Puranpoli recipe in marathi / how to make puranpoli / पुरणपोळी कशी बनवायची / पुरणपोळी ची रेसिपी >> आपण पाहतो की, आपल्या भारतात प्रत्येक राज्याची स्वतःची अशी वेगळी खासियत आहे, मग ती राहणीमान असो अथवा सन, व्रत असो किंवा भोजन म्हणजेच जेवण आणि त्यातील पदार्थ असो. या प्रत्येक गोष्टीत विविधता आपण पाहतो जसे की – गुजराथी थाली, पंजाबी थाली, उडपी डिशेस, महाराष्ट्रीय पुरणपोळी.
आपल्या महाराष्ट्रा ची खासियत म्हणजे ” महाराष्ट्रीयन पुरणपोळी ” ही महाराष्ट्रीयन पुरणपोळी संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. भारतातील जवळपास सर्वच सुगरण महिलाना उत्तम आणि मऊसुद पुरणपोळी बनवता येते आणि ज्यांना येत नाही त्यांना ती बनवता यावी, असे सारखे वाटत असते. अनेक नवतरुणी आणि नवयुवती तसेच जे महाराष्ट्र बाहेरील महिला आहेत ज्यांना अजुनही मऊ अशी पुरणपोळी बनवता येत नाही, तर त्यांच्या साठी आमचा आजचा हा लेख अतिशय उपयोगी पडणारा असा आहे .
आजच्या लेखात त्या सर्वांच्या “पुरणपोळी कशी बनवायची/पुरणपोळी ची रेसिपी /(puranpoli recipe in marathi/ how to make puranpoli)” याविषयीच्या सर्व समस्या दूर होणार आहेत , त्यामुळे या लेखातील माहिती लक्षपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे पुरणपोळी बनवा. ज्या महिलांना मऊ आणि उत्तम अ शी पुरणपोळी बनविण्यात अडचणी येत आहेत त्यांना हा लेख अतिशय उपयोगी येणारा असा आहे. “चला तर मग सुरू करूया आजच्या महितीला …पुरणपोळी कशी बनवायची ..या रेसिपीला” .
Table of Contents
पुरणपोळी कशी बनवायची/पुरणपोळी ची रेसिपी / puranpoli recipe in marathi
आपण पाहतो की, पुरणपोळी हे नाव जरी एकच असले तरी, पुरणपोळी बनविण्याचे साहित्य आणि पद्धत ही वेगवेगळी असू शकते, त्या पद्धती आणि साहित्य हे कोणते आहेत ते आपण पुढील लेखात वाचणारच आहोत. पुरणपोळी ही वेगवेगळ्या प्रांतात त्यांच्या त्यांच्या पद्धती प्रमाणे बनविली जाते, जसे की – गूळ घालून पुरणपोळी, मैदाची पुरणपोळी, पुरणमद्धे खवा म्हणजेच मावा घालून पुरणपोळी. आजच्या या लेखात आपण गव्हाचे पीठ, मैदा चे पीठ, पूरण, तिळगूळ ची पुरणपोळी या सर्व कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या माहितीला –
1. गव्हाचे पीठापासून बनवलेली:-गव्हाचे पीठ वापरुन पुरणपोळी कशी बनवायची
गव्हाचे पीठ वापरुन पुरणपोळी कशी बनवायची, सुरूवातीला आपण पाहणार आहोत की, गव्हाच्या पीठाची पाती करून हरभरडाळ आणि साखर वापरुन पुरणपोळी कशी बनवावी –
- पुरणपोळी बनविण्यासाठी लागणारी सामग्रीः-
1. हरभरा डाळ = दोन वाटी
2. गव्हाचे पीठ =आपल्याला लागेन तेवढया पोळ्यांप्रमाणे
3. साखर = दोन वाटी
4 . वीलायची पावडर = तीन चमचे
5. मीठ = छोटा अर्धा चमचा
6. तेल = एक चमचा
7. पाणी = दोन ते तीन वाटी
- पुरणपोळी बनविण्याची कृती (how to make puranpoli):-
पहिल्यांदा हरभरा दाळ दोन वाटी स्वच्छ धुवून कुकरमध्ये चार वाटी पाणी टाकून शिजायला टाका. शिजल्यानंतर एका गाळणी मध्ये डाळ निथळून घ्यावे. आता पाणी काढून पुर्णपणे शिजवून निथळलेल्या डाळीला पूरणयंत्रातून बारीक काढून घ्यावे, पूरणयंत्र नसेन तर मिक्सर मधून बारीक करावे. बारीक केलेल्या शिजलेल्या दाळ मध्ये दोन वाटी साखर टाकून त्यास गॅसवर मोठ्या आचेवर शिजवून घ्यावे, म्हणजेच चटका देऊन घ्यावे. चटका देत असताना, शिजत असताना त्यात थोडे साजूक तूप टाकावे, त्याने पूरण करपणार नाही साजूक तूप नी पूरणला छान चव येईल. पुर्णपणे पाणी साखर आणि दाळ एकजीव होऊन आटू द्यावे म्हणजे छान पूरण तयार होईल.
छान असा तपकिरी ब्राऊन रंग येई पर्यंत पूर्ण शिजू द्यावे नंतर गॅस थोडा मंद करावा आणि त्यात विलायची पावडर टाकावी, आवडत असेन तर जायफळ देखील टाकावे त्यामुळे पूरणला छान सुगंध आणि टेस्ट येते. आता गव्हाचे पीठ एका मोठया ताटात घेउन त्यात थेाडे मीठ आणि तेल टाकून मऊसुद मळून घ्यावे. जवळपास अर्धा तास भिजू द्यावे. नंतर कणकीचा बारीक गोळा करून घ्यावा आणि त्याच्या दुप्पट त्यात पूरण भरावे आणि पुर्णपणे बंद करावे. पूरण भरून झाल्यानंतर लाटताना पूरन बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. थोडे थोडे पीठ टाकून हळुवार लाटून घ्यावी.
आता गॅसवर तवा गरम झाल्यानंतर थोडे तेल टाकून पोळी भाजून घ्यावी. भाजतांना पहिल्यांदा तव्यावर थोडे तेल टाकावे जेणे करून पोळी छान खरपूस भाजली जाईल, तसेच तव्याला देखील चिटकणार नाही, आणि रंग देखील येईल. पोळी लाटताना चिटकट असेन तर कोळपाट ला कॉटन / सूती कपडा बांधवा आणि त्यावर पीठ टाकून पोळी लाटावी.
- टिप्सः-
1. कणीक मळून अर्धा तास भिजु द्यावी म्हणजे पोळी मऊसर बनते. पीठ मळताना तुम्ही पाणी न घेता दूध देखील वापरू शकता.
2. सुरुवातील मोठ्ठ्या आणि नंतर कमी आचेवर गॅस करून पोळी भाजावी म्हणजे करपणार नाही आणि छान अशी भाजली देखील जाईल.
अशा प्रकारे, गव्हाचे पीठ वापरुन आपण मऊ सुद अशी पुरणपोळी बनवू शकता, आणि गरम गरम पोळी वर साजूक तूप टाकून दूध सोबत सर्व्ह करावी. गरम पुरणपोळी वर साजूक तूप अप्रतिम लागते.
2. मैदाच्या पीठापासून बनवलेली पोळी – Puranpoli recipe in marathi
गव्हाच्या पीठापासुन जसे आपण पूरणपोळी बनवू शकतो, त्याचप्रमाणे मैदा वापरुन देखील मऊसुद अशी पुरणपोळी आपण बनवू शकतो. मैदा वापरुन पुरणपोळीची रेसिपी, आता आपण पाहूया, पुरणपोळी च्या पाती साठी मैदा वापरुन पुरणपोळी कशी बनवावी यासाठीची साहित्य आणि कृती.
- पुरणपोळी बनविण्यासाठी लागणारी सामग्रीः-
1.हरभरा डाळ = दोन वाटी
2.मैदा = दोन ते तीन वाटी
3.साखर = दोन वाटी
4.विलायची पावडर = दोन चमचे
5. मीठ = चिमूटभर
6. तेल =तीन चमचे
7. पाणी = तीन वाटी
- पुरणपोळी बनविण्याची कृती (puranpoli recipe in marathi)
पहिल्यांदा दोन वाटी हरभरा दाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला टाका. शिजल्यानंतर त्याला गाळून घ्या . शिजलेल्या डाळीतून पाणी निथळल्यानंतर पुरणयंत्रातून दाळ बारीक करून घ्यावी अथवा मिक्सर मधून बारीक करून घ्या . आता या बारीक केलेल्या दाळीत दोन वाटी साखर टाकून गॅसवर शिजवू द्यावे.नंतर त्यात दोन तीन चमचे विलायची पावडर टाकावी, आवडत असेन तर जायफळ देखील टाकावे. आता एका परातीत मैदयाचे तीन वाटी पीठ घ्यावे त्यात थेाडे तेल आणि थोडे मीठ टाकून मळून घ्यावे. मळतांना पाणी थोडे-थोडे टाकावे कारण कणीक खूपपण पातळ असू नये, आणि घट्ट देखील असू नये तर मऊ असली पाहीजे. नंतर मैदा च्या कणकीचा बारीक गोळा करून त्यात त्याच्या दुप्पट पुरण टाकुन पेाळी चांगली हळुवार लाटून घ्यावी.
लाटताना पोळी तुडणार नाही आणि त्यातून पूरण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी नंतर गॅसवर तवा गरम करून झाल्यानंतर त्यावर पोळी टाकावी आणि थोडे तेल लावावे. सुरूवातीला मोठ्या आचेवर आणि नंतर मंद आचेवर पोळी भाजून घ्यावी, भाजताना देखील हळुवार भाजावी जेणे करून पूरण बाहेर येणार नाही आणि पोळी तुटणार नाही. भाजतांना पहिल्यांदा तव्यावर थोडे तेल टाकावे म्हणजे तव्याला पोळी चिटकणार नाही आणि खरपूस देखील भाजली जाईल. गरम गरम पोळी वर साजुक तूप टाकून सर्व्ह करावी.
- टिप्सः-
1. पोळी लाटतांना ती पातळच लाटावी म्हणजे मऊसर राहते पातीचे पीठ मऊ आणि सैलसर भिजवावे.
2. साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर सुध्दा करू शकतात तसेच त्यात थोडा मावा म्हणजे खवा देखील टाकू शकता .
अशा प्रकारे, मैदा किंवा गव्हाचे पीठ वापरुन तुम्ही अगदी खरपुस अशा पूरण पोळी बनवू शकता. आणि गरम गरम पोळीवर साजूक तूप टाकावे आणि दूध सोबत किंवा कटाच्या आमटी सोबत गरमागरम पूरणपोळी सर्व्ह करावी .
3. तीळापासून बनविलेली पोळी / तिळगूळ पोळी
तीळ आणि गूळ वापरुन बनवता येणारी पुरणपोळी ही, वरील दोन्ही पुरणपोळी पेक्षा अतिशय अवघड आहे, आणि सांभाळून करावी लागते, कारण यातून सारण बाहेर येण्याची शक्यता असते आणि गूळ असल्याने तो बाहेर आला तर लवकर करपट वास मारतो, म्हणूनही पोळी हळुवार करावी.
- तिळगूळ पोळी बनविण्यासाठी लागणारी सामग्रीः–
- तिळ = एक वाटी
- गुळ = दोन वाटी
- शेंगदाणा पावडर = अर्धी वाटी
- बारीक केलेले खोबरे = सात -आठ चमचे
- मीठ, पाणी = आवशक्यते प्रमाणे
- तूप = गरजे प्रमाणे
- गव्हाचे पीठ / मैदा = तीन वाटी
- तिळगूळ पोळी बनविण्याची कृतीः-
एक वाटी तिळ छान भाजून घ्यावे आणि मिक्सर मधून बारीक करावे. खिसणीने गूळ दोन वाटी खिसून घ्यावा. त्यात खोबरे खिस करून टाकावा . चवीनुसार विलायची पावडर टाकावी. अर्धी वाटी भाजून केलेले शेंगदाणा पावडर टाकावे. हे सर्व मिश्रण एकजीव करावे . आता पोळी साठी मैदाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ घेउन त्यात थेाडे मीठ व तुप टाकून मळून घ्या. अर्धा तास नंतर कणकीचा बारीक गोळा करून त्यात हे सारण भरून पेाळी चांगली लाटून घ्यावी. लाटताना सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर गॅसवर तवा गरम करून त्यावरती थोडे तूप टाकून भाजून घ्यावी. तिळगूळची पोळी मंद गॅसवर भाजावी, मोठा गॅस असेन तर गूळ चा करपट वास येण्याची शक्यता असते .
- टिप्सः-
1. तिळाची पोळी करतांना तीळ छान खरपूस भाजुन घ्यावी आणि मगच मिक्सर मधून काढावे .
2. तुपा ऐवजी तेलाचा पण वापर करावा , म्हणजे तिळगूळ च्या पोळी ची चव अजून वाढते .
सारांश -पुरणपोळी कशी बनवायची/ पुरणपोळी ची रेसिपी (puranpoli recipe in marathi)
वरील माहिती ” पुरणपोळी कशी बनवायची (how to make puranpoli) ” ही माहिती वाचून तुम्ही अगदी योग्य आणि रुचकर मऊसुद पोळी बनवू शकता . या लेखातील माहितीचा आणि कृतीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि मऊसुद अशी पुरणपोळी बनेल , या महितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल .
आपल्याला “पुरणपोळी कशी बनवायची /पुरणपोळी ची रेसिपी” ही मराठी रेसिपी (puranpoli recipe in marathi/how to make puranpoli) या विषयी ची माहिती कशी वाटली, आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)