तळपाय दुखणे उपाय | १२ सर्वोत्तम घरगुती उपाय

तळपाय दुखणे उपाय | १२ सर्वोत्तम घरगुती उपाय (talpay dukhane gharguti upay) >> तळपाय दुखणे हे देखील आपल्याला प्रचंड वेदना देणारे दुखणे आहे. आपल्या पायाचा चालताना जमिनीशी संपर्क हा तळपाया द्वारेच येतो आणि त्यामुळेच हा तळपाय दुखायला लागला की चालणे सुध्दा मग अवघड होऊन बसते. काहींचे तळपाय दुखतात तर अनेकांच्या तळपायांची आग होते. तळपायाला आग होण्याचे कारण खुप वेळा एका जागेवर उभे राहने किंवा खुप चालल्याने देखील तळपायांचे दुखणे चालु होते.

आपल्या शरीराच्या दोन टोकाच्या दोन गोष्टी म्हणजेच तळपाय आणि मेंदू यांचा एकमेकांशी संबंध आहे. तळपायांना झालेल्या संवेदना ह्या कशा आहेत हे मेंदुमधुन समजते. तळपायांपासुन मेंदुकडे जाणा-या वेदना या विजेच्या प्रवाहाप्रमाणे अति वेगाने जात असतात. मग कधी कधी तळपायांमध्ये असणार्‍या पेशी गरम होतात, आणि मग त्या वेदना देतात. मेंदुमध्ये प्रत्येक भागांमध्ये काम करणार्‍या पेशी सतत रासायनिक द्रव्य तयार करतात. ही रासायनिक द्रव्ये विशिष्ट ठिकाणी किंवा त्यांच्या वेळेत वेगळया वेगळया पध्दतीने तयार होणे अत्यंत गरजेचे आहे.

अशा या तळपाया च्या दुखण्यावर आपण काही घरगुती उपाय करून देखील आराम मिळवू शकतो. या लेखामध्ये आपण त्या संबंधित माहिती बघणार आहोत.

तळपाय दुखणे उपाय | १२ सर्वोत्तम घरगुती उपाय (talpay dukhane gharguti upay)

उंच टाचांचे बूट / सॅंडल- तळपाय दुखण्याचे कारण होऊ शकतात - तळपाय दुखणे घरगुती उपाय
उंच टाचांचे बूट / सॅंडल- तळपाय दुखण्याचे कारण होऊ शकतात

तळपाय दुखणे म्हणजे पायांच्या मध्यभागात त्रास सुरू होतो. उंच टाचाच्या चपला किंवा योग्य नसलेले बुट जर पायात घातले तर तळपाय दुखण्याचा त्रास सुरू होतो किंवा कोणताही खेळ खेळताना जोरात जर पळण्यात आले किंवा अतिशय जोरात हालचाली झाल्या तर तळपायांना इजा होवु शकते. कधी तर तळपायांचा त्रास इतका उदभवतो की असे वाटते आपल्या तळपायांच्या खाली खडा गेला आहे आणि तो आपल्याला टोचत आहे. तर अशाच पध्दतीच्या तळपायांच्या दुखण्यावर आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात तळपाय दुखणे उपाय (talpay dukhane upay).

देशी गाईचे तूप

तळपाय दुखत असतील तर देशी गाईचे तुप घ्यावे. घरी बनवलेले असेल तर उत्तमच, नंतर त्या तुपात मीठ टाका आणि या मिश्रणाने तळपायाला मसाज करा. याने तळपायाचे दुखणे कमी होवुन त्रास कमी होतो आणि त्याचबरोबर पायांना आणि टाचांना भेगा सुध्दा पडत नाहीत. पायांच्या तळव्यांना नुसते तुप लावले तरी देखील पायांचे तळवे दुखणे कमी होते.

चंदन पावडर

चंदन पावडर - तळपाय दुखणे उपाय (talpay dukhane upay)
चंदन पावडर

बाजारात जी चंदनाची पावडर मिळते ती तळपाय दुखत असल्यास अतिशय उपयोगी येते त्यासाठी चंदन पावडर घ्यायची आणि त्यामध्ये गुलाबजल टाकून चांगले मिक्स करून हा लेप तयार करून घ्या आणि तळपायांना लावा. आठवड्यातून तीन वेळा असे केल्याने पायांना थंडावा मिळतो. तळपाय दुखणे वर हा घरगुती उपाय केल्याने पायांची आग होणे कमी होते आणि तळपायांचे दुखणे देखील बंद होते.

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल - तळपाय दुखणे उपाय (talpay dukhane upay)
मोहरीचे तेल – तळपाय दुखणे उपाय (talpay dukhane upay)

रोज रात्री झोपायच्या आधी मोहरीच्या तेलाने तळपायाची मालीश केल्याने, तळपायाच्या दुखण्यावर आराम मिळतो आणि रात्रभर शांत झोप लागते. असे रोज रात्री झोपताना केल्यास काही दिवसातच तुमचे तळपाय दुखणे किंवा तळपायाची आग होणे थांबेल. किंवा मोहरीच्या तेलामध्ये थंड पाणी नाहीतर एखादा बर्फाचा तुकडा टाकुन त्याने देखील तुम्ही तळपायांची मालिश केली, तर लवकरच तळपांयाना होणार्‍या वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच तळपायांची जर आग होत असेल तर ती सुध्दा कमी होऊन आराम मिळतो.

तिळाचे तेल

तिळाचे तेल - तळपाय दुखणे उपाय (talpay dukhane upay)
तिळाचे तेल – तळपायाच्या दुखण्यावर गुणकारी

तिळाचे तेल घ्यावे आणि त्या तेलाने पायांची आणि तळपायाची मसाज करावी आणि नंतर कोमट पाण्याने पाय धुवून टाकावेत. नक्कीच पायांना आणि तळपाय दुखणे वर आराम मिळेल. कारण तीळ च्या तेलणे मालीश केल्याने आकुंचन झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि रक्तप्रवाह हा देखील सुरळीत चालतो. तिळच्या तेलणे पायाचे रक्ताभिसरण योग्य होते.

जवसाचे तेल

तिळच्या तेलाप्रमाणेच जवस चे तेल देखील अत्यंत उपयोगी आणि लाभदायक असे आहे, त्यासाठीच तळपाय दुखत असतील तर हमखास या तेलाचा वापर केला जातो जवसाच्या तेलाने सुध्दा पायांची आणि तळपायांची मालिश केली जाते , आणि त्यामुळे पायांना आणि तळव्यांना आराम मिळतो व तळपाय दुखणे कमी होण्यास बरीच मदत मिळते.

कारले

कारले - तळपाय दुखणे उपाय (talpay dukhane upay)
कारले – तळपाय दुखण्यावर उत्तम उपाय

कारले हे खायला कडु लागते पण हे तळपायाच्या दुखण्यासाठीच नव्हे तर आपल्या बर्‍याच आजरांसाठी खुपचं गूणकारी असते. कारल्याच्या रसाने पायांची व तळपायाची मालिश केल्याने पायांच्या तळव्यांचे दुखणे हे कमी होते. कारण कारल्यांच्या रसामध्ये औषधी गुणधर्म असतात. जे की वेदना कमी करण्यास आणि रक्त शुद्ध करण्यास उपयोगी ठरतात.

दुधाची मलई / साई

आपल्या घरात दुध हे असतेच, नेहमी सारखेच आपण दुध तापवल्यावर दुधावर जी मलाई / साई येते ती घ्या आणि त्यामध्ये पाच ते सहा थेंब लिंबाचा रस टाकावा. आणि हया मिश्रणाने तळपायांची मालिश करावी. हा प्रयोग झोपतांना करावा. याने पायाचे तळवे मऊ होण्यास मदत होते. रात्रभर मालिश केलेले तळवे सकाळी उठल्यावर धुवून टाकावे याने नक्कीच पायांच्या तळव्यांची आग कमी होते आणि तलपायाचे दुखणे देखील थांबते.

ऑलिव्ह ऑइल

जर तुमचे तळपाय रात्री च्या वेळी जास्त दुखत असतील तर रात्री झोपण्याआधी ऑलिव्ह ऑईलने पायांच्या तळव्यांची मालिश करावी. याने पायांच्या तळव्यांची त्वचा चांगली राहण्यास मदत होते आणि तळवे दुखण्याचा त्रास सुध्दा बंद होतो. तळपाय दुखणे वर हा उत्तम घरगुती उपाय असून रोज रात्री झोपताना तुम्ही हा उपाय करू शकता याने निश्चितपणे आराम मिळेन.

बर्फाने शेकणे – तळपाय दुखणे थांबेल

बर्फाने शेकणे - तळपाय दुखणे घरगुती उपाय (talpay dukhane upay)
बर्फाने शेकणे – तळपाय दुखणे उपाय (talpay dukhane upay)

एक प्लॅस्टिकची बाटली घ्यावी, त्यामध्ये अर्धी बाटली पाणी भरून घ्यावे आणि ही बाटली फ्रिजरमध्ये ठेवून ध्या. बाटलीमध्ये पाण्याचा बर्फ तयार झाल्यास बाटली बाहेर काढुन घ्यावी. बाटलीबाहेर बर्फाचे तयार झालेले पाणी पुसून टाकावे आणि ही बाटली कोरडया कपडयावर किंवा टॉवेलवर ठेवावी आणि तुम्ही स्वतः खुर्चीवर बसा आणि ही बाटली कपडयासह तळपायाच्या खाली ठेवावी. ही बाटली आपल्या पायांच्या तळव्यानेच पुढे मागे करा याने तुमच्या तळपाया च्या नसा मोकळया होतात आणि रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास नक्कीच मदत होते. तसेच तळपायातील पेशींची थंडाव्याने चांगली मसाज होते. हा उपाय निदान पंधरा ते वीस मिनिटे करावा. याने नक्कीच पायांची आग कमी होवुन तळपांयामध्ये होणार्‍या वेदना देखील कमी होण्यास मदत होते.

खोबरेल तेल

आपण केसांना लावतो ते खोबरेल तेल देखील तळपाय दुखणे वर फायदेशीर ठरते, खोबर्‍याचे तेल हलकेसे गरम करून घेऊन ते तळपायांना लावुन एका गोलाकार वाटीने तळपायांची मसाज करावी याने पायांची आग कमी होऊन तळपाय दुखणे कमी होते. घरच्या घरी आणि अगदी फायदेशीर असा हा उपाय केल्याने तळव्यांच्या दुखण्यापासून त्वरित आराम मिळतो.

मेहंदी – तळपायाला थंडावा मिळतो

बाजारात गावराण मेहंदी भेटते, ती गावराण मेहंदी म्हणजेच मेंहदीची पावडर घ्यावी त्यामध्ये थोडेसे नारळाचे तेल टाकावे. तसेच त्यामध्ये थोडेसे पाणी टाकुन ही पेस्ट झोपण्यापुर्वी तळपायांना लावावी आणि रात्रभर ही मेंहदी पायांच्या तळव्यांना तशीच राहु दयावी. मेहंदी ही थंड असते त्यामुळे तुमच्या तळपायांना मेहंदी लावल्याने थंडावा मिळतो आणि तळपायांचे दुखणे सुध्दा कमी होते.

व्हिनेगर – तळपाय दुखणे गुणकारी उपाय

अॅपल सायडर व्हिनेगर हे देखील तळपाय दुखणे वर उपयोगी ठरते. दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये हे व्हिनेगर थोडे टाकून पिल्याने तळपायांच्या दुखण्याच्या समस्या कमी होतात. हा उपाय रोज नियमित केल्यास साधारण एक महिन्यांच्या आतच आराम मिळतो.

सारांश – तळपाय दुखणे घरगुती उपाय

तुम्हाला जर तळपाय दुखण्याचा किंवा तळपायाची आग होण्याचा त्रास होत असेन तर तुम्ही वरील पैकी कोणताही उपाय अगदी सहजपणे घरच्या घरी करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही खर्च ही करावा लागणार नाही आणि हे सर्व घरगुती उपाय केल्याने तळपाय दुखणे वर आराम देखील मिळेल. त्यासाठी तुम्हाला इतरत्र खर्च करण्याची आवश्यकता नाही. हे उपाय करून देखील तुम्हाला आराम वाटत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ला घेणे गरजेचे आहे.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले तळपाय दुखणे घरगुती उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top