मूळव्याध वर घरगुती उपाय – 11 Best Home Remedies

मूळव्याध वर घरगुती उपाय/ मुळव्याध वर औषध/ मुळव्याध विषयी माहिती/मुळव्याधाची लक्षणे/ मूळव्याध होण्याची कारणे >>>> आजच्या काळातली बदललेली जीवनशैली, बदललेला आहार आणि आहाराच्या बदललेल्या आवडी निवडी यांचा विचार करता त्याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर होतोच. आपण जे काही पदार्थ खातो त्यात असलेले घटकच आपल्या शरीरात जातात आणि त्याचा आपल्या शरीरावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो.

आपण जर सात्विक आणि सकस आहार, पालेभाज्या, फळे यांचे सेवन केले तर त्यातून मिळणारी पोषक तत्वे म्हणजे खनिजे, मूलद्रव्ये, जिवणसत्वे हे आपल्या शरीराला मिळतात ;परंतु आजच्या काळात मुलांनाच नव्हे; तर आपल्याला देखील चिली फ्लेक्स, मिरे पूड, दालचीनी पूड अशा मसालेदार पदार्थांना खाण्याची ईच्छा असते परंतु या सर्वांचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशाच एक अती गरम वस्तु, पेय किंवा गरम म्हणजे मसालेदार पदार्थ खाण्याने होणारा आजार म्हणजे मुळव्याध, तर हा आरोग्याशी संबंधित लेख “मूळव्याध वर घरगुती उपाय” हा सादर करीत आहोत.

या लेखात, मूळव्याध विषयी परिपूर्ण माहिती जसे की, मूळव्याध वर घरगुती उपाय, मूळव्याधाचे प्रकार, लक्षणेआणि मूळव्याध होण्याचे कारण, यासर्व बाबतीत विस्तृत माहिती आम्ही सादर करणार आहोत जी तुम्हाला किंवा तुमच्या घरातील सदस्याला या आजारापासून आराम देण्यास नक्कीच मदत करेल. चला तर मग पाहूया आजच्या लेखातील माहिती.

मूळव्याध विषयी माहिती

मूळव्याध ही काही वेळेस आरोग्याला भेडसावणारी समस्या आहे, त्याचा त्रास एकदा का सुरू झाला तर दीर्घकाळ कमी होत नाही. मूळव्याध आजार म्हणजे, लोवर रेक्टम आणि गुदद्वार यांच्यातील सुज आलेल्या आणि आकाराने फुगलेल्या नसा, यांच्यात होणारा आजार हा अपस्फीत निला म्हणजेच मूळव्याध.

मूळव्याध हा आजार रेक्टमच्या आत देखील होऊ शकतो किंवा बाहेरील बाजूस म्हणजेच गुदद्वारच्या शेजारील त्वचेला देखील होऊ शकतो. मूळव्याध चा हा आजार प्राथमिक स्तरावर असेल तर घरगुती औषधोपचार आणि पथ्य याने बरा होऊ होऊ शकतो परंतु जर हा आजार अतिशय वाढलेला असेल तर यावर सर्जरी किंवा लेजर ट्रीटमेंट घ्यावी लागते. ही वेळ न येऊ देण्यासाठी आपल्याला या आजाराची लक्षणे, हा आजार होण्याची कारणे आणि या आजारावर घरगुती उपाय कोणते आहेत हे माहित असायला हवे आणि त्यासाठी हा लेख आणि यातील पुढील माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

आता आपण जाणून घेऊया की, हा आजार आपल्याला झाल्याची लक्षणे काय आहेत, आपण या आजाराने ग्रस्त झाले आहोत हे कसे ओळखावे, हा आजार असल्यास नेमकी कोणती लक्षणे ही रुग्णास दिसतात. ही लक्षणे माहित करून घेणे यासाठी आवश्यक आहेत कारण वेळीच यावर उपाय केले गेले नाही तर मूळव्याध चे रूपांतर हे भगंदर या रोगात होते, त्यामुळे वेळीच मूळव्याध च लक्षणे लक्षात आल्यास फायदा होतो.

मुळव्याधाची लक्षणे

बहुतेक वेळा या आजाराची लक्षणे सौम्य असतात. रूग्णांच्या लक्षात देखील येत नाही की, त्यांना हा आजार आहे. सौम्य लक्षणामुळे आणि प्राथमिक स्तरावर हा आजार असल्याने उपचार शिवाय रुग्णाचा आजार कमी देखील होतो परंतु; नंतर पथ्य आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या नाही तर आजार जास्त वाढू शकतो आणि दिसणारी व जाणवणारी लक्षणे ही स्पष्ट असतात. तर ती मूळव्याधाची लक्षणे खालील प्रमाणे आहेत;

  • मूळव्याध ह्या आजाराची सुरुवात होण्याआधी गुदद्वाराजवळ सतत खाज आल्यासारखे वाटते.
  • मल निःसाराच्या वेळी त्रास होणे, वेदना होणे, किंवा आग होणे.
  • मल निःसारण केल्यानंतर देखील परत परत शौच आल्यासारखी वाटणे.
  • मूळव्याध हा रेक्टम च्या आत म्हणजे अंतर्गत अंतस्थ- गुद्द्वराजवळ झाला असेल तर सुरूवातीला वेदनारहित मलोत्सर्जणापूर्वी किंवा नंतर लाल रक्त पडणे. त्याचे प्रमाण हे कमी किंवा अधिक असू शकते.
  • मूळव्याध झाला असेल तर गुदद्वारच्या बाजूला मोठ्या झालेल्या रकवाहिन्यातील अशुद्ध रक्ताच्या गुठळ्या म्हणजे मूळव्याधीचे कोंब तयार होते आणि मलविसर्जना रकवाहिन्यावर तान पडून हे कोंब बाहेर येऊ शकते.  
  • साध्या आणि सौम्य मूळव्याध प्रकारात वेदना किंवा चिरकाळ म्हणजेच सतत रक्तस्त्राव होत नाही. परंतु मूळव्याधामुळे भगंदर, अंतत्क्लर्थण, गुदविदर, गुदमार्ग कर्करोग यांसारखे आहार झाल्यास प्रचंड वेदना होऊ शकतात.

साधारणपणे वरील लक्षणे दिसू लागल्यास किंवा जाणवू लागल्यास, मूळव्याध असल्याची किंवा होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे मूळव्याधला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय आणि घरगुती औषध घेऊन आपण नियंत्रणात आणू शकतो त्यामुळे वरील लक्षणे जाणवल्यास खालील घरगुती उपाय करावेत.

मूळव्याध वर घरगुती उपाय/ मुळव्याध वर औषध

मूळव्याध हा आजार झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही खालील उपाय किंवा आयुर्वेदिक औषधांचा वापर करावा.

तंतुमय पदार्थ खाणे

मूळव्याध वर घरगुती उपाय/ मुळव्याध वर औषध/ मुळव्याध विषयी माहिती/मुळव्याधाची लक्षणे/ मूळव्याध होण्याची कारणे
तंतुमय पदार्थ खावेत

बद्धकोष्ठता होत असेल किंवा शौच साफ होत नसेल तर आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करावा त्यामुळे शौच साफ होते आणि बद्धकोष्टता होत नाही. त्यामुळे या त्रासावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही तंतुमय पदार्थ खावेत, तसेच गव्हाची पोळी बनवताना त्यातील कोंडा न काढता पोळी बनवावी, गाजर, मुळा काकडी सॅलड यांचा आहारात समावेश करावा.

द्रव पदार्थाचे सेवन करणे

द्रव पदार्थ म्हणजे नारळ पाणी, फळांचा ज्यूस, ताक किंवा थंड पाणी यांसारख्या लिक्विड पदार्थास दोन तासानंतर एक वेळेस तरी प्यावे, याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि शरीर थंड राहते त्यामुळे मूळव्याध चा त्रास लवकर कमी होण्यास मदत होते.

चहा कॉफी घेऊ नये

चहा किंवा कॉफी ही अति उष्ण असते. जास्त प्रमाणात जर चहा किंवा कॉफी घेतली तर शरीरातील उष्णता वाढून मूळव्याधचा त्रास आणखी वाढू शकतो, त्यामुळे चहा कॉफी घेणे बंद करावे त्याने मूळव्याध हळूहळू कमी होईल.

कडक जागेवर, फर्शीवर बसने टाळावे

मूळव्याध वर घरगुती उपाय/ मुळव्याध वर औषध/ मुळव्याध विषयी माहिती/मुळव्याधाची लक्षणे/ मूळव्याध होण्याची कारणे
मऊ जागेवर बसावे

मूळव्याध अधिक वाढून जर मूळव्याधचा कोंब आला असेल तर कडक जागेवर बसने घातक ठरू शकते. त्यामुळे कडक जागेवर फार्शीवर बसने टाळावे, मऊ पृष्ठभागावर बसावे, मूळव्याधीचे कोंब आले असेल किंवा सूज असेल तर ती मूळव्याधची सूज कमी होते तसेच नवीन हॅमॅरॉयड म्हणजेच कोंब येणे रोखते.

नियमित व्यायाम करावा

मूळव्याध वर घरगुती उपाय/ मुळव्याध वर औषध/ मुळव्याध विषयी माहिती/मुळव्याधाची लक्षणे/ मूळव्याध होण्याची कारणे
नियमित व्यायाम करावा

नियमित व्यायाम , याने वजन नियंत्रणात राहते, रक्तप्रवाह सुरळीत चालतो, आणि बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होत नाही. वाढलेले वजन म्हणजे आजाराला आमंत्रण, म्हणून हे टाळण्यासाठी नियमित व्यायाम करावा.

कोडीन घटक असलेली औषधे घेऊ नये

काही दुखल्यास किंवा ईजा झाल्यास आपण मेडिसीन्स घेतो परंतु त्यात जर कोडीन हा घटक असेल तर तो मूळव्याध या आजारसाठी अतिशय त्रासदायक ठरू शकतो त्यामुळे कोणतेही औषध घेताना जर तुम्हाला मूळव्याध चा त्रास असेल तर ते औषध घेऊ नये॰

सीट बाथ घ्यावे

मूळव्याध वर घरगुती उपाय/ मुळव्याध वर औषध/ मुळव्याध विषयी माहिती/मुळव्याधाची लक्षणे/ मूळव्याध होण्याची कारणे
सीट बाथ घ्यावे

मूळव्याधी वर घरगुती उपाय म्हणून सीट बाथ अत्यंत प्रभावी उपाय आहे, याने काही इन्फेकशन होण्याचा धोका राहत नाही आणि रुग्णास त्वरित आराम मिळतो. त्यासाठी कोमट पाणी करावे आणि त्यात डेटोल लिक्विड टाकावे, सहन होईल असे कोमट पाणी घेऊन त्यात पाच मिनिटे बसावे. असे केल्याने मूळव्याधीचे हॅमॅरोईड झाले असेल तर ते देखील गळून पडते.

दूर्वा – मुळव्याध वर औषध

मूळव्याध वर घरगुती उपाय/ मुळव्याध वर औषध/ मुळव्याध विषयी माहिती/मुळव्याधाची लक्षणे/ मूळव्याध होण्याची कारणे
दूर्वा

गणपतीस वाहिल्या जाणार्‍या दूर्वा या मूळव्याध च्या आजारास मूळापासून नाहीसे करण्यास अत्यंत उपयोगी ठरतात. शरीरातील रक्त शुद्ध करण्यास देखील दूर्वा मदत करतात त्यामुळे मूळव्याध या आजारावर उपाय म्हणून दूर्वाचा वापर करण्यासाठी गाई च्या दुधात दूर्वा उकळाव्या आणि नंतर ते दूध गाळून प्यावे.

जेष्ठ मध आणि तूप चाटण

जेष्ठ मध हा आयुर्वेदिक औषधी मध्ये गणला जातो, त्यामुळे मूळव्याध वर घरगुती उपाय म्हणून जेष्टमध चा वापर करताना चार चमचे जेष्ठमध पावडर घ्यावी आणि त्यात तीन चमचे साजूक तूप आणि अर्धा चमचा मध मिसळून त्याचे चाटण तयार करावे आणि दिवसातून दोन वेळेस तरी खावे.

काळे मनुके खावेत

मूळव्याध वर घरगुती उपाय/ मुळव्याध वर औषध/ मुळव्याध विषयी माहिती/मुळव्याधाची लक्षणे/ मूळव्याध होण्याची कारणे
काळे मनुके खावेत

काळ्या मनुका ह्या जास्त फाईबर्स युक्त असतात त्यामुळे पोट आणि रक्त साफ राहण्यास मदत होते आणि मूळव्याधीचा त्रास हा कमी होतो. त्यामुळे कोमट दुधात काळ्या मनुका भिजू घालाव्या आणि त्या अर्ध्या तासांनी खाव्या, याने मूळव्याधीचा त्रास कमी होईल.

त्रिफळा चूर्ण

मूळव्याध वर घरगुती उपाय/ मुळव्याध वर औषध/ मुळव्याध विषयी माहिती/मुळव्याधाची लक्षणे/ मूळव्याध होण्याची कारणे
त्रिफळा चूर्ण खावे

त्रिफळा चूर्ण हे मूळव्याधीची तक्रार दूर करण्यास उत्तम उपाय म्हणून ओळखले जाते. त्यासाठी कोमट पाण्यात दोन चमचे हे चूर्ण मिसळून घेणे, याने शौचयास साफ होईल आणि मूळव्याधीची समस्या देखील कमी होईल. हा उपाय 20 ते 25 दिवस केल्याने नक्कीच मूळव्याधीच्या त्रासापासून आराम मिळेन. 

आता आपण पाहूया की, मूळव्याध होतो तरी कोणत्या कारणाने, ती कारणे आपल्याला माहिती असल्यास आपण स्वतःचे मूळव्याध पासून रक्षण करू शकतो.

मूळव्याध होण्याची कारणे

बर्‍याच लोकांना असा प्रश्न पडतो की, हा मूळव्याध आजार का होतो तर, त्याचे खालील काही कारणे आहेत;

  • तुम्हाला बद्धकोष्ठेचा त्रास असेल तर हे कारण मूळव्याध होण्याचे होऊ शकते. कारण बद्धकोष्ठतेमुळे मल कठीण होते, आणि कुथून शौच करण्याच्या प्रयत्नात तेथील रक्तवाहिन्या कमजोर होतात, आणि त्यातून मूळव्याधीचा आजार वर येतो.
  • अनुवांशिकता आणि वय हे देखील मूळव्याध होण्याचे कारण आहे.
  • जास्त जागरण केल्याने हा आजार होतो. जागरण शरीरावर आणि पचनक्रियेवर परिणाम करते.
  • नेहमी शिळे अन्न खाणे हे देखील या आजारचे एक कारण आहे.
  • गरोदरपणा च्या वेळी देखील हा आजार होऊ शकतो.
  • सतत जड उचलण्याचे काम करणे
  • आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव
  • बैठी जीवनशैली मूळव्याधीस आमंत्रण देते.
  • अयोग्य आहार असल्यास, म्हणजे सतत अति तिखट, मसाल्याचे, गरम पदार्थ खाल्ल्याने हा आजार होतो.
  • व्यसन असणे मद्यपान-धूम्रपान करणे, हे केल्यास त्यांचे शरीर लवकर डिहायड्रेट होते त्यामुळे हे देखील मूळव्याध चे एक कारण आहे.

सारांश –मूळव्याध वर घरगुती उपाय/ मुळव्याध वर औषध/ मुळव्याध विषयी माहिती/मूळव्याध होण्याची कारणे

तुम्हाला जर मुळव्याधचा त्रास असेल आणि तो प्राथमिक स्तरावर असेल तर या लेखात सांगितलेले घरगुती उपाय नक्की करून बघा त्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेन आणि तुमचा त्रास देखील कमी होईल. परंतु लक्षात असून द्या की, उपाय करत असलात तरी उपचारची गरज जाणवल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. जर तुमचा मूळव्याध प्रथम टप्प्यात असेल तर वरील उपाय केल्याने नक्कीच कमी होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, “मूळव्याध वर घरगुती उपाय /मुळव्याध वर औषध/ मुळव्याध विषयी माहिती/मुळव्याधाची लक्षणे/ मूळव्याध होण्याची कारणे ” कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top