शंकरपाळी कशी बनवायची | शंकरपाळे कसे बनवायचे | शंकरपाळी रेसिपी मराठी

शंकरपाळी कशी बनवायची | शंकरपाळे कसे बनवायचे | शंकरपाळ्या ची रेसिपी | शंकरपाळी रेसिपी मराठी मध्ये (khuskhushit shankarpali recipe in marathi/ shankarpali sweet) >> शंकरपाळी हा करण्यास अगदी सोपा आणि चवीस अगदी स्वादिष्ट असा दिवाळी फराळातील पदार्थ आहे. कुठल्याही वेळी, फराळ मध्ये पाहुण्यांसाठी इतर दिवाळी फराळा सोबत शकंरपाळी दिली तर उत्तमच. तसेच तोंडात टाकली की लगेच विरघळणारी, खुसखुशीत अशी शंकरपाळी सर्वांनाच अतिशय आवडते. 

करंजी प्रमाणेच शंकरपाळी हा देखील दिवाळी फराळाची रंजक वाढवणारा पदार्थ आहे. शंकरपाळी हा पदार्थ आकाराने छोटा जरी असला तरी, झटपट भुक भागविण्याची मोठी कामगिरी अगदी चविष्टपणे निभावत असतो. खाण्याचे शौकीन आणि फराळाचे चाहते जे लोक असतात, त्यांचा फराळ नाष्टा हा तर शंकरपाळी शिवाय पुर्ण होतच नाही.

म्हणूनच म्हणावेसे वाटते,

दिवाळी फराळात आहेत अनारसी, लाडु, चकली, करंजी

पण तरीही आम्हांला शंकरपाळीच हवी……

अशी मागणी म्हणजेच डिमांड लहान मुलांची असते. लहान मुलांना एका ठिकाणी बसुन एकदाच खाण्याचा भारी कंटाळा असतो. तेव्हा त्यांना चालत फिरत खाण्यासाठी किंवा छोटी छोटी भुक झटपट भागविण्यासाठी घरात नेहमी खारी किंवा गोडी अशा प्रकारची शंकरपाळी तयार असावीत, असे आयोजन प्रत्येक सुगरण गृहीणीची असते. खरं तर ते आपण करायलाच पाहिजे.

चला तर मग असा एक मस्त पदार्थ म्हणजे शंकरपाळी कशी बनवायची / शंकरपाळी रेसिपी मराठी मध्ये हे अगदी सोप्या पध्दतीने पाहुयात.

शंकरपाळी कशी बनवायची | शंकरपाळी रेसिपी मराठी मध्ये (khuskhushit shankarpali recipe in marathi/ shankarpali sweet)

 शंकरपाळी ही दोन प्रकारची बनवता येते, एक म्हणजे ‘गोड शंकरपाळी‘ आणि दुसरी म्हणजे ‘खारी शंकरपाळी‘. सर्वप्रथम आपण साखर घालुन केलेली गोड शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहीत्य आणि कृती पाहुयात.आणि त्यानंतर आपण खुसखुशीत खारी शंकरपाळी कशी बनवायची याची माहिती बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात अतिशय चविष्ट आणि तोंडात विरघळणारे शंकरपाळे कसे बनवायचे याची सर्वात उत्तम आणि सोपी रेसिपी.  

गोड शंकरपाळी रेसिपी मराठी / मैद्याचे शंकरपाळे (sweet shankarpali recipe / rava maida shankarpali recipe in marathi)

गोड शंकरपाळी (मैद्याची शंकरपाळी) बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

 • मैदा – जवळपास पावकिलो
 • बारीक केलेली साखर – १ मध्यम आकाराची वाटी
 • साजुक तुप मोहनसाठी – साखर घेतलेल्याच आकाराची 1 वाटी
 • विलायची पावडर – आवडीनुसार

गोड शंकरपाळी (मैद्याची शंकरपाळी) बनवण्याची कृती :-

सर्वप्रथम एका मोठया ताटात मैदा चाळुन ठेवावा. साजुक तुप गॅसवर मंद आचेवर गरम करून थंड करण्यास ठेवावे. मध्यम आकाराच्या वाटीमध्ये बसेल एवढे तुप घ्यावे. त्याच आकाराच्या वाटीत बसेल तेवढी पिठीसाखर घ्यावी. एका मोठया भांडयात 1 वाटी बारीक केलेली साखर आणि 1 वाटी साजुक तुप पातळ थंड केलले घ्यावे. भांडयातील साखर आणि तुप हाताने पुर्ण मिक्स करावे, आणि बारीक वाटलेली साखर तुपात थोडी विरघळली की त्यात बसेल तेवढा मैदा टाकावा. मैदा हा संपुर्ण मिश्रणाचा घट्ट गेाळा बनेपर्यंत टाकावा. नंतर 20 ते 25 मिनिटे त्याला झाकुन ठेवावे. जवळपास अर्धा तास नंतर मळलेला मैदा घ्यावा, आपल्या आवडीप्रमाणे त्यात वेलची पावडर टाकावी आणि त्याचे आपण पोळी बनवतो एवढया आकाराचे गोळे बनवावेत.

आता आपल्याला त्या पिठाच्या शंकरपाळ्यांच्या आकाराचे काप करायचे आहेत, त्यासाठी पोळपाटाला तुपाचे बोट घेउन सगळीकडे ते तुप पसरवावे, जेणेकरून आपण त्या मैदाची पोळी लाटत असताना ती खाली चिकटणार नाही. पोळपाटाप्रमाणेच रोलरला म्हणजेच बेलण्याला देखील तुप लावावे. आपल्या नेहमीच्या पोळी एवढा गोळा घेउन त्याची थेाडी जाडसर पोळी लाटावी मग त्याचे तिरकस उभे आणि तिरकस आडवे असे काप पाडावे. सुरीच्या साहाय्याने काप करत असताना लाटलेली पोळी सुरी चिकटणार नाही किंवा गोळा होणार नाही याची काळजी घ्यावी. अगदी हळुवारपणे एकसारखे काप कापावे आणि सुती कपडयावर सुकण्यास ठेवावे. सर्व गोळयांचे शंकरपाळी काप बनवुन झाल्यास एक पॅनमध्ये तुप घ्यावे तळणासाठी लागेल तेवढे.

शंकरपाळी कशी बनवायची | शंकरपाळे कसे बनवायचे | शंकरपाळ्या ची रेसिपी | शंकरपाळी रेसिपी मराठी मध्ये (khuskhushit shankarpali recipe in marathi/ shankarpali sweet)
गोड शंकरपाळी रेसिपी मराठी (sweet shankarpali recipe in marathi)

कढई किंवा पॅनमध्ये टाकलेले तुप कडक गरम झाल्यावर त्यात 10  ते 12 याप्रमाणात हळुवार पणे शंकरपाळे टाकावे आणि तळुन घ्यावे. चला मग झाले तर अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे नंबरवन शंकरपाळी तयार.

बर्‍याच खवयांना खारी शंकरपाळी देखील खुप आवडतात. त्याचबरोबर ज्यांना मधुमेह चा आजार आहे ते पण खारे शंकरपाळीची मागणी करतात. त्यांच्यासाठीच ‘‘खारी शंकरपाळी‘‘ अतिशय सोप्या पध्दतीमध्ये कशी बनवायची ते पुढील प्रमाणे.

खुसखुशीत खारी शंकरपाळी रेसिपी (khare shankarpali recipe marathi / salty shankarpali recipe)

खारी शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

 • एक वाटी तेल
 • मैदा – बसेल तेवढा
 • एक वाटी पाणी – 1 वाटी
 • ओवा – 2 चमचे
 • जिरेपुड – 1 चमचा
 • मीठ – चवीनुसार
 • तेल – शंकरपाळी तळणासाठी

खुसखुशीत खारी शंकरपाळी रेसिपी (khare shankarpali recipe marathi / salty shankarpali recipe)

ज्याप्रमाणे आपण गोड साखरपुड टाकुन शंकरपाळी बनवितो, अगदी त्याचप्रकारे हे खारे शंकरपाळी बनवता येतात. तेल आणि पाणी समप्रमाणात घेऊन त्यात मीठ, ओवा, जीरेपुड घ्यावी आणि तेल व पाणी यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण तयार करताना प्रमाण पुढीलप्रमाणे असावे 2 चमचे ओवा – 1 वाटी तेल – 1 वाटी पाणी घेऊन बसेल तेवढा मैदा टाकावा.

आता आपल्याला त्या पिठाच्या शंकरपाळ्यांच्या आकाराचे काप करायचे आहेत, त्यासाठी पोळपाटाला तेलाचे बोट घेऊन सगळीकडे ते तेल पसरावे, जेणेकरून आपण त्या पिठाची पोळी लाटत असताना ती खाली चिकटणार नाही. पोळपाटाप्रमाणेच रोलरला म्हणजेच बेलण्याला देखील तेल लावावे. आपल्या नेहमीच्या पोळी एवढा गोळा घेउन त्याची थेाडी जाडसर पोळी लाटावी मग त्याचे तिरकस उभे आणि तिरकस आडवे असे काप पाडावे.

आता सुरीच्या साहाय्याने काप करत असताना लाटलेली पोळी सुरीला चिकटणार नाही किंवा गोळा होणार नाही याची काळजी घ्यावी. अगदी हळुवारपणे एकसारखे काप कापावे आणि हे कापलेले शंकरपाळे सुती कपडयावर सुकण्यास ठेवावे. सर्व गोळयांचे शंकरपाळी काप बनवुन झाल्यास एक पॅनमध्ये तेल घ्यावे तळणासाठी लागेल तेवढे आणि गॅस वर गरम करण्यास ठेवावे.

शंकरपाळी कशी बनवायची | शंकरपाळे कसे बनवायचे | शंकरपाळ्या ची रेसिपी | शंकरपाळी रेसिपी मराठी मध्ये (khuskhushit shankarpali recipe in marathi/ shankarpali sweet)
खुसखुशीत खारी शंकरपाळी रेसिपी (khare shankarpali recipe marathi / salty shankarpali recipe)

कढई किंवा पॅनमध्ये टाकलेले तेल कडक गरम झाल्यावर त्यात 10  ते 12 याप्रमाणात हळुवार पणे शंकरपाळे टाकावे आणि तळुन घ्यावे. चला तर मग झाली आपली अगदी खुसखुशीत नंबरवन खारी शंकरपाळी तयार.

शंकरपाळी बनवताना घ्या वयाची काळजी

गोड शंकरपाळयामध्ये आपण केवळ बारीक साखर 1 वाटी आणि तुप 1 वाटी याचा वापर केला, त्यात पाणी किंवा दुध टाकले नसल्यामुळे ते अतिशय मऊ आणि खाण्यासाठी खुसखुशीत होतात. त्यात पाणी टाकल्यास त्या कडक बनतात व खाण्यास कठीण होतात. त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा गोड शंकरपाळी (मैद्याची शंकरपाळी) बनवताना त्यात पाणी वापरू नका.

शंकरपाळी कशी बनवायची | शंकरपाळे कसे बनवायचे | शंकरपाळ्या ची रेसिपी | शंकरपाळी रेसिपी मराठी मध्ये (khuskhushit shankarpali recipe in marathi/ shankarpali sweet)
शंकर पाळी तळणे

तसेच शंकरपाळी तळताना तुमच्या पॅन अथवा कढई च्या आकारा नुसार च त्यामध्ये १० ते १२ शंकरपाळ्या टाका, जास्त शंकरपाळ्या एका वेळेस तळायला गेल्यास त्या एकमेकांना चिटकतात. आणि मग खुसखुशीत तळल्या जात नाहीत.

सारांश – शंकरपाळी कशी बनवायची | शंकरपाळी रेसिपी मराठी मध्ये (khuskhushit shankarpali recipe in marathi)

दिवाळी म्हंटले की दिवाळी फराळ तर आलाच, आणि याच फराळातील महत्वाचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी हा आहे. ही शंकरपाळी कशी बनवायची या बद्दलची माहिती आपण वरील लेखामध्ये बघितली आहेच. गोड आणि खारी अशा दोन प्रकारच्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या याची माहिती आपण या लेखामध्ये बघितली. यांखेरीस काही जण आपल्या दिवाळी फराळ मध्ये गोड आणि खारी शंकरपाळी सोबतच तिखट शंकरपाळी देखील बनवतात.

आपल्याला ही शंकरपाळी कशी बनवायची ही मराठी रेसिपी / शंकरपाळ्या ची रेसिपी ( shankarpali recipe in marathi) विषयी माहिती कशी वाटली, आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top