेल , किंवा हळदी मध्ये तेल टाकून सुकू द्यावे आणि त्याला कोमट कोमट शेकल्याने देखील खाज कमी होऊन आपला त्रास कमी होऊ शकतो. मात्र सोरायसिसचा त्रास जास्त असेल तर हळदीचा उपयोग करण्याच्या आधी आवश्यक तो डॉक्टरांचा सल्ला घेणे हे गरजेचे आहे जेणेकरून त्याचा त्रास हा वाढणार नाही .

वजन कमी करणे : सोरायसिसवर सोपा घरगुती उपाय

सोरायसिस मध्ये वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे . अति लठ्ठपणा यामुळे देखील सोरायसिस होण्याचा धोका वाढतो ; परंतु सोरायसिस आधीच झालेला असेन तर खुप जास्त प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते . जर वजन जास्त असेल आणि आपल्याला सोरायसिस झालेला असेन , तर आपल्या वजनावर नियंत्रण ठेवावे सोरायसिसचा त्रास वजन जास्त असलेल्या व्यक्तीला थोडा जास्त मोठया प्रमाणात जाणवतेा . यामुळे जर सोरायसिस झालेला असेन तर आपले खाण्यावर नियंत्रण असावे, नियमित व्यायाम, योगासने करावे, जेणेकरून वजनावर नियंत्रण ठेवले पाहिजे या उपायाने त्रास कमी होतो आणि आजार असेनच तर त्यावर नियंत्रण राहते.

आयुर्वेदिक वस्तू : सोरायसिस वर उत्तम उपाय      

सोरायसिस आयुर्वेदिक उपाय
आयुर्वेदिक उपाय

सोरायसिस झालेल्या व्यक्तीने जास्तीत जास्त आयुर्वेदिक वस्तूंचा वापर करावा , त्यामुळे केमिकल्स पासून आपल्या त्वचेचे संरक्षण होईल आणि त्वचेची अधिक हानी होणार नाही . आपल्याला माहितच आहे की , बाजारात विकत मिळणा-या प्रत्येक वस्तु म्हणजे सौंदर्य प्रसाधनामद्धे अनेक केमिकल असतेच ,कारण केमिकल वापरुन त्या वस्तु बनवल्या जातात जसे की , साबण , क्रीम . सैादंर्यप्रसाधनामध्ये सुगंधाचा वापर करण्यात असलेला असतो त्यातील केमिकल्समुळे त्वचेचे नुकसान होऊन आपला सोरायसिसचा त्रास आणखी डोके वर काढतो आणि त्यात जर त्वचा सेनसेटिव्ह असेल तर अजून घातक . याचकरता अशा वस्तुंचा वापर न करता आर्येुवेदीक वस्तुंचा आपण जास्तीत जास्त वापर करावा याने कोणतेही नुकसान होणार नाही.

चंदन : सोरायसिस घरगुती उपचार

सोरायसिस घरगुती उपाय / सोरायसिस घरगुती उपचार /सोरायसिस मराठी माहिती / psoriasis treatment in marathi - चंदन
चंदन

सोरायसिस या आजारावर चंदन हे देखील अतिशय उपयोगी येते. त्वचेसाठी चंदनाचा वापर हा अनादी काळापासून केला जातो कारण नैसर्गिक साधनात चंदन प्रभावशाली आहे . चंदन हे सोरायसिस वर उपयोगात आणण्यासाठी चंदन चे खोड सहानीवर उगाळून घ्यावे आणि खाजवत असलेल्या ठिकाणी लावावे . चंदन आपल्या त्वचेसाठी अमृत आहे त्यामुळे हा उपाय केल्याने आपल्याला सोरायसिसचा त्रास होत नाही आणि त्वचा थंड व मुलायम पडते . यामुळे चंदन सोरायसिस च्या घरगुती उपचारात प्रभावी आहे .

अशाप्रकारे वरील माहितीवरून , सोरायसिस म्हणजे काय , सोरायसिस लक्षणे आणि सोरायसिस वर घरगुती उपचार / सोरायसिस घरगुती उपाय , ही माहिती आपल्या लक्षात आली असेलच .

सारांश – सोरायसिस घरगुती उपाय / सोरायसिस घरगुती उपचार

आपल्याला जर सोरायसिस या आजाराचा त्रास असेल तर , वरील लेखात सांगितलेली ” सोरायसिस घरगुती उपाय “( psoriasis treatment in marathi ) ही माहिती आपल्याला अतिशय उपयोगी पडेल आणि हे सोरायसिस घरगुती उपचार / घरगुती उपाय केल्याने , आपला त्रास देखील निश्चितच कमी होईल . आमच्या लेखात सांगितलेले हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या त्रासापासून मुक्त व्हा . त्यासोबतच आपल्याला जास्त त्रास होत असल्यास आपण वैद्यकीय सल्ला देखील घेऊ शकता .

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले सोरायसिस घरगुती उपाय कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top