मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय – Top 13 Best Home Remedies

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय /मणक्याच्या आजाराची लक्षणे/  मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार/ मणक्याच्या आजारावर व्यायाम>>>मणका हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा असा हाडांचा सापळा आहे. मणक्याची रचना पाहिल्यास एक एस आकाराचा वळण घेत जाणारा बाक दिसतो, आपल्या मणक्या मध्ये नैसर्गिकरीत्याच चार वेगवेगळे बाक असतात. आणि या सर्व बाकांच्या साहयानेच आपल्या पाठीचा एक मणका हा तयार होत असतो. आपल्या मणक्यात जे चार बाक असतात ते म्हणजे, आपल्या कंबरेला पुढच्या बाजूला असलेला बाक, मानेला पुढच्या दिशेने, आणि पाठीला मागच्या दिशेने तसेच माकड हाडला मागच्या दिशेने बाक असतो. आता हे चार बाक मिळून आपल्या मणक्याचा एक स्तंभ हा तयार होत असतो.

मणक्याचे संपूर्ण कार्य सुरळीत चालण्यासाठी हे चार बाक देखील सदृढ आणि कार्यरत असावे लागतात. म्हणजेच हे चार बाक जो पर्यंत टिकून आहेत तो पर्यंत आपल्या मणक्याची लवचिकता देखील टिकून असते. आपण पाहतो की, मणक्याचा विशिष्ट असा आकार असतो आणि हा मणक्याचा आकार बदलणे म्हणजे देखील एक मणक्याची विकृती झाल्याची संभाव्यता असते.

मणक्यात काही बिघाड झाल्यास किंवा मणक्याचा आकार बदल्यास तुम्हाला मणक्याचे आजार होऊ शकतात आणि त्याचा त्रास तर होतोच, त्यातच जर वयस्कर व्यक्तींना मणक्याचे आजार झाले असल्यास वयोमानाप्रमाणे त्यांना तर जास्तच त्रास होऊ शकतो. बर्‍याच वेळा असे होते की, आपण जसे समजतो तसे होत नाही, मणक्याचा आजार नसू देखील शकतो. मणक्याच्या आजाराची काही खास आणि विशिष्ट अशी लक्षणे असतात. ती मणक्याच्या आजाराची लक्षणे कोणती आहेत ते आपण पुढील लेखात हे मणक्याची आजाराची लक्षणे नेमकी काय आहेत ते पाहणार आहोत.

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय /मणक्याच्या आजाराची लक्षणे/  मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार/ मणक्याच्या आजारावर व्यायाम
मणक्याचे आजार

त्याच बरोबर जर आपल्याला मणक्याचे आजार झाले असतील तर त्यावर घरगुती उपचार किंवा घरगुती उपाय करून तुम्ही त्या पासून आराम मिळवू शकता., त्याच साठी आम्ही हा लेख “मणक्याच्या आजाराची लक्षणे आणि मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार” घेऊन आलो आहोत. या लेखातील माहिती तुमचा मणक्याचा त्रास कमी होईल तसेच त्यावर उपचार , उपाय आणि व्यायाम करून तुम्ही मणक्याच्या आजाराच्या त्रासा पासून आराम मिळवू शकता.

मणक्याच्या आजारा वर असणारे घरगुती उपाय आपण नंतर पाहुचयात परंतु त्या आधी मणक्याचा आजार झाल्याची लक्षणे कोणती आहेत ते पाहूया, जेणे करून तुम्हाला मणक्याच्या आजाराशी निगडीत योग्य ते उपचार हे करता येतील. चला तर सुरूवातीला पाहूया मणक्याच्या आजाराची लक्षणे कोणती आहेत?

Table of Contents

मणक्याच्या आजाराची लक्षणे

साधारणपणे मणक्याच्या आजाराची ही लक्षणे लवकर लक्षात येत नाहीत तरी देखील काही त्रास किंवा खालील समस्या या जाणवत असल्यास ती सर्व मणक्याच्या आजाराची लक्षणे समजली जातात. ही खालील प्रमाणे सांगितली जातात.

सतत बसून राहिले तर पाठ दुखणे

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय /मणक्याच्या आजाराची लक्षणे/  मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार/ मणक्याच्या आजारावर व्यायाम
सतत बसून राहिल्याने पाठ दुखते

मणक्याचा आजार झाल्यास तुम्हाला सतत एका जागी बसले तर, पाठीचा कणा हा आखडल्या सारखा वाटेल किंवा पाठी मध्ये तीव्र वेदना देखील होऊ शकतात. त्यामुळे असे लक्षण जर जाणवले तर समजून घ्यावे की तुम्हाला थोड्या बहुत प्रमाणात, मणक्याच्या आजारचा त्रास हा सुरू झाला आहे. मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय आणि उपचार करून आपण आराम मिळवू शकतो.

पाठीचा कणा दबल्या सारखा वाटणे

मणक्याचे आजार झाल्यास मज्जासंस्थेवर तान पडून आपल्या पाठीचा कणा हा दबल्या सारखा जाणवतो. पाठीच्या कण्याचा आकार देखील थोडा बदलतो आणि मणक्याचा आजार झाल्यास पाठीचा कणा हा कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवली तर लगेचच मणक्याच्या आजार साठी जे योग्य उपाय आहेत ते करावेत यामुळे हा आजार आटोक्यात येईल.

दोन मणक्यात तीव्र वेदना जाणवणे किंवा मणक्यातील गादी सरकणे

मणक्याचा आजार झाल्यास, रस्त्यावरून गचका लागल्यास किंवा थोडा जरी भार उचलला गेल्यास तरी देखील दोन मणक्यात तीव्र वेदना या जाणवू लागतात, कारण दोन मणक्यात जी गादी असते , ती या आजारामुळे सरकरली जाते. त्यामुळे दोन मणक्यात जर तीव्र वेदना जाणवली किंवा गादी सरकली असेल तर तुम्हाला हा मणक्याचा आजार झाला असल्याची शक्यता आहे.

हात पाय बधीर वाटणे

मणक्याचा आजार झाल्यास तुम्हाला अधून -मधून हात पाय हे बधीर पडल्यासारखे वाटू शकतात. दोन हाडांवर तसेच मणक्यावर ताण पडून हात पाय जड पडल्यासारखे तसेच त्यांना मुंग्या आल्या सारखे वाटणे, ही लक्षणे मणक्याचे आजार झाल्यास, मणक्यावर ताण पडल्यामुळे जाणवू लागतात.

आता आपण माहिती घेऊया, मणक्याचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार या विषयी

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय/ मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय /मणक्याच्या आजाराची लक्षणे/  मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार/ मणक्याच्या आजारावर व्यायाम
मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय

मणक्याचे आजार झाल्यास त्यावर काही घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार करून आपण त्वारीत आराम मिळवू शकतो. त्यासाठी आपण जर कोणते वेदनाशामक औषध घेतले तर मणक्याला आणि पाठीला तात्पुरता आराम मिळतो परंतु काही कालावधीनंतर हा त्रास परत जाणवतो आणि त्या नंतरचा टप्पा म्हणजे ऑपरेशन करणे. हे सर्व करण्यापेक्षा उत्तम उपाय म्हणजे घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार करणे, या द्वारे बरेच आपण मणक्याच्या आजार कमी करून ऑपरेशन टाळू शकतो, तर ते उपाय खालील आहेत.

बस्ती तेल

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय /मणक्याच्या आजाराची लक्षणे/  मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार/ मणक्याच्या आजारावर व्यायाम
बस्ती तेल

मन्या बस्ती कटी आणि बस्ती मान तसेच कंबर, या प्रदेशी औषधी या सिद्ध तेल औषधी तेल म्हणून ओळखल्या जातात. यासर्व बस्ती प्रकारामुळे हाडांची झीज भरून निघण्यास मदत होते. आपल्या मणक्यामध्ये जो वंगण सारखा पदार्थ असतो, तो तयार होण्यास मदत होते. याचा वापर करताना हे तेल घ्यावे आणि या औषधी तेलाने रुग्णाच्या दुखणार्‍या भागावर जवळपास 30 ते 40 मिनिटे मालिश करावी. असे केल्याने मणक्याचा आजार पुर्णपणे बरे होण्यास मदत होते आणि त्रास देखील नाहीसा होतो.

राई चे तेल आणि औषधी वनस्पती

राई चे तेल आणि त्या तेलामध्ये लसूण च्या पाकळ्या घ्याव्या आणि तेल थोडे गरम करावे. या गरम केलेल्या तेलाला थोडे थंड होऊ द्यावे आणि नंतर कोमट तेलणे थोडा लसूण घेऊन त्याने मालीश करावी. लसूण हा गरम पदार्थ मध्ये येत असल्याने, त्याच्या गरम गुणधर्मा मुळे शरीरातील वात देखील नाहीसा होतो आणि मणक्याच्या वेदनेपासून त्वरित आराम मिळतो.

आंबट पदार्थ

आंबट रस हा मणक्याच्या आजारावर फायदेशीर ठरतो. आंबट पदार्थमुळे हाडांची आणि मणक्याची झीज जलद भरून निघण्यास मदत होते. त्यामुळे आंबट पदार्थ म्हणजे दही, चिंच आणि ताक इत्यादी मुळे मणक्याचे आजार कमी होण्यास बरीच मदत होते.

बाभळीची साल

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय /मणक्याच्या आजाराची लक्षणे/  मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार/ मणक्याच्या आजारावर व्यायाम
बाभळीच्या सालीचा रस

बाभळीची साल घ्यावी आणि एका पातेल्यात पाणी घेऊन कडक पाण्यात उकळावी. पाच ते दहा मिनिट उकळल्यानंतर ते पाणी थंड करावे आणि मग गाळून ते पानी मणक्यावर टाकावे, ह्या पाण्याने मणक्याला शेक द्यावा. हा उपचार केल्याने आपला मणक्याचा आजार नक्कीच बरा होईल. हा उपाय आपण अगदी लहानपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही करू शकतो.

एरंड तेल

मणक्याच्या आजारावर एरंड तेल पेक्षा गुणकारी आणि प्रभावशाली असे दुसरे औषध नाही. यात वात कमी करणारी औषधी गुणधर्म असतात तसेच सांध्याना स्निग्धता देऊन स्तंभता प्रदान करतात त्यामुळे जखडेपणा देखील दूर होतो॰ त्यामुळे रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर गरम पाण्यात किंवा चहात अर्धा चमचा एरंडेल तेल घ्यावे.

जवस खाणे

जवस हे देखील रोज सकाळी खाल्याने शरीरातील हाडे ही मजबूत होतात. त्याच बरोबर जवस हे वंगण प्रमाणे काम करते. याने मणक्याच्या वेदना पासून आराम मिळतो. त्यामुळे इतर तेलगत किंवा तिखट पदार्थ खाण्याएवजी तुम्ही जवस किंवा जवस पासून बनवलेली चटणी खावी, काही भाज्यामध्ये जवस बारीक करून टाकावे, यामुळे मणक्याचे आजार आटोक्यात येतील.

पांढरे तीळ

पांढरे तीळ हे देखील तुम्हाला मणक्याच्या त्रासापासून आराम देण्यास बर्‍याच प्रमाणात मदत करतात. त्यामुळे ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी पांढरे तीळ खावे याने बराच आराम मिळतो आणि तुमचा त्रास देखील कमी होतो. जवस प्रमाणे तीळ देखील वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो. जसे की भाजी मध्ये टाकून किंवा चटणी बनवून॰

शेक देणे

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय /मणक्याच्या आजाराची लक्षणे/  मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार/ मणक्याच्या आजारावर व्यायाम
शेकणे

कोणत्याही मणक्याच्या आजारावर शेक दिल्याने देखील मणक्याच्या आजारा पासून आराम मिळतो. आपल्याला जर मणक्याचा त्रास असेल तर आपण बाजारातून शेक देण्याची electric hot bag आणावी. निरनिराळ्या प्रकारे शेक दिल्याने देखील मणक्याच्या बर्‍याच समस्या दूर होतात. शेक दिल्याने संपूर्ण नसा या मोकळ्या होतात आणि मणक्याना आणि स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे शेक देणे किंवा शेक घेणे हे मणक्यांचा आजार असणार्‍यांसाठी अतिशय फायदेशीर ठरते.

मणक्याच्या आजारावर व्यायाम

विविध प्रकारचे मणक्याचे आजार असतात. जसे की, नस दाबणे, हाता-पायाला मुंग्या येणे, मणक्यात गॅप तयार होणे, मणक्याची गादी सरकणे यांसारखे बरेच मणक्याचे आजार असतात. परंतु हे सर्व आजार हे काही व्यायाम करून देखील कमी करू शकतो. त्या विषयीचीच संपूर्ण माहिती ही या लेखात आम्ही सादर करीत आहोत.

फिजिओथेरपी –मणक्याच्या आजारावर व्यायाम

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय /मणक्याच्या आजाराची लक्षणे/  मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार/ मणक्याच्या आजारावर व्यायाम
फिजिओथेरपी

फिजिओथेरपी हा एक मसाज आणि व्यायामचा प्रकार आहे. हाडांच्या, सांध्याच्या सर्व प्रकारच्या आजावर फिजिओथेरपी हा रामबाण उपाय आहे. मनाक्यांच्या आजारावर फिजिओथेरपी चा मसाज किंवा व्यायाम वैद्यकीय सल्ल्यानुसार करून शश्त्रक्रिया न करता तुम्ही आराम मिळवू शकता.

पंचकर्मे

आयुर्वेदात सांगितलेली पंचकर्मे केल्यास हाडांची झीज ही कमी होते आणि या मध्ये पतफेडरली, स्वेद, अभ्यंग, या केरलियन मसाज आणि व्यायाम पद्धतीमुळे पाठीचे आणि मानेचे स्नायू हे बर्‍यापैकी मजबूत होतात आणि मणक्याचा त्रास हा पुर्णपणे बारा होतो.

भुजंगासण –मणक्याच्या आजारावर व्यायाम

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय /मणक्याच्या आजाराची लक्षणे/  मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार/ मणक्याच्या आजारावर व्यायाम
भुजंगासन

भुजंगासण हे मणक्याच्या त्रासावर आणि आजरावर परिणाम कारक असा व्यायाम आहे. माणक्यांचा त्रास असेल तर आपण योग्य प्रकारे भुजंगासण करावे. हा व्यायाम केल्याने तुमचा मणक्याचा आजार कमी होईल.

नौकासण

नौकासण हे देखील मणक्यांचा आजाराचा त्रास कमी करण्यास मदत करते. यामुळे या आसना मुळे सर्व मणक्याचा व्यायाम होतो तसेच त्यामुळे मनके हे मजबूत देखील होतात आणि त्याचा आजार होत नाही.

धनुरासण –मणक्याच्या आजारावर उत्तम व्यायाम

धनुरासण हा व्यायाम मणक्याचा आजार असल्यास करावा याने देखील सांधे दुखी, पाठ दुखी, स्नायू आखडणे या पासून आराम मिळेन.

सारांश – मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय /मणक्याच्या आजाराची लक्षणे/ मणक्याच्या आजारावर व्यायाम / मणक्याच्या आजाराची लक्षणे

आपल्याला जर मणक्याचे आजार असतील आणि त्यामुळे तुम्ही जर परेशान असाल तर तुम्ही हा लेख वाचवा. या सांगितलेल्या उपचारा नंतर तुमचा त्रास नक्कीच कमी होईल आणि तुम्हाला बराच आराम मिळेन.

अशाप्रकारे वरील सर्व आयुर्वेदिक उपचार, घरगुती उपाय आणि मणक्याचे व्यायाम केल्याने तुम्ही मणक्यांच्या आजारा पासून त्वरित आराम मिळवू शकता. तसेच हे आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय केल्याने याचा कसलाही दुष्परिणाम देखील होणार नाही.

वरील उपाय आणि उपचार हे प्राथमिक उपचार म्हणून फायदेशीर ठरतील. जर तुमचा त्रास आणि बिमारी मणक्यांच्या आजार हा अतिउच्च स्तरावर असेल तर वैद्यकीय सल्ला घेलेला योग्य राहील.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, मणक्याच्या आजारावर  घरगुती उपाय व आयुर्वेदिक उपचार हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top