नखे वाढवण्याचे उपाय | नखे कशी वाढवायची – घरगुती उपाय

नखे वाढवण्याचे उपाय | नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय /नखे कशी वाढवायची (How to grow nails in marathi) >> प्रत्येकाला आपले सौदर्यं हे अधिक खुलून दिसावे असे वाटत असतेच, आणि त्यातल्या त्यात मुलींना तर सौंदर्य वाढवणे हे जरा अधिकच आवडत असते. सौंदर्य वाढविण्याच्या अनेक पद्धती मधील एक पद्धत म्हणजे नखे वाढविणे.त्यासाठी आम्ही आजच्या लेखात “नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय, तसेच नखे कशी वाढवायची , याविषयी माहिती देणार आहोत. सौंदर्य वाढवण्यासाठी आणि आपल्या सौदर्यांत भर टाकण्यासाठी काही मुली नखे वाढवतात.

नखे वाढवण्याचे उपाय | नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय /नखे कशी वाढवायची (How to grow nails in marathi

नख वाढवले तरी त्याची निगा सुध्दा राखणे तेवढेच गरजेचे आहे. प्रत्येक ड्रेसवर मॅंचींग नेलपेंट लावणे हे जवळपास सर्वच मुलींना आवडते. पण काही वेळा दैनंदिन स्वयंपाक करणार्‍या, भांडे घासणार्‍या किंवा घरातील धुणे धुणा-या मुलींना / स्त्रियांना पण नखे वाढवावी वाटतात. पण अशा कामांमुळे त्यांना नखे वाढवता येत नाही.काही मुलींना कामांमुळे नखे वाढवता येत नाहीत आणि वाढवली तरी ती तुटतात. त्यांची निगा व्यवस्थित राखता येत नाही अशा मुली किंवा स्त्रिया फॅशन करण्यासाठी आर्टिफिशिअल नखांचा देखील वापर करतात. त्या पेक्षा आपण आम्ही जे नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत ते करावे .

नखे जर वाढत नसतील तर त्याचे कारण ,काही जणांमध्ये कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे नखे वाढण्याचा कालावधी हळू असतो . काही काही लोकांना नखे खाण्याची घाणेरडी सवय असते. नखे खाल्ल्याने नखांमध्ये बसलेली घाण तोंडात जाते आणि मग पोटात बॅक्टेरीया जावुन विविध आजार मागे लागतात. पण आम्ही असे काही नखे वाढविण्याचे उपाय सांगणार आहोत ज्याने नखे मजबूत देखील होतात . आजच्या लेखात आपण पाहणार आहोत ,” नखे कशी वाढवायची /नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय ” याविषयी विस्तृत माहिती , ज्याने तुमची नखे जोमाने वाढू लागतील .

            ‘नखे वाढवण्याचे घरगुती उपाय’ या लेखात,असे काही घरगुती उपाय आहेत, ज्यांच्यामुळे आपण आपली इच्छा पुर्ण करू शकता. म्हणजेच वेगवेगळया शेपची नखे वाढवु शकता, त्यांना नेलपेंट लावु शकता. त्यावर निरनिराळे नेलआर्ट करून आपल्या हातांची किंवा पायांची निगा राखुन आपण आपल्या हाता पायाच्या नखांची छान फॅशन करू शकता आणि आपल्या सौंदर्यात भर घालू शकता . चला तर मग , आपण आज कसे नैसर्गिकरित्या नखे वाढवण्याचे उपाय /नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय / नखे कशी वाढवायची ( nakhe vadhavnyasathi upay ) कोणते ते पाहुयात.

Table of Contents

नखे वाढवण्याचे उपाय | नखे कशी वाढवायची/नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय (How to grow nails in marathi)

माझी नखे देखील लांब, सुंदर ,आणि आकर्षक असावी असे जवळपास सर्वच मुलींना तसेच तरुण महिलाना वाटते ;परंतु प्रत्येक तरुणीचे नखे लांब तसेच आखीव- रेखीव वाढतीलच असे नाही, काही मिळविण्यासाठी काही तरी तर करावेच लागते. या करिताच, नखे वाढवण्याचे उपाय, नखे कशी वाढवायची आणि त्याच बरोबर नखे स्वच्छ पांढरे कसे राहतील? तसेच यासाठी नखांची काळजी कशी घ्यायची? याची विस्तृत माहिती या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न केलाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात नखे कशी वाढवायची , नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय –

संत्री – नखे वाढवण्यासाठी उत्तम उपाय

नखे वाढवण्याचे उपाय | नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय /नखे कशी वाढवायची (How to grow nails in marathi - संत्री
संत्री

संत्री या फळामध्ये ‘क’ हे जीवनसत्व असते , जे केस वाढण्यास , त्वचेला उजळ बनविण्यास तसेच नखे वाढण्यास उपयुक्त ठरते . आपण संत्री खल्या नंतर आपल्या शरीराला तर फायदा होतोच , पण त्याच बरोबर संत्री ची साल फेकून न देता त्या संत्रीची साल नखांवर घासावी . किमान दहा ते पंधरा मिनिटे संत्र्याची साल नंखावर घासल्याने त्याचा नाखाला फायदा होतो व नखे तुटत नाहीत. तसेच, संत्रीमधील ज्युस देखील नखांवर लावावा आणि तो देखील लावुन दहा मिनिटे तसाच ठेवावा. याने नखे वाढण्यास मदत होते. नखांवर लावलेला ज्युस दहा मिनिटांनी धुवून टाकावा याने नक्कीच तुम्हाला तुमचे नखे वाढवण्यासाठी फायदा होईल.

गरम पाणी आणि लिंबाचा रस – नखे वाढविण्यास फायदेशीर

नखे वाढवण्याचे उपाय | नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय /नखे कशी वाढवायची (How to grow nails in marathi -
लिंबू आणि गरम पाणी – नखे वाढवायला फायदेशीर

गरम पाणी हे आपल्या शरीरातील आकसलेल्या ग्रंथी मोकळ्या करण्यास अतिशय फायदेशीर ठरते . त्यामुळे एका पातेल्यात थोडे गरम / कोमट पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये एका पूर्ण लिंबाचा रस घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये जवळपास दहा – पंधरा मिनिटे हात बुडवून ठेवावा . साधारण पंधरा मिनिट नंतर साध्या थंड पाण्याने हात धुवावे आणि कोरड्या कपड्याने पुसावे . लिंबू रस आणि गरम पाणी या मिश्रणात हात बुडवून ठेवल्याने नखे तर नक्कीच वाढतील पण त्याच सोबत स्वच्छ सुंदर आणि पांढरे शुभ्र देखील दिसतील. एक आठवड्यातून जवळपास तीन वेळा हा उपाय करवा , यामुळे तुमच्या नखांची वाढ नक्कीच होईल आणि नखे स्वच्छ आणि चमकदार होतील.

लसूण – नख वाढवण्यासाठी घरगुती उपाय

नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय - लसूण
लसूण

बर्‍याच जणांची नखे ही काही उपाय केले की लागलीच वाढतात परंतु ; काही दिवसात लगेच तुटतात .कारण नखाचा पोत नाजुक असतो अशा वेळी लसूण हा नखे मजबूत नख वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो . रात्रीच्या वेळी तुमची सर्व कामे आटोपल्यावर अगदी झोपायच्या आधी लसूण घ्यावा आणि तो आपल्या नखांवर घासावा त्यामुळे नखे खुप भराभर वाढतात आणि नखांचा पोत सुधारतो आणि नखे आधीपेक्षा टणक होतात . तुम्हाला जर लवकरात लवकर नखे वाढवायची असतील आणि वाढलेली नखे टिकवायची असतील , तर हा उपाय रोज रात्री झोपण्यापूर्वी करावा.

ऑलिव्ह ऑईल – नखे वाढवण्यासाठी गुणकारी उपाय

नखे वाढवण्याचे उपाय - ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल

ज्याप्रमाणे आपल्या केसांच्या वाढीसाठी तेल/ ऑइल मदत करते , केसांचे पोषण करते त्याचप्रमाणे नखांना देखील पोषक द्रव्य म्हणून ऑलिव्ह ऑइल काम करते . इतर उपायां प्रमाणेच ऑलिव्ह ऑईलचा देखील नखे वाढण्यास चांगलाच उपयोग होतो . ऑलिव्ह ऑईलमध्ये ई व्हिटॅमिनची मात्रा असल्यामुळे हे नखांना पोषकतत्त्वे देतात. त्यामुळे नखे भरभर वाढण्यास मदत होते. आणि नखे स्ट्रॉंग , मजबूत देखील होतात आणि नखे लवकर तुटण्याची समस्या देखील सुटते . ऑलिव्ह ऑइल नखाला लावण्याच्या उपायाने नखे लवकर तर वाढतातच पीएन त्याच बरोबर चमकदार ,मजबूत आणि आकर्षक दिसतात.नखांवर एक वेगळीच चमक येते .

खोबर्‍याचे तेल – नखे वाढवण्यासाठी फायदेशीर

खोबर्‍याचे तेल आपण केंसाना तर लावतोच पण या खोबर्‍याच्या तेलाचा वापर नखे वाढवण्यासाठी सुध्दा केला जावु शकतो. आपले केस आणि नखे हे शरीरातील सौम्य हाडे म्हणून ओळखले जातात आणि त्याच्या पोषक तत्वासाठी खोबरेल तेल हे आधी पासूनच प्रचलित आहे . खोबर्‍याचे तेल हलकेसे कोमट करून घेवुन त्याची आपल्या नखांवर मालीश करावी याने नखांची वाढ तर होतेच शिवाय नखे मजबुत देखील होतात ज्यामुळे ती तुटत देखील नाही हा उपाय रोज केला तरी फायदेशीर ठरेल आणि सातत्याने आपली नखे वाढण्यास मदत होईल.

मोहरीचे तेल – नखे वाढवण्यास उपयुक्त

मोहरीचे तेल देखील नखे वाढवण्यासाठी उपयोगी ठरते. मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा -3 व ओमेगा -6 तसेच नखे वाढण्यास उपयुक्त अशा असिड चा समावेश असतो . जे नखाना जोमाने वाढीस मदत तर करतोच ; पण त्याचबरोबर नखे तंदुरुस्त व मजबूत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे खोबर्‍याच्या तेलाप्रमाणेच मोहरीच्या तेलाने देखील नखांची मसाज केली तर, त्याचा नक्कीच फायदा होईल . मोहरीच्या तेल थोडेसे कोमट करून नखांवर हलकेसे मसाज करावे . असे आठवडयातुन किमान दोन ते तीन वेळेस करावे. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

टोमॅटोचा रस आणि ऑलिव्ह ऑइल – नखे वाढवण्याचा गुणकारी उपाय

नखे वाढवण्याचे उपाय - टोमॅटोचा रस
टोमॅटो

टोमॅटो मध्ये व्हिटॅमीन ए ,व्हिटॅमीन सी तसेच ई आणि व्हीटामीन के हे घटक असतात जे त्वचेसाठी ,आणि नखे वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात . टोमॅटो चा वापर आपण नखे वाढवण्यासाठी सुद्धा करू शकतो . टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावेत, आणि त्याचा रस काढुन घ्यावा . निदान हा रस एक कप तरी असावा. आता हया टोमॅटोच्या रसामध्ये ऑलिव्ह ऑईल चार चमचे मिसळावे व हे मिश्रण आपल्या नखांवर पंधरा मिनिटे लावुन ठेवावे.

त्यानंतर थंड पाण्याने हात धुवावा .यामुळे नखे वाढवण्यासाठी बराच फायदा होतो आणि तुमचे नखे जोमाने वाढतील. असा हा टोमॅटो आणि ऑलिव्ह ऑइल, नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून उपयोगी आहे. हा उपाय केल्याने नखांवर चमक देखील बर्‍याच प्रमाणात वाढू शकते. आणि नखाला पौष्टिकता देखील मिळते.

लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल – नखे जलद वाढवण्याचा उपाय

नखे वाढवण्याचे उपाय | नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय /नखे कशी वाढवायची (How to grow nails in marathi

ज्या प्रमाणे नुसता लिंबाचा रस नखे वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो त्याच प्रमाणे लिंबाच्या रसामध्ये थोडेसे ऑलिव्ह ऑईल टाकुन ते थोडे गरम करून घेऊन त्या नंतर या तेलाने नखांना मालीश करावी. याने नखे जलद वाढण्यास मदत होते. नखावर चमक येते .लिंबू रस सोबत , लिंबाची सालसुध्दा नखांवर घासल्यास त्याचा देखील नखे वाढवण्यासाठी फायदा होतो. आपल्याला नखे कशी वाढवायची हा प्रश्न असेन तर , हा उपाय त्याचे उत्तर आहे.

मध,रोझमिरीचे तेल आणि नारळाचे तेल -नखे वाढवण्यासाठी उपाय

साधारण एक चमचा मध, एक चमचा रोझमिरीचे तेल आणि एक चमचा नारळाचे तेल चांगले मिक्स करून घ्यावे . हे तयार झालेले मिश्रण नखांवर लावल्यास नखे वाढतात आणि मजबुत देखील होतात.आठवड्यातून साधारण दोन ते तीन वेळा हा नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय केल्यास नक्कीच उपयोगी ठरेल आणि तुमचे नखे लवकर वाढतील आणि तुटनार नाहीत .

लसूण, व्हिटॅमिन ई ची कॅप्सुल आणि लिंबाचा रस

लसूण हा आपल्या शरीरासाठी गुणकारी तर आहेच, पण त्याबरोबर नखे कशी वाढवायची या प्रश्नावर उत्तर म्हणून देखील लसूण गुणकारी आहे. लसणाच्या साधारण तीन ते चार पाकळया घ्याव्यात, पाण्यामध्ये त्या पंधरा मिनिटे उकळुन घ्याव्यात. यानंतर त्या पाण्यातुन उकळुन घेतलेल्या लसणाची पेस्ट करून त्यामध्ये व्हिटॅमिन ई ची कॅप्सुल आणि थोडासा लिंबाचा रस टाकुन चांगले मिश्रण तयार करून घ्या. आता हे तयार मिश्रण नखांना लावावे. याने नखे लवकर वाढतात त्याचबरोबर स्वच्छ देखील होतात.आठवड्यातून साधारण एक ते दोन वेळा हा , नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय केल्यास तुमचे नखे नक्कीच वाढतील .

दूध आणि अंडे – नखे वाढवण्यास फायदेशीर

दुध आणि अंडी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. दुध आणि अंडयामध्ये अशी पोषकतत्त्वे असतात, जे की आपली हाडे बळकट करण्यास मदत करतात. त्याचबरोबर दुध आणि अंडयाचा वापर आपण नखे मजबुत करण्यासाठी सुध्दा करू शकतो. त्यासाठी अंडयाचा पांढरा भाग दुधामध्ये टाकुन चांगला फेटायचा आणि यामिश्रणात दहा मिनिटे नखे बुडवून ठेवायची. नंतर दहा मिनिटांनी नखे धुवून टाकायची, हा उपाय आठवडयातुन चार वेळा केल्यास नखांना मजबुती मिळेल आणि नखे झपाटयाने वाढतील . अशा प्रकारे ,नखे वाढण्याचा घरगुती उपाय म्हणून हा उपाय करावा .

बदामाचे तेल नखे – नखे वाढवण्यास घरगुती उपाय

खोबरेल तेल आणि मोहरीच्या तेला प्रमाणेच बदामाच्या तेलामुळे सुध्दा नखे वाढण्यास मदत होते. बदामाचे तेल नखांवर लावुन मसाज करावी याने ब्लड सक्र्युलेशन चांगले होण्यास मदत होते आणि त्यामुळे नखे सुध्दा वाढतात. त्यासाठी रोज रात्री बदामाच्या तेलाने नखांची मसाज करावी. नखे वाढवण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे , याने नखे जोमाने वाढू लागतात .

टुथपेस्ट – नखे वाढवण्यासाठी उपयोगी

दातांची निगा राखण्यासाठी ज्याप्रमाणे टूथपेस्ट वापरली जाते, त्याचबरोबर नखे चांगली वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून देखील टुथपेस्टचा उपयोग केला जावु शकतो. टुथपेस्ट घेवुन नखांवर घासावी यामुळे नखांवरील पिवळेपणा नाहिसा होईल आणि नखे स्वच्छ तर होतीलच पण ती चांगली वाढून चमकदार होतील. टुथपेस्ट हे दातांप्रमाणेच नखांना देखील चमकदार करतात.

नखे कशी वाढवायची , या विचारात तुम्ही असाल तर विचार बंद करा आणि आमच्या या लेखात आम्ही जे सांगितले आहेत हे उपाय करा याने तुमचे नखे वाढण्यास नक्कीच मदत होईल.

सारांश -नखे वाढवण्याचे उपाय /नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय / नखे कशी वाढवायची ( nakhe vadhavnyasathi upay)

या वरील “नखे वाढवण्याचे उपाय / नखे कशी वाढवायची (nakhe vadhavnyasthi upay)” लेखाद्वारे आपणास ,नखे वाढवण्यासाठी घरगुती उपाय आणि नैसर्गीक उपाय कोणते आहेत आणि तुम्ही ते कशाप्रकारे करू शकता , या विषयी विस्तृत आणि परिपूर्ण माहिती आणि उपाय आपल्या लक्षात आलेच असतील ते उपाय वापरुन तुम्ही नक्कीच तुमचे नखे वाढवण्याची आणि मजबूत तसेच चमकदार बनविण्याची ईच्छा पूर्ण करू शकता आणि याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल .

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले नखे वाढवण्याचे उपाय / (nakhe vadhavnyasathi upay)नखे कशी वाढवायची , हे उपाय कसे वाटले, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top