कंबर दुखीवर घरगुती उपाय | 6 प्रकारचे कंबर दुखीवरील व्यायाम

कंबर दुखीवर घरगुती उपाय / कंबर दुखी व्यायाम / कंबर दुखीवर आयुर्वेदिक औषध ( kambar dukhi kami karnyache upay) >>> आपण पाहतो कि, आधी माझी कंबर दुखतीये अशी तक्रार फक्त आजी -आजोबाच करत असत, म्हणजे वयस्कर लोकच कंबरदुखीची तक्रार करत; पण आजकाल आपण पाहतोय की ही ‘कंबरदुखी‘ तक्रार ब-याच तरुण युवकांना, मध्यमवयस्क लोकांना देखील सतावत असते. कंबरदुखी असल्यास ना आपण व्यवस्थित काम करू शकत नाही ना आराम करू शकत. एकंदरीत काय? तर संपुर्ण शरीराला अस्वास्थता जाणवण्यास कारणीभुत ठरते तर ती म्हणजे कंबरदुखी. त्यामुळेच अनेक लोकांचा प्रश्न असतो की, कंबर दुखी कमी करण्याचे उपाय कोणते ?

            सध्याच्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे जे वर्क फ्रॉम होम सुरू झाले त्यामुळे तर सर्वच तरूण वर्गाचे कंबरडे मोडते आहे असे म्हणायची वेळ आली आहे . आधी फक्त घरातील सर्व महिला वर्गाचीच कंबरदुखीची तक्रार असत ; पण आताच्या काळात आपण पाहतोय की, पुरूष मंडळीची देखील कंबरदुखीच्या तक्रारीत नोंद होत आहे. एवढेच नव्हे; तर घरातील मुले ते देखील आता एकाच ठिकाणी बसुन ऑनलाईन क्लास मुळे पाठ दुखतीये, कंबर दुखत आहे अशी तक्रार करत असतील ; पण तो एक गमतीचा भाग झाला . आता आपण कंबर दुखीचा त्रास आहे तरी काय ? आणि त्यापासुन सुटका हेाण्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार करूया आणि तो त्रास दूर करण्यासाठी जे व्यायाम आणि उपाय आम्ही सांगणार आहोत , ते कोणते आहेत हे पाहूया .

            सतत उठ बस, वाकणे, स्नायुंवर ताण पडणे, जड ओझे उचलण्यात येणे किंवा शरीरातील कॅल्शिअमचे कमी प्रमाण असणे , साधारणपणे यासर्व कारणांमुळे कंबरदुखीचा त्रास हा उद्भवु शकतो; पंरतु या त्रासावर वेळीच उपाय केले नाही, औषधेापचार किंवा याला आळा घातला गेला नाही तर तो त्रास आजार बनु शकतो, आणि आपल्याला दवाखान्याच्या चक्रा माराव्या लागतील त्याचबरोबर अस्थिरोग तज्ञांकडून उपचार करून घ्यावे लागतील.

हे सर्व नको असेल, तर आपल्याला आपल्या निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायामाची सवय आपल्या शरीराला लावावी लागेल.त्याचसाठी आम्ही आजच्या लेखात कंबर दुखीवर व्यायाम सांगणार आहोत

पाठ दुखणे, कंबर दुखणे किंवा इतर छोटे-मोठे आजार /त्रास यांवर मात करण्याची क्षमता इतर उपाय यापेक्षा ‘‘व्यायाम‘‘ यामध्येच अधिक आहे, नियमित आणि योग्य आसनाात व्यायाम केल्याने कंबरदुखीचा बराचसा त्रास कमी होतो असा दावा अस्थिरोगतज्ञांनी देखील केला आहे. त्यामुळे कंबरदुखी साठी व्यायाम जे योग्य आहेत ते करून आपण त्रास मुक्त होऊ शकता यात काही शंका नाही . आपल्या शरीराची रचनाच मुळात व्यायाम मध्येच आहे.

‘‘वैयक्तिक स्तरावर आरोग्य राखण्याचा मंत्र………..

वजन नियंत्रणात ठेवण्याचे सुत्र………………………….

उत्तम प्रकारे आजारास दुर ठेवण्याचे हत्यार……

आपली क्रियाशीलता वाढवणारे यंत्र ………………….

म्हणजे व्यायाम ……………………………………..!‘‘

आपल्या दैनंदिन जीवनात आपण जर नियमित व्यायामाचा अंगिकार केला तर आपण आपल्या छोटया – मोठया आजारांपासुन आपले रक्षण निश्चितच करू शकतो. कंबरदुखीच्या या त्रासावर आपण व्यायाम करून आराम मिळवु शकतो. परंतु तरी देखील या त्रासाचे निरसन होत नसेल आणि आपल्याला त्रास होत असेन तर मात्र आपण वैद्यकिय सल्ला अवश्य घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक्सरे, एमआरआय यांसारख्या चाचण्या करून घ्याव्या.

कंबर दुखीवर घरगुती उपाय (kambar dukhi gharguti upay) /

आपल्याला जर कंबर दुखीचा त्रास असेन तर आपण, आम्ही सांगितलेले खालील कंबर दुखी कमी करण्याचे उपाय करावेत

कंबर दुखीवर घरगुती उपाय / कंबर दुखी व्यायाम / कंबर दुखीवर आयुर्वेदिक औषध ( kambar dukhi kami karnyache upay) - कंबर दुखणे
कंबर दुखीवर घरगुती उपाय
  • नारळ तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या तळून घ्याव्या आणि त्या तेलाने , कंबरेवर मालीश करावी .
  • कंबर दुखीचा त्रास असेन तर कंबर दुखी कमी कानयचा उपाय म्हणून आपण आहारात कल्शियम युक्त पदार्थांचा समावेश करावा .
  • गरम पाणी एक बॉटल मध्ये भरावे अथवा , शेक घेण्याची बॅग असेन तर त्यात भरावे आणि त्याने कंबरला शेक द्यावा , या उपाय ने कंबर दुखी लवकर कमी होते .
  • रात्री झोपताना पाठीवर सरल झोपावे, चुकीच्या झोपण्याच्या सवयीमुळे देखील कंबर पाठ दुखू शकते .
  • आपण जर एकाच जागी बसून काम करत असाल तर , प्रत्येक अर्धा तास नंतर आपले आसन सोडावे , पाच मिनिट तरी चालावे .
  • अर्धी वाटी मीठ गरम करावे आणि त्याने कंबर शेकावी .

कंबर दुखी व्यायाम ( kambar dukhiwar vyayam)

            कंबरदुखी हा त्रास साधारणतः महिलांना जाणवणारा त्रास आहे. घरातील अनेक छोटी-मोठी कामे करत असताना महिलांच्या कंबरेवरती ताण पडत असतो त्यामुळे त्यांना कंबरदुखीचा त्रास उद्भवतो; परंतु हा त्रास वाढून या त्रासचा गंभीर आजार होण्याआधीच आपण व्यायामाचा अंगिकार करून आपल्या शरिराला नियमित पणे व्यायामाची सवय लावावी, कंबरदुखीच्या त्रासापासून सुटण्यासाठी नियमित काही व्यायाम करावेत . व्यायाम केल्याने निश्चितच आपला कंबरदुखीचा त्रास हा बर्‍याच प्रमाणात कमी होईल आणि आपल्याला आराम मिळेल .आता आपण पाहूया कंबर दुखीवर व्यायाम कोणते आहेत :

ओमकार चा उच्चार करावा

कंबर दुखीवर घरगुती उपाय / कंबर दुखी व्यायाम / kambar dukhi kami karnyache upay

           ओमकारचा उच्चार ही आपल्या शरीरासाठी एक देणगी ठरू शकते . कुठलेही योगासन सुरू करण्यापुर्वी ओमकारचा उच्चार करावा .संपुर्ण ब्रम्हांड हे नादमयी करण्याची शक्ती ‘‘ ओम ‘‘ मध्ये समाविष्ट आहे आणि म्हणुनच ‘‘ औमित्यकाक्षरंम ब्रम्हा ‘‘ असे योगाभ्यासात म्हणटले गेले आहे. ओमकारच्या उच्चारासाठी घेतलेला दिर्घ श्वास हा , तोंडातुन नाकात , नाकातुन डोक्यात आणि डोक्यातून मेंदूत नंतर मेंदुतून पाठिच्या मणक्यादवारे पाठीच्या हाडांद्वारे अगदी कंबरेपर्यंत हा श्वास जाणवतो. त्यामुळे पाठिच्या हाडापासुन ते कंबरपर्यंत मंदावलेल्या स्नायुग्रंथी सक्रीय आणि सचेत होतात .

आपला श्वास- प्रश्वास आणि आपल्या मनाला एकाग्र करून प्राणासेबत ओेंकाराची उपासना केल्यास नक्कीच कंबरदुखीचा त्रास हा कमी होण्यास मदत होईल .ॐकार चा उच्चार हा कंबर दुखीवर व्यायाम म्हणून फायदेशीर ठरतो .

तानासनात उभे रहावेः-  कंबर दुखी कमी करण्यास मदत होते

कंबर दुखी व्यायाम - तानासन
कंबर दुखी व्यायाम – तानासन

            ‘तानासन‘ हा एक व्यायामाचा प्रकार आहे . ‘ तानासन ‘ या शब्दातच अर्थ समजतो , तानासन म्हणजे आपले संपूर्ण शरीर ताणने . तानासन केल्याने आपले आखडलेले स्नायु, ग्रंथी या मोकळया होण्यास मदत होते . शरीरास ताणून केलेल्या आसनामुळे संपूर्ण शरीरात दीर्घ श्वास घेतलेली हवा पसरते आणि बराच आराम मिळतो . आता आपण पाहूया की हे तानासन करतात कसे ? तानासन करण्यासाठी एका योगामॅटवर दोन्ही पायजवळ घेवुन उभे रहावे व डोळे बंद करावे .

नंतर एक दिर्घ श्वास घेत आपले हात एकमेंकात बोटे अडकवुन आकाशाकडे तळवे करत वर न्यावे. पायांच्या बोटांवर उभे राहुन हाताच्या तळव्याद्वारे आपल्या शरीराला पायापासुन आकाशाकडे पुर्णपणे ताणावे, ओढावे , आपल्याला जेवढे शक्य हेाईल तेवढे आपल्या शरीराला ताणून वर ओढावे. त्यानंतर 8 वेळेस दिर्घश्वास घ्यावे व हळुवार सोडावे , असे केल्याने आपल्याला कंबरदुखीपासून नक्कीच आराम मिळेल .

त्रिकोणासन करावेः- कंबर दुखीवर उत्तम व्यायाम

कंबर दुखी व्यायाम - त्रिकोणासण
कंबर दुखी व्यायाम – त्रिकोणासण

           त्रिकोणासण हे देखील आपल्या कंबर दुखीवर अतिशय फायदेशीर आहे . त्रिकोणसण हे पाठदुखी कंबरदुखी यासाठी लाभदायक आहे , त्यामुळे आपल्याला जर कंबर आणि पाठदुखी चा त्रास असेन , तर आपण त्रिकोणसण नक्की करावे . आता आपण पाहूया की , त्रिकोणासण कसे करतात ? त्रिकोणसण करण्यासाठी योगा मॅटवर मोकळ्या आणि हवेशीर जागी, दोन्हीपायांत चार फुट अंतर ठेवुन सरळ उभे रहावे, उजवे पाऊल थेाडे आडव्या रेषेत करावे.

नंतर दीर्घ श्वास घेत कंबर सरळ ठेवुन उजवीकडे झुकावे. एक हात पायाच्या घोटयावर ठेवावा आणि एक हात सरळ रेषेत आकाशाकडे न्यावा. त्याचप्रमाणे हाच व्यायाम विरूध्द दिशेने म्हणजे डाव्या बाजुच्या हाताने करावा . त्रिकोणसण हा व्यायाम करत असताना ,डोळे उघडे ठेवले तरी चालेल . हा व्यायाम केल्याने देखील कंबर दुखीच्या त्रासापासून आपल्याला बराच आराम मिळेल. कंबर दुखीवर व्यायाम मध्ये हा व्यायाम सर्वात जास्त प्रमाणात केला जातो .

वक्रासन करावे

कंबर दुखी व्यायाम - वक्रासण
कंबर दुखी व्यायाम – वक्रासण

           वक्रासण वरील व्यायामांप्रमाणे करण्यास सोपे व त्रास कमी करणारे आसन आहे . याचा फायदा स्ंनायुंचे दुखणे कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात होतो . सहसा वयस्क व्यक्तींना हे आसन करणे अवघड जाऊ शकते , त्यामुळे त्या व्यक्तीने शरीराला जास्त तान देऊन हे आसन करण्याचा प्रयत्न करू नये . तर आता पाहूया , वक्रासन करावे कसे ? वक्रासण करण्यासाठी येागामॅट वर सरळ रेषेत पाय लांब करून बसावे. पायांची बोटे सरळ रेषेत आकाशाकडे करावी, आणि उजवा पाय गुडघ्यातुन उचलुन घ्यावा. त्यांनतर आपल्या डाव्या हाताने उजव्या पायाच्या घोटयाला धरावे.

आता उजवा हात थेाडा मागे नेवुन मानेच्या आणि पाठिच्या साहाय्याने कंबरेपासुन शरिराला उजव्या हाताच्या बाजुस ताणावे म्हणजेच झुकवावे. त्याचप्रमाणे त्याच्या विरूध्द दिशेने म्हणजे उजव्या हाताने डाव्यापायाच्या घोटयाला पकडावे आणि डावा हात मागे नेऊन पुर्ण शरीर हे डाव्या हाताकडे ओढावे; पण लक्षात ठेवावे कि कंबर सरळ ठेवुन कंबरेपासुन ओढावे .यामुळे कंबरेचा छान व्यायाम होतो. आणि आपल्याला कंबरदुखीच्या त्रासपासून मुक्तता मिळेल .

शवासन या आसनात झोपावे      

 वरील सर्व व्यायाम करून झाल्यावर शवासण अवश्य करावे. शवासन करणे हा कंबरदुखीवर अतिशय उत्तम असा व्यायाम आहे. शवासन करण्यासाठी चटईवर किंवा योगा मॅटवर डोळेबंद करून अगदी सरळ रेषेत आकाशाकडे तोंड करून झोपावे. पायाचे बोटे आणि पाय ताठ करून आपल्या हातांची तळवे आकाशाकडे करून डोळे बंद करावे व पाठीवर झोपावे . दिर्घश्वास घ्यावा आणि सोडावा.

शरीराच्या आत येणारा आणि शरीराबाहेर जाणारा प्रत्येक श्वास अनुभवावा आणि अगदी रिलॅक्स झोपावे. त्यामुळे कंबरेला भरपुर आराम. हे आसन करताना डोळे पुर्णपणे बंद करावे, त्यामुळे योगासने प्राप्त झालेली ऊर्जा डोळ्यांमार्फत शरीराबाहेर जाऊ शकत नाही आणि आपल्याला याचा फायदा होईल .

हस्तपादासण करावे

हस्तपादासण हे देखील कंबर दुखीवर अतिशय उपयोगी आहे . ही आसन केल्याने आपल्या मज्जासंस्थेचा रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि आपल्याला कंबर दुखीच्या त्रासापासून आराम मिळेन . हस्त पादासण करण्यासाठी मॅट वर सरळ रेषेत उभे राहावे आणि दीर्घ श्वास घेत हात वर न्यावे आणि हळू हळू श्वास सोडत हात खाली आणावे असे करत असताना पाठीपासून वाकु नये . आपले डोके आणि कपाळ हे गुढ्घ्याला टेकवण्याचा प्रयन्त्न करावा .

अशाप्रकारे वर सांगितलेले ‘ कंबर दुखीवर व्यायाम ‘ करून कंबरदुखीवर कायमची मात करू शकतो ,आणि आपल्या शरीराला आणि मनाला व्यायामाच्या साहाय्याने अगदी उत्तम आरोग्य प्रदान करू शकतो. आणि आपले शारीरिक तसेच मानसिक आरोग्य अगदी उत्तम ठेऊ शकतो . जर योग्य रीतीने वरील व्यायाम करून देखील कंबरदुखीचा त्रास कमी झाला नाही तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा .

कंबर दुखीवर आयुर्वेदिक औषध (kambar dukhi ayurvedic upay)

कंबर दुखीवर आयुर्वेदिक औषध - kambar dukhi kami karnyache upay - कंबर दुखणे
कंबर दुखीवर आयुर्वेदिक औषध

कंबर दुखीवर आयुर्वेदिक औषध म्हणून आपण खालील औषध घ्यावे

  • कंबर दुखीवर आयुर्वेदिक औषध म्हणून डिंक हे हमखास वापरले जाते . अर्धा कप गरम दूध मध्ये अर्धा चमचा डिंक पावडर टाकावी व ते दूध प्यावे .
  • पालक चे सूप , पालक ची भाजी , कॉर्न सूप जास्त प्रमाणात घ्यावे कारण यात कल्शियम जास्त असते ,त्याने कंबर दुखी हमखास कमी होते .
  • मेथ्या , उडीदडाळ आणि डिंक याचे लाडू बनवावे व ते खावे , कंबर दुखीवर आयुर्वेदिक औषध म्हणून याचा हमखास वापर होतो .
  • रोज रात्री दूध प्यावे , याने कल्शियम वाढते आणि कंबर दुखी थांबते .

कंबर पट्टा (कंबर पट्टा) :- कंबर दुखी उपाय

कंबर दुखीवर घरगुती उपाय - कंबर पट्टा
कंबर पट्टा

कंबर पट्टा वापरणे, हे देखील कंबर दुखी कमी करण्यास मदत करते. योग्य कंबर पट्टा वापरल्यास, कंबरेला बराच आराम मिळून कंबर दुखी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कमरेतील स्नायूंना ताठ राहण्यास मदत होते आणि कंबर दुखी देखील थांबते.

सारांश -कंबर दुखीवर घरगुती उपाय / कंबर दुखी व्यायाम / कंबर दुखीवर आयुर्वेदिक औषध (kambar dukhi kami karnyache gharguti upay)

जर तुम्हाला कंबर दुखीचा त्रास असेन तर, आम्ही वर सांगितलेले ‘ कंबर दुखी घरगुती उपाय / कंबर दुखी व्यायाम ‘ हा लेख वाचून तुम्ही ते कंबर दुखीवर व्यायाम व कंबर दुखीवर आयुर्वेदिक औषध तसेच कंबर पट्टा वापरुन बघा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. परंतु आपल्याला काही त्रास किंवा स्नायूंचा आजार असल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

आपल्याला वरील लेखामध्ये सांगितलेल्या ,कंबर दुखी घरगुती उपाय/कंबर दुखी व्यायाम /कंबर दुखीवर आयुर्वेदिक औषध (kambar dukhi kami karnyache upay), या विषयी माहिती, तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top