कान दुखणे घरगुती उपाय | कान दुखीवर 8 सर्वोत्तम घरगुती उपाय

कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay in marathi) >> आज एक असा व्यक्ती सापडणार नाही, ज्याला काही दुखणे नाही. काही ना काही दुखणे हे प्रत्येकाच्या मागे असतेच. त्यातच कान दुखणे हा त्रास सुध्दा ब-याच जणांना होते. कान हा अवयव एकतर आधीच नाजुक असतो, त्यामुळे कशाचा जोरात जरी आवाज आला तर कांठाळया बसतात. आणि त्यामुळे देखील आपल्याला कान दुखण्याचा त्रास उद्भवू शकतो. तर काही जणांचे हिवाळयात थंडीमुळे कान ठणकतात आणि मग ते दुखतात. अनेकदा सर्दी झाली आणि ती बरेच दिवस राहिली तरी कान दुखतो.

कान दुखणे ची काही कारणे पुढीलप्रमाणे, काही काही वेळा कानाच्या पडदयाला धक्का लागला किंवा कानातील पडदयाला थेाडी जरी जखम झाली, तरी कान दुखतो. आणि ही कान दुखीची समस्या इतके डोके वर काढते की त्या कान दुखण्याच्या वेदनांनी माणूस अक्षरशा अस्वस्थ होतो. कधी कधी कानामध्ये छिद्र पडले असले तरी कानांची मागची बाजु दुखते कान जड झाल्यासारखा वाटतो. अशा अनेक समस्यांना मग आपल्याला सामोरे जावे लागते. कानात जर मळ झाला आणि तो वेळच्यावेळी साफ नाही केला तरी कानामध्ये मग दुखापत होते आणि कानाचे दुखणे वाढते.

कान जर दुखत असेल तर आपण सारख्या सारख्या पेनकिलर्स खातो. सारख्या पेनकिलर्सच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम उद्भवतात. आणि अशा सततच्या पेनकिलर्स खाल्याने दुसरेच दुखणे चालु होते. म्हणुनच आपण कानदुखीवर काही घरगुती उपाय करून कानाचे दुखणे कमी करू शकतो आणि आपला त्रास देखील कमी करू शकतो.

कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)

कान दुखणे यावर घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत हे उपाय करताना काही काळजी घेणे देखील गरजेची आहे ती विस्तृत स्वरुपात ज्या त्या उपायांच्या माहिती मध्ये दिलेली आहे. आपल्याला जर काही कारणास्तव कान दुखणे ही समस्या जाणवत असेल तर आपण आमच्या या लेखातील घरगुती उपाय करून पहावे याने आपला त्रास नक्कीच कमी होईल. चला तर मग जाणून घेऊयात कान दुखणे घरगुती उपाय.  

मोहरीचे तेल – कान दुखणे उत्तम घरगुती उपाय

मोहरीचे तेल - कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)
मोहरीचे तेल – कान दुखणे घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)

अनेकदा काय होते की, आपल्या कानात खुप मळ साचतो आणि मग आपला कान दुखण्यास सुरूवात होते. आणि आपण कानात हेअरपीन, काटापीन असल्या वस्तु टाकुन मळ काढण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मळ तर निघतच नाही उलट कानाला इजा होऊ शकते. त्यामुळे अशावेळेस तुम्ही मोहरीच्या तेलाचा उपयोग केला तर खुप फायदा मिळतो. मोहरीचे तेल घ्यायचे आणि ते कोमट असे गरम करायचे, कोमट तेलाचे दोन ते तीन थेंब एका कानात वरच्यावर सोडावेत.

तेल कानामध्ये जास्त आतमध्ये टाकु नये आणि ज्या कानात तेल टाकले त्या बाजुला झोपुन रहावे .यामुळे कानात साठलेला मळ वर येतो आणि मग हा मळ तुम्ही वरच्यावर इअरबड्सच्या मदतीने तो काढु शकता. अशा पद्धतीने कानातील मळ काढल्यास तुमचा कान स्वच्छ झाल्यानंतर तुमचे कान दुखणे देखील थांबते.

मीठ आणि इअरबर्ड- कान दुखणे घरगुती उपाय

मीठ - कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)
मीठ – कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)

मीठामुळे देखील कान दुखणे थांबु शकते, थेाडेसे मीठ घ्यायचे आणि ते मंद आचेवर गरम करायचे. आता या गरम केलेल्या मिठामध्ये एअरबड बुडवायचा. संपुर्ण बडला मीठ लावुन घ्यायचे आणि तो मीठाचा बड साधारण दहा मिनिटे दुखत असलेल्या कानावर ठेवायचा, हा बड जास्त कानामध्ये न घालता वरच्यावर धरून ठेवायचा. मिठामुळे काय होते की कानातील ओले असलेला द्रव किंवा पाणी शोषले जाते आणि कान दुखणे कमी होते.

एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की, कानात कधीच मीठाचे पाणी घालु नये. हा उपाय खुप काळजीने करावा आणि लक्षपुर्वक करावा. जो बड्स आहे तो अगदीच कानामध्ये घालू नये, वरच्यावर धरावा. या घरगुती उपायाने तुमचा कान दुखण्याचा त्रास नक्कीच कमी होईल.

तुळशीच्या पानाचा रस – कान दुखणे घरगुती उपाय

तुळशीची पाने - कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)
तुळशीची पाने – कान दुखणे घरगुती उपाय

आयुर्वेदीक औषधामध्ये तुळशीचा वापर खुप मोठया प्रमाणात केला जातो. तुळस ही खुप गुणकारी असते. त्यामुळे कान दुखण्याचा त्रासापासुन देखील तुळशीच्या पानांचा वापर करून सुटका होऊ शकते. तुळशीची पाने घ्यायची आणि ती ठेचुन त्या पानांमधील रस काढुन घ्यायचा. आता पाने आणि रस वेगवेगळे करा आणि मग त्या तुळशीच्या पानांचे तीन ते चार थेंब दुखणा-या कानात टाकायचे.

यांखेरीस तुम्ही हा रस खोब-याच्या तेलात घालुन तो चांगला मिक्स करून त्याचे देखील थेंब दुखणा-या कानात टाकले तर याचा देखील खुप मोठया प्रमाणात फायदा होतो. हा देखील खुप प्रभावी असा कान दुखीवर उपयोगी येणारा असा उपाय आहे.

लसूण – कान दुखणे वर गुणकारी

लसूण - कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)
लसूण – कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)

लसणाच्या साधरण दोन सोललेल्या पाकळया घ्यायच्या आणि दोन चमचे मोहरीचे तेल घ्या. गॅसवर एक छोटेसे पातेले ठेवुन त्या पातेल्यात मोहरीचे तेल टाका आणि मग लसूण घेउन त्याला थेाडेसे ठेचुन घ्या आणि मग त्या मोहरीच्या तेलात टाका. हे मिश्रण गॅसवर चांगल्याप्रकारे उकळुन घ्या नंतर थंड होऊध्या, थंड झाल्यानंतर जो कान दुखत आहे त्या कानात एकवेळा दोन ते तीन थेंब टाका, असेच दिवसातुन किमान तीनदा करावे. याने कान दुखण्याचा त्रास चटदिशी बरा होतो आणि जर कानामध्ये कशाचे इनफेक्शन झाले असेल तर ते दूर होऊन कान दुखण्याचा त्रास देखील थांबतो.

अशाच प्रकारे मोहरीच्या तेलाच्या ऐवजी तीळाचे तेल देखील लसणासोबत वापरले तरी कान दुखण्याचा त्रास कमी होतो आणि आपल्या कानाला आराम मिळतो. तेल गरम गरम कानात टाकु नये थोडेसे थंड असल्यास किंवा हलकेसे कोमट जरी असले तरी चालेल.कान दुखणे वरील हा घरगुती उपाय करताना देखील जरा सावधगिरी बाळगा.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर – कान दुखीवर फायदेशीर

कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay) - अ‍ॅपल सायडर व्हिनेगर
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर हे देखील कानदुखीवर अत्यंत प्रभावी असे औषध आहे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अॅंटीफंगल आणि अॅटी बॅक्टेरीअल हे गुणधर्म आहेत, जे की कानातील पीएच बॅलन्स बदलते. त्यामुळे कानात कोणतेही फंगस किंवा बॅक्टेरीया जिंवत राहत नाही आणि ते मरून जातात. त्यामुळे इन्फेक्शन जरी झाले असेल तर हे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वेदना कमी करण्यास मदत करते आणि कान दुखणे कमी होते.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर कॉटनच्या मदतीने किंवा इअरबड च्या मदतीने कानातील आतील भागांवर लावावे. आणि ते कॉटन किंवा इअरबड्स तसाच कानात किमान पाच मिनिटे तरी ठेवावा. याने इनफेक्शन कमी होण्यास मदत होते आणि कान देखील दुखत नाही.

कांदा – कान दुखणे वर घरगुती उपाय म्हणून गुणकारी

कांदा - कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)
कांदा – कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)

कांदयाचा रस काढुन घ्यायचा आणि तो हलकासा गरम करायचा. नंतर थोडावेळ तसाच थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आणि कोमट झाल्यानंतर त्याचे थेंब दुखणार्‍या कानात टाकायचे आहेत. याने नक्कीच आराम मिळतो तसेच कानामध्ये काही इनफेक्शन झाले असेल तर ते देखील कमी होते. कांदा हा प्रत्येक घरात सहज उपलब्ध होऊ शकतो तसेच हा घरगुती उपाय कान दुखणे वर अत्यंत गुणकारी देखील ठरतो.

आल्याचा रस– कान दुखणे घरगुती उपाय

आल्याचा रस - कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)
आल्याचा रस – कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय

कांदा आणि लसणाप्रमाणेच आल्याच्या रसाचे दोन ते तीन थेंब दुखणा-या कानात टाकले तर कान दुखण्याचा त्रास कमी होतो. हा उपाय दिवसातुन साधारण दोन ते तीन वेळा केल्यास कान दुखीवर आराम मिळतो. आले (अद्रक) हे देखील कानातील इनफेक्शन दूर करण्यास मदत करते. त्यामुळे तुमचा जर कान दुखत असेल तर तुम्ही हा घरगुती उपाय नक्की करून बघा तुम्हाला कान दुखणे पासून नक्कीच आराम मिळेल.

बदामाचे तेल– कान दुखणे घरगुती उपाय

बदामाचे तेल - कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)
बदामाचे तेल – कान दुखणे घरगुती उपाय | कानदुखीवर घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)

बदामाचे तेल हे बर्‍याच गुणधर्माने परिपूर्ण असते कारण त्यात बरेच औषधी गुणधर्म हे उपलब्ध असतात. त्यामुळे आपला कान जर दुखत असेल तर या बादमच्या तेलाचा घरगुती उपाय म्हणून वापर करावा. कान दुखत असेल तर हे बदामाचे तेल गरम म्हणजेच कोमट करून घ्यावे आणि कानात त्याचे थेंब टाकले तर आराम मिळतेा आणि त्रास कमी होतो.

बदामाचे तेल गरम करून घ्या आणि चांगले कोमट गाऊ द्या. कोमट झाल्यानंतर या कोमट तेलाचे काही थेंब जो कान दुखत आहे त्या कानात सोडा. कानात बदामाच्या तेलाचे थेंब टाकल्याने कान दुखीवर आराम मिळतो आणि कान दुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

कानात तेल टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे साधारण तीन ते चार च थेंब कानात टाकावे आणि दिवसातून जास्तीतजास्त दोन वेळा हा प्रयोग करावा याने नक्कीच आराम मिळून कान दुखायचा थांबतो.

सारांश – कान दुखणे घरगुती उपाय (kan dukhane gharguti upay)

कान दुखणे घरगुती उपाय, या लेखामध्ये आपण घरच्या घरी कान दुखीवर काय उपाय करता येतील ते बघितले आहेतच. हे उपाय घरच्या घरी करणे अवघड नसून यातील काही उपाय करून देखील तुम्ही हा त्रास कमी करू शकता आणि जर हे उपाय करून देखील तुमच्या कान दुखणे मुळे होणार्‍या वेदना कमी नाही झाल्या तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हा अवश्य घ्यावा.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले कान दुखणे घरगुती उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top