करंजी कशी बनवायची | खुसखुशीत करंज्या कशा बनवतात

करंजी कशी बनवायची / करंज्या कशा बनवायच्या / खुसखुशीत करंजी कशी बनवायची (karanji recipe in marathi) >> करंजी हा परंपरागत चालत आलेला , घरोघरी बनविला जाणारा फराळा चा पदार्थ आहे ; परंतु बर्‍याच नवसुगरनीना, महिलाना अजूनही करंजी सारखा पदार्थ अगदी उत्तम प्रकारे बनविण्यात अनेक अडचणी येत असतात . जसे की करंजीची पाती कडक होणे , करंजी रुचकर आणि खुसखुशीत न होणे तसेच बनविलेली करंजी जास्त दिवस मऊ न राहणे . याचसाठीच आम्ही आजचा लेख घेऊन आलो आहोत , करंजी कशी बनवायची / खुसखुशीत करंज्या कशा बनवतात .

करंजी कशी बनवायची / करंज्या कशा बनवायच्या / खुसखुशीत करंजी कशी बनवायची / करंजी कशी बनवावी - करंजी रेसिपी - karanji recipe in marathi

श्रावण महिना संपला की, लगेचच आपल्याकडे सणांची रेलचेल चालु होते. सण म्हटले की ,त्यात फराळ तर आलाच, आणि करंजी शिवाय तर फराळाचे ताटच पुर्ण होऊ शकत नाही. करंजी म्हणजे अतिशय आखीव -रेखीव आणि रुचकर तसेच जास्तीत जास्त दिवस टिकणारा पदार्थआणि , लहानांपासुन ते मोठयांपर्यत सर्वांना आवडणारा गोड पदार्थ . चला तर मग, जाणून घेऊया आजच्या या लेखात – करंजी रेसिपी मराठी / खुसखुशीत आणि रुचकर करंजी कशी बनवायची याची रेसिपी काय आहे ते .

            आपल्या भागात जवळपास सर्वच घरांमध्ये गौरी – गणपतीच्या सणाला करंजी ही बनविली जातेच. करंजीची आणखी एक वैशिष्टपुर्ण बाब आहे ,ती म्हणजे करंजीची मुरड. आपल्या सर्व सुगरणी अतिशय उत्कृष्ठरित्या आणि हळुवारपणे कंरजीला मुरड पाडुन, तिच्यातील गोडवा आणि करंजीचे सौदंर्य हे अधिक वाढवतात.

तयारी चालु आहे गौरी – गणपतीची ……

     चला तर आज शिकुया रेसीपी ……….

     करंजी…………कशी बनवायची …………

करंजी कशी बनवायची / करंज्या कशा बनवायच्या / खुसखुशीत करंजी कशी बनवायची / करंजी कशी बनवावी - करंजी रेसिपी - karanji recipe in marathi
खुसखुशीत करंजी

करंजी बनविणे हे वाटते तेवढे सोपे नाही, कारण जर करंजी बनविण्याच्या पातीचे पीठ हे पातळ झाले जर करंजी बनविता येत नाही आणि घट्ट झाले तर करंजी कडक होते, तसेच काही वेळेस तळत असताना करंजी तुटतात किंवा फुटतात, आपला हाच प्रश्न सोडवण्यासाठी आज आपण पाहणार आहोत , करंजी कशी बनवायची (karanji recipe in marathi). तर सुरूवातीला करंज्या कशा बनवायच्या यासाठी लागणारे साहित्य काय आहे हे पाहूया.

करंजी बनविण्यासाठी लागणारे साहित्यः-

            आपल्या भारताच्या वेगवेगळया प्रदेशात कंरजी वेगवेगळे साहित्य वापरून बनविली जाते, तसेच आवडीनुसार गेाड आणि तिखट अशा देान्ही प्रकारची करंजी बनविली जाते, पंरतु आपल्या महाराष्ट्रात फराळाच्या पदार्थात गोड करंजी बनविली जाते. करंजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य निवडतांना आपल्याला जर करंजी तात्काळ खाण्यासाठी करंजी बनवायची असेल , तर आपण ओल्या नारळाचा देखील उपयोग करू शकतो ; पण जर काही दिवस टिकवुन ठेवायची असेल तर मात्र सुक्या नारळाचा वापर करावा , सुक्या नारळ पासून बनवलेली करंजी जास्त दिवस टिकते आणि पंधरा ते वीस दिवस मनमुराद मऊ करंजी खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

तर आज आपण या लेखात ,बरेच दिवस टिकणारी , रूचकर, चविष्ठ आणि अगदी खुसखुशीत अशी करंजी बनविण्यासाठी कृती पाहणार आहेात. चला तर पाहुया खुसखुशीत, रूचकर आणि अगदी तोंडात टाकले की लागलीच विरघळणारी ,अशी करंजी कशी बनवावी आणि यासाठी लागणारे साहित्य काय ते पाहुया.

करंजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:‌-

खुसखुशीत अशी करंजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे –

1.         रवा = तीन वाटी, रवा बारीक असावा.

2.         मैदा = अर्धी वाटी

3.         साखर = एक किंवा दीड वाटी

4.         साजुक तुप मोहनसाठी = छोटी अर्धी वाटी

5.         किसलेले खोबरे = एक वाटी

6.         काजु, बदाम, किसमीस = छोटी अर्धी वाटी

7.         चारोळी = आवडीप्रमाणे

8.         वेलची पुड = दोन चमचे

9.         तुप तळणासाठी = आवश्यकते प्रमाणे

10.      दुध = साधारण तीन कप / आवश्यकते नुसार

करंजी बनविण्याची कृतीः-

                 करंजी बनविण्यासाठी आपल्याला दोन कृती कराव्या लागतात ,एक म्हणजे करंजीची पाती बनवण्यासाठीची कृती आणि दूसरी म्हणजे करंजीत भरण्याचे सारण बनविण्याची कृती . सर्वप्रथम आपण पाती बनविण्याची कृती पाहुयात . करंजी ची पाती बनविण्यासाठी रवा आणि मैदाचे योग्य प्रमाणात मिश्रण घेऊन ते मोहन टाकुन मळून घ्यावे . आणि दुस-या टप्प्यात करंजीमध्ये भरण्याचे उत्कृष्ठ आणि चविष्ठ सारण बनविणे . सर्वप्रथम आपण करंजीची पाती बनविण्यासाठीची कृती काय आहे ते पाहुया.

            एका परातीत 3 वाटी रवा घ्यावा. त्यात अर्धी वाटी मैदा टाकावा. बारीक रवा आणि मैदा घेतल्यामुळे हवा लागली तरी करंजी कडक होत नाही. त्यानंतर त्यात छोटी अर्धी वाटी साजुक तुप पातळ करून टाकावे. मोहनसाठी तुप टाकल्यातुळे करंजीची पाती अगदी खुसखुशीत आणि दीर्घकाळ मऊ राहते. त्यानंतर त्यात दुध टाकुन त्याचा घट्ट गोळा मळुन घ्यावा. तुप आणि दुध असल्यामुळे करंजीचे बाहय आवरण अगदी मऊ राहते , कडक होत नाही . भिजवलेल्या गोळयास एक तास भिजत ठेवावे . त्यामुळे मैदा आणि रवा सैलसर भिजतो आणि पाती मऊ व खुसखुशीत राहते .

करंजी कशी बनवायची / करंज्या कशा बनवायच्या / - करंजी रेसिपी - karanji recipe in marathi - करंजी सारण
करंजी सारण

आता आपण पाहुया करंजीचे सारण कसे बनवायचे ? तर , करंजीचे सारण बनविण्यासाठी एक वाटी बारीक किसलेले खोबरे ( खोबरे खीस ) घ्यावे . त्यात अर्धी छोटी वाटी बारीक काजुचे काप, बदामाचे काप, किसमिस/ मणुका तसेच चारोळी टाकावी . दोन चमचे बारीक केलेली वेलची पावडर टाकावी , अर्धी वाटी काजु,बदाम, मनूका घ्यावे 2 ते 3 चमचे चारोळी आणि एक ते दीड वाटी आपल्या आवडीप्रमाणे बारीक केलेली साखर घ्यावी . आता हे सर्व साहित्य एकत्र करावे , आणि झाले आपले पौष्टीक आणि चविष्ठ असे गोड करंजीचे सारण तयार .

            आपण भिजत ठेवलेला रवा आणि मैदा चे मळलेले पीठ तासभर भिजल्या नंतर , त्याचे छोटे गोळे करून घ्यावे . ते मध्यम आकाराच्या जाडीचे आणि पुरी एवढया आकारात लाटावे. त्यात आपण बनविलेले करंजीसाठीचे सारण 1 चमचा भरावे आणि ती पाती अर्धगोल आकारात बोटभर अंतर ठेवुन कडा दाबुन बंद करावी॰ लक्षात ठेवावे की ,पाती मध्ये भरलेले सारण तळताना बाहेर येणार नाही , यासाठी सारन भरल्या नंतर कडा पूर्ण बंद कराव्या .

करंजी रेसिपी - karanji recipe in marathi

कडा  दाबत असताना बेाटाला थोडे पाणी लावावे जेणे करून पाती च्या कडा पूर्ण चिटकतील आणि मधील भरलेले सारण तळतांना बाहेर येणार नाही. आता करंजीला सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आपण वेगवेगळया प्रकारच्या मुरड ही पाडु शकतो किंवा करंजीच्या साचात टाकुन आकर्षक असा आकार ही देखील देवु शकतो किंवा बाजारात जो फिरकीचा चमचा भेटतो , जो करंजीला झिकझॅक आकार देण्यासाठी वापरता येतो , तो चमचा देखील वापरू शकतो. अशाप्रकारे सर्व करंजी बनवुन घ्याव्या . सगळ्या करंजी बनवून झाल्या की, एका खोलगट पॅनमध्ये करंजी तळता येतील येवढे साजुक तुप तळणासाठी टाकावे .

करंजी कशी बनवायची / करंज्या कशा बनवायच्या / खुसखुशीत करंजी कशी बनवायची / करंजी कशी बनवावी - करंजी रेसिपी - karanji recipe in marathi

करंजी तळत असताना अगदी अलगद आणि हळुवारपणे एक- एक करंजी टाकावी आणि सुरूवातीला मोठया आचेवर आणि अर्धा मिनिटांनतर मंद आचेवरती तळावी . करंजी अगदी लालसर होण्या आधीच बाहेर काढावी, म्हणजे करंजीचा पांढराशुभ्र रंग आणि सुंदर असा आकार खाणा-यांचे लक्ष वेधुन घेईल , सर्व करंजी तळुन झाल्या टिश्युपेपरवर टाकाव्या, त्यामुळे जास्तीचे तुप त्यावर निथळेल आणि आपली करंजी तूपगट होणार नाही .( करंजी तळण्यासाठी आपण तेल देखील वापरू शकतो )

            अशाप्रकारे आपली रूचकर, चविष्ठ आणि खुसखुशीत अशी करंजी तयार होईल . सुके खोबरे वापरल्यामुळे ही करंजी 10 ते 12 दिवस देखील आरामात टिकते आणि त्याचा वास देखील येत नाही . जर आपण ओले नारळ वापरले तर , जवळपास 3 ते 4 दिवसात त्या करंजीस कुम्मट वास येण्याची शक्यता असते . अशाप्रकारे वरील लेखाद्वारे आपल्याला करंजी कशी बनवायची / खुसखुशीत करंज्या कशा बनवायच्या हे नक्कीच समजले असेल .

करंजी ची पाती कडक न होण्यासाठी काय करावे

करंजी कशी बनवायची / करंज्या कशा बनवायच्या / खुसखुशीत करंजी कशी बनवायची / करंजी कशी बनवावी - करंजी रेसिपी - karanji recipe in marathi
करंजी ची पाती

करंजी बनवल्यानंतर 4-5 दिवस झाले की लगेचच कारंजीची पाती कडक होण्याची समस्या ही बर्‍याच गृहीणींना सतावत असते , करंजी कडक झाल्यामुळे घरातील वडीलधार्‍या व्यक्तींना ती करंजी खाण्यास त्रास होतो त्यामुळे करंजी ची पाती मऊ आणि खुसखुशीत राहणे गरजेचे आहे . त्याकरिता रवा आणि मैदा पाण्यात न मळता तो दूध आणि साजूक तुपात घेऊन त्यात भिजत ठेवावा. त्याच बरोबर 2 -3 चमचे साय देखील मळताना त्यात घालावी, कारण साई मध्ये सर्वात जास्त स्ंनिग्धता असते, त्यामुळे निश्चितच करंजी ची पाती बरेच दिवस मऊ राहील आणि खाताना अजिबात कडक लागणार नाही.

करंजी बनविण्यासाठी काही  टीप        

रंगबेरंगी करंजी कशी बनवायची / करंज्या कशा बनवायच्या / खुसखुशीत करंजी कशी बनवायची / करंजी कशी बनवावी - करंजी रेसिपी - karanji recipe in marathi
रंगबेरंगी करंजी

जर आपल्याला रंगबेरंगी करंजी बनवायची असेल तर रवा आणि मैदा भिजवतानाच त्यामध्ये जो रंग पाहीजे तो खाण्याचा रंग टाकुन वेगवेगळे पीठ भिजवावे त्यामुळे कंरजीचा रंग पिवळा, नारंगी, हिरवा व लाल याप्रकारचा तुम्ही जो रंग मिसळला तसा येईल. आपल्या करंजी छान रंग -बेरंगी दिसतील. पाक कलेसाठी अशी कलरफुल करंजी बनवावी ज्यामुळे चवीसोबत ,आकारासोबत, पौष्टिकते सोबत, रंगाने देखील तुमची करंजी अधिक आकर्षक होईल.

सारांश – करंजी कशी बनवायची / करंजी रेसिपी मराठी – karanji recipe in marathi

आपल्या वरील ” करंजी कशी बनवायची / खुसखुशीत करंज्या कशा बनवतात ” या लेखातील, माहिती साहित्य आणि कृती वापरुन,आपण नक्कीच मऊ, रुचकर आणि खुसखुशीत अशी करंजी अगदी उत्तम प्रकारे बनवू शकता. जी जास्तीत जास्त दिवस टिकेलही आणि खाण्यासाठी मऊ देखील राहतील.

वरील लेखातील ” करंजी कशी बनवायची – karanji recipe in marathi ” याविषयी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेन आणि तुम्हाला करंज्या कशा बनवायच्या हे देखील समजले असेल. आम्ही सांगितलेली कृती , साहित्य आणि टिप्स वापरुन करंजी करून बघा . नक्कीच तुमची करंजी मऊ, खुसखुशीत होईल आणि बरेच दिवस देखील टिकेल .

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेली “करंजी कशी बनवायची ” ही घरगुती रेसिपी कशी वाटली, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य आमच्या पर्यन्त पोहचवा .

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top