इडली कशी बनवायची – साहित्य – कृती – संपुर्ण माहिती

इडली कशी बनवायची (idali kashi banvaychi) / इडली रेसिपी मराठी >>> आपला भारत देश हा विविधतेने  नटलेला देश म्हणून ओळखला जातो . आपल्या देशात अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. प्रत्येक जाती-धर्मा नुसार त्यांच्या खाण्याच्या पदार्थात बराच भेद आपण पाहतो; परंतु आपण पाहतो की, त्या त्या प्रांतातले खाद्यपदार्थ हे तेवढ्या प्रांता पुरतेच मर्यादित न राहता बर्‍याच भागात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ बनतात , आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भारतातील , दक्षिण भागातील लोकप्रिय आणि प्रचलित पदार्थ “इडली सांभर” हा पदार्थ संपूर्ण देशभर बनवला जातो आणि आवडीने खाल्ला देखील जातो.

दक्षिण भारतातील इडली सांभर हा पदार्थ आपल्या महाराष्ट्रात अगदी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जन खूप आवडीने खातात. लहान मुलांची तर इडली ही डिश सर्वात आवडती आहे . कुठेही जा आपल्याला उडपी हॉटेल ह्या दिसतातच, कारण उडपी पदार्थ म्हणजे इडली सांभर, डोसा हे पदार्थ सर्वात जास्त प्रमाणात ऑर्डर केले जातात आणि याची संपूर्ण जगात मागणी देखील आहे .

बर्‍याच महिला घरी इडली बनवितात ;परंतु त्यांची तक्रार असते की , इडली हलकी होत नाही, गच्च आणि कडक होते . बाजारात जशी हलकी, फुगलेली आणि जाळीदार इडली मिळते ,तशी आमची घरी बनवलेली इडली हलकी, फुगलेली आणि जाळीदार इडली बनत नाही. त्यामुळे याच तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आजच्या या लेखात “आम्ही घेऊन येत आहोत रेसिपी ….इडली कशी बनवायची/इडली रेसिपी मराठी (idali kashi banvaychi) ..”. चला तर मग पाहूया आजच्या लेखातील माहिती काय म्हणते …या इडली रेसिपी मराठी माहितीचा वापर करून तुम्ही नंबर वन इडली घरी बनवू शकता.

इडली कशी बनवायची (idali kashi banvaychi) / इडली रेसिपी मराठी ( idali recipe marathi)

इडली आजकाल घराघरात नाष्ट्यासाठी बनवली जाते व तितक्याच आवडीने खाल्लीही जाते. इडली  तांदळापासून बनवण्यात येणारा सर्वात स्वादिष्ट व पौष्टिक पदार्थ आहे. त्याचबरोबर झटपट होणारा देखील पदार्थ आहे. इडली रव्यापासूनही देखील बनवली जाते. दुकानातून विकतही इडलीचा  वेगळा असा रवा मिळतो. पण घरी स्वतः बनवून खाण्यात काही वेगळीच  मजा असते. स्वतःच्या  हाताने बनवून घरच्यांनाही खाऊ घालण्याचा आनंद काही वेगळाच असतो,  त्यात एक वेगळेच समाधान असते. आंबवून बनवलेल्या इडल्या पचायला खूप हलक्या असतात. चला तर मग ,आपण घरच्या घरी तांदळापासून इडली कशी बनवायची , ते पाहू या ….सर्व प्रथम इडली बनविण्यासाठी लागणारे साहित्य कोणते ते पाहूया –

इडली  बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे खालीलप्रमाणे :-

तांदूळ – तीन वाटी 

तांदूळ - इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य / इडली कशी बनवायची (idali kashi banvaychi) / इडली रेसिपी मराठी
तांदूळ – इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

उडीद डाळ – एक वाटी 

उडीद डाळ - इडली साठी लागणारे साहित्य / इडली कशी बनवायची (idali kashi banvaychi) / इडली रेसिपी मराठी
उडीद डाळ – इडली साठी लागणारे साहित्य

पोहे – एक वाटी 

सोडा – अर्धा चमचा 

मीठ –  चवीनुसार 

तेल – गरजेनुसार

टीप :- जर इडली जास्त जणांसाठी बनवायची असेन तर तीन ग्लास तांदूळ घ्यावे आणि एक ग्लास उडीद दाल घ्यावी. पोहे दीड वाटी घ्यावी, पोहे नसेन तर आपण शिजवलेला भात देखील टाकू शकतो .

इडली बनवण्याची  कृती (idali kashi banvaychi)

इडली बनविण्यासाठी आधी इडलीचे तांदूळ आणि दाळ हे, चार ते पाच तास भुजू द्यावे आणि मग मिक्सर मधून काढून रात्रभर आंबवण्यास ठेवावे .तर सर्वप्रथम आपण पाहूया की रवाळ आणि हलकी फुलकी व जाळीदार इडली होण्यासाठी , इडली चे पीठ कशा पद्धतीने आंबवण्यास ठेवावे .

इडली पीठ आंबविण्याची कृती / इडली रेसिपी मराठी (idali recipe marathi) –

सर्वप्रथम इडली बनवण्यासाठी लागणारे तांदूळ एका मोठ्या पातेल्यात घालून ते तांदूळ स्वच्छ २ ते ३ वेळा पाण्याने धुवून घ्यावे. त्यानंतर तांदळामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घालून ते चार ते पाच तास भिजायला ठेवावे. त्याचबरोबर उडीददाळ मध्ये देखील त्याच्या दुप्पट पाणी घालावे आणि भिजण्यास ठेवावे.

इडली कशी बनवायची - इडली चे आंबवलेले पीठ
इडली कशी बनवायची – इडली चे आंबवलेले पीठ

लक्षात ठेवा, तांदूळ व उडिद डाळ दोन्हीही वेगवेगळे भिजवावेत एकत्र भिजवू नये आणि मिक्सर मधून देखील एकत्र करून काढू नयेत. जवळपास चार ते पाच तास तांदूळ आणि दाळ भिजल्यानंतर ते मिक्सर मधून काढण्यास घ्यावे. दाळ आणि तांदूळ मिक्सर मधून काढत असताना , तांदूळ हे रवाळ आणि थोडे जाडसर काढावे तर उडीद दाळ ही अगदीच बारीक काढावी. त्यामुळे इडली रवाळ बनते, जर आपण तांदूळ आणि दाळ बारीक आणि एकत्र काढले तर इडली गच्च बनते. इडली चे पीठ आंबविण्यास ठेवताना, त्यात लगेचच एक वाटी भिजवलेले पोहे देखील मिक्सर मधून काढून टाकावे, पोहे जास्तीत जास्त दहा मिनिट जरी भिजवले तरी चालते त्यामुळे इडली हलकी आणि मऊ होण्यास मदत होते तसेच इडली छान फुगते देखील.

आता हे सर्व काढलेले मिश्रण छान हलवून घ्यावे आणि एका गच्च झाकण असलेल्या डब्यात आंबवण्यासाठी ठेवावे. लक्षात ठेवा, रात्री पीठ आंबवण्यासाठी ठेवताना त्यात मीठ आणि सोडा दोन्हीही अजिबात टाकायचे नाही. रात्री आंबवताना मीठ टाकले तर इडली पिवळसर होते, पांढरीशुभ्र होत नाही .

 तांदळाची इडली करताना हे लक्षात असुद्या की ज्या दिवशी तुम्ही इडली बनवणार आहात त्याच्या आधीच्या दिवशी तांदूळ व डाळ भिजू घालावेत. आंबवून बनवल्यामुळे इडली खूप पौष्टिक व पचायलाही हलकी असते. तसेच तिची चवही छान लागते तसेच आंबवलेली असेल तर ती छान फुकते .

आता हे मिश्रण दमट जागी झाकून  ठेवावे, जेणे करून मिश्रण छान आंबेल आणि आपली इडली अगदी स्पंजी, हलकी आणि मऊ होईल. पोहे घातल्यामुळे इडली एकदम मऊ व  लुसलुशीत होतात. जर तुम्ही पोहे नाही घातलात तरीही चालेल. पोह्याऐवजी तुम्ही शिजवलेला भात वाटून घातला तरीही चालेल. त्यामुळे देखील इडली खूप छान बनतात. सकाळपर्यंत तुमचे इडली चे पीठ अगदी मस्त फुगून येईल म्हणजेच आंबलेले असेल .

पीठ छान आंबवले गेले हे कसे ओळखावे :

पीठ छान आंबवले गेले असेन तर, रात्री होते त्याच्या दुप्पट दिसते आणि जाळीदार दिसते . याप्रकारे जर सकाळी पीठ असेन तर समजावे की आपले पीठ अगदी छान आंबवले गेले आहे आणि आता हे पीठ इडली करण्यास तयार आहे .

इडली कशी बनवायची (idali kashi banvaychi / idali recipe marathi) - इडली चे आंबवलेले पीठ
इडली चे आंबवलेले पीठ

जेव्हा तुम्ही इडली बनवायला घ्याल त्यावेळी आपण बारीक केलेल्या मिश्रणामध्ये  चवीनुसार मीठ आणि सोडा घालावा आणि संपूर्ण मिश्रण एकसारखे मिक्स करावे, फेटावे. इडलीच्या भांड्यात थोडे पाणी घालून यामध्ये एक लिंबाची फोड टाकावी व गॅसवर भांडे ठेवावे. लिंबाच्या फोडीमुळे भांडे काळे होत नाही. आता इडली पात्राच्या प्लेटला थोडे तेल लावून घ्यावे आणि त्यात इडली पीठ बाजूला न सांडता टाकावे. इडलीचे पात्र पुर्णपणे गरम झाल्यानंतर च त्यामध्ये इडली पीठ घातलेले प्लेट्स ठेवावे, गरम आणि उकळते पाणी असल्यास इडली खूप छान फुगते, अजिबात चापट होत नाही . इडलीच्या पात्रातील वाफ बाहेर जाऊ नये यासाठी , पात्राचे झाकण लावल्यानंनतर त्यावर बत्ता ठेवावा, म्हणजे वाफ जाणार नाही .

इडली ५-१० मिनिटे साधारण मोठ्या आचेवर ठेवून इडल्या चांगल्या शिजू द्याव्यात , दहा मिनिट मोठ्या आचेवर झाल्यानंतर आता दोन ते तीन मिनिट मंद आचेवर इडली होऊ द्यावे त्यामुळे अजून जास्त हलक्या आणि जाळीदार इडली होतील . 

दहा मिनिटानंतर झाकण उघडून एकदा इडल्या व्यवस्थित झाल्या आहेत का तपासून पहा, जर तुम्हाला अजून १-२ मिनिटे ठेवाव्या लागतील, असे वाटल्यास तर अजून एक दोन मिनिट होऊ द्यावे. त्यांनतर गॅस बंद करून साचे भांड्यातून बाहेर काढून घ्या. बाहेर काढल्यानंतर प्लेट्स दोन मिनिट्स थंड होऊ द्या. गरम प्लेट मधून इडली काढल्यास त्या तुडण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडे थंड झाल्यानंतर इडली पुर्णपणे न तुटता प्लेट्स च्या बाहेर काढता येतील. सगळ्या  इडल्या बाहेर काढून घेतल्यानंतर टिशू पेपरवर ठेवाव्या किंवा असेन तर केळीच्या पानावर ठेवाव्या आणि सर्व्ह कराव्या. अश्याप्रकारे आमची ही माहिती वाचून, अगदी घरच्या घरी उडपी स्टाइल हलक्या इडली आपण घरच्या घरी बनवू शकतो.

इडली बनविण्यासाठी चांगले तांदूळ न वापरता तुकडा तांदूळ किंवा मग हलक्या प्रतीचे तांदूळ वापरावे त्यांच्या इडली अगदी मस्त आणि हलक्या बनतात तसेच त्याचे पीठ देखील छान आंबते .

अशाप्रकारे गरम गरम इडली ही खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची  चटणी, किंवा सांबर यासोबत तुम्ही खाऊ शकता .गरमागरम सांभर , चटणी आणि इडली असा उत्तम नाश्ता तयार. जो बनवायला देखील सोपा आणि पचायला देखील सोपा तसेच खाण्यास स्वादिष्ट असा पदार्थ आहे.

इडली फ्राय - उरलेल्या इडलीचा तुम्ही इडली फ्राय देखील करू शकता (idali recipe marathi) / (इडली रेसिपी मराठी)
इडली फ्राय – उरलेल्या इडलीचा तुम्ही इडली फ्राय देखील करू शकता

 जर आपल्या इडल्या उरल्या असतील तर, त्यापासूनही आपण वेगळे वेगळे पदार्थ बनवू शकतो. जसे की इडली फ्राय, इडली मसाला असे प्रकार बनवू शकता. हे सर्व पदार्थ देखील अतिशय चविष्ट आणि अप्रतिम लागतात. आम्ही सांगितलेली रेसिपी वापरुन तुम्ही अशाप्रकारे इडली करून बघा, तुमच्या इडली अगदी मस्त हलक्या, जाळीदार आणि फुगलेल्या बनतील. आमच्या ‘इडली कशी बनवायची (idali kashi banvaychi) या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल .

सारांश -इडली कशी बनवायची/इडली रेसिपी मराठी/ (idali kashi banvaychi)

आपल्याला जर अगदी हॉटेल सारखी जाळीदार, हलकी, रवाळ आणि फुगलेली, उडपी स्टाइल इडली बनवायची असेन, तर आम्ही वर सांगितलेली ” इडली रेसिपी मराठी / इडली कशी बनवायची(idali recipe marathi) ” ही रेसिपी तुम्हाला नक्कीच खूप फायदेशीर ठरेल आणि तुमच्या इडली एकदम मस्त अगदी उडपी स्टाइल नक्कीच बनतील. आम्ही सांगितलेल्या या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल.

तांदळाची इडली कशी बनवायची ?

वरील लेखामध्ये दिलेली इडली कशी बनवायची (idali recipe marathi) ही रेसिपी तांदळाच्या इडलीची असून, वरील कृती नुसार जर तुम्ही तांदूळ आणि उडीद डाळ वापरुन इडली बनवली तर ती चवीला देखील अतिशय उत्तम होते. चला तर मग या लेखामध्ये दिल्याप्रमाणे तांदळाची इडली कशी बनवायची ते वाचून त्याप्रमाणे उडदाची डाळ आणि तांदळाची इडली बनवून पाहुयात. अशाच प्रकारे काही लोक रव्याची इडली कशी बनवायची हे देखील विचारतात, या प्रकारच्या इडली साठी देखील कृती जवळ पास सारखीच असते. फक्त त्या मध्ये तांदळा ऐवजी रवा वापरला जातो.

आपल्याला ही इडली कशी बनवायची /इडली रेसिपी मराठी /idali kashi banvaychi या विषयी माहिती कशी वाटली, आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top