लोकर च्या वस्तु / लोकर विणकाम – Best Wool Goods

लोकर च्या वस्तु / विणकाम लोकर / lokar chya vastu / लोकर विणकाम >> लोकर च्या वस्तु ह्या अतिशय टिकाऊ आकर्षक दिसतात तसेच त्या आपण हँड वॉश देखील करू शकतो. लोकर पासून बनविण्यात येणार्‍या काही वस्तु या शो साठी वापरल्या जातात किंवा काही वस्तु या आपल्या पोशाख साठी, थंडी पासून बचाव करण्यासाठी वापरल्या जातात. लोकर पासून बनविल्या गेलेल्या वस्तु ह्या संपूर्ण जग भरात प्रसिद्ध आहेत. भारत हा देश अगदी सुरूवातीपासुनच ‘‘हस्तोद्योग‘‘ या व्यवसायात अग्रेसर आहे. भारतातील हस्तोद्योग क्षेत्रातील बराच माल, हा मोठया प्रमाणात देश- विदेशात विकला जातो. 

महात्मा गांधीच्या शिकवण्यातुन आणि विचारातुन ‘‘हस्तकला‘‘ हा विषय शैक्षणिक विषयात समाविष्ट झाला, त्यामुळे बेरोजगारांची संख्या कमी होण्यासही मदत झाली आणि मध्यम वर्गीयांच्या रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील ब-याच अंशी संपुष्टात आला. भारतातील अनेक उद्योगांपैकी मोठया प्रमाणात चालणारा आणि घरगुती महिला किंवा बेरोजगार यांच्या हाताला काम देणारा एक व्यवसाय म्हणजे ‘‘लोकर पासून वस्तु बनविणे‘‘ हा व्यवसाय याने आज जगाच्या कानाकोपर्‍यात लोकर च्या वस्तु पोहचविल्या आहेत. चला तर मग, आज आपण या लेखात पाहुया लोकरच्या वस्तु विषयी थोडी अधिक माहिती .

लोकर च्या वस्तु विषयी माहिती

लोकर च्या वस्तु या काही खास आणि विशिष्ट प्रकारे लोकर ची विन करून बनविण्यात येत असतात, त्यात जर हातमाग करून लोकर बनविले गेले असेन तर त्या लोकर ला अधिक लवचिक स्वरूप प्राप्त झालेले असते. आपण लोकर ची छोटी-मोठी विन करून अनेक वस्तु बनवू शकतो, तसेच आपल्या पेहणाव्या साठी देखील लोकर च्या वस्तु बनवू शकतो आणि घर सजावटी साठी देखील लोकर वस्तु बनवू शकतो .

लोकर विषयी माहिती

            आपण हिवाळयामध्ये जे मोजे, स्वेटर, हॅण्डग्लोज, शॉल, कानटोपी, मफलर वापरतो त्या सर्व वस्तु या ‘लोकर‘ या धाग्यापासुन बनलेल्या असतात. सुंदर अशी गोफण आणि वीण याप्रमाणे वेगळया प्रकारच्या आकोडयांच्या सुईने या सर्व वस्तु बनवतात यालाच विणकाम लोकर म्हणतात; पण ही लोकर म्हणजे काय? याचे झाड असते का? लोकर कुठून मिळते? असे प्रश्न येत असतील तर लोकर ही मेंढी या प्राण्यांपासुन त्यांच्या केसांपासुन मिळत असते. मेढयांना थंडीपासुन बचावासाठी ईश्वरी देणगी म्हणजे त्यांचे लांब आणि उबदार ठेवणारे त्यांचे केस. हे केस म्हणजेच लोकर .

अगदी उत्तम प्रतीचे लोकर देणा-या मेंढया या मध्यप्रदेशात, जम्मु कश्मिर, उत्तरप्रदेश या भागात आढळतात. तर या मेंढयाच्या केंसानाच ‘लोकर‘ असे म्हणतात. तसेच ‘अंगोरा‘ जातीच्या पश्चिमी शेळींपासुन देखील लोकर मिळते. अंगोरा शेळीपासुन मिळणा-या लोकरीस ‘मोहर‘ म्हणतात. तर पश्मिना शेळीपासुन मिळणा-या लोकरला ‘पश्मिना‘ असे म्हणतात. लोकर ला इंग्रजीमध्ये वूल असे म्हणतात. आणि त्यापासुन बनविलेल्या वस्तूंना ‘ लोकर च्या वस्तु ‘ असे म्हणतात . या लोकर पासून बर्‍याच उपयोगी आणि गरजेच्या तसेच शोभेच्या वस्तु देखील बनवता येतात . लोकर पासून बनविले जाणारे कपडे हे आपले थंडी पासून रक्षण करते आणि आपल्याला उबदार वाटण्यास मदत करते .

लोकरचा उपयोग कसा होतो / विणकाम लोकर

            मेंढयापासुन आणि पश्मिना व अंगोरा या जातींच्या शेळयांपासुन मिळवलेली लोकर अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडते . लोकरचा उपयोग खासकरून उबदार कपडे बनविण्यासाठी केला जातो. जेणेकरून थंडीपासुन रक्षण करता येईल आणि शरीरातील उष्णता शरीराच्या आतच राहील. लोकर या तंतूचे खास वैशिष्ट असे की , इतर कोणत्याही धाग्यापेक्षा लोकर मध्ये आर्द्रता साठून ठेवण्याची क्षमता ही आधी पासूनच अंतर्भूत असते , त्यामुळे थंडी च्या दिवसात इतर कोणत्याही कापड पेक्षा लोकर पासून बनविलेले कपडेच जास्त प्रमाणात वापरले जातात . लोकरीपासुन विणलेले स्वेटर, शाल, टोपी, हातमोजे, मफलर, आणि अनेक वेगवेगळया प्रकारची वस्त्रे विणली जातात, जे आपल्या शरीरास उबदार ठेवण्यास मदत करते आणि थंडी पासून रक्षण करते त्याचबरोबर आपले त्यातुन उत्तम उत्पन्न मिळवले जाते.

लोकर च्या वस्तु / विणकाम लोकर / lokar chya vastu / लोकर विणकाम
लोकर विणकाम

वस्त्रांसोबतच आजच्या आधुनिक काळात लोकरपासुन अनेक नवनविन आकर्षक वस्तु ज्या शो-साठी विकण्याकडे आणि वापरण्याकडे ब-याच लोकाच्या कल दिसत आहे. एकंदरीत सांगावयाचे झाल्यास , लोकरचा उपयोग उबदार कपडे बनविण्यासोबतच शो-च्या, दिखाव्याच्या वस्तु बनविण्यासाठी देखील सध्या मोठया प्रमाणात उपयोग केला जात आहे .

लोकर उत्पादनाचा आढावा

            भारत हा जगातील लोकर उत्पादन करणारा सातव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात लोकर उत्पादनातुन मोठया प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याने लोकर चे उत्पादन मोठया प्रमाणात केले जाते . हस्तोद्योगातुन देखील लोकरीपासुन वस्तु बनवुन विकल्या जात असतात .आपल्या देशातच नव्हे ; तर आपल्या देशाबाहेर देखील लोकर च्या वस्तूंची आणि कपड्यांची मागणी आहे . भारताच्या अमेरीका, इंग्लड आणि इतर युरोपीय संघ येथे लोकर उत्पादनांच्या बाजारपेठा आहेत . यावरून आपल्या लक्षात आले असेलच की , लोकरच्या वस्तु बनवुन विकणे हा छोटा व्यवसाय जरी असला तरी त्याचा विस्तार मोठा आहे . त्यातून मिळणारे उत्पन्न आणि त्याचे फायदे हे बरेच आहेत .

लोकरपासुन बनविण्यात येणार्‍या वस्तु – लोकर च्या वस्तु / lokar chya vastu / लोकर विणकाम

लोकर च्या वस्तु / विणकाम लोकर / lokar chya vastu / लोकर विणकाम
विणकाम

लोकर पासून बर्‍याच वस्तु बनविता येतात , त्यात काही वापरा योग्य असतात तर काही शोभेच्या वस्तु देखील असतात . त्या कोण-कोणत्या हे आपण पाहूया आपल्या पुढील लेखात . चला तर मग जाणून घेऊया की , लोकर पासून बनविण्यात येणार्‍या वस्तु या कोण कोणत्या आहेत ;

1. शौल / लोकर चादर –

लोकर विणकाम - शाल
शाल

लोकर ही प्रामुख्याने मेंढयापासुन मिळते पण , मोहन आणि पश्मिना या शेळयांपासुन मिळणा-या लोकरपासुन मऊ ऊबदार कश्मिरी शाली आणि चादर बनविता येते . थंड प्रदेशात अशा लोकर पासून बनविण्यात आलेल्या शौल आणि चादर यांना तर जास्तीतजास्त मागणी असते . म्हणजेच लोकर पासून उत्कृष्ठ दर्जाची शौल आणि चादर बनविता येते .

2. लोकर ची टोपी –

लोकर च्या वस्तु / विणकाम लोकर / lokar chya vastu / लोकर विणकाम -लोकरची टोपी
लोकरची टोपी

आपण हिवाळयात थंडी पासून आपले रक्षण करण्यासाठी जे स्वेटर, कानटोपी, शाल, हातमोजे, स्कार्फ मफलर यासर्व वस्तु वापरतो , त्या सर्व वस्तु , ह्या लोकरपासुन सुंदर अशी गुंफण आणि विण बनवुन केल्या जातात , बनविल्या जातात. थंडी पासून बचाव करण्यासाठी याचा वापर केला जातो . लोकर या तंतुमय धाग्यामध्ये मुळातच उबदारपणा असतो जो शरीरात आर्द्रता टिकवून ठेवतो .

3. लोकर पासून फ्रॉक –

लोकर च्या वस्तु / विणकाम लोकर / lokar chya vastu / लोकर विणकाम - लोकर पासून फ्रॉक
लोकरचा फ्रॉक

लोकर पासुन छोटया मुलांचे मुलींचे सुंदर असे फ्रॉक देखील विणले जातात, जेणेकरून लहान मुलांना हिवाळयात उबदार वाटते आणि थंडीपासुन त्यांचे रक्षण होते. हे लोकर चे फ्रॉक विणकाम च्या सुई पासून वेगवेगळ्या पद्धतीने गोफण करून विणले जातात आणि दिसतात देखील छान , उबदार देखील वाटतात आणि टिकतात देखील जास्त दिवस . अशा प्रकारे आपण लोकर पासून विणकामची कला वापरुन सुंदर फ्रॉक बनवू शकतो .

4. दारावरचे लोकर चे तोरण –

विणकाम लोकर - तोरण
तोरण

 ज्या प्रकारे फ्रॉक आणि इतर लोकर पासुन वस्तु या विन करून बनविल्या जातात , त्याच प्रमाणे सुंदर असे दारावरचे तोरण , पुजा ताटा वर झाकण्याचे वस्त्र, तसेच इतर अनेक वस्तु बनविता येतात . ज्यामुळे आपण आपली कलाकुसर वापरुन आपल्या दारा वरची तोरण लाऊन शोभा वाढवू शकतो .

5. लोकर चे झुंबर –

लोकरचे झुंबर ही लोकरची वस्तु अतिशय प्रसिद्ध आहे आणि आपल्या घरची शोभा वाढवते , हे लोकरचे झुंबर बनविण्यासाठी बाजारातून एक रिंग आणावे आणि त्याला लोकरची विण घ्यावी आणि एक आकाराचे लोकरचे गोंडे बनवावे त्यासाठी चार बोटावर 7-8 लोकरचे वेढे घ्यावे आणि त्याला मधोमध बांधावे आणि चौबाजूंनी एकसारखे कापावे व गोलाकार द्यावा. आता शो चे मनी थर्मकोल बॉल लोकरच्या दोर्‍यात वोवावे .रिंग ला बनविलेले लोकर बॉल चिटकवावे आणि लोकर चे मनी लावलेले दोरे बांधावे झाले आपले लोकरचे झुंबर तयार.

6. लोकरचा गणपती –

लोकर च्या वस्तु / विणकाम लोकर / lokar chya vastu / लोकर विणकाम - लोकर पासून गणपती
लोकर पासून गणपती

 एक छोटा आणि एक थोडया मोठया आकाराचा चेंडु म्हणजेच प्लास्टिकचा बाॅल वापरुन आपण लोकरचा गणपती देखील बनवू शकतो . एक मोठा चेडू खाली आणि त्यावर एक छोटा चेंडू घ्यावा आणि त्यावर विनकामच्या सुईच्या सहाय्याने लोकरची विन घ्यावी आणि समोरून त्याला सोंडेचा आकार द्यावा वर बाजारात मिळणारे डोळे वापरुन गणपती चा आकार व रूप द्यावे . अशा प्रकारे लोकरच्या वस्तूतील ‘लोकरचा गणपती’ सर्वप्रिय लोकर वास्तूत मोडतो ॰

7. लोकरचे पडदे –

लोकर च्या वस्तु / विणकाम लोकर - पडदे
पडदे

रेशीम लोकर (चमकीचे लोकर) ला वीण घ्यावी आणि आपल्या दाराच्या उंचीच्या आकारात लांब घ्यावे , अशा दाराच्या रुंदी येवढ्या लोकर वीण दोर्‍या बनवव्या आणि मग वर तोरण पट्टी घेऊन त्यावर या लोकर वीण लावावे आणि सर्वात वर दोन बोट अंतर ठेऊन शिलाई मारावी. सजावटी साठी त्यावर ग्लास चिटकवावे .

8. लोकरचे बेबी शू –

लोकर च्या वस्तु - बेबी शू
बेबी शू

  लोकरचा वापर करून सुंदर असे ‘ बेबी शु‘ देखील आपण बनवु शकतो . जी आपल्या बाळा च्या पायाला उबदार ठेवण्यास मदत करते . हे लोकरचे शू अतिशय आकर्षक तर दिसतातच त्याच बरोबर आपल्या बाळाच्या पायाला उबदार देखील ठेवतात .

9. लोकर डिझाईन पासून फुले बनून लोकर चे तोरण –

 लोकरपासुन सुंदर असे गुलाब फुल, दाराचे तोरण, थालपीस रूमाल, तोरणपटटी, वुलन रूमाल, वुलन पासुन झेंडुफुल बनवुन त्याचे तोरण बनवु शकतो.आणि आपल्या घराच्या दाराची शोभा आपण वाढवू शकतो .

10. लोकर पासून बदक –

lokar chya vastu / लोकर विणकाम
लोकर पासून शो चे बदक

 लोकरचा बदक तयार करण्यासाठी , बल्ब चा वापर करून त्यावर लोकरने विणकाम करून घ्यावे आणि त्याला लोकर च्या साह्याने बदका चा आकार देत विणकाम करावे , अशाप्रकारे बल्ब आणि पांढरी लोकर वापरुन आपण सुंदर असा लोकरचा पांढरा बदक/वेगवेगळे पक्षी आपण बनवु शकतो . हे बदक पांढरे असल्याने खराब जारी झाले तरी देखील आपण वॉश करू शकतो.

11. लोकर विणकाम पर्स –

चमकीच्या लोकर पासून आपण विणकाम करून केवळ लोकर आणि दोन मध्यम आकाराचे रिंग वापरून आपण आपण लोकर चे पर्स बनवू शकतो. हातात धरण्यासाठी दोन साइड च्या दोन रिंग वर लोकर ने वीण घ्यावी आणि त्याला तसेच बटव्याचा आकार देत खाली वीण घ्यावी आणि खाली तळव्याला रुंद पट्टी घेऊन दोन्ही बाजू जोडाव्या .

11. लोकर डॉल –

लोकर पासून सुंदर असा बहुलीचा ड्रेस बनवू शकतो. बाजारातून एक बाहुली आणावी आणि तिला चहु बाजुने ड्रेसच्या आकारात लोकर ने विन करावी . आपल्याला हवी तेवढी घेरदार विन आपण पूर्ण बाहुलीच्या बाजूने घ्यावी आणि आपली सुंदर अशी घेरदार “लोकर ड्रेस डॉल” तयार .

अशाप्रकारे कितीतरी लोकरच्या वस्तु बनवता येतात आणि त्यातुन उत्पन्न देखील काढता येते. पहाडी प्रदेशात तर शेळी पालन करून बर्‍याच महिला रोजगार काम करून, लोकर च्या वेग वेगळ्या वस्तु बनवून ,यातुन उत्पन्न काढत असतात . एकंदरीत सांगावायचे झाल्यास , लोकरपासुन स्वेटर, उबदार कपडे, शाली, मफलर यासोबत अनेक शोभेच्या वस्तु देखील बनविल्या जातात .

सारांश – लोकर च्या वस्तु / विणकाम लोकर / lokar chya vastu

आपल्याला जर लोकर पासून वस्तु बनवायच्या असतील तर , आमच्या आजच्या वरील लेखातील माहिती वाचून तुम्ही लोकर चा वापर करून सुंदर आणि वेगवेगळ्या आकर्षक अशा शोभेच्या वस्तु अगदी घरच्या घरी आरामात बनवू शकता . तुम्हाला जर जास्त वेळ मिळत असेन आणि लोकरची विन , गुंफण या गोष्टी छानपैकी जमत असतील तर तुम्ही घरच्या घरी स्वेटर, कानटोपी, वुलनशू, शौल या वस्तु देखील बनवू शकता.

आपल्याला वरील लेखामध्ये , सांगितलेली ” लोकर च्या वस्तु / विणकाम लोकर / lokar chya vastu” ही घरगुती माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना किंवा प्रश्न असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top