कागदाच्या वस्तू – How to make Top 4 Best Paper Items

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane >> आता पर्यंतच्या काही लेखात आपण पाहिले की, आपण घरातील बर्‍याच पदार्थापासुन आणि वस्तुंपासुन काही ना काही वस्तु बनवु शकतो आणि या मूळ वस्तुला नवे रंग रूप आणि आकार देऊ शकतो. अनेक दिवस वापरलेल्या टाकाऊ वस्तू पासून नवीन टिकाऊ वस्तू देखील आपण बनवू शकतो. जुन्या साडया, बांगडया, पेन, बाॅटल्स, काडीपेटीच्या काडया, आईस्क्रिमच्या काडया, शुज यासारख्या ब-याच वस्तु आहेत ,ज्यापासुन आपण काही ना काही बनवु शकतो, आणि आपल्या घराची शोभा वाढवू शकतो तसेच आपल्या कल्पकतेचा,आपल्यात असणार्‍या कलेचा वापर करू शकतो.

आपण दिवसभरात अशा किती तरी वस्तू, गोष्टी हातात घेतो, ज्यापासून आपण एखादी नवीन वस्तू बनवू शकतो. कागद हा आपण लहानपणा पासूनच पाहतो, हा कागद म्हणजे चित्रकला साठी वापरला जाणारा कागद तुम्ही कल्पना केली का, की आपण लिहण्यासाठी, चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा हा कागद वापरुन आपण कागदाच्या वस्तू बनवू शकतो का ? तर हो खरच,आपण कागदापासून वस्तू बनवू शकतो.

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane
कागदाच्या वस्तु बनवणे

जो कागद वापरतो त्यापासुन किंवा वर्तमानपत्र वाचतो तो कागद किंवा ड्राईंगसाठी जो चार्ट मिळतो तो कागद, घोटीव कागद, टिश्यु पेपर यांच्यापासुन, यांसारख्या कागदापासुन आपण हस्त कला वापरुन काही वस्तु तयार करू शकतो, कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या किंवा कागदाच्या वस्तू बनवणे हे शिकवण्यासाठी “ओरिगामी” नावाचे एक विशेष क्षेत्र देखील आजच्या काळात प्रगत झाले आहेत , त्यात कागदाच्या वस्तू , कागदी गुलाब , पेपर फ्लॉवर पॉट, टेबलखुर्ची बनवणे . कागदाचे झुंबर बनवणे , यांसारख्या कागदाच्या वस्तू बनवणे शिकवले जाते. तर अशीच एक आगळी- वेगळी माहिती आम्ही या लेखात घेऊन येत आहोत.

चला तर मग जाणून घेऊया ” कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या ” या लेखातील माहिती काय सांगते.

कागद:-

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane
कागद निर्मिती

            सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की, कागद म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो. कागद हा असा आहे की, ज्याच्यापासुन कोणीही अपरीचित आहे असे नाही. जवळपास सगळयांनाच कागद म्हणजे काय आणि तो कशा – कशा साठी वापरला जातो हे माहित आहे. कागद म्हणजे लाकुड, गवत, चिंध्या यांच्यापासुन या सर्व घटकांना एकमेंकात मिसळुन त्याचे जाळे होवुन तयार झालेला पदार्थ आहे. जो आपण लिहीण्यासाठी, छापण्यासाठी, पुस्तकांसाठी, चित्रे काढण्यासाठी, वापरतो. कागद हा वनस्पतीच्या सेेल्युलोज या धाग्यासारख्या पदार्थापासुन मुख्यतः तयार होतो आपल्या दैनंदिन जीवनात आपण कागद अनेक कामासाठी वापरतो.

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane
कागद निर्मिती माहिती

            असा लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी, चित्रे काढण्यासाठी वापरण्यात येणारा हा कागद आता नवनवीन वस्तु बनविण्यासाठी देखील पुरेपुर उपयोगी येतो. कागदाच्या वस्तु बनविण्याचे क्षेत्र हे व्यापक झाले आहे. त्यासाठी “ओरीगामी” नावाची नवीन शाखादेखील प्रचलित झाली आहे, ज्यात कागदाच्या वेगवेगळया घडया करून प्राणी, पक्षी म्हणजे चिमणी, कावळा, बगळा, मोर, घोडा हत्ती, मांजर, ससा यांसारखे पक्षी व प्राणी कसे बनवायचे हे शिकवले जाते. त्याचबरोबर कागदाचा वापर करून टेबल, खुर्ची, कप-बशी, दिवे, डबे, पंचीपाळे यांसारख्या वस्तु देखील उत्कृष्ठरित्या तयार करता येतात.

चला तर मग पाहुया कागदापासून कोणकोणत्या वस्तू बनवता येतात आणि त्या वस्तु कशा बनवायच्या ते या लेखात आपण बघूयात.

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे

आपण वेगवेगळ्या कागदाचा वापर करून, रंगबेरंगी कागद वापरुन खालील वस्तू बनवू शकतो.

कागदापासून टेबलखुर्ची बनवणे :- कागदाच्या वस्तू बनवणे

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane
कागदाची टेबल खुर्ची

            कागदाच्या वस्तू बनवण्यात सर्वात जास्त प्रमाणात बनवली जाते आणि बनवण्यास सोपी आहे ती म्हणजे , कागदाची टेबल खुर्ची . चला तर मग पुढील लेखात पाहूया की , कागदापासून टेबलखुर्ची कशी बनवायची. प्रत्येकी 4 सेमी चे 2 रंगाचे कलर पेपरचे चैकोनी कात्रण घेणे, त्या चौकोनी कात्रणाला त्रिकोणी घडी करावी, नंतर ती घडी उघडावी आणि त्याच्या विरूध्द बाजुंनी परत त्रिकोणी घडी करावी .नंतर तीही घडी उघडावी आणि मधोमध बेरीजच्या आकाराची घडी, रेष दिसेल अशी घडी करावी.

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane
घोटीव कागदाची टेबल खुर्ची

बेरीज आकाराच्या मधोमध चारही बाजुंनी त्रिकोणी पेपर फोल्ड करून घेऊन परत त्या प्रत्येक त्रिकोणावर अर्धा भागात पेपर फोल्ड करावा. बाजुचे त्रिकोणी घडी केलेले पेपर खोलावे आणि मग ते मागच्या बाजुने मुडपावे. झालेल्या उभ्या पट्टीला परत वरच्या बाजुने त्रिकोणी घडी करावे. घडी केलेला भाग ओपन करून आधीच्या उभ्या घडीपासुन मुडपावा आणि आतल्या बाजुस दाबावा आता त्याचा छानसा बॉक्स तयार होईल.अशाप्रकारे दुसरा बॉक्स बनवुन दुस-या रंगाच्या पेपरचा बॉक्स त्या बॉक्स ठेवावा. मागच्या बाजुस 5 सेमी ची दुहेरी पेपर घडी केलेली पटटी मधील बाजुस अडकवावी आणि खुर्चीला मागच्या बाजुने असतो तसा भाग बनवावा अशाप्रकारे तीन चार खुर्ची बनवावी, आणि मधोमध चार्टचा टेबल बनवुन ठेवावा.

अशा प्रकारे आपण रंगीत घोटीव कागद किंवा साधा कागद वापरुन कागदापासुन टेबलखुर्ची बनवू शकतो. आता आपण पाहूया की, कागदापासून झुंबर कसे बनवायचे ते. या पुढील लेखात –

कागदापासून झुंबर बनवणे

कागदापासुन आपण अगदी आकर्षक असे झुंबर तयार करू शकतो, त्यासाठी लागणारे साहित्य आहे -काळे, लाल, पिवळे अशा रंगाचे रंगीत कागद, बारीक तार, लोकर, फेव्हिकॉल इत्यादी साहित्य वापरुन आपण झुंबर तयार करू शकतो. कागदाचे झुंबर तयार करण्यासाठी आपण 6/4 सेमीची रंगीत कागदचे तुकडे करून घ्यावे आणि प्रत्येक कागदाच्या तुकडयाला मधोमध घडी करावे. आता त्या घडी केलेल्या भागावर हार्ट शेपचा अर्धा भाग ,म्हणजे नथच्या आकाराचा निमुळता लांब गोल आकार काढावा आणि त्यानंतर तो आकार कट करावा.

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane - कागदाचे झुंबर
कागदा पासून झुंबर बनवणे

अशाप्रकारे लाल आणि पिवळे दोन्ही कलरच्या पेपरचे हार्ट शेप कट करून घ्यावे व 25 सेमीची लोकर घ्यावी. लोकरचा रंग आपल्या आवडीनुसार घ्यावा. त्यावर फेव्हिकॉलच्या साहाययाने ते सर्व शेप चिटकवावे. अशा लोकरच्या 10-12 ओळी बनवाव्या. त्यानंतर बारीक तारचे 3 वेढे गोलाकार करून घ्यावे साधारण 12 सेमी वर्तुळाकार तारेचा गोल बनवावा.

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane
कागदाचा झुंबर

त्यावर म्हणजे तारेच्या गोलवर देखील पुर्णपणे लोकर गुंडाळावी, हॅगींगसाठी लटकवण्यासाठी त्या तारला 3 जागी अजुन दुसरी लेस/लोकर बांधावी आणि त्या तिन्ही लोकर/लेस ला एकत्र करून गाठ बांधावी म्हणजे तारेचे गोल वर्तुळ हॅंग होईल आणि त्याला आपण कागदाच्या हार्ट शेपच्या ज्या माळा बनवल्या त्या थोडया थोडया अंतरावर बांधाव्या, झाले आपले सुंदर असे कागदापासुन झुंबर तयार.

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane
झुंबर

            अशाप्रकारे कागदापासुन आपण आपल्या लिविंग हॉलसाठी झुंबर बनवु शकतो आणि आपल्या घराची शोभा वाढवु शकतो. हे झुंबर करण्यास सोपे आणि दिसण्यास आकर्षक असे आहे. याच्या सजावटी साठी आपण डेकोरेशन चे काच देखील वापरू शकतो. आता आपण पाहूया कागदाचा फ्लॉवर पॉट कसं बनवायचा

पेपर फ्लॉवर बॉक्स / पेपर पॉट

            पेपर फ्लॉवर पॉट बनवण्यासाठी आपण पेपर/ किंवा पुटटयाचा बॉक्सदेखील डेकोरेट करून घेऊ शकतो. फ्लॉवर पॉट बनविण्यासाठी लागणारे साहित्य आहे – ए 4 शीट चा पांढरा कागद, हिरवा कागद, पांढ-या कागदाचे आडवे 2 भाग करावे. 2 भाग कापल्यानंतर 1 भाग परत आडवा मुडपावा. आता मध्यभागापासुन परत मुडपावा नंतर दोन्ही मुडपलेल्या टोकापासुन 1 ते 2 सेमी अंतर सोडुन थोडया अंतराने सरळ रेषेत कागद कापावा. नंतर मधुन घडी केलेला कागद खोलावा त्याच्या विरूध्द बाजुने त्याच जागेवर परत फोल्ड करावा आणि त्याच्या कडा चिटकवाव्या.

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane
कागदाचा फ्लॉवर पॉट

पिवळा रंगाचा 2 सेमीचा कागद घेऊन त्यालाही सेम असेच पुर्ण कापावे जेणेकरून ते पराग दिसतील आणि नंतर फुलाची दांडी करण्यासाठी हिरव्या रंगाचा 4 /2 सेमी कागद घ्यावा. शेवटच्या टोकापासुन त्याला गुंडाळत जावे आता त्याचा लांब दांडा तयार होईल. तयार दांडीला पिवळा रोल बनवुन गुंडाळावा आणि त्यांच्या बाजुला पुर्ण पांढ-या कागदाची कापलेली पट्टी गोलाकार चिकटवावी आणि त्याच्या कापलेल्या दोन मध्यभागाला मोकळे करावे किंवा फुलवावे.

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane - पेपर फ्लॉवर पॉट
पेपर फ्लॉवर पॉट
कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane
फ्लॉवर पॉट

            अशाप्रकारे हिरव्या पेपरचे देखील फुले बनवावी अगदी सुंदर आकर्षक दिसणारी ही पांढ-या आणि हिरव्या रंगाची फुले पिवळे पराग अगदी नजरेत भेदुन जातात आणि आकर्षक दिसतात व आपल्या घराची शोभा वाढवतात.

कागदी गुलाब :-

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane

गुलाबी रंगाचा घोटीव कागद 4/4 आकारात कापावा. त्याला क्रॉस मध्ये घडी करावी आणि परत उघडावी. आता त्या चौकोनी पेपर ला मधोमध त्रिकोण करून दोन भाग वेगळे करून घ्यावा जेणे करून मध्ये घडी येऊन एकावर एक दोन त्रिकोण मिळतील. वरील त्रिकोण चा खालचा भाग खालून फोल्ड करावा तसाच दूसरा भाग देखील वर फोल्ड करावा. याच प्रकारे मागच्या / खालच्या त्रिकोण देखील फोल्ड करून घ्यावा आता आपल्याला चौकोन मिळेल ज्यावर त्रिकोण चे दोन भाग असतील आता त्याला परत फोल्ड करून पेपर चे फोल्ड मध्ये टाकावे त्याच्या मधोमध परत त्रिकोणी फोल्ड करावे आणि दुसर्‍या बाजूने देखील फोल्ड करावे. अशाच प्रकारे मागच्या बाजूने देखील दोन त्रिकोणी फोल्ड करावे म्हणजे गुलाब च्या पाकळ्या दिसतील. आता याला हिरव्या रंगाच्या पेपर ने रोल करत दांडा करावा.

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane

कागदी गुलाब बनवण्याची अजून दुसरी पद्धत म्हणजे 3 सेमी चा गोल लाल किंवा गुलाबी रंगाचा कागद कापावा. ह्या गोल कापलेल्या आकाराच्या कागदावर 1 सेमी अंतर ठेऊन तसेच गोल गोल अगदी मध्यावर येई पर्यंत कापत जावे. आता पूर्ण गोल कापल्या नंतर अगदी शेवटच्या भागापासून गोल गोल गुंडाळत जावे आणि मध्यावर आले की फेविकॉल ने शेवटचा भाग कागद ला चिटकवून द्यावा. आता हिरव्या कागदाची दांडी करावी आणि मधोमध चिटकवावी. अशा प्रकारे आपण वरील दोन पैकी कोणतीही एक पद्धत वापरुन कागदी गुलाब बनवावा.

कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे / कागदी गुलाब / kagdachi vastu banane
कागदाचा गुलाब

अशाप्रकारे आपण हा लेख वाचून या लेखातील माहितीच्या आधारे कागदाच्या वस्तू बनवू शकता. या लेखातील माहिती वाचून आपल्याला कागदाच्या शोच्या वस्तु कशा बनवायच्या हे नक्कीच समजले असणार.

सारांश – कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदाच्या वस्तू बनवणे ( kagdachi vastu banane)

आपल्याला जर कागदाच्या वस्तू बनवायच्या असतील , किंवा कागदी गुलाब बनवायचा असेल तर आपण वरील लेखातील माहिती वाचून त्याप्रमाणे कागदाच्या वस्तू बनवाव्या, त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , “कागदाच्या वस्तू / कागदाच्या वस्तू कशा बनवायच्या / कागदी गुलाब /कागदाच्या वस्तू बनवणे ” ही घरगुती माहिती हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top