मोदक कसे बनवायचे | रव्याचे मोदक बनवण्याची संपुर्ण रेसिपी

मोदक कसे बनवायचे (modak kase banvayche) >> मोदक हा परंपरागत चालत आलेला गणपती बाप्पांचा नैवेद्य आहे. श्री गणेशाच्या आगमनाच्या वेळी घरोघरी मोदक बनविले जातात आणि म्हणुनच मोदकाला सर्वश्रेष्ठ प्रसाद मानले जाते. या मोदकाचा आकार देखील अगदी गणपती बाप्पांसारखाच मनमोहक असतो.  पांढरेशुभ्र आणि खुसखुशीत असे मोदक दिसले की मन अगदी खाण्यासाठी आतुर होते. मोदक हा नुसता शब्द जरी ऐकला की अगदी सगळयांच्याच तोंडाला पाणी सुटते. दर महिन्यात येणार्‍या चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला मोदकांचा प्रसाद हा जवळ जवळ प्रत्येक घरात गणपती बप्पाला दाखवलाच जातो.

नुकताच श्रावणमास चालु झाला आहे. भगवान श्री शंकरांच्या आराधने नंतर आता वेळ आली ती श्री गणपतींच्या आगमनाची तर मग चला लागुया तयारीला गणपती बाप्पा मोरया म्हणत सुरूवात करूया आपल्या मोदकाच्या रेसिपीला, जाणून घेऊयात मोदक कसे बनवायचे या विषयी ची माहिती पाहूया;

मोदक कसे बनवायचे / modak kase banvtat

मोदक ही सर्वांचा आवडणारी रेसिपी आहे, परंतु जर याचे प्रमाण आणि सारण बरोबर नाही जमले तर मोदक तळत असताना ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे गणपती बप्पा ला आवडणारे मोदक कसे बनवायचे हे आपण जाणून घेणार आहोत, मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य सुरवातीला आपण जाणून घेऊयात त्यानंतर मोदक बनवण्याची संपुर्ण कृती आणि लेखाच्या शेवटी मोदक बनवण्याचे प्रकार कोणते आहेत ते आपण बघणार आहोत.

गणपती बाप्पा आहेत दैवत आराध्य……
चला तर मग बघुया………
मोदक बनविण्यासाठी लागणारे साहित्य…….

मोदक बनविण्यासाठी लागणारे साहीत्य

मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे वेगवेगळे असू शकते, जसे की, रव्याचे मोदक, उकडीचे मोदक, गूळ-खोबर्‍याचे मोदक, रव्याचे सारण भरून, ड्राय-फूड चे सारण भरून, इतकेच नाही तर, आपण तिखट सारण भरून तिखट मोदक देखील बनवू शकतो. तर सुरूवातीला आपण पाहूया की, रव्याचे मोदक कसे बनवायचे आणि त्यासाठी कोणते साहित्य वापरावे-

खालील सर्व साहीत्य आणि योग्य ते प्रमाण वापरून अगदी खुसखुशीत आणि चविष्ठ तसेच पौष्टिक असे मोदक तुम्ही घरच्याघरी बनवु शकता.

  • बारीक पांढरा रवा – 3 वाटी
  • बारीक किसलेले खोबरे -2 वाटी
  • गुळ बारीक केलेला – दिड वाटी
  • खसखस – 2 चमचे
  • ड्रायफुडचे बारीक कप – अर्धी वाटी छोटी
  • वेलची व जायफळ पावडर- 1 चमचा
  • साजुक तुप- तळण्यासाठी
  • दुध आणि मलई साय- दोन्ही मिळुन 2 वाटी साय 4 -5  चमचे
  • तेल किंवा साजूक तूप- तळनासाठी लागेल तेवढे

मोदक कसे बनवायचे – संपुर्ण कृती

वरील सर्व पदार्थ वापरून उत्कृष्ठ असे मोदक बनविण्यासाठी वाप्रण्याची कृती ही खालील प्रमाणे :-

सर्वप्रथम मोदक बनविण्यासाठी लागणारे सारण बनवायचे आहे आणि रवा घेऊन साय आणि दुध हे घालून चांगला मळायचा आहे.

रव्याचे मोदक - मोदक कसे बनवायचे (modak kase banvayche)
रव्याचे मोदक – मोदक कसे बनवायचे (modak kase banvtat)

मोदक बनविण्यासाठी 3 वाटी रवा घ्यावा, त्यामध्ये साधारण ५ चमचे साय आणि थोडे दूध घालून मळून घ्यावे. हा मळलेला रवा 2 ते 3 तास तसाच भिजत ठेवावा. त्यानंतर मोदकाचे सारण बनविण्यासाठी सुके खोबरे चांगले बारीक खिसुन घ्यावे, त्यात बारीक कापलेले काजु देखील घालावे. बारीक कापलेले बदाम आणि किसमिस देखील तुम्ही घालू शकता. दोन चमचे खसखस, अर्धा चमचा वेलची पुड आणि अर्धा चमचा जायफळ पुड आपल्या आवडीनुसार आवडत असल्यास टाकावी. बारीक खिसलेले खोबरे, काजु, बदाम, खसखस, वेलची, जायफळ पुड एकजीव झाल्यानंतर त्यात बारीक खिसलेला गुळ टाकावा आणि संपुर्ण सारण परत एकजीव करावे.

साखर आणि खोबरं यापेक्षा गुळ आणि खोबरे याचे सारण अतिशय उत्कृष्ठ आणि चवदार लागते. याकरीता आपण साखर ऐवजी गुळ वापरावा. गुळ हा आपल्या आरोग्यासाठी देखील चांगला समजला जातो कारण गूळ खाल्याने शरीरातील लोहाचे म्हणजेच रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.आणि त्याचबरोबर लहान मुलांना देखील गुळ खोबरे यांचे मोदक आवडतात.

मोदकाचे सारण - मोदक कसे बनवायचे (modak kase banvayche)
मोदकाचे सारण – मोदक कसे बनवायचे (modak kase banvayche)

सारण बनवुन झाल्यांनतर तीन ते चार तास भिजत घातलेल्या रव्याचे लहान लहान गोळे करावे. आपल्याला मोदक जेवढया आकाराचे हवे असतील. त्यानुसार थोडे कमी-जास्त करता येतील. प्रत्येक छोटया गोळयाची पुरी लाटावी आणि त्यात जवळपास 1 चमचा आपण बनवलेले सारण भरावे. एक सारखा आकार देत वर ओढावे व मोदकाचा मस्त आकार द्यावा. त्यानंतर सर्वबाजुंनी ते दाबुन बंद करावे.

संपुर्ण मोदक बांधून झाल्यावर कढई मध्ये साजुक तुप टाकावे आपल्याला हवे असल्यास आपण तूप एवजी तेल देखील वापरू शकता. तुप चांगले गरम झाल्यानंतर मंद आचेवर अगदी सावकाश पणे सर्व मोदक तळुन घ्यावे. सर्व मोदक तळुन झाल्यावर त्यावर थोडेसे केशर टाकावे. झाले तर मग आपल्या गणपती बाप्पाचे आवडते मोदक तयार. हे रव्याचे मोदक तीन-चार दिवस देखील छान राहतात.

अशाच प्रकारे तुम्ही केवळ सुका मेवा म्हणजे काजू, बदाम, खारीक खोबरे, किसमिस हे सारण भरून देखील मोदक बनवू शकता. जर आपल्याला तिखट मोदक बनवायचे असतील तर, तीन चमचे शेंगदाणा पीठ, तीन चमचे तीळ, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा जिरे आणि धने पावडर, एक चमचा भाजलेला खोबर्‍याचा खिस, हे सर्व साहित्य मिक्सर मधून बारीक करून घ्यावे आणि त्यात चवीनुसार लाल तिखट आणि मीठ व हळद टाकावी आणि इतर सारण प्रमाणे मोदक मध्ये भरावे.

मोदक कसे बनवायचे – मोदकाचे प्रकार व त्यांची माहिती थोडक्यात

आपण पाहतो की, मोदक बनविण्याचे अजुनही बरेच प्रकार प्रचलित आहेत. जसे की पेढयाचे मोदक, उकडीचे मोदक, पंचखाद्याचे मोदक, पेढयापासुन किंवा माव्यापासुन अगदी झटपट आपण मोदक बनवु शकतो. त्यासाठी आपण मेादकाच्या साचाचा वापर करतो. तसेच तांदळाच्या पीठापासुन उकडीचे मोदक बनविता येतात.

खवा मोदक - मोदक कसे बनवायचे (modak kase banvayche)
खवा मोदक – मोदक कसे बनवायचे (modak kase banvayche)

उकडीचे मोदक हा तरअतिशय प्रचलित आणि आवडता असा मोदक प्रकार आहे. उकड बरोबर झाली तर हा लुसलुशीत आणि मस्त असा मोदक खाण्यासाठी अगदी उत्तम असतो. उकडीचे मोदक बांवण्यासाठी तांदळाचे पीठ आणि रव्याच्या मोदक मध्ये जे सारण भरतो तेच सारण भरावे आणि बनवलेल्या मोदकला उकड घ्यावी. आपण या लेखात जे तळलेले रव्याचे मोदक बनविले ते उकडीच्या मोदकांच्या तुलनेत जास्त दिवस छान राहतात. तसेच लहान मुलांना ते अतिशय आवडतात.

उकडीचे मोदक - मोदक कसे बनवायचे (modak kase banvayche)
उकडीचे मोदक – मोदक कसे बनवायचे (modak kase banvayche)

आपण बनवलेला हा रव्याचा मोदक अतिशय सोप्या पद्धतीचा आणि सर्वांना आवडणारा असा आहे. तसेच आपण सारण मध्ये जे ड्रायफ्रूट वापरले ते आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहेत. गूळ देखील आपल्या आहारात तसा कमीच घेतला जातो. त्यामुळे मोदक मध्ये गूळ असल्या कारणाने आपल्याला त्याचा फायदा होतो.

अशा प्रकारे येणार्‍या गणेश चतुर्थींसाठी लागणार्‍या प्रसादासाठी आपण आजच “मोदक कसे बनवायचे” याची रेसिपी पाहिली आहे त्याप्रमाणे तुम्ही मोदक नक्कीच बनवू शकता.

करावया स्वागत श्रीगणेशाचे
आताच शिकलो रेसिपी
मोदक कसे बनवायचे …      

सारांश – मोदक कसे बनवायचे

वरील लेखामध्ये गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद असलेले मोदक कसे बनवायचे या बाबत माहिती दिलेली आहे, मोदक तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता त्यातील रव्याचे मोदक कडे बनवायचे या बाबत माहिती आपण बघितली. या गणेश उत्सवात आपल्या घरच्या गणपती बाप्पा ला हे मोदक प्रसाद म्हणून नक्की बनवून बघा कारण हे करण्यास सोपे आणि खाण्यास चविष्ट लागतात.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेली मोदक कसे बनवायचे ही घरगुती रेसिपी कशी वाटली, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top