बर्फी कशी बनवायची – Barfi Recipe In Marathi

बर्फी कशी बनवायची / बर्फी कशी बनवतात / खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची / नारळाची बर्फी कशी बनवायची / रव्याची बर्फी कशी बनवतात / barfi recipe in marathi >>.या विषया वरचा आजचा हा लेख अत्यंत उपयोगी आणि महत्वाचा असा आहे. सन-वार , पाहुणे यां सारख्या गोष्टीं साठी मिठाई ही तर लागतेच लागते. मिठाई शिवाय आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे कुणाच्याही घरी सण वार अथवा घरी आलेल्या पाहुण्याचे आदरातिथ्य झाले, असे तर होणे शक्यच नाही . आपण पाहतो की, आपल्या घरी पाहुणे आले किंवा कुठला सन असला तर आपली धांदल उडते.

बर्फी कशी बनवायची / बर्फी कशी बनवतात / खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची / नारळाची बर्फी कशी बनवायची / रव्याची बर्फी कशी बनवतात / barfi recipe in marathi
बर्फी कशी बनवायची / barfi recipe in marathi

कामाची किंवा साफ सफाई ची गडबड होते आणि वेळेची तारांबळ उडते, अशा वेळी सोपे होते जर आपल्या घरात आधीच मिठाई बनवून तयार असेन तर. आपली अशी गडबड आणि धांदल होऊ नये, याचसाठी आम्ही आजचा हा लेख घेऊन येत आहोत, ज्यात आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत की, बर्फी कशी बनवायची या विषयी ची संपूर्ण रेसिपी. याचा फायदा असा की, आपल्याला मिठाई बनवण्याची गडबड होऊ नये आणि सण असो वा पाहुणे आलेली असो, तुमची मिठाई ही तयार असेन, कारण या लेखा मध्ये आम्ही जी बर्फी बनवण्याची रेसिपी सांगत आहोत ती रेसिपी वापरुन बनविलेली बर्फी ही बरेच दिवस टिकते आणि अगदी मऊ राहते व त्याची चव देखील वरचे वर वाढतच जाते.

चला तर मग पाहूया, बर्फी कशी बनवायची, याची अगदी योग्य आणि संपूर्ण रेसीपी, जी आपल्याला अतिशय उपयोगी येईल.

बर्फी कशी बनवायची/बर्फी कशी बनवतात याची (barfi recipe in marathi)

बर्फी कशी बनवायची / बर्फी कशी बनवतात / खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची / नारळाची बर्फी कशी बनवायची / रव्याची बर्फी कशी बनवतात / barfi recipe in marathi - बेसन बर्फी
बेसन बर्फी / barfi recipe in marathi

आम्ही आज जी बर्फी बनवायची रेसिपी सांगत आहोत, त्याने तुम्ही अगदी हलवाई सारखी रेसिपी बनवू शकता अगदी घरच्या घरी आणि ती लवकर खराब देखील होत नाही व त्याचा वास देखील येत नाही. आजच्या लेखात आपण खोबर्‍याची बर्फी कशी बनवायची ,नारळाची बर्फी कशी बनवायची तसेच मिल्क पावडर वापरुन बनवली जाणारी बर्फी, याची रेसिपी पाहणार आहोत. सर्व प्रथम पाहूया मिल्क पावडर वापरुन बनविलेली बर्फी ची रेसिपी ( barfi recipe in marathi ) –

खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची

आपल्या सर्वांच्याच घरात खोबरे हे असतेच आणि खोबरे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते , सुक्या मेव्यातील सर्वात जास्त वापरले जाणारे आणि अगदी सर्वां कडेच उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे खोबरे, चला तर मग पाहूया, खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची ( barfi kashi banvaychi)

खोबर्‍यापासून बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ह्या प्रकारची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे-

सुके खिसलेले खोबरे – दोन वाटी

बेसन पीठ किंवा मिल्क पावडर – अर्धी वाटी

बारीक केलेली साखर -दोन वाटी साखर

दूध आणि दुधा वरची साय – दोन ते तीन वाटी

विलायची पावडर – दोन चमचे

ड्रायफूड चे काप -आवडी प्रमाणे

जायफळ – आपल्या आवडीनुसार अर्धा चमचा

खोबर्‍यापासून बर्फी बनविण्याची कृती –

खोबरे वापरुन बर्फी ही खाण्यास अतिशय चवीष्ठ लागते .खोबर्‍या पासून बर्फी बनविताना सर्वप्रथम खोबरे साफ करून खिसून घ्यावे. आता एका पॅन मध्ये थोडे तूप टाकून अर्धी वाटी बेसन पीठ छान लालसर भाजून घ्यावे. जर आपल्याला हरभरा डाळ च्या पीठाचा त्रास होत असेन तर आपण मिल्क पावडर देखील वापरू शकता. खिसलेले खोबरे व छान लालसर / तपकिरी भाजेलेल अर्धी वाटी बेसन पीठ अथवा मिल्क पावडर मिक्स करून झाल्यावर त्यात दोन वाटी बारीक केलेली साखर टाकावी .

आता हे सर्व साहित्य पुर्ण पणे मिक्स करून घ्यावे .खोबरे , मिल्क पावडर आणि बारीक साखर मिक्स झाल्यानंतर त्यात दोन चमचे विलायची पावडर टाकावी आणि अर्धी वाटी साय आणि घट्ट गोळा होईल एवढे दूध टाकावे. आता हे सर्व एकसारखे करून घ्यावे आणि आपल्या आवडी प्रमाणे त्यात ड्राय फूड काप टाकावे व एका ट्रे ला खालून तूप लावावे व त्यात हे सर्व सारन टाकावे.

सारण टाकल्यानंतर त्याला एकसारखा पृष्ठ भाग यावा याकरिता त्यावरून एक सपाट ताट फिरवावे, आणि त्याला थंड आणि सेट होण्यासाठी दोन तास ठेवावे . दोन तास नंतर या ट्रे वर सूरी ने बर्फी च्या आकाराच्या वड्या पाडून घ्याव्या. वड्या हळुवार पाडाव्या जेणे करून बर्फी तुटणार नाही आणि आता झाली आपली छान अशी खोबर्‍याची बर्फी तयार॰

मिल्क पावडर पासून बर्फी बनविण्यासाठी साहित्य

आपण पाहतो की, बाजारात अनेक प्रकारच्या बर्फी मिळत असतात. या प्रत्येक बर्फी ची स्वतः ची अशी वेगळी खासियत असते आणि वेगळी चव असते. बर्फी आपण आपल्याला आवडतो त्या फ्लेवर मध्ये बनवू शकतो. तसेच ओले नारळ, खोबरे ,मावाअथवा बेसन, रवा अथवा मिल्क पावडर यांपैकी कोणते ही साहित्य वापरुन आपण बर्फी बनवू शकतो ती देखील घरच्या घरी अगदी उत्कृष्ठ प्रकारे.

बर्फी कशी बनवायची / बर्फी कशी बनवतात / खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची / नारळाची बर्फी कशी बनवायची / रव्याची बर्फी कशी बनवतात / barfi recipe in marathi
बर्फी बनवणे / barfi recipe in marathi

आज आपण आपल्या या लेखात, सर्वप्रथम आपण मावा न वापरता मिल्क पावडर वापरुन बर्फी बनविण्याचीची कृती पाहूया. आपण पाहतो की, बर्‍याच वेळेस आपल्याला अगदी ताजा आणि भेसळ मुक्त मावा, मिळत नाही, तसेच काही वेळेस मावा आणल्यास त्याला वेगळाच कुम्मट वास येतो , त्यामुळे आम्ही आज मिल्क पावडर वापरुन बर्फी कशी बनवायची याची रेसिपी तसेच ओल्या नारळ पासून बर्फी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन येत आहोत. सर्वप्रथम आपण मावा न वापरता मिल्क पावडर वापरुन बर्फी कशी बनवायची ते पाहूया तर मिल्क पावडर वापरुन बर्फी बनविण्यासाठी लागणारे साहित्य आहे –

  1. दूध – 3 वाटी
  2. साखर – 2 वाटी
  3. साजूक तूप – मोठे चार ते पाच चमचे
  4. केशर – चवीसाठी
  5. मिल्क पावडर – 3 वाटी
  6. विलायची पावडर – 2 चमचे
  7. काजू / पिस्ता चे काप – सजावटीसाठी

मिल्क पावडर पासून बर्फी बनविण्याची कृती

        बाजारामध्ये देखील वेगवेगळ्या बर्फी मिळतात पण काही वेळा साधारण सणा-सुधीच्या वेळी त्यामध्ये थोडीशी भेसळ होण्याची शक्यता असते, आणि त्यासाठीच आपण घरीच अगदी मिठाईवाल्या सारखी बर्फी बनविण्याची रेसीपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण मावा म्हणजेच खवा अजिबात नाही वापरणार. खवा / मावा न वापरता उत्कृष्ठ अशी बर्फी बनविण्यासाठी मिल्क पावडर चा वापर करणार आहोत.

       सगळयात आधी आपण एका मोठ्या पॅन अथवा पॉट मध्ये तीन कप दुध घालायचे आहे. आपण जर वाटीच प्रमाण घेत असेल तर तीन वाटी दुध घालायचे आहे त्यानंतर यामध्ये दोन कप साखर घालायची आहे. साखर आता यामध्ये विरघळुन घ्यायची आहे. त्या दुधात पुर्णपणे साखर विरघळल्या शिवाय पुढची कृती करायची नाही. साखर आणि दूध पुर्णपणे एकत्र झाले हे व्यवस्थित पहावे आणि साखर पुर्णपणे विरघळली नसेन तर पुर्णपणे विरघळावी.

       साखर व्यवस्थित विरघळली की, यामध्ये आपण मोठे चमचे भरून चार किंवा पाच आपल्या आवडीप्रमाणे साजुक तूप त्या साखर विरघळलेल्या दुधात अगदी पुर्णपणे मिक्स करायचे आहे. थोडसं 1 चमचा जास्त घातले तरी चालेल . आता हे सुध्दा त्यामध्ये व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे .साखर , दूध आणि साजूक तूप पुर्णपणे मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये थोडसं केशर घालायचं आहे. केशर घातल्याने बर्फीला फ्लेवर छान येतो , जर आपल्या घरी असेल केशर असेल तरच घालावे , जर आपल्याकडे उपलब्ध नसेन तर केवळ विलायची पूड घातली तरी चालेल .

साखर ,दूध ,तूप ,केशर आणि विलायची हे आता मिक्स करुन झाल्यानंतर , त्यामध्ये तीन वाटी मिल्क पावडर मिक्स करावी . हे मिल्क पावडर घातल्यानंतर एकसारखं हालवत राहायचं म्हणजे एक सारखं नीट करून मिक्स केल्यास त्याच्या गाठी होत नाहीत . त्यानंतर त्या पीठाचा पीठ असा मऊ गोळा होईपर्यंत एकसारख भिजवत राहावे , कुठेही गाठी राहू देऊ नये . जवळपास 3 ते 4 मिनिट एकसारखं हालवुन घ्यायचे आहे , मग छान पैकी मऊ असा गोळा तयार होईल . जसजसा वेळ होईल तसतसा हा गोळा दाटसार होईल म्हणजेच घट्ट होईल . त्यानंतर 7 ते 8 मिनिटा नंतर थोडे थोडे दूध लाऊन त्यास मऊसर आणि सैलसर असे बनवून तयार करून घ्यावे .

   आता या बॅटल ची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 8 बाय 8 इंचचा ट्रे . ज्यामुळे आपल्याला बर्फी च्या छान वड्या पाडणे सोपे जाणार आहे . ट्रे घेतल्यानंतर त्या ट्रे ला चारही बाजूंनी पातळ करून तूप लावावे . जेणे करून बर्फी च्या वड्या पाडताना त्या ट्रे ला चिटकणार नाहीत . आपली बर्फी आरामात ट्रे च्या बाहेर काढली जाईल आणि तिचा शेप जाणार नाही

सारण टाकल्यानंतर त्यावर सजावटी साठी पिस्ता काप , काजू काप , असेन तर चांदी वर्क लावावे आणि जवळपास 10 मिनिट नंतर चौकोनी तिरप्या म्हणजे बर्फी सारख्या वड्या पाढाव्या , आणि त्यानंतर हा ट्रे सेट होण्यासाठी 3 तास तरी बाजूला ठेवावा . तीन तासानंतर आपली मऊ अशी बर्फी तयार झालेली असेन. तीन तास झाल्यानंतर बर्फी ट्रे च्या बाहेर काढताना हळुवार काढावी जेणे करून त्या तुटणार नाहीत आणि अलगद ट्रे च्या बाहेर निघतील . अशा पध्दतीने आपली अगदी हलवाईया सारखी मिल्क पावडर वापरुन बनवलेली बर्फी तयार झालेली आहे.

नारळाची बर्फी कशी बनवायची

ज्या प्रमाणे आपण मिल्क पावडर वापरुन बर्फी बनविली अगदी त्याचप्रमाणे , ओले नारळ आणि खोबरे वापरुन देखील बर्फी बनवू शकतो त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे .

ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची / ओले नारळ पासून बर्फी बनविण्याची कृती

1.         आता आपण ओल्या नारळाची बर्फी करणार आहोत. ओल्या नारळाची वडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य – ओल नारळ, साखर आणि तुप या साहित्याचा वापर करावा. आपल्याला एका नारळाला १ ग्लास साधारणत: मध्यम आकाराचा ग्लास या प्रमाणात साखर घ्यायची आहे. म्हणजे एक ग्लास साखर भरून घ्यायची आहे.

2.         सगळयांत आधी आपल्याला या नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. बारीक तुकडे करून झाल्यानंतर. त्यांनतर हयाला परत मिक्सरमधुन बारीक करून घ्यायचे आहे. जेणे करून आपल्या बर्फी मध्ये नारळचे तुकडे दिसणार नाही आणि बर्फी एकसारखी होईल .

3.         वडी / बर्फी बनवण्या साठी गॅस वर एक कढई ठेवायची आहे. त्यामध्ये आपल्याला तुप टाकायचे आहे. थोडसं गरम होवु दयायचे आहे. आता यामध्ये आपण बारीक केलेले खोबरे टाकायचे आहे. याला लालसर होईपर्यंत परतुन घ्यायचे आहे. साखरही यामध्ये घालायची आहे. दोन्ही एकत्रच गॅस वर भाजुन घ्यायचे आहे. लालसर कलर येई पर्यंत हे सगळं एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बर्फी च्या आकाराच्या त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या .

अशा प्रकारे आपण खोबर्‍याची बर्फी आणि नारळाची बर्फी वरील साहित्य आणि कृती वापरुन आपण बनवू शकतो .

सारांश – बर्फी कशी बनवायची / खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची /नारळाची बर्फी कशी बनवायची/(barfi recipe in marathi)

आपल्याला जर घरच्या घरी हलवाई सारखी बर्फी बनवायची असेन आणि आपल्या कडे जर ताजा , आणि भेसळ विरहित मावा नसेन तर आमच्या या लेखा तील ” बर्फी कशी बनवायची ” ही रेसिपी आपल्याला अतिशय उपयुक्त आहे , आमच्या लेखा तील माहिती वाचून तुम्ही मिल्क पावडर वापरुन बर्फी आणि ओले नारळ पासून बर्फी बनवू शकता .

आपल्याला बर्फी कशी बनवायची ही मराठी रेसिपी / खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची / ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची (barfi recipe in marathi) या विषयी ची माहिती कशी वाटली, आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top