सर्वोत्तम १० घरगुती व्यवसाय व त्यांची माहिती | gharguti vyavsay

घरगुती व्यवसाय | घरच्या घरी करता येणारे व्यवसाय | महिलांसाठी घरगुती व्यवसाय मार्गदर्शन मराठी (gharguti vyavsay) >> आजकाल सर्वांनाच आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी पैसा हा लागतोच. प्रत्येक व्यक्तीला म्हणण्यापेक्षा सहसा ब-याच अशा महिला असतात ज्यांना बाहेर जाऊन काम करता येत नाही किंवा त्यांना आपल्या घरातील कामामुळे किवा आपल्या लहान मुलांमुळे बाहेर पडता येत नाही. तर त्यांच्या साठी घरगुती व्यवसाय करणे हा बेस्ट ऑप्शन असतो. घरगुती व्यवसाय म्हणजे घरात बसुन काम करून पैसा कमविणे, आणि हा महिलांसाठी उत्तम पर्याय असू शकतो.

आजच्या आधुनिक जगात खुप अशा फेमस महिला उदयेाजक आहेत की ज्यांनी शुन्यातुन विश्व निर्माण केलेले आहे. म्हणुनच महिलांनी आपल्या मध्ये असलेले कौशल्य गुण ओळखुन, अनेक असे घरगुती व्यवसाय करून व्यवसाय क्षेत्रात आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली पाहिजे. आजच्या हया धकाधकीच्या जीवनात कोणावरही अवलंबुन न राहता आपली एक नवी ओळख करावी याचा फायदा आपल्या घरच्यांना देखील खुप मोठया प्रमाणात होतो. या लेखामध्ये आपण असेच काही घरगुती व्यवसाय बघणार आहोत. ज्यातुन नवीन घरगुती व्यवसाय सुरू करू इच्छित असणार्‍यांना बरीचशी माहिती मिळण्यास मदत होईल.

चला तर मग जाणून घेऊयात घरगुती व्यवसाय कोणते कोणते आहेत जे आपण करू शकता.

घरगुती व्यवसाय व त्यांची विस्तृत माहिती (gharguti vyavsay information in marathi)

खाली ११ घरगुती व्यवसाय दिलेले आहेत, जे तुम्ही अगदी कमी खर्चात घरच्या घरी सुरू करू शकता.आणि आपला स्वतःचा व्यवसाय वाढवू शकता.

तुम्ही खालील पैकी कोणताही व्यवसाय करत असाल किंवा सुरू केला असेन, तर तुम्ही तो व्यवसाय वाढवण्यासाठी त्याची जाहिरात whatsapp वर आणि facebook वर देखील करू शकता. परंतु हल्ली प्रत्येक व्यक्ती काही घ्यायचे म्हंटले तरी आधी गूगल वर सर्च करतो.. जसे की “cake shop near me” “chinese near me” “beauty parlor near me” आणि बरेच काही. असे सर्च करणारे ग्राहक तुम्हाला मिळू शकतात, त्यासाठी तुमचा व्यवसाय गूगल वर रजिस्टर असणे गरजेचे आहे. तुम्हाला जर तुमचा व्यवसाय गूगल वर रजिस्टर करायचा असेन तर खालील “local business online” या बटन वर क्लिक करा.

घरगुती मेस – एक उत्तम घरगुती व्यवसाय विकल्प

जर तुम्हाला योग्यप्रकारे आणि स्वादिष्ट असे जेवण बनवता येत असेल, तर तुम्ही घरगुती मेस सुरू करू शकता किंवा घरपोहच डबा देण्याची सेवा देखील चालु करू शकता. हा व्यवसाय असा आहे की यामुळे आपल्या घराकडे आपले दुर्लक्ष होणार नाही आणि याचा आपल्याला नफा देखील मिळेल. अन्न हे स्वच्छ आणि चविष्ट असले की आपला या व्यवसायात जम बसायला वेळ लागत नाही, आणि आपला हा व्यवसाय वाढण्यास मदत होते.

घरगुती मेस / खानावळ - घरगुती व्यवसाय व त्यांची विस्तृत माहिती (gharguti vyavsay information in marathi)
घरगुती मेस / खानावळ – घरगुती व्यवसाय (gharguti vyavsay information in marathi)

आजकाल प्रत्येकालाच म्हणजे विदयार्थी, एकटे राहणारे पुरूष किवा कधी कधी घरात वेळ नसेल तर काही लोक बाहेरून अन्न ऑर्डर करतात. त्यामुळे अशा लोकांसाठी घरगुती भोजन भेटले तर उत्तमच होते. तसेच ऑफिसमध्ये सुध्दा डबा पोहचवण्याची सेवा चालु केली तर खुप फायदा होतो. आणि त्यासाठी आपल्याला वेगळे असे काय करण्याची आवश्यकता नसेल, उत्तम, ताजे, पौष्टिक असे जेवण आपण आपल्या घरातील सदस्यांसाठी करतच असता, त्यातच थोडी वाढ करून करू शकता. आणि सुरूवातीला थोडक्यात हा घरगुती व्यवसाय करून बघा आणि जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण हा व्यवसाय वाढवु शकता.

पाळणाघर – चांगला घरगुती व्यवसाय

पाळणाघर चालविणे हा देखील खुप चांगला व्यवसाय आहे. आजकालच्या गृहीणी कामासाठी बाहेर जातात, अशावेळी त्यांच्या मुलांना सांभळण्यासाठी घरी कुणीच नसते त्यामुळे जर आपण त्यांची मुले ऑफिस टाईममध्ये चांगल्या प्रकारे सांभाळली तर त्याचे पैसे मिळतात. शहरी भागात हा व्यवसाय हल्ली चांगल्या प्रकारे चालू आहे. अगदी लहान मुलांपासुन तर चार ते पाच वर्षा पर्यंतची मुले आपण सांभाळु शकतो तसेच हया मुलांना योग्य ती शिकवणी दिली व योग्य ते खेळ खेळण्यास दिले तर ही मुले आपल्याकडे चांगली रमतात.

पाळणाघर घरगुती व्यवसाय व त्यांची विस्तृत माहिती (gharguti vyavsay information in marathi)
पाळणाघर – घरगुती व्यवसाय (gharguti vyavsay mahiti in marathi)

एकदाका मुले चांगली राहू लागली आणि खेळू लागली की त्यांचे आई-वडील देखील निच्छिंत राहुन काम करू शकतात आणि तुमचा व्यवसाय देखील चांगला चालतो. सुरवातीला दोन ते तीन मुले सांभाळावीत, मग जसा जसा चांगला जम बसेल, तसे आपोआपच त्यांचे पालक इतर त्यांचा मित्र मैत्रिणींना आपले नाव सुचवतात आणि तुमच्याकडे सांभाळण्यासाठी मुलांची संख्या वाढते.

केक बनवण्याचा घरगुती व्यवसाय

घरगुती व्यवसाय करायला आणखी एक पर्याय म्हणजे केक बनविणे, बेकरीचे पदार्थ बनविणे. यातुन देखील चांगलाच फायदा होतो. आपण चांगल्या कॅालीटीच्या कुकीज, केक बनवला तर आपल्याला चांगल्या मोठया मोठया ऑर्डर येउ शकतात आणि हे सर्व बनवायला कमी पैसा लागतो, यातुन उत्पन्न मात्र खुप चांगले होते. तसेच आजकाल कोरोनाच्या या महामारीमुळे लोक बाहेरून आणण्यापेक्षा घरगुती केक आणणे जास्त पसंद करतात.

केक बनवणे - घरगुती व्यवसाय व त्यांची विस्तृत माहिती (gharguti vyavsay information in marathi)
केक बनवणे – घरगुती व्यवसाय (gharguti vyavsay mahiti in marathi)

त्यामुळे आपण घरगुती केक व इतर बेकरीचे सामान बनविले तर चांगला स्कोप आहे. हा घरगुती व्यवसाय सुरू केल्यावर सुरवातीला बाहेर ज्या किंमतीमध्ये केक मिळतात, त्यापेक्षा थोडया कमी किमतीत आपण केकची विक्री करावी. असे केल्याने ग्राहक आकर्षित होतील आणि आपला नफा होतो. त्यामुळे घरगुती व्यवसायामध्ये बेकरी पदार्थ बनवणेचा व्यवसाय उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. हा व्यवसाय तुम्ही गूगल वर रजिस्टर केल्यास तुम्हाला नवनवीन ग्राहक मिळण्यास देखील मदत होते.

लेडीज ब्युटि पार्लर – उत्तम घरगुती व्यवसाय

घरगुती लेडीज पार्लर टाकणे, हा देखील एक योग्य घरगुती व्यवसाय आहे. अनेक महिला आपल्या सौदंर्याच्या बाबतीत खुप जागृत असतात, प्रत्येक महिलेला हेच वाटते की, आपला चेहरा छान दिसावा, आपले केस सुंदर दिसावे आणि त्याच बरोबर आपल्याला प्रसन्न वाटावे. यासाठी महिला घरामध्ये पार्लर टाकुन खुप चांगला व्यवसाय करू शकतात. महिलांचे अनेक प्रॉब्लेम यातुन सॉल्व्ह होतात. फक्त यासाठी तुम्हाला सर्व पार्लरचे काम आले पाहिजे, आणि आपल्या गि-हाईकाशी व्यवस्थित बोलता आले पाहिजे.

लेडीज ब्युटि पार्लर - घरगुती व्यवसाय व त्यांची विस्तृत माहिती (gharguti vyavsay information in marathi)
लेडीज ब्युटि पार्लर – घरगुती व्यवसाय (gharguti vyavsay information in marathi)

त्याचबरोबर त्यांचे सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित हॅन्डल करता आले पहिजेत. हे सर्व करता आले की तुमचा व्यवसाय अतिशय व्यवस्थित आणि उत्तमरित्या चालतो. या व्यवसायची खासियत म्हणजे एक ग्राहक तुमच्या कामाने संतुष्ट झाला, की ती लेडीज दुस-यांना सांगते आणि मग हा तुमचा घरगुती पार्लरचा व्यवसाय अतिशय उत्तमरित्या चालुन तुमचा फायदा होतो. या व्यवसायाचे देखील गूगल वर रजिस्ट्रेशन केल्यास चांगले ग्राहक मिळू शकतात.

उन्हाळी पदार्थ बनवून देण्याचा घरगुती व्यवसाय

आजकालच्या बिझी शेडयुलमुळे महिलांना उन्हाळयाचे काम करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे तुम्ही घरच्याघरी शेवया, कुरडई, उडीदपापड, चिप्स, तांदळाचे पापड, यांसारखे खादयपदार्थ बनवुन सुध्दा विकु शकता. याचबरोबर तुम्ही लोणचे व साजूक तूप सुध्दा बनवुन विकु शकता. हा अतिशय चांगला असा घरगुती व्यवसाय आपण करू शकता आणि यातुन देखील तुम्ही चांगला नफा मिळवु शकता.

घरच्या घरी शिकवणी घेणे

घरगुती शिकवणी - घरगुती व्यवसाय व त्यांची विस्तृत माहिती (gharguti vyavsay information in marathi)
शिकवणी – घरगुती व्यवसाय (gharguti vyavsay information in marathi)

शिकवणी हा देखील खुप चांगला घरगुती व्यवसाय आपण घरबसल्या करू शकता. यासाठी आपल्याला कोणताही पैसा इन्वेस्ट करायची गरज नाही, तसेच आपल्याला कोणतीही जागा खरेदी करण्याची ही गरज नाही, आपल्या घरातल्या घरात आपण क्लासेस घेऊ शकता. यासाठी आपले शिक्षण चांगले असावे आणि आपल्याला विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकविता आले पाहिजे. आपण अभ्यासक्रम व्यतिरीक्त इंग्लिश स्पिंकीगचे क्लास देखील घेऊ शकता. डान्सिंग, कुकींग यांसारखे बरेचसे क्लासेस करता येतील. आणि यातुन आपल्याला चांगला फायदा होतो. हा व्यवसाय देखील तुम्ही गूगल वर रजिस्टर करून विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकता.

घरगुती शिवणकाम करण्याचा व्यवसाय

शिवणकाम - घरगुती व्यवसाय व त्यांची विस्तृत माहिती (gharguti vyavsay information in marathi)
शिवणकाम – व्यवसाय

घरच्या घरी कपडे शिवणे हा देखील व्यवसाय उत्तम घरगुती व्यवसाय म्हणून तुम्ही करू शकता. हा व्यवसाय आपण घरातल्या घरात करू शकता, बिना भांडवल गुंतवता हा व्यवसाय महिला घर सांभाळुन करू शकतात. हा व्यवसाय करायला निटनिटके कपडे शिवता आले पाहिजे ब्लाउज शिवणे, कुर्ती शिवणे, लहान मुलींचे कपडे शिवणे, याचबरोबर तुम्ही पिकोफ़ॉल सुध्दा करून या व्यवसायातुन जास्तीत जास्त पैसा कमवु शकता. कोणताही व्यवसाय करायचा असेल त्यासाठी मेहनत खुप महत्त्वाची आहे, मेहनत केल्यावर नक्कीच त्याचे फळ मिळते तसेच या व्यवसायात देखील आहे. हा “ledies tailor” व्यवसाय तुम्ही गूगल वर रजिस्टर केल्यास निच्छितच तुम्हाला चांगले ग्राहक मिळतील.

शिवणकाम करण्यासाठी लागणारी शिलाई मशीन कोणती घ्यावी या बाबत माहिती हवी असल्यास किंवा ऑनलाइन शिलाई मशीन विकत घेण्यासाठी तुम्ही शिलाई मशीन किंमत व सर्व इत्यंभूत माहिती हा लेख बघा.

जीएसटी व अकाऊंटिंग ची कामे

जीएसटी व अकाऊंटिंग - gharguti vyavsay information in marathi
जीएसटी व अकाऊंटिंग – gharguti vyavsay information in marathi

तुमचे जर बी. कॉम. झाले असेन किंवा तुम्हाला अकाऊंट शी संबंधित कामाची माहिती असेन तर तुम्ही घरबसल्या लोकांना त्यांचे महिन्याचे जीएसटी रिटर्न भरणे व इतर अकाऊंटिंग ची कामे तसेच बँक संबंधित कामे करून देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त काही खर्च करण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला लागेल फक्त एक कम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि त्या सोबत जीएसटी रिटर्न भरणे आणि अकाऊंटिंग ची माहिती. तुम्हाला जर ही माहिती असेन तर तुम्ही ऑनलाइन whatsapp आणि facebook द्वारे ग्राहक मिळवू शकता. तसेच तुमच्या जवळ पास च्या उद्योगांना भेटी देऊन त्यांचे जीएसटी रिटर्न चे व अकाऊंटिंग चे काम तुम्ही मिळवू शकता.

घरच्या घरून विविध वस्तूंची विक्री

हल्ली कोणतीही वस्तु विकण्यासाठी तुम्हाला त्याचे दुकान टाकूनच बसले पाहिजे असे काही नाहीये, तुम्ही नवनवीन पद्धतींचा अवलंब करून घरबसल्या अनेक वस्तु whatsapp आणि facebook च्या माध्यमातून विकू शकता आणि पैसे कमवू शकता. तुम्ही या कामासाठी meesho किंवा shop 101 यांसारखे अॅप्लिकेशन तुमच्या मोबाइल मध्ये वापरू शकता. या अॅप्लिकेशन ची खासियत हीच आहे की तुम्ही कोणतीही वस्तु घरबसल्या विक्री करून कमिशन मिळवू शकता.

यूट्यूब

यूट्यूब वर तुम्ही विविध विडियो अपलोड करून, देखील पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, तसेच हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करण्याची देखील गरज नाही. महिला घरच्या घरी विविध पदार्थांच्या घरगुती रेसिपी चे विडियो बनवून ते यूट्यूब ला अपलोड करू शकतात. तुम्ही अपलोड केलेल्या विडियो ला जितके जास्त दर्शक बघतील तेवढे तुम्हाला यूट्यूब कडून पैसे मिळतील, कारण तुमच्या विडियो च्या मध्ये यूट्यूब द्वारे विविध जाहिराती दाखवल्या जातील आणि त्या द्वारे तुम्हाला यूट्यूब पैसे देईल.

तुमच्या विडियो वर जाहिरात दाखवण्या आधी तुम्हाला यूट्यूब च्या काही शर्थिंचे पालन करावे लागेल. जसे की तुमच्या यूट्यूब चॅनल चे १००० सब्सस्क्रायबर पुर्ण होणे बंधनकारक आहे. सुरवातीला कष्ट हे प्रत्येक व्यवसायात करावेच लागतात, तसेच इथे देखील तुम्हाला काही दिवस कष्ट घ्यावे लागतील परंतु एकदाका तुमचं चॅनलला चांगले दर्शक मिळाले की मग तुम्हाला मिळणार्‍या पैश्यांला काही मर्यादा नसतील.

सारांश – १० सर्वोत्तम घरगुती व्यवसाय आणि त्यांची माहिती

वरील लेखामध्ये दिलेल्या १० सर्वोत्तम घरगुती व्यवसायांची विस्तृत माहिती वाचल्या नंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की अगदी सहजपणे आणि कमीत कमीत खर्चात तुम्ही घरच्या घरी नवीन व्यवसाय सुरू करू शकता. वरील १० सर्वोत्तम व्यवसाय कल्पना व्यतिरिक्त इतर ही अनेक कल्पना आहेत ज्या तुम्ही घरच्या घरी व्यवसाय म्हणून सुरू करू शकता.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेली १० सर्वोत्तम घरगुती व्यवसायांची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top